सध्या काय वाचताय? - भाग १९

मोठ्या आकाराच्या, विश्लेषण स्वरूपाच्या लिंका 'बातम्या' म्हणता येत नाहीत आणि पुस्तकंही नसतात. त्याही याच धाग्यांवर देत्ये.

जयपूर लिटफेस्टबद्दल एक लेख. मांडणी विस्कळीत आहे; त्याकडे दुर्लक्ष करता आल्यास लिटफेस्टबद्दल फार माहिती नसणाऱ्यांसाठी, वेळ काढून वाचण्यासारखा लेख आहे.
जयपूर लिटफेस्ट २०१६

field_vote: 
0
No votes yet

सध्या kindle घेतले असल्यामुळे त्यावर वाचायची हौस सुरु आहे. फ्री किंवा स्वस्त दरातील kindle version पुस्तके कुठे मिळतील ? तसेच electrical - electronics पुस्तके पण हवी आहेत .

डॉ.डी.टी.इंगोले

Amazon.com
Bookganga

बुकगंगावर किंडल पुस्तकं मिळतात?

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हां, नाही चालणार किंडल वर, सध्य फ्क्त android च आहे.

India’s Economic Data ‘Manipulated,’ Chinese Scholars Write - चिनी विचारवंतांच्या मते भारतीय जीडीपी ची आकडेवारी फुगवलेली आहे. या विचारवंतांच्या मते भारताची अर्थव्यवस्था ही चीनइतक्याच (किंवा त्यापेक्षा) जोमाने वाढत आहे हे सुद्धा मिथक आहे. टीसीए अनंत (भारताचे मुख्य स्टॅटिस्टिशियन) यांनी मागच्या वर्षी असे विधान केलेले होते की भारतातली जीडीपी ची आकडेवारी ही राजकीय उद्दीष्टांनी प्रेरित नसते. पण अरविंद सुब्रमण्यम (भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार) यांनी सुद्धा जीडीपी च्या आकडेवारीवर/प्रक्रियेवर शंका उपस्थित् केलेल्या होत्या.

वरच्या जयपूर फेस्टिवल ब्लॅाग लिंकसाठी धन्यवाद.

नंदा खरे यांचे ‘उद्या’ वाचतो अाहे. भविष्यातल्या तंत्रज्ञानाधिष्ठीत जीवनाचे सांभाव्य चित्र. काहीसे निराशावादीही. त्यांचे उत्क्रांतीविषयीचे ‘कहाणी मानव प्राण्याची’ वाचले होते. ते खूपच अावडले होते.

उद्या वाचताना डोळ्यांसमोर सतत ब्लेड रनरसारखी चित्रं डोळ्यांसमोर येत होती. साधारण ७०% वाचून झाल्यावर पुढे काय होणार याचा अंदाज यायला लागला होता, तरीही खऱ्यांनी कसं मांडलंय हे वाचायची उत्सुकता फार होती. पुस्तक पूर्ण झाल्यावर लगेच 'हर' चित्रपट बघितला.

‘कहाणी मानवप्राण्याची’ही मला आवडलं होतं; खऱ्यांची शैली सुंदर आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Outflow - Lori Romero

A romance passed through them,
a small town twister that left
the smell of old water in pipes. Knee-deep
in quiet, they salvage what they can.
Coverless books, coffeemaker,
wristwatch.
.
.
.

आभार - http://www.poemsniederngasse.com/Poetry/084_romero.html
___
Diana Krall on the radio,
peelin’ a grape, crushin’ some ice
an infusion of possibilities, a tall sip of desire

on a night like this, feigning innocence
is like trying to sneak moonrise past a coyote

.
.
.

anticipation stirs like an unsheltered beast
with red-lit cigarette eyes
आभार- http://www.authorsden.com/visit/viewPoetry.asp?AuthorID=29059
______________

http://dazedimg.dazedgroup.netdna-cdn.com/750/azure/dazed-prod/1150/0/1150507.jpg
.
http://dazedimg.dazedgroup.netdna-cdn.com/786/azure/dazed-prod/1150/0/1150608.jpg
.
http://www.dazeddigital.com/artsandculture/article/28541/1/incredible-fe...
____________

