ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते

आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः।
पितरंच प्रयन्त्स्व:॥
ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य

(ऋ. १०/१८९/१)

अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची परिक्रमा करते.

ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच.

गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते. इथे "गौः" शब्दाचा अर्थ पृथ्वीच का? हा प्रश्न मनात येईलच? याचे स्पष्टीकरण:

वरील ऋचाची ऋषिका सार्पराज्ञी आहे.

पहिली देवता सार्पराज्ञी आहे. आपली आकाशगंगाहि सर्पिल आहे. अंतरिक्षात ती सापासारखी कुंडली मारलेल्या अवस्थेत दिसते. बहुतेक ऋषिकाने आकाशगंगेला सार्पराज्ञी असे संबोधले असावेत.

दुसरी देवता सूर्य आहे. भक्त हा आपल्या देवतेची परिक्रमा करतो, हि आपली प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. ऋचेत गमन करणारी वस्तू सूर्याची परिक्रमा करत आहे. दृष्टा ऋषिका आपल्या पृथ्वीवरच राहणारी मानव होती. तिने आयुष्यभर दिवस-रात्र जागून खगोल विज्ञानाचे विशेषकरून आपल्या आकाशगंगेचे अध्ययन केले असेल म्हणून तिचे नावहि सार्पराज्ञी असे पडले असावे. तिला झालेल्या साक्षात्काराचे वर्णन तिने छंदबद्ध भाषेत वरील ऋचेत केले आहे. पृथ्वीसाठी "गौः" हा शब्द वापरला. तिच्यामुळे जगाला कळले कि पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते.

टीप: ऋचेचा अर्थ वेद पोर्टल वरून घेतलेला आहे आणि आचार्य बालकृष्णच्या "वेदों शिक्षाएँ" या पुस्तकातून पुन्हा तपासून पाहिला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

>>>>>ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण.................ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही

ऋग्वेद आणि सगळेच वेद हे अपौरुषेय (म्हणजे कोणा ऋषींनी रचलेले नसून आकाशवाणी किंवा तत्सम मार्गाने ज्ञात झाले) असतील तर ते माहिती असलेल्या ऋषींना श्रेय नेमके कशाबद्दल द्यावे याचा खुलासा करावा ही विनंती.

वेदात सगळं ज्ञान आहे + वेद अपौरुषेय आहेत ही दोन विधाने आमच्या सर्व प्राचीन ऋषीमुनींच्या कार्याला मातीमोल ठरवतात हे या वैदिक-भक्त लोकांच्या लक्षात येत नाही का?

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऋग्वेद आणि सगळेच वेद हे अपौरुषेय (म्हणजे कोणा ऋषींनी रचलेले नसून आकाशवाणी किंवा तत्सम मार्गाने ज्ञात झाले) असतील तर

बाकीच्या वेदांबाबत माहीत नाही, परंतु केवळ ऋग्वेदापुरतेच बोलायचे झाल्यास, त्याचे पश्चिम पंजाबाच्या आसपासचे रचनास्थान लक्षात घेता, ऋग्वेद हा रेडिओ पाकिस्तानमार्गाने ज्ञात झाला असण्याची शक्यता अधिक वाटत नाही काय?

(वेदांत जर सगळेच होते, तर मग वेदांत अनुक्रमे पाकिस्तान आणि रेडिओ पाकिस्तानसुद्धा का असू नयेत?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वीच्या आकर्षण शक्तीमुळे वर फेकलेली प्रत्येक वस्तू खाली पडते. ज्याला ज्ञानाचा साक्षात्कार झाला झाला आणि त्याने जगाला माहिती दिली तो ऋषि इति. वेदांच्या बाबतीत हे असेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वीच्या आकर्षण शक्तीमुळे वर फेकलेली प्रत्येक वस्तू खाली पडते.

असो.

(आमच्या अमेरिकन भाषेत एक वाक्प्रचार आहे: Throw everything at the wall and see what sticks. त्याची आज या निमित्ताने प्रकर्षाने आठवण झाली.)

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(प्रतिसाद योग्य जागी हलविला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिने आयुष्यभर दिवस-रात्र जागून खगोल विज्ञानाचे विशेषकरून आपल्या आकाशगंगेचे अध्ययन केले असेल ...

मलाही पहाटे आणि संध्याकाळी झोपायला आवडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तिने आयुष्यभर दिवस-रात्र जागून खगोल विज्ञानाचे विशेषकरून आपल्या आकाशगंगेचे अध्ययन केले असेल ...

दिवसा जागून आकाशगंगेचे अध्ययन कसे करता येईल?

(अगदी ‘वेदांचे आर्क्टिक घर’, सहा महिन्यांचा दिवस नि सहा महिन्यांची रात्र, वगैरे मानले, तरीसुद्धा? जे काही पाहायचे, ते सहा महिन्यांच्या रात्रीतच पाहावे लागणार. सहा महिन्यांच्या दिवसात आकाशगंगा तरीही दिसायचीच नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिवसा सूर्याचा प्रकाश वजा करून पार्श्वभूमीचे तारे तेवढे दाखवणारी दुर्बीण आपल्या सर्वज्ञ पूर्वजांनी लाखो वर्षांपूर्वीच शोधली होती, कांय समजलांत?

आणि आपल्या आकाशगंगेव्यतिरिक्त इतर शेकडो अब्ज दीर्घिका विश्वात आहेत, हे पटाईत काकांस माहीत नाही ह्मणून. नाहीतर तिने त्यांचेही अध्ययन तेंव्हाच केले असते बरें!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

आणि आपल्या आकाशगंगेव्यतिरिक्त इतर शेकडो अब्ज दीर्घिका विश्वात आहेत, हे पटाईत काकांस माहीत नाही ह्मणून. नाहीतर तिने त्यांचेही अध्ययन तेंव्हाच केले असते बरें!

माहीत नसेलच, असे नाही. परंतु, (हिंदूंकरिता) आकाशगंगेचे अनन्यसाधारण महत्त्व हे आपल्या जागी निर्विवाद आहे.

