ह्युमन क्लोनिंग

(मूळ लेखक झपाटलेला फिलॉसॉफर,यांच्या पूर्वपरवानगीने इथे प्रकाशित )

काही दिवसापूर्वी क्लोजर टू गॉड हा हॉलीवूडपट पाहिला . आणि मनात विचारशॄन्खला सुरू झाली ...
http://www.imdb.com/title/tt3457486/

क्लोनिंग मुळे कॅन्सर / अल्झायमर / एड्स सारख्या असंख्य रोगाना प्रतिबन्ध करता येवू शकेल. अधिक आयक्यू असणारी / सशक्त / रोगप्रतिबन्धक गुणधर्म जन्मजात असलेली बालके जन्मास घालता येवू शकेल . मानवी उत्क्रान्तीचा वेग अनेक पटीनी वाढून मानवी आयुर्मर्यादा देखील वाढवता येइल . असे अनेक क्रान्तिकारी बदल आणि फायदे मानवी जीवनास होतील ....याबाबत डोक्टर मिशियो काकू या अमेरिकन जापनीझ सायन्टिस्ट चे मत अवश्य ऐकण्यासारखे आहे. https://www.youtube.com/watch?v=6GooNhOIMY0 .

परंतु ह्यूमन क्लोनिंग / जीन्स डेव्हलपमेन्ट ट्रायल्स ला गेल्या अनेक वर्षे पाश्चिमात्य देशातून आणि विषेशतः कट्टर ख्रिश्चन आणि इस्लामिक समुदायांकडून प्रचंड विरोध होत आहे . आजतागायत या बिनडोक धर्मवाद्यांच्या दबावाला बळी पडून असो किंवा ह्यूमन क्लोनिंग कितपत नैतिक /अनैतिक आहे असल्या फुटकळ मुद्द्यात अडकून असो, ह्यूमन क्लोनिंगला आजतागायत कायद्याने मान्यता नाही...

कोणत्याही वैज्ञानिक शोधाचे फायदे तोटे असतातच ! पण अ‍ॅबॉर्शन ला सुद्धा आन्धळा विरोध बिनडोक विरोध करणार्या अशा बावळट धर्मसंस्था अन त्यांचे ऐकून कायदे राबवणार्या आयर्लन्ड सारख्या देशात सविता हलपनवार चे काय झाले ? हे सुज्ञ वाचक अजून विसरले नसतील अशी अपेक्षा ! यास्तव अशा बुरसटलेल्या बाण्डगुळाना त्वरित दूर सारून ह्यूमन क्लोनिंग खरोखरीच जर मानवजातीस उपयुक्त असेल तर त्वरित त्यास परवानगी देवून संशोधन खुले करावे , असे मला वाटते !

आपणास काय वाटते?

field_vote: 
0
No votes yet

यास्तव अशा बुरसटलेल्या बाण्डगुळाना त्वरित दूर सारून ह्यूमन क्लोनिंग खरोखरीच जर मानवजातीस उपयुक्त असेल तर त्वरित त्यास परवानगी देवून संशोधन खुले करावे , असे मला वाटते !
+ १०००!
Very well said! And not just the religions, but many secular entities also are mortally scared of anything new, and manage to transfer their anxiety to the general populace. Even something simple as a gene therapy trial for muscle growth had to be taken to a South American country, since the US does not approve of it.
India's resistance to GM crops is another such example!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मानवी क्लोन मध्ये फक्त निरनिराळी इंद्रिये बनवून ती काढून वापरण्यासाठी या तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जाईल अशी भीती जैविक-नीतिद्न्य उभी करतात. पण आता मानवी इंद्रिये डुक्कर आणि मेंढीतही वाढविणे शक्य झाले आहे . त्याबाबत नीतिद्न्य गप्प आहेत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

>>सशक्त / रोगप्रतिबन्धक गुणधर्म जन्मजात असलेली बालके जन्मास घालता येवू शकेल >>
याविषयी शंका आहे.इकडे BT/GM च्या नावाखाली बनवलेल्या वाणांत दोन गोष्टी येतात आणि तीन गायब होतात.गुलाबातल्या रंगीत मोठ्या जाती आल्या पण सुगंध गायब.कापसाची प्रजोत्पादन शक्ती गायब.वांग्याचेही असेच काही असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याविषयी शंका आहे.इकडे BT/GM च्या नावाखाली बनवलेल्या वाणांत दोन गोष्टी येतात आणि तीन गायब होतात.

अजून फार नाही फक्त १५ वर्षांनी हेच विधान पुन्हा करा. Smile

गुलाबातल्या रंगीत मोठ्या जाती आल्या पण सुगंध गायब.

कारण आज मोठ्या रंगीत जातीना सुगंधी जातींपेक्षा जास्त मागणी आहे.. आणि सुगंधाला जर जास्त मागणी असेल तर तो वाढवायचीही सोय आहे...

कापसाची प्रजोत्पादन शक्ती गायब.वांग्याचेही असेच काही असेल.

नक्कीच! कारण क्लोनिंगने पुनरुत्पादन करायचे म्हंटल्यावर मुलांना प्रजोत्पादन शक्ती ठेवायची गरजच नाही... Smile

अचरटबाबा, वनस्पतीतले बायोइंजिनियरींग (मॉनसॅन्टो वगैरे) हे अजून फार प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये आहे, कारण त्यात रिलेटिव्हली पैसा कमी.
कटिंग एज बायोइंजिनियरिंग कितीतरी म्हणजे अनेक कितीतरी पुढल्या स्टेजमध्ये आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लोनिंगला मुसळ म्हणायला हवे.ते यादवांनी वापरले ते.मुसळाच्या चुय्रातून मुसळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणुस कधीच सेटल झाला नाही. काळजी नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

याचे इम्प्लिकेशन्स अस्वस्थ करणारे असल्यामुळे लोक घाबरतात, परंतु तत्त्वतः यावर आक्षेप घेता येत नै हेही तितकेच खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्युमन क्लोनिंग वापरुन,
उत्तर कोरियाचा हुकुमशहा, लादेन, बुश, ट्रंप, इंदिरा गांधी, मोदी, बाळ ठाकरे ...... इत्यादिंच्या प्रतिकॄती तयार झाल्या असत्या. त्या जगाला परवडल्या असत्या का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या जगाला परवडल्या असत्या का ?
होय.
एकासमोर एक उभे करायला बरे पडले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0