Freedom of Speech: Mightier Than the Sword by David K. Shipler
http://www.amazon.com/Freedom-Speech-Mightier-Than-Sword/dp/0307957322
.
सध्या जे एन यु प्रकरणाबद्दल जे पडसाद ऐसीवर वाचायला, ऐकायला मिळताहेत, त्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक निवडलेले आहे. पहीले प्रकरण वाचून झाले. रोचक वाटत आहे. कोणी वाचले असल्यास, कृपया टिप्पणी करावी.
___________
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5045401390413056296&Sectio...(%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%20%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87)
_______
मौन - http://www.filosofiaesoterica.com/ler.php?id=1659#.VtdaIn0rLmg

Fewer Asians Need Apply - आयव्ही लीग कॉलेजेस मधे भेदभाव कसा चालतो त्याबद्दल. मेरिट वाल्या उमेदवारांविरुद्ध भेदभाव चालतो त्याच्या इतिहासाबद्दल. व वर्तमानात काय घडत आहे व ते या इतिहासाशी कसे जोडले गेलेले आहे त्याबद्दल.

आयव्ही लीग शाळा या पूर्णपणे खाजगी (प्रायव्हेट) आहेत. त्यांनी कुणाला आणि कसा प्रवेश द्यावा, हे इतरांनी ठरवू नये.

भारतीय राष्ट्रवादाची जडणघडण हा यशवंत सुमंत यांनी लिहिलेला लेख वाचला.

राष्ट्रवाद या संकल्पनेचा भारतीय परिप्रेक्ष्यात घेतलेला अगदी धावता आढावा आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://www.huffingtonpost.com/ken-solin/men-emotional-health_b_1395348.html
काही कळलं नाही. कोणीतरी समजाऊन सांगा.

परवा उत्कर्ष प्रकाशनाच्या दुकानात "येरा गबाळाचे काम नोहे (रहस्यमय कादंबरी) " हे दुर्गानंद गायतोंडे यांचे २०१४ साली प्रसिद्ध झालेले पुस्तक पाहिले. शीर्षकाचा उलगडा संत तुकारामांच्या अभंगाच्या उल्लेखाने आत होतो. कव्हरवर एक हिर्‍याचा दागिना आणि पिस्तुल धारण केलेला हात. मागे नव्वदीत पदार्पण केलेल्या लेखकाच्या लांबलचक सरकारी व निमसरकारी करियरचे व समाजकार्याचे वर्णन.

पहिल्या पाच-सहा पानांतच एका वयस्कर डॉक्टरचा खून होतो, एक स्त्री दोन नाट्यसंगीत म्हणते, "देवेंद्र वेदान्त" नावाचा एक अत्यंत लोकप्रिय खासदार येत्या निवडणुकेत जिंकून पंतप्रधान व्हायची स्वप्ने पाहतो, आणि नाट्यसंगीत म्हणणार्‍या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे कळते. इतक्या वेगाने सरकणारी "पेज टर्नर" गोष्ट पाहून मी पुस्तक विकत घेतले, आणि त्याच वेगाने प्रवासात वाचून काढले. "वाचणे" हे कदाचित अतिशयोक्ति म्हणता येईल, कारण शेवटी शेवटी माझ्या वाचनाचा वेग गोष्टीतल्या खुनांच्या आणि लॉजिकल लीप्स समोर फारच कमी पडला. दहा बाराच पात्रं, त्यात चार-पाच झपाझप ठार, आणि वर चौघे पोलीस!

पोलीस प्रोसीजरल ज्यांना आवडतात त्यांना यातले पोलीस फारच बिन-प्रोसीजरल वाटण्याची शक्यता आहे. पण सगळे कस्ले कर्तबगार, अगदी एक-दोन क्लू पाहूनच पूर्ण कट उलगडणारे, आणि त्यात गोंधळ करण्यासाठी एक तोतया देखील. विमान प्रवास, टेक्नॉलॉजी, पाठलाग, प्रेम, दुरावा, राजकारण, अगदी सगळं सगळं या कथेत आहे. सगळ्यात मस्त म्हणजे यात ब्रेस्ट कॅन्सरची प्राथमिक चाचणी आणि निदान एकाच विझिट मधे डॉक्टरांकडून स्त्रीच्या स्तनातील गाठीला "हाताने परत परत चाचपडून", व नंतर साधी सोनोग्राफी करून होते. नंतर तो रोग चमत्काराने नाहिसा होतो, पण तो कसा हे कादंबरी रहस्यमय असल्यामुळे इथेच सांगून टाकणे इष्ट ठरणार नाही.