हो, उगाच कोठल्यातरी आकाशमुळामुठेचे नाहीतर आकाशआंबीलओढ्याचे अध्ययन करण्यात काय पॉइंट आहे?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सूक्ताची देवता सूर्य आहे, आणि सूक्तातील वर्णन सूर्याचे आहे (पृथ्वीचे नव्हे!)

पहिल्या ऋचेचा पदपाठ : आ । अयम् । गौः । पृश्निः । अक्रमीत् । असदत् । मातरम् । पुरः ।
पितरम् । च । प्रऽयन् । स्वरिति स्वः ॥

आणि योग्य भाषांतर खालीलप्रमाणे:

"हा चपळ, विविधरंगी वृषभ (सूर्य) आला आहे, आणि आपल्या मातेसमोर (पृथ्वी) पूर्वेस (थोडा) बसून (मग) आपला पिता जो स्वर्ग, त्याच्याकडे जलद गतीने चालला आहे."

यात काही खगोलविषयक कल्पना असलीच, तर ती "सूर्य पृथ्वीच्या पूर्वेकडून आकाशात जातो" अशीच आहे. आणि सूर्य हा स्वर्ग आणि पृथ्वी यांचा पुत्र अशी कविकल्पना आहे.

बाकी आकाशगंगा, तिचा सर्पिल आकार, वगैरेंचा सूक्ताशी काडीमात्र संबंध नाही!!

पटाईत काकांच्या कल्पनाशक्तीला मात्र माझा सलाम!

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

बाण मारायचा आणि मग वर्तुळ काढायचं, हा वाक्प्रचार ऐकला असालच!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अयं गौः (हा बैल) याची आयमाय गाय करून टाकली आहे मूळ लेखात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गुन्ह्याबद्दल मूळ लेखकाला तसेच मूळ लेखातील भाषांतर जेथून उचलले त्या स्रोताच्या कर्त्याला, गोहत्येच्या गुन्ह्याकरिता जे काही प्रायश्चित्त गोमातेच्या सत्पुत्रांच्या (पक्षी: वृषभांच्या) राष्ट्राच्या कायद्यांनुसार लागू असेल, ते का देण्यात येऊ नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय ज्ञानाच्या प्रति पूर्वग्रह ग्रसित संस्कृत भाषेचे अल्प ज्ञान असलेल्या विदेशी विद्वानांनी त्यांच्या सोयीने केलेले भाष्यावर आधारित तुमचा प्रतिसाद आहे. मी दिलेला अर्थ प्रसिद्ध वैदिक विद्वान डॉक्टर ब्रह्ममुनी यांच्या वैदिक पोर्टल वरून घेतला आहे. त्यांचे हिंदी भाष्य "पृथिवी पूर्व की ओर घूमती है और सूर्य के चारों ओर आकाश में गति करती है ॥१॥" समस्त भारतीय विद्वान ज्यांनी व्याकरण शास्त्र आणि वेदांचा अभ्यास केलेला आहे स्वामी दयानंद ते आणि आचार्य बालकृष्ण पर्यंत हेच भाष्य केलेले आहे.

१. चुकीच्या भाष्यात गौः शब्दाचा अर्थ वृषभ असा केलेला आहे. पण ऋग्वेदात पुलिंग बैल शब्दासाठी वृषभ हा शब्द वापरला आहे. याच मंडळातील १०२ वे सुक्त. म्हणजे समकालीनच.

नि । अ॒क्र॒न्द॒य॒न् । उ॒प॒ऽयन्तः॑ । ए॒न॒म् । अमे॑हयन् ।वृ॒ष॒भम् । मध्ये॑ । आ॒जेः । तेन॑ । सूभ॑र्वम् । श॒तऽव॑त् । स॒हस्र॑म् । गवा॑म् । मुद्ग॑लः । प्र॒ऽधने॑ । जि॒गा॒य॒ ॥ १०.१०२.५
२. याशिवाय ऋग्वेदातील शाकल शाखा, ब्राम्हण ग्रंथात ऐतरेय (३/४४ ) मध्ये हि स्पष्ट केले आहे सूर्य स वा न कदाचनास्तमेति नोदेति ....इति
३. बाकी भक्त देवतेची परिक्रमा करतात. देवता नाही. शिवाने गणेशाची परिक्रमा केलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ऋग्वेदात पुलिंग बैल शब्दासाठी वृषभ हा शब्द वापरला आहे.

पुलिंग बैल बोले तो, जुवाला जोडलेला, गाडी ओढणारा बैल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट3
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“भारतीय ज्ञानाच्या प्रति पूर्वग्रह ग्रसित संस्कृत भाषेचे अल्प ज्ञान असलेल्या विदेशी विद्वानांनी त्यांच्या सोयीने केलेले भाष्यावर आधारित तुमचा प्रतिसाद आहे. मी दिलेला अर्थ प्रसिद्ध वैदिक विद्वान डॉक्टर ब्रह्ममुनी यांच्या वैदिक पोर्टल वरून घेतला आहे.”

संस्कृत भाषा येणारे, स्वत: विचार आणि भाषांतर करू शकणारे लोक “ऐसी” वर आहेत. दिलेल्या भाषांतराचा तर्कशुद्ध प्रतिवाद तुह्मी स्वत: जरूर करा. चुका असल्यास त्या स्वीकारून दुरुस्त केल्या जातील. पण उगीच कुणा फलाण्या-ढिमक्यांनी केलेली भाषांतरे “बाबा वाक्यं प्रमाणं” म्हणून उद्धृत करू नका, ही विनंती.

  • ‌मार्मिक7
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

ऋग्वेदात सूर्यला सूर्यच म्हंटले आहे. "गौ" नाही. पाश्चात्य तिन्ही विद्वानांना संस्कृत भाषेचे विशेष ज्ञान नव्हते. कुणीही पाणिणी व्याकरण, निरुक्त,धातूपाठ इत्यादि अध्ययन केलेले नव्हते. जे आम्हाला माहीत नाही यांना कसे माहीत होते. मग आपल्या सोयी नुसार गायीला (स्त्री लिंग ) पुलिंगी सूर्य बनवून टाका. आणि शिक्षित गुलाम, साहेबांनी जे लिहले तेच सत्य. असो.

