मीर जाफरची आठवण आली

आजची तारीख 23 जून. सकाळी ब्रेकिंग समाचार पाहताना मीर जाफरची आठवण आली. 1757 साली आजच्या दिवशी प्लासीचे युद्ध झाले होते. राबर्ट क्लाईव जवळ अत्यंत कमी सैन्य होते. नवाब सिराजुदौलाच्या सेनापति मीर जाफर जवळ अठरा हजारचे. राबर्ट क्लाईवला विजयाचा पूर्ण विश्वास होता. त्याने नवाबच्या सेनापति मीर जाफरला बंगालचा नवाब बनविण्याचे आश्वासन दिले होते. आता मीर जाफरचे सल्लागार योग्य असते तर त्यांनी सल्ला दिला असता, युद्ध जिंकल्यावर नवाबकडून मोठी जागीर तू सहज पदरात पाडू शकतो. पुढे मागे आपल्या कर्तृत्वाने नवाब ही बनू शकतो. पण दुर्भाग्य एक ही योग्य सल्लागार त्याच्या जवळ नव्हता. क्लाईव युद्ध जिंकला. नवाब सिराजुदौलाचा सर्व खजाना ईस्ट इंडिया कंपनीने गिळंकृत केला. अडीच लाख पेक्षा जास्त रुपईया राबर्ट क्लाईवच्याही खिश्यातही गेला. सत्ता मिळाल्यावर नवाब मीर जाफर स्वत:चे आणि बंगालच्या जनतेचे कल्याण करण्याच्या विचारही करू शकला नाही. ईस्ट इंडिया कंपनीची सतत वाढती भूक पूर्ण कारण्यासाठी त्याला बंगालच्या जनतेलाच पिळावे लागले. राज्यात अराजकता पसरली. तीन वर्षांत त्याची हकाल पट्टी झाली. शेवटी बंगालच्या सत्तेवर ब्रिटीशांचा पूर्ण अधिकार झाला.

हरियाणा विधान सभेचा निकाल लागला. माननीय दुष्यंत चौटालाच्या पार्टीला 10 जागा मिळाल्या. त्यालाही मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखविल्या गेले होते. पण दुष्यंतने उपमुख्यमंत्री बनण्यात धन्यता मानली. राजनीतीत दुसर्‍यांचे उपकार घेण्यापेक्षा दुसर्‍यांवर उपकार करणे नेहमीच फायद्याचे असते. सत्तेची मलई चाखत तो हरियाणात त्याच्या पक्षाला अधिक सदृढ करू शकतो. शिवाय त्याच्या सोयीने योग्य वेळी सत्तेतून बाहेर ही पडायचा मार्ग मोकळा. आज त्याच्या निर्णय योग्य होता, याची खात्री त्याला निश्चित झाली असेल.

दुर्भाग्य माननीय उद्धव ठाकरे जवळ योग्य सल्लागार नव्हते. जे होते ते बहुधा मा. उद्धव एवजी मा. शरदजींने हित साधणारे होते. आपले अधिकान्श मतदार हे कॉंग्रेस विरोधी हिंदुत्ववादी विचारधारेचे आहे, ह्याचाही मा. उद्धवजींना विसर पडला. मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात मोठी किंमत मा. उद्धवजींना द्यावी लागली. सत्तेची सर्व मलाई आजच्या राबर्ट क्लाईवच्या खिश्यात गेली. शिवसेनेच्या आमदारांवर ताकावर गुजराण करण्याची वेळ आली. याशिवाय पालघर ते चितळे पर्यन्त होणारे घटनाक्रम, तरुंगात असलेल्या मंत्र्यांविरुद्ध ही कारवाई करण्याची हिम्मत नसलेला मुख्यमंत्री इत्यादि, राज्यात भाजपला मजबूती प्रदान करत होते. आज सकाळी यू ट्यूब वर बीएमसीचे महिन्यापूर्वीचे ओपिनियन पोल पाहीले. शिवसेनेला फारच कमी जागा मिळत आहे असे चित्र आहे. साहजिकच आहे, याची जाण अधिकान्श शिवसेनेच्या आमदारांना ही असेलच, की असेच चालत राहिले तर, पुढची निवडणू जिंकणे अशक्य आहे. स्वत:चे राजनीतिक अस्तित्व सुरक्षित करणे हा प्रत्येक राजनेत्याचा धर्मच असतो. बंडखोर शिवसैनिक ही तेच करत आहे.