थोडक्यात, "इट्स सो बॅड इट्स गुड" या सदरात हे पुस्तक फिट्ट बसतं. मला खाली ठेववलंच नाही. मेघना, तुला पोस्टाने पाठवते, तुझा पत्ता प्लीज व्यनी ने सांग!

प्रतिसाद वाचता वाचताच उत्सुकता अनावर होऊन पुस्तकाच्या शोधात निघणार होते, तितक्यात शेवटची ओळ आली आणि एकदम (उत्सुकतेने मी) गारठले! (;-) पत्ता पाठवीत आहे हे वेगळे सांगायला नकोच!) काय साली शैली आहे प्रतिसादलेखिकेची. 'झपाझप-ठार' काय आणि 'हिर्‍याचा दागिना धारण केलेला हात' काय. केवळ असल्या शैलीतली पुस्तकवर्णने यावीत म्हणून काही पुस्तके उलटटपाली येऊन पोहोचतील याची तेवढी आगाऊ नोंद घ्यावी.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"उत्सुकतेने मी गारठले"!! Biggrin हे एका मराठी साहित्यावरील समीक्षकीय निबंधांच्या पुस्तकासाठी चांगले शीर्षक आहे.

तुम्ही उत्कर्ष प्रकाशनाच्या दुकानात गेलात इथेच तुम्ही किती धीराच्या आहात हे लक्षात आलं.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

याची मला जाणीव आहे हो!
मला हे पुस्तक, आणि हे हवे होते, म्हणून तिथे जावे लागले.
पण बुकगंगावर संपलेली फास्टर फेणेची एक-दोन पुस्तकंही त्यांच्याकडे होती. "रंगूनचे रत्नमय रहस्य, व बाबी पत्रकार होते" (ले: ज्ञानदा नाईक) हे पुस्तकही मिळाले. त्यामुळे मोठे चिरंजीव खूष आहेत.

फार आवाज करत खाताना (पाणीपुरी, टाको शेल) आम्ही 'मर्डर, शी रोट' नावाची मालिका हौसेने बघतो. तुझ्या पुस्तकाचं दृश्य रूप आहे. कोणाचा खून होणार आणि खुनी कोण याबद्दल आम्ही भांडणं करतो.

मुख्य पात्र बाई, ती स्वतःला मिझ नाही मिसेस म्हणवून घेते, पुरुषी व्यवसायात सगळ्यांपेक्षा हुशार आहे पण गाडी चालवत नाही, आणि हे सगळं सो-बॅड-दॅट-इट्स-गुड असं दाखवलंय. ती जाते तिथे खून होतात, याबद्दल तिला कोणी टोकत नाही का; हा आमच्या परिसंवादाचा कालचा विषय होता.

मला ही मालिका खूप खूप आवडते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अँजेला लँन्सबरी रूल्स! मी ती मालिका पाहत पाहत एकेकाळी अनेक मोजे आणि स्वेटर विणले होते. त्यातलं मेनचं इंग्रजी बोलणं, ते ८०च्या दशकातले कपडे.... चांगल्या आठवणी Smile

मी ती मालिका पाहत पाहत एकेकाळी अनेक मोजे आणि स्वेटर विणले होते.

इतकीही 'टाका"ऊ नाही हो ती मालिका! Wink

त्यातलं मेनचं इंग्रजी बोलणं, ते ८०च्या दशकातले कपडे.... चांगल्या आठवणी (स्माईल)

+१

अनुभव मासिकात लिहीणारे संपत मोरे - त्यांचे तीन चार लेख गेल्या काही अंकात वाचले. ग्रामीण पत्रकारितेचा उत्कृष्ट नमुना. हरिनाम सप्ताह, बैलगाडी शर्यती, जतजवळच्या संख व उमदी या गावांतील अतर्क्य (अंध)श्रध्दा अशांसारखे वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले अाहेत. अावडले लेख अाणि शैलीही. नमुना: http://uniquefeatures.in/anubhav/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0...