नमो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ चक्ष॑से म॒हो दे॒वाय॒ तदृ॒तं स॑पर्यत ।
दू॒रे॒दृशे॑ दे॒वजा॑ताय के॒तवे॑ दि॒वस्पु॒त्राय॒ सूर्या॑य शंसत ॥ १॥ (10/37/1)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

तेथील या ऋचेचा दुवा :

https://xn--j2b3a4c.com/en/rigveda/10/189/1

आयं गौः पृश्नि॑रक्रमी॒दस॑दन्मा॒तरं॑ पु॒रः ।

अजून मूळ ऋचा पूर्ण बदलायची लबाडी हा वेबसाईटवाल्यांना सुचलेली नाही.

अर्धवट लबाडी जमली आहे :
आ अयम् (पुल्लिंगी) आणि संस्कृतात पृथ्वी तर स्त्रीलिंगी! म्हणून भाषांतरात काहीतरी पुल्लिंगी शब्द घालायचे सुचले :

(आ अयम्) यह पृथिवीलोक

पण इथे लबाडी जमली नाही, म्हणून मूळ शब्दांचा उल्लेख बदलला, मुळात "पृश्निर" (प्रथमा एकवचन) आहे, आणि उल्लेख "अयं गौः पृश्निर्" विशेषणे विशेष्ये एकाला एक जोडून आहेत

(मातरं पृश्निम्) मातारूप अन्तरिक्ष को

आधी आधी "पृश्नि" दूरच्या "मातरं"ला जोडले; आणि पृश्निम् (द्वितीया एकवचन) केले!

थोड्याच दिवसांत मूळ वैदिक ऋचाही बदलून वेबसाईटवरती टाकतील. मग मजा -- तुमच्याकडे मूलपाठ्य आहे, तसे आमच्याकडे आम्ही म्हणतो तसे "मूल"पाठ्य आहे!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

...that which is adequately explained by stupidity. - Hanlon's razor.

(आमची पुस्ती: ...or sheer incompetence.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

alternative facts

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खोटा प्रतिसाद देऊन खोटे सत्य होत नाही. ऋचेत कुठलाही बदल केलेला नाही. तपासून बघितले आहे. स्वामी दयानंद ते डॉक्टर ब्रह्ममुनी सर्व भारतीय संस्कृत पंडित मूर्ख आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला कारण सर्वांनी हाच अर्थ केला आहे. ऋग्वेदातील ऋग्वेदातील शाकल शाखा, ब्राम्हण ग्रंथात ऐतरेय (३/४४ ) मध्ये हि स्पष्ट केले आहे सूर्य स वा न कदाचनास्तमेति नोदेति ....इति लिहिणारा हि असत्य बोलतो आहे असे म्हणायचे आहे का. संस्कृत भाषेत एका वाक्यातील शब्दांना पुढे मागे केले तरी अर्थ बदलणे संभव नाही. किमान एवढे तरी माहित असायला पाहिजे. असो. ऐसी वर असेच प्रतिसाद मिळतील हि अपेक्षा होतीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

“ संस्कृत भाषेत एका वाक्यातील शब्दांना पुढे मागे केले तरी अर्थ बदलणे संभव नाही.”.

हा तर विनोदच! एकही अक्षर न बदलतां अर्थ किती बदलू शकतो याची उदाहरणे संस्कृतात शेकड्याने आहेत. वानगीदाखल:

१. अहं च त्वं च राजेंद्र लोकनाथौ उभौ अपि । बहुव्रीहिरहं राजन् षष्ठी तत्पुरुषो भवान् ।

२. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत: पितरौ वंदे पार्वतीपरमेश्वरौ / पार्वतीप रमेश्वरौ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

ऐसी वर असेच प्रतिसाद मिळतील हि अपेक्षा होतीच.

तेथे 'मिसळपाव.कॉम' या संस्थळावरसुद्धा याच लेखाला असेच (किंवा, कदाचित याहूनही वाईट साले काढणारे) प्रतिसाद आलेत. कदाचित तेथे तसे ते मिळतील, ही अपेक्षा नसावी, किंवा कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगवेगळ्या विचारधारा न चा प्रचार ,प्रसार करण्यासाठी मराठी संकेत स्थळ चालत असतील तर कठीण आहे.
सत्याला सत्य म्हणून कोणत्याच संकेत स्थळावर स्वीकारले जाणार नाही.
स्वतची बुध्दी हे असत्य आहे असे सांगत असली तरी असत्य च स्वीकारले जाईल.
ह्याचा अर्थ सत्या शी कोणाला देणेघेणे नाही माझ्याच विचार सरणी चा प्रचार ,प्रसार झाला पाहिजे हेच कर्तव्य.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुह्मास नक्की काय ह्मणायचे आहे ते सोप्या शब्दात लिहाल कां? जमल्यास या धाग्याच्या संदर्भात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

धाग्याशी संबंधित असावा व त्याचा अर्थ कळावा ही आपली अपेक्षा व्यर्थ आहे असे आपणास वाटत नाही का?

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे, तुम्हाला एवढे अवघडअवघड संस्कृत समजते, पण तुम्हालासुद्धा ते काय लिहितात, त्यातून काही अर्थबोध होत नाही ना?

अहो, ब्रह्मदेवालासुद्धा ज्यातून काही अर्थबोध होत नाही - आणि, ब्रह्मदेवालासुद्धा भारी संस्कृत समजत असले पाहिजे, अशी आमची अटकळ आहे - ते तुम्हाला समजेल, अशी अपेक्षा तुम्ही करूच कशी शकता?

(ब्रह्मदेवाचे सोडा. ते जे काही लिहितात, ते त्यांचे त्यांना तरी समजते की नाही, याबद्दल मला शंका आहे. अर्थात, त्यांना मजबूत संस्कृत समजते, अशा प्रकारचा कोणताही आरोप मी त्यांच्यावर करू इच्छीत नाही, हे येथे स्पष्ट करणे प्राप्त आहे. असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वामी दयानंद ते डॉक्टर ब्रह्ममुनी सर्व भारतीय संस्कृत पंडित मूर्ख आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला

नाही. मूर्ख नव्हेत. परंतु, भोंदू आहेत, अशी (तुमच्या भाषेत सांगायचे, तर) 'तीव्र आशंका' आहे.