बाकी इतिहासात मीर जाफर सोबत मा. उद्धवजींचे नाव ही घेतले जाणार, हेच दुर्भाग्य त्यांच्या नशिबात येणार.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अरे वा. चांगलीये तुमची स्मरणशक्ती. अनेकांना शिंदेंची भाजपला जाऊन मिळण्याची धडपड पाहून मीर जाफर आठवला असेल. कपटी क्लाइव्हला सामिल होऊन आपल्या नेत्याला धोका देणारा.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बहुतेक तुम्हाला इतिहासाचे ज्ञान नाही. शाळेकरी मुलाला ही माहीत आहे. मीर जाफर हा सिराजुदौलाचा सेनापति होता. त्याने दगाबाजी केली होती. तो क्लाईवच बाहुला अर्थात बंगालचा नवाब झाला. आता या शतकात मीर जाफरचे जुने सहकारी पुन्हा सिराजुदौलाला जाऊन मिळाले. बहुतेक क्लाईवचे राज्य जाणार असे आसार आहे. बाकी वय झाले असले तरी क्लाईव पण कमी चतुर नाही, हे ही लक्षात ठेवले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता जे माकड चाळे राजकारणात चालले आहेत त्याच्या शी लोकांना काही देणे घेणे नाही.
लोकांच्या प्रश्न न पेक्षा ,देशाच्या प्रश्न न पेक्षा माकड
चाल्याना जास्त किंमत आली आहे.
मीडिया वर २४ तास हेच चालू आहे,राजकीय लोक ह्याच विषयावर बोलत आहेत.
लोकांच्या समस्येवर कोणीच बोलत नाही.
ही असली लोकशाही असण्या पेक्षा ब्रिटिश काय वाईट होतें

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असले राजकारण करायला देश स्वतंत्र केला आहे का?

ही असली लोकशाही असण्या पेक्षा ब्रिटिश काय वाईट होतें

अगदी खरे आहे! देश ब्रिटिशांना परत देऊन टाकला पाहिजे!

पण अडचण अशी आहे, की देश ब्रिटिशांना परत देऊन टाकायचा म्हटला, तर होता त्या स्थितीत जसाच्या तसा परत करावा लागणार. मग प्रश्न असा पडतो, की भारत तर आपण देऊन टाकू, परंतु पाकिस्तान, बांग्लादेश यांचे काय करायचे? (फक्त भारतच काय म्हणून द्यायचा?) ते देऊन टाकणे तर आपल्या नियंत्रणात नाही. मग कसे करायचे?

आणि, होता त्या स्थितीत द्यायचा म्हटला, तर मग गोवा, पाँडिचेरी, झालेच तर सिक्कीम, वगैरे हे जे काही 'होता त्या स्थितीत' नसलेले भाग आता भारतात आहेत, त्यांचे काय करायचे? (ते ब्रिटिशांना काय म्हणून द्यायचे? मग पोर्तुगीजांना, फ्रेंचांना, परत बोलवायचे काय? झालेच तर, सिक्कीमचा जो कोणी राज्यकर्ता होता, त्याचा जिवंत असलेला वारस शोधून त्याला गादीवर बसवायचा काय?)

आणि, ती कितीतरी शे किंवा हजार संस्थाने जी तुकड्यातुकड्यांमध्ये होती, त्यांचे काय? त्यांचे प्रत्येकाचे जिवंत वारस शोधत बसावे लागणार नाहीत काय, ब्रिटिशांना देण्यापूर्वी गादीवर बसवण्यासाठी? पिडाच की ती! (आता तुम्हीच 'टुकड़े-टुकड़े'ची भाषा करू लागलात, म्हटल्यावर कठीण आहे!) एवढे कोण करत बसणार?

त्यापेक्षा भारत सध्या आहे तसा बरा आहे!

(शिवाय, ब्रिटिशांना द्यायचा, म्हटल्यावर, मुळात ब्रिटिशांना आता परत हवाय काय, याचा विचार कोणी केला आहे काय? उगाच झ** गा** ब्रिटिश कशाला अंगावर घेऊ पाहातील? लाथांच्या सुकाळाचा प्रसाद मिळणार नाही काय त्यांना? उगाच आपले काहीतरी!)

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता जे माकड चाळे राजकारणात चालले आहेत त्याच्या शी लोकांना काही देणे घेणे नाही.
लोकांच्या प्रश्न न पेक्षा ,देशाच्या प्रश्न न पेक्षा माकड
चाल्याना जास्त किंमत आली आहे.
मीडिया वर २४ तास हेच चालू आहे,राजकीय लोक ह्याच विषयावर बोलत आहेत.
लोकांच्या समस्येवर कोणीच बोलत नाही.
ही असली लोकशाही असण्या पेक्षा ब्रिटिश काय वाईट होतें

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदी किंवा भारताची मीडिया देशाचे प्रश्न आणि देशासमोरील आव्हान ह्या वर बोलत नाही

आयटी सेल हा मूर्ख विभाग तर डोक्याला ताप आहे.

ह्या असल्या देशाचे भवितव्य काय.