गर्ल ऑन द ट्रेन हे पॉला हॉकिन्सचं पुस्तक वाचलं. गेल्या वर्षीच प्रकाशित झालेलं हे पुस्तक जाम हिट झालं होतं. मस्त आहे. एकदा-हाती-घेतलं-की-खाली-ठेववत-नाही छापाचं आहे. मला सगळ्यात आवडलं ते त्यातलं वातावरण. अतिशय क्रीपी (मराठी शब्द?) असं वातावरण पहिल्या पानापासून शेवटपर्यंत राखलं आहे. ज्यात वर्णनं रक्तरंजित किंवा बटबटीत करायला फुलॉन वाव आहे असे काही प्रसंगही पुस्तकात येतात. पण तसं न करताही वातावरणातला ताण वाढत जातो. व्यक्तिरेखा जिवंत होऊन डोळ्यासमोर उभ्या राहतात.
थोर नव्हे. पण सस्पेन्स-थ्रिलर प्रकारातलं चांगलं पुस्तक.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काय पाठवलंय ते कळलेलं नाही, पण "निरोप" जरूर बघा !

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

किरण नगरकरांचं रावण-एडी सिरीजमधलं दुसरं पुस्तक "द एक्सट्राज" वाचायला घेतलं आहे. नगरकर अतिषय बाप स्टोरीटेलर आहेत. भडक-मेलोड्रॅमॅटिक प्रसंगही वाचकाला विश्वासार्ह वाटायला लावतात.

नगरकर खास भारतीय प्रवृत्ती-अपप्रवृत्तीबद्दल लिहितात. (उदा० कोचिंग क्लासचं फॅड, किंवा मुंबईतले टॅक्सीवाले.) पण ते निव्वळ तिरकस निरीक्षण या स्वरूपात. अरविंद अडिगाही तसं लिहितो, पण त्यात तुच्छतेचा सूर लागलेला असतो, आणि तो डोक्यात जातो.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कै. निपो हे किरण नगरकरांचे प्रचंड फॅन होते. प्रचंड हा शब्द अत्यंत तोकडा आहे. त्यांच्याकडून या सगळ्या पुस्तकांबद्दल बरंच ऐकलेलं आहे. मी ते "सात सख्खं..." (मराठी) विकत घेतलं होतं पण वाचलं नाहिये.

अरविंद अडिगाही तसं लिहितो, पण त्यात तुच्छतेचा सूर लागलेला असतो, आणि तो डोक्यात जातो.

अडिगाची शैली म्हणायची की अजून कै ते माहिती नाय. परंतु 'पांढरा वाघ' मध्ये बाकी सगळं सोडून फक्त गाडीत हुच्चभ्रू लोक्स कसे पादतात आणि त्यांच्या ड्रायव्हरला कसा वास सहन करावा लागतो हेच लक्षात राहिलं. (इथे कसलीही उपमा वापरावी.) बाकी कादंबरी एकदमच अनुल्लेखनीय वगैरे वाटली.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी अगदी. बरं, कथा चांगली असेल तर एकवेळ असलं सहन करायला हरकत नाही. पण कथाही अनुल्लेखनीय आहे.

असल्या पुस्तकाला बुकर मिळत असेल तर हैदोसला नोबेल मिळायला हवं.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

यग्जाक्टली. बाकी हैदोस आणि अलीकडे मचाक यांना नोबेल, पुलिट्झर किंवा गेलाबाजार ज्ञानपीठ तरी मिळालेच पाहिजे.

(मचाक फॅन) बॅटमॅन.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मचाक म्हंजे काय ? (हैदोस माहीती आहे)

मराठी चाणाक्ष कथा!

आणखी 'चा' वरून कुठले शब्द सुचतायत का? चावट वगैरे?
Wink

Wink

+१ अडिगा अति म्हंजे अतिच ओव्हररेटेड आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डावे व उजवे यांच्या व्याख्यांबद्दल ..... मुद्रित स्वरूपात. तसेच व्याख्यांची थोडी वेगळी मांडणी.

१) डावे हे मार्केट विरोधी असतात. मार्केट ने कितीही चांगले रिझल्ट्स काढून दाखवले तरी डाव्यांना मार्केट च्या रिझल्ट्स बद्दल समाधान व्यक्त करताना अत्यंत वेदना होतात.