बाकी, (एक ढूँढो, तो हजार मिलते हैं, त्यामुळे) चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट3
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“ ऋचेचा अर्थ वेद पोर्टल वरून घेतलेला आहे आणि आचार्य बालकृष्णच्या "वेदों शिक्षाएँ" या पुस्तकातून पुन्हा तपासून पाहिला.”

हा आचार्य बालकृष्ण म्हणजे “पतंजलि” चा बनिया चालक की काय?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

आचार्य बाल्कृष्ण म्हणजे ज्यांच्या पुस्तकाचे सर्वात जास्त विदेशी भाषेत अनुवाद होतात. ज्यांनी भारतातील लुप्तप्राय औषधी वनस्पतींना जीवनदान दिले. आयुर्वेदाला आधुनिक अनुसंधानाशी जोडले. जगात योग आणि आयुर्वेदाचे नाव केले. https://www.aninews.in/news/national/general-news/acharya-balkrishna-rec...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आचार्य बाल्कृष्ण म्हणजे ज्यांच्या पुस्तकाचे सर्वात जास्त विदेशी भाषेत अनुवाद होतात. ज्यांनी भारतातील लुप्तप्राय औषधी वनस्पतींना जीवनदान दिले. आयुर्वेदाला आधुनिक अनुसंधानाशी जोडले. जगात योग आणि आयुर्वेदाचे नाव केले.

असतील ब्वॉ.

बादवे, हे आचार्य बालकृष्ण, झालेच तर ते डॉ. ब्रह्ममुनी, हे सर्व बोले तो, प्रा. अद्वयानंद गळतगे यांचे नक्की कोण म्हणे?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले दिवाळखोरी दाखवू नका. बाकी ऋग्वेदात सूर्यला सूर्यच म्हंटले आहे. "गौ". पाश्चात्य तिन्ही विद्वानांना संस्कृत भाषेचे विशेष ज्ञान नव्हते. कुणीही पाणिणी व्याकरण, निरुक्त,धातूपाठ इत्यादि अध्ययन केलेले नव्हते. जे आम्हाला माहीत नाही यांना कसे माहीत होते. मग आपल्या सोयी नुसार गायीला (स्त्री लिंग ) पुलिंगी सूर्य बनवून टाका. आणि शिक्षित गुलाम, साहेबांनी जे लिहले तेच सत्य. असो.

नमो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ चक्ष॑से म॒हो दे॒वाय॒ तदृ॒तं स॑पर्यत ।
दू॒रे॒दृशे॑ दे॒वजा॑ताय के॒तवे॑ दि॒वस्पु॒त्राय॒ सूर्या॑य शंसत ॥ १॥ (10/37/1)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

तुह्माला कोपरापासून नमस्कार!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

कृपया आपल्या प्रतिसादाच्या (शालजोडीतल्या) शीर्षकाचे स्पष्टीकरण सोबत जोडावे, ही विनंती; अन्यथा, आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे, ते त्यांच्या डोक्यावरून जाईल.

(टू बी फेअर, यथा बाधति बाधते-वाली ष्टोरी आमच्या लहानपणी आम्हालाही (आमच्या जाणकार वडीलधाऱ्यांकडून) ऐकविण्यात आलेली होती, त्यामुळे आमच्या परिचयाची खरे तर असायला हवी होती. परंतु, त्या विषयी पुढे अधिक रस न घेतल्याकारणाने ती पूर्णपणे विस्मरणात गेलेली होती. त्यामुळे, शीर्षक पाहून 'अरेच्या! हे पूर्वी कधीतरी ऐकलेले आहे!', याची अनुभूती आली, आणि, याच्यात काहीतरी खोच आहे, एवढे चटकन् लक्षात आले, परंतु रेफरन्स लागेना. आमची सेव्हिंग ग्रेस एवढीच, की, कुतूहलापोटी म्हणा, किंवा 'तिच्यामारी, आपल्याला लहानपणी जे ऐकविण्यात आले होते - आणि ज्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केले होते - ते शिंचे होते तरी काय?', हे बघण्यासाठी म्हणा, आम्ही लगेच गुगलून पाहिले. गूगलशोधपरिणामांत वाटेल त्या ऐऱ्यागैऱ्यांनी आपापल्या मगदुराप्रमाणे केलेल्या कथनांच्या काटछेदातूनसुद्धा बऱ्यापैकी रेफरन्स लागला. (पटाईतकाका तसे काही करतील, याबद्दल साशंक आहे. आचार्य बालकृष्ण - झालेच तर ते कोण ते डॉ. ब्रह्ममुनी - प्रभृति मंडळींनी ठोकून दिलेल्याखेरीज इतर जे काही संस्कृत आहे, ते त्यांच्याकरिता बहुधा औट-ऑफ-सिलॅबस असावे. (चूभूद्याघ्या.)))

इंग्रजी शिक्षणाच्या परिणामामुळे म्हणा, किंवा आमच्या निव्वळ करंटेपणामुळे म्हणा (हो, इंग्रजी शिक्षणाच्या नावाने कशाला विनाकारण खडे फोडा?), आम्हाला आमच्या लहानपणी (आमच्या सुदैवाने म्हणा, किंवा निव्वळ कर्मधर्मसंयोगाने म्हणा) आमच्या घरातच बऱ्यापैकी एक्स्पोझर असूनसुद्धा आम्ही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, हा आमचा दोष. या (जाणूनबुजून) अज्ञानातून आमचे पुष्कळ नुकसान झाले (जसे, वरील उदाहरणातील नेमकी खोच आम्हाला त्वरित कळली नाही), हे आम्ही मुळीच अमान्य करीत नाही. मात्र, (उदाहरणादाखल) पटाईतकाकांच्या अज्ञानामुळे, आपल्याला कोणी शालजोडीतील ठेवून दिलेली आहे, हे त्यांच्या गावीही नसल्यास, संस्कृतच्या अज्ञानातून होणारे हे सांस्कृतिक नुकसान (नेमके कोणाचे, शालजोडीतील ठेवून देणाऱ्याचे, की ज्याला/जिला ठेवून देण्यात आलेली आहे, त्याचे/तिचे, याबद्दल ज्यूरी अजूनही बाहेर आहे.) हे आमच्या नुकसानापेक्षा कित्येक पटींनी अधिक नव्हे काय?