आणि सर्वात महत्वाचे भारतीय लोक मेंदू कमी वापरतात आणि भावनिक जास्त असतात.
मेंदू भारतीय लोकांनी वापरावा ह्या वर काही शोध वैगेरे लागणार आहे की नाही.
हिंदू धोक्यात असे सांगितले की हिंदू बहु संख्य असून पण ह्यांना असुरक्षित वाटते
मेंदू विचार करण्यासाठी दिला आहे की फक्त भावना निर्माण करण्यासाठी

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

राजेश188 आणि नवी बाजू तुम्ही दोघांच्या प्रतिकिर्या विषयाला धरून नाही. तरीही लोकतांत्रिक देशांत मतभेद ही सामान्य बाब आहे. बाकी ब्रिटीशांनी देशाला किती लुटले हे ही तपासून पहा. एका शिक्षित आणि जगातील 34 टक्के विदेशी व्यापार असणार्‍या देशाला कंगाल आणि अशिक्षित बनवून सोडले. गुलामीच्या मानसिकतेने मुक्त व्हा. खानदानी गुलामीतून मुक्तिचा संघर्ष अनेक दशकांपासून देशात सुरूच आहे.
बाकी देशा बाबत बोला. तुम्ही शिक्षित आहात हे ग्रहित धरतो. सर्व मंत्रालयांच्या वेबसाइट वर जाऊन 2004 ते 2020 चे त्यांचे कार्य तपासून पहा. गेल्या 8 वर्षातील उन्नती तुम्हाला सहज दिसून येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय हुशार केंद्र सरकार आणि पंत प्रधान भारताला लाभले आहे

2014 पासून च दर्जा हिन सरकार भारतात आहे
भारताचे आर्थिक मूल्य मापन 2014 पासून च केले पाहिजे.
गणिती आकडे वारी आणि गुलाम सरकारी अहवाल ह्या वर नाही .
तटस्थ यंत्रणेच्या अहवालावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगातील सर्वात गरीब ज्या देशात राहतात त्या यादीत भारताचे पण नाव आहे गरीब लोकांच्या संख्येवरून .भारत पहिल्या पाच देशात आहे.
भारतात जगातील अतिशय गरीब लोकांची संख्या जास्त आहे.
प्रगती,उन्नती झाली असेल तर फक्त नेते,भारत सरकार,आणि ठराविक वर्ग.
लोकांची नाही झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात सर्व गोष्टीचे सर्व्ह होतात घरोघरी जावून जावून
जनगणना घरोघरी जावून
पोलिओ डोस घरोघरी जावून.
आधार कार्ड घरोघरी जावून.
पण जगात एका तरी देशाने घरोघरी जावून आर्थिक सर्व्ह केला आहे का?
माझ्या माहिती प्रमाणे जगातील एका पण देशाने घरोघरी जावून आर्थिक सर्व्हे केला नाही.
उन्नती ,प्रगती कशी ठरवतात..
गणिती मॉडेल वर.
Gdp पासून purchesing पॉवर,विदेशी मुद्रा भंडार
जे काही आर्थिक स्थिती चे निर्देशांक आहेत.
ते सर्व गणिती मॉडेल वर आहेत.
त्या मधून देशातील लोकांची खरी आर्थिक स्थिती कधीच माहीत पडत नाही.
गरीब जनता आणि श्रीमंत सरकार.
काहीच श्रीमंत ,बाकी सर्व सर्व गरीब.
अशी स्थिती असणारे देश गणिती मॉडेल वर श्रीमंत गणले जातात .
पण ते साफ चुकीचे असते.
प्रतेक दोन वर्षा नी घरोघरी जावून आर्थिक स्थिती चा सर्व्हे केला तर ..
जागतिक सर्व देश त्यांची सरकार पूर्ण नागडी होतील.
पूर्ण अब्रू जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

सर्व्हे करताना कोणते प्रश्न विचारावेत?
कोणती माहिती गोळा करावी ? असे तुम्हाला वाटते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देशातील प्रतेक कुटुंबाची माहिती
कुटुंब मध्ये किती लोक राहतात.
आणि त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पादन किती आहे.

ह्याची डिटेल माहिती.
असा सर्व्हे केला तर भारत हा सर्वात जास्त गरीब लोक राहणार जगातील देश ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा कंपू सोडून बाकी ठिकाणी तुमच्या मत कडे जोक म्हणून च बघितले जाते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देशातील एका पण व्यक्ती वर अन्याय होता कामा नये.
देशातील एक पण व्यक्ती आपल्या गरजा भागवण्ासाठी असक्षम नसावी.
बाकी तुम्ही काय गोंधळ घालायचा आहे तो घालणं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीर जाफरचा सेनापति बंगालच्या गादीवर सिराजुदौलाच्या मदतीने स्थानापन्न झाला. असो. बाकी राजेशजी सात वर्षांत 45 कोटी गरीबांना प्रथमच बँक खाते मिळाले. सरकारी योजनांचा लाभ थेट खात्यात मिळू लागला. गळती बंद झाली. तुमच्याच मते गरिबांची गरज भागविण्याचे कार्य प्रथमच खर्‍या अर्थाने गेल्या 8 वर्षांत झाले आहे. निश्चितच दुसर्‍या पूर्वर्ती शासकांपेक्षा मोदीजींनी उत्तम कार्य केले आहे. हे तरी मान्य करावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0