(एखाद्याला ठेवून द्यावी, आणि आपल्याला कोणी ठेवून दिलेली आहे, हे त्याला समजूही नये ना! हा हन्त हन्त! मॅकॉले मुर्दाबाद!)

----------

तरी म्हणतो, आपल्या प्रतिसादाच्या शीर्षकाचे गाइड काढण्याचे कृपया एकदा मनावर घ्याच! केवळ जनहितार्थ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते त्यांना समजावून सांगणे हे “शिरसि मा लिख मा लिख मा लिख” कॅटॅगरीतील होईल.

“आई गं ऽऽ माझ्या डोक्यात तीन लिखा आहेत”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

…आकाशवाणीवरील संस्कृत बातम्या हा प्रकार आजचा नव्हे, तर गेला बाजार आमच्या लहानपणापासून (बोले तो, अव्वल काँग्रेसी अमदानीत, त्यातही इंदिरा राजवटीत) आहे. कदाचित त्याअगोदरही (बोले तो, नेहरू किंवा शास्त्री राजवटीत) असू शकेल; कल्पना नाही.

सांगण्याचा मतलब, साठ वर्षांच्या नालायक काँग्रेसी राजवटीचे हे योगदान असावे; हिंदुत्ववाद्यांच्या ‘अच्छ्या दिनां’चे नव्हे. (त्याचा उपयोग नक्की काय नि कोणाला, हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू. तूर्तास, लेट अस जस्ट फोकस ऑन गिविंग क्रेडिट व्हेअर क्रेडिट इज़ ड्यू.)

यात गमतीचा भाग असा, की आकाशवाणीवरील आमच्या लहानपणीच्या (बोले तो, अव्वल काँग्रेसी राजवटीतल्या) संस्कृत वृत्तनिवेदकांचे उच्चार हे बऱ्यापैकी अचूक नि स्वच्छ असत, असे स्मरते. आयरॉनिकली, आजमितीस (बोले तो, हिंदुत्ववाद्यांच्या ‘अच्छ्या दिनां’त) त्यांचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठल्याच तऱ्हेच्या rigour (तुमच्या भाषेत rigor) चे हिंदुत्ववाद्यांस वावडेच असते. IQ कसाबसा दोन अंकी असल्यावर तसे होणारच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

ज्यांच्या पुस्तकाचे सर्वात जास्त विदेशी भाषेत अनुवाद होतात. ज्यांनी भारतातील लुप्तप्राय औषधी वनस्पतींना जीवनदान दिले. आयुर्वेदाला आधुनिक अनुसंधानाशी जोडले. जगात योग आणि आयुर्वेदाचे नाव केले.

'सारी दुनिया में मशहूर, उत्तम क्वालिटी से बना...'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा अख्ख्या दिल्लीत जगप्रसिद्ध वगैरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अति विद्वानांसाठी सत्य हे विनोदी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

https://www.storypick.com/wp-content/uploads/2015/08/C-5.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटची प्रतिक्रिया. ऋग्वेदात सूर्यला सूर्यच म्हंटले आहे. "गौ". पाश्चात्य तिन्ही विद्वानांना संस्कृत भाषेचे विशेष ज्ञान नव्हते. कुणीही पाणिणी व्याकरण, निरुक्त,धातूपाठ इत्यादि अध्ययन केलेले नव्हते. जे आम्हाला माहीत नाही यांना कसे माहीत होते. मग आपल्या सोयी नुसार गायीला (स्त्री लिंग ) पुलिंगी सूर्य बनवून टाका. आणि शिक्षित गुलाम, साहेबांनी जे लिहले तेच सत्य. असो.

नमो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ चक्ष॑से म॒हो दे॒वाय॒ तदृ॒तं स॑पर्यत ।
दू॒रे॒दृशे॑ दे॒वजा॑ताय के॒तवे॑ दि॒वस्पु॒त्राय॒ सूर्या॑य शंसत ॥ १॥ (10/37/1)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपलं मत गळी उतरलच पाहीजे हा जो काही धार्मिक लोकांचा अट्टाहास असतो ना तो खरच डोक्यात जातो. गटारी म्हणजे मूळात गताहारी वगैरे जो आचरटपणा सध्या चालू आहे, तो पहाता धर्ममार्तंड हाताबाहेर चाललेत हे नक्की. नव्याने इतिहास लिहावा तशी नव्याने संस्कृती लिहीतायत लेकाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. विवेक पटाईत, आचार्य बालकृष्ण, झालेच तर ते डॉ. ब्रह्ममुनी की कोण ते, हे लोक धर्ममार्तंड कधीपासून होऊ लागले म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही नाही पटाईत व ते अन्य लोक नाहीत. हे जे गताहारी आणि तत्सम इन्व्हेन्ट करणारे लोकं आहेत ते स्वत:ला धर्ममार्तंड व संस्कृतीचे तारणाहार समजतात असा माझ समज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जे गताहारी आणि तत्सम इन्व्हेन्ट करणारे लोकं आहेत ते स्वत:ला धर्ममार्तंड व संस्कृतीचे तारणाहार समजतात असा माझ समज आहे.

असेच काही नाही.

ग्वाटेमाला = गौतमालय हे खुद्द सावरकरांनी तुम्ही म्हणता तसे इन्व्हेंट केले होते. सावरकर स्वत:ला संस्कृतीचे तारणहार समजत होते किंवा नाही, याबद्दल मला निश्चित कल्पना नाही - कदाचित समजत असतीलही, किंवा नसतीलही, परंतु समजत असतील याबद्दल आय हॅव माय डाउट्स - परंतु, ते स्वत:ला धर्ममार्तंड निश्चित समजत नसावेत, असा अंदाज बऱ्यापैकी खात्रीनिशी वर्तविता यावा.

किंबहुना, आज एकविसाव्या शतकात आपल्याला कोणी धर्ममार्तंड म्हणू शकते, आणि/किंवा आपण स्वत:ला धर्ममार्तंड समजतो, अशी आपल्याबद्दल कोणी कल्पना करू शकते, या निव्वळ कल्पनेने सावरकर आपल्या थडग्यात गरागरा फिरू लागतील, अशी (पटाइतांच्या भाषेत सांगायचे, तर) आशंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावरकर आणि थडग्यात???? काय नबा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्ममार्तंड म्हणजे धार्मिक परंपरा आणि नियमांचे ज्ञान असलेला व्यक्ति. बाकी वरील दोन्ही व्यक्तींनी पाणिणी व्याकरण, निरुक्त, धातुपाठ यांचे अनेक वर्ष अध्ययन केले आहे. सर्व वेदांचे भाष्य त्यांनी लिहलेले आहे. याशिवाय अधिकान्श भारतीय विद्वानान्ंनी हाच अर्थ काढला आहे. प्र्शन तर त्यांना विचारा जे सूर्यला गौ संबोधित करतात आणि गौ शब्दाचा अर्थ वृषभ काढतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

बाकी वरील दोन्ही व्यक्तींनी पाणिणी व्याकरण, निरुक्त, धातुपाठ यांचे अनेक वर्ष अध्ययन केले आहे.

पाणिणी व्याकरण, हं? Biggrin

(भगताच्या नाग्यांचा/माचीवरल्या बुधांचा 'यथा बाधति बाधते'वाला विनोद डोक्यावरून गेला असेल, अशी शंका होतीच. आता खात्री पटली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाईतांचे हिंदी मिश्रित मराठी भाषेतील ललितं तूफान आवडत. पटाइतजी तुम्ही ललित परत सुरु करा. खूप आवडतात. क्षणिकाही मस्त आहेत. ती मनी प्लँटची जास्त आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी काय म्हणतो -
एकदाच काय ते वैदिक-शास्त्रीय संशोधनासाठी १०० कोटी बाजूला काढून एक संस्था स्थापन करून टाका.
आणि मग वेदांमधला हा शास्त्रीय खजिना खुल्ला करत चला.

निदान २०४५ मधलं नोबेल तरी आपल्या ऋषी-मुनींना मिळेल.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

COVID 19 नी कथित आधुनिक विज्ञाना ची लक्तरे वेशीवर टांगली .ह्यांचे सर्व दावे 100% खोटे ठरले ना ह्यांची औषध कामाला आली ना उपचार.सर्वांची फजिती झाली.आता नैसर्गिक रित्या covid 19 कमजोर होत जाईल आणि हे अती शहने लसीकरण मुळे हे झाले असे मत व्यक्त करतील.
आणि नंतर फक्त लसीकरण झालेले च आजारी पडून ह्यांना पूर्ण नागडे covid करेल.
आयुर्वेद थोडा तरी खात्री चा आहे alopathy नाही.
कॅन्सर
मधुमेह
Bp
Heart attak
Kidney fail
Liver fail
Brain फैल
दात पडणे
केस गळणे
असे किती तरी गंभीर आणि अतिशय किरकोळ आजार पण आधुनिक स्वतः च म्हणून घेणारे खात्री नी बरे करू शकत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी5
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या - तुमच्या भरतवाक्याचीच उणीव राहिली होती. तुम्ही किचकट तिहाई न घेताच कोव्हिडच्या समेवर आलात. आता हा धागा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणून जाहीर करण्यास हरकत नाही!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

आयुष्यभर आयुर्वेदाचा प्रसार करणारे बालाजी तांबे शेवटी ॲलोपथीवर आधारित दिनानाथ रुग्णालयात उपचार घेत होते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकन लोकांचे जीवनमान कमी होत आहे असा पण रिपोर्ट आहे.अमेरिकन लोकांचे सरासरी आयुष्य कमी होत आहे.
अमेरिकन लोकांनी मॉडर्न म्हणून जी जीवन श्रेणी स्वीकारली त्याची फळ आता मिळत आहेत.
जास्त वेळा प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ आहारात असण्याचे प्रमाण अमेरिकन मुला मध्ये जास्त आहे.
पारंपरिक आहार ,विहार ठेवला असता तर ही अवस्था झाली नसती.
जपान बघा परंपरा सोडली नाही त्यांचे सरासरी आयुष्य पण जास्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ॲलोपाथी अशी कुठली उपचारपद्धती नाही. तुम्हाला म्हणायचं आहे ते आधुनिक वैद्यक, modern medicine.

अमेरिकी लोकांचं जीवनमान गेली काही वर्षं, सातत्यानं कमी होत आहे, हे खरंच आहे. त्या मागचं मोठं कारण त्यांची जीवनशैली आहे हेही खरंच आहे. पण त्यांतले तपशील बघायला जाता, जीवनशैली म्हणजे आधुनिक वैद्यकाचा दोष नसून, वैद्यकीय व्यवस्था अमेरिकेत ज्या पद्धतीनं राबवली जाते, तिचा दोष आहे. अमेरिकेत आरोग्यविमा नामक सगळ्यात मोठी बाजारपेठ आणि घपला आहे. आपल्याकडे कसे चारा घोटाळा, बोफोर्स घोटाळा वगैरे गाजले, तसा कधी तरी अमेरिकेत आरोग्यविमा घोटाळा गाजावा, असं मला फार वाटतं. असो, ते अवांतर झालं.

तर अमेरिकेत लोकांना सहज डॉक्टर आणि उपचार मिळत नाहीत. सगळ्यांचीच ही गत आहे असं नाही. तर नेहमीप्रमाणे पैसेवाल्या, शहरी, उच्चभ्रू, गोऱ्या वगैरे लोकांना हे उपचार सहज मिळतात. ग्रामीण, गरीब, गौरेतर वगैरे लोकांचे हाल होतात. त्यांना नोकरी नसेल तर आरोग्यविमा परवडतोच असं नाही. नोकरदार लोकांचे आरोग्यविमे त्यांच्या नोकरीशी जोडलेले असतात. मग नोकरदार लोकांची नोकरी बदलली की विमा बदलतो, मग कधीमधी डॉक्टर बदलावे लागतात. कारण आधीचा डॉक्टर नवा विमा घेत नाही, वगैरे. नेहमीच्या डॉक्टरला आपल्या तब्येतीच्या खाचाखोचा माहीत असतात. "हे काही गंभीर वाटत नाही, औषधाची गरज नाही", किंवा "हे दिसतात साधंच दिसतंय, पण मला शंका वाटत्ये तर आपण आणखी चाचण्या करून घेऊ", अशी निदानं होत नाहीत. ती निदानं वेळेत झाली तर लोकांचे कॅन्सर वगैरेही अगदी सुरुवातीलाच लक्षात येतात, ते बरे होतात. माणसं जास्त जगतात, एवढंच नाही तर त्यांच्या आयुष्याची प्रतही सुधारते. वेळीच निदान आणि उपचार झाले तर रोगही लवकर बरे होणारच.

जपानमध्येही आधुनिक वैद्यक वापरतात. युरोपातही. युरोपात बऱ्याच देशांत हे फॅमिली डॉक्टरच रुग्णांना भेटतात, त्यांच्यावर इलाज करतात. अमेरिकेत ही अशी व्यवस्थाच बोंबललेली आहे.

बाय द वे, आधुनिक वैद्यकही खूप प्रक्रिया केलेलं अन्न खाण्याला विरोध करतं. त्या बाबतीत तुमचं आणि आधुनिक वैद्यकाचंही एकमत आहे. आणि अमेरिकेत परंपरा नावाची चीज अस्तित्वात असण्याएवढा देश जुना नाही.

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

करोनाने गेले असे खात्रीलायकरीत्या समजते! मृत झाल्यामुळे आता वैर संपले. अन्यथा फार डोक्यात जायचे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

ह्याचा अर्थ हिटलर च्य डोक्यात पण काही लोक जायची.
कंबोडिया च्या हुकूमशाही सरकार च्य डोक्यात पण काही लोक जायची.
चीन च्या कमिनिस्त सरकार च्या डोक्यात पण काही लोक जायची.
त्यांची कत्तल करून तो प्रश्न मिटला .
तुम्ही पण तोच मार्ग निवडा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

फार असहिष्णू असू नये हा मुद्दा पटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

sAtaNAcArya

सायणाचार्यांचे ह्या ऋचेवरील भाष्य येथे पान ८८५वर उपलब्ध आहे. त्याचाच अंश वरती उद्धृत केला आहे,

ह्यातील टिप्पणीचा मला कळलेला अर्थ असा आहे. (वैदिक संस्कृताची माझी समज मर्यादित आहे हे येथे सांगून ठेवतो.)

गमनशील प्राप्ततेजस् असा हा सूर्य उदयाचलावर आला. आल्यावर पूर्वदिशेकडे सर्व प्राणिमात्रांची निर्मात्री अशा मातेला (पृथ्वीला) प्राप्त करता झाला. तेथून पालनकर्त्या द्युलोकास आणि अन्तरिक्षास शीघ्र प्राप्त होऊन शोभनगमन होतो. (अथवा स्वर्गलोकाकडे गमनकर्ता होतो.)

सायणाचार्यांच्या मते ह्या ऋचेमध्ये सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असा अर्थ आहे. असाच अर्थ तत्कालीन ज्योतिषाला माहीत होता.

"ऋचेचा अर्थ वेद पोर्टल वरून घेतलेला आहे आणि आचार्य बालकृष्णच्या "वेदों शिक्षाएँ" या पुस्तकातून पुन्हा तपासून पाहिला." असे पटाईतकाका लिहितात. ह्या दोन स्रोतांच्या links मिळाल्या तर तुलना करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायण (मृ. इ.स. १३७८) हा वेदांचा सर्वश्रेष्ठ भाष्यकार मानला जातो. त्यानेही हाच अर्थ केला आहे, हे वाचून माझ्या जिवात जीव आला. अर्थात सायणानेही पाश्चात्त्यांची चुकीची भाषांतरे वाचून हा अर्थ काढला असे पटाईतकाका ह्मणू शकतील. बिच्चारा सायण - डॅा. ब्रह्ममुनी, आचार्य बाळकृष्ण इत्यादींचे मार्गदर्शन त्याला लाभलेच नाही!

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

अर्थात सायणानेही पाश्चात्यांची चुकीची भाषांतरे वाचून हा अर्थ काढला असे पटाईतकाका ह्मणू शकतील.

किंवा, श्री. कोल्हटकर हे पाश्चात्त्यांच्या नादी लागून सायणाचार्याच्या भाष्याचा चुकीचा अर्थ लावीत आहेत, असेही म्हणू शकतील. (म्हणायला काय जाते? आफ्टर ऑल, श्री. कोल्हटकर हे एका पाश्चात्त्य देशातच राहतात ना? QED! बादवे, 'पाश्चात्य' बरोबर, की 'पाश्चात्त्य'? की दोन्ही?)

बिच्चारा सायण - डॅा. ब्रह्ममुनी, आचार्य बाळकृष्ण इत्यादींचे मार्गदर्शन त्याला लाभलेच नाही!

लकी बा*र्ड!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पाश्चात्य' बरोबर, की 'पाश्चात्त्य'? की दोन्ही?

प्रत्यय त्य आहे, य नव्हे हे ध्यानात असलं, की ठरवणं सोपं जातं.

पश्चात् + त्य. 'त्य'मुळे पहिल्या स्वराची वृद्धी. म्हणून प --> पा. म्हणून पाश्चात् + त्य = पाश्चात्त्य. त्त्य.
--
ह्याच नियमानुसार -
पश्चिमा + त्य. 'त्य'मुळे पहिल्या स्वराची वृद्धी. म्हणून प --> पा. म्हणून पाश्चिमा + त्य = पाश्चिमात्य. त्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी स्वत:चीही अशीच धारणा होती. (आणि, नेमक्या याच लॉजिकास धरून.)

मात्र, आपट्यांचा शब्दकोश 'पाश्चात्य' अशी (आणि फक्त अशीच) एंट्री देतो. (आणि पुन्हा त्यावर 'पश्चाद्भवः त्यक' अशी मखलाशीसुद्धा करितो.) (दुवा.)

उलटपक्षी, 'पाश्चात्त्य'च्या बाजूने जे दाखले मिळतात, त्यांत 'पाश्चात्य' तथा 'पाश्चात्त्य' दोन्ही बरोबर असल्याचा दावा आढळतो. (दुवा १, दुवा २. पैकी, 'ट्रान्सलिटरल'वाला (दोन नंबरचा) दुवा कितपत खात्रीलायक आहे, हे शंकास्पद आहे.)

म्हणून शंका उद्भवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्याकरणदृष्ट्या “पाश्चात्त्य” योग्य. पण त्याचा उच्चार “पाश्चात्य” हून काही वेगळा संभवतो काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

सायण (मृ. इ.स. १३७८) हा वेदांचा सर्वश्रेष्ठ भाष्यकार मानला जातो.

बादवे, सायणानेसुद्धा पाश्चात्त्यांच्याच प्रभावाखाली येऊन आपले भाष्य केले नसेल कशावरून? आफ्टर ऑल, भारतातहिंदुस्थानात पहिला पाश्च्यात्त्य हा इ.स.पू. ३२७मध्ये आला; इ.स. १४९८मध्ये नव्हे!

(वास्तविक, आर्य हे कॉकेशस पर्वताहून त्याही बरेच अगोदर आले, असे म्हणणार होतो; परंतु, आर्य हे मुळात बाहेरून हिंदुस्थानात आलेच नाहीत, उलट, हिंदुस्थानातूनच बाहेर गेले, असे मानण्याची तूर्तास 'या लोकां'च्यात फॅशन आहे, सबब, तो दाखला उपयोगाचा नाही. जाऊ द्या. आर्यांची तहान शिकंदरावर!)

----------

वास्तविक, तो ज्या भागात आला, तो परिसर आजमितीस पाकिस्तानात मोडावा; भारतात नव्हे. सबब, तो भारतात आलेला नसून हिंदुस्थानात आला होता, असे म्हणणे सयुक्तिक ठरावे. (उलटपक्षी, सायणास पाकिस्तानात जाण्यास व्हिसा लागत नसावा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वी वर माणूस च बाहेरून आला आहे येथील त्याची उत्पत्ती नाही .
अशी पण थियरी आहे.
आर्य इथले होते असे समजणारे लोक आहेत आणि ते बाहेरून आले ही डाव्यांची थियरी आहे.
जे असेल ते असेल पण आता कब्जा तर भारताचा त्यांच्या कडेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

“आता कब्जा तर भारताचा त्यांच्या कडेच आहे.”

आयला! ह्मणजे अंबानी आणि अडानी आर्य आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

अंबानी आणि अडानी कुटुंबीय एकमेकांतील पुरुषांना (बोर्डमीटिंगमध्ये वगैरे) ऊठसूठ (त्या दूरदर्शनवरील ‘महाभारत’ मालिकेतल्यासारखे) ‘आर्यपुत्र’ म्हणून संबोधीत आहेत, असे चित्र मनश्चक्षूंसमोरून क्षणभर तरळून गेले.

(“आयला! हे (तेवढे) ‘आर्यपुत्र’, नि बाकीचे काय मग दासीपुत्र की काय?” असा एक बंडखोर विचारसुद्धा स्वतंत्रपणे उसळून गेला.)

(‘रिलायन्स’च्या बोर्डमीटिंगमध्ये सर्वजण धीरूभाईंच्या छायाचित्रासमोर ‘अटेऽऽऽन् शन!’च्या पोज़मध्ये उभे राहून, हात उंचावून, एकसमयावच्छेदेकरून एकमुखाने एकसुरात “हेऽऽऽल (की हाइल?) अंबानी!” अशी आरोळी ठोकीत आहेत, नि हा कार्यक्रम आटोपल्यावर पाय न वाकविता बदकपावलांनी लेफ् रैट लेफ् रैट करीत प्रस्थान करीत आहेत, अशीही एक कल्पना करून पाहिली.)

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

प्रतिसाद रद्द केला आहे

का बुवा? (कुतूहल. अन्यथा, तुमची मर्जी आहेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे तर आधी फक्त "आर्य म्हणतील ती- पूर्व" अशी एकच दिशा होती असेही म्हणता येईल (का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॅक्चुअल एरर सापडल्यामुळे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

चा काळ इसा म्हणजे येशू च्या जन्म पूर्वी ५०० ते १५००वर्ष पूर्वीचा आहे .त्या काळात हा ग्रंथ निर्माण झाला आहे
पृथ्वी सूर्य भोवती फिरते है त्या मध्ये सांगितले आहे असा दावा लेखक करत आहे.
तर हिंदू विरोधी सूर्य पृथ्वी भोवती फिरत आहे असे ऋगवेदा मध्ये सांगितले आहे असा अर्थ काढून समाधान करत आहेत.
दोन्ही गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या अतिप्राचीन काळी सूर्य किंवा पृथ्वी स्थिर नाही हे ज्ञान असणे खूप मोठी गोष्ट आहे.
ख्रिस्त धर्मात तर पृथ्वी सपाट आहे असे त्यांचे धर्म ग्रंथ सांगत आहे
त्या पेक्षा वेदा चा दावा नक्कीच प्रगत आहे
बाकी कोणत्याच धर्माच्या ग्रंथात ह्या विषयावर काही लीहले गेले आहे ह्याची जगाला माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

मी प्रतिक्रिया न देण्याचा निसचे केला होता. सायणाचार्यचा उल्लेख इथे उल्लेख केला आहे. महर्षि अरविंद आणि स्वामी दयानन्द त्यांच्या भाषयाला आंशिक सत्य मानतात. त्यांच्या काळात वैदिक धर्म कालातीत होऊन गेला होता. देवांचे मानवीय कारण झाले होते. पौराणिक कथेत सूर्य चंद्र इत्यादि माणसांसारखे आकाशात विहार करू लागले होते. त्यामुळे भाषयात अनेक त्रुटि राहून गेल्या. स्वामी दयानन्दाने पुन्हा वैदिक धर्माची स्थापना केली. आर्ष गुरुकुलांची स्थापना केली. नव्याने वैदिक साहित्याचे भाष्य लेखन सुरू झाले. तात्पर्य आचार्य बाळकृष्ण यांनी केलेला अनुवाद व्याकरण दृष्टीने अधिक उपयुक्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गौः.

क्वॅऽऽऽऽऽऽक! क्यीर्रर्रर्रर्रर्र!

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0