२) उजवे हे डावे विरोधी असतात. डाव्यांची कोणतीही कल्पना व ती कितीही सुयोग्य असो त्यांना तिची योग्यता मान्य करताना उजव्यांना अत्यंत वेदना होत असतात.

आता ऋ, म्हणणार की उजवी विचारप्रणाली ही डाव्या विचार प्रणालीस नाकारून उभी आहे ... उजव्या विचारप्रणाली ला स्वतंत्र अस्तित्व नाही.

संदर्भ - थोडक्यात नास्तिकता ही आस्तिकतेला नाकारल्याशिवाय तुम्हाला स्वतंत्ररित्या उभी करता आलेली नाही.

मी अस३ म्हणणार नाही. काळजी नसावी

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"The Stories of John Cheever" या नावाने प्रसिद्ध झालेल्या, जॉन चीवर या अमेरिकन लेखकाच्या कथा वाचायला घेतल्या. त्यातली विशेषतः " द स्विमर" ही (त्याच्या चांगल्या कथांपैकी एक समजली जाणारी) कथा चांगलीच लक्षांत राहिली.

कथा म्हण्टलं तर साधी आहे आणि तिची लांबीही लहानच आहे. आपल्या आठवणी, आपलं वर्तमानकाळात असणं, त्या विषयीचं भान या सार्‍याचा अर्थ बराच तरल आहे, आणि तो बराचासा आपल्या मनःस्थितीवर अवलंबून आहे याचा प्रत्यय कथेतून येतो. कथानक इतकंच की अपस्टेट न्यूयॉर्क भागात राहाणारा एक माणूस उन्हाळ्याच्या एका दिवशी, संपूर्ण दिवसभर त्याच्या भागातल्या ओळखीच्या लोकांच्या स्विमिंगपूल्स मधे, एका मागोमाग एक अशा रीतीने पोहतो. बाहेर पडल्यावर शेजारपाजारच्या पार्ट्यांमधे तसाच काही काळ रेंगाळतो. मग शेवटी आपल्या घरापाशी येतो. बंद असलेल्या घराच्या खिडकीपाशी येऊन उभा राहातो. मग त्याला लक्षांत येतं की घर आपण विकलंय. तिथे कुणीही राहात नाही. आपल्या कुटुंबाची नि आपली कायमची ताटातूट झालेली आहे.

जॉन चीवरच्या चरित्राकडे लक्ष दिलं तर या कथेचा संदर्भ लक्षांत येतो. चीवर या काळात दारूच्या आहारी गेला होता. कफल्लक झाला होता. कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्याची पुरती वाट लागली होती. बायको-मुलं सोडून गेली होती. या कशाबद्दलही थेट न लिहिता चीवर आपल्याला दारुड्याच्या जगाची आणि एकंदरीतच वास्तव आणि आपण याच्या नात्याच्या स्वरूपाची कल्पना करून देतो. हा संदर्भ लक्षांत अल्यावर कथा एक गडद अनुभव देते.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रेघेवरच्या नव्या नोंदीतून साभार -

"आपले ज्यांच्याशी मतभेद असतात त्यांच्यापासून आपण सर्वसाधारणपणे अंतर राखतो. पण आधुनिक माध्यमं आपल्या नावडत्या व्यक्तींचे चेहरे आपल्यावर असे काही थोपवतात की आपल्या नकारात्मक प्रतिक्रिया आणखी तीव्र होतात"

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मार्मिक चिंजं. सत्य आहे.

ही टाळी फक्त माध्यमवाल्या हातानेच वाजते याबद्दल इतकी खात्री असणे रोचक आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> फक्त माध्यमवाल्या हाताने वाजते <<

असा आग्रह मूळ पोस्टमध्ये किंवा उद्धृतामध्येही दिसला नाही. आधुनिक प्रसारमाध्यमं कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतात आणि व्यक्तिगत आयुष्यात मात्र पुष्कळशा लोकांची झेप आसपासच्या आप्तस्वकीय-सहकारी इ. परिसरापुरतीच मर्यादित असते, हा संख्यात्मक फरक मात्र लक्षात घ्यावा लागेल.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुस्तक परिक्षण : Sext and the Single Girl - मी हे वाचलेले नाही व वाचणारही नाही. पण हे एक पुस्तक परिक्षण आहे. पुस्तकाचे नाव - Girls and Sex : Navigating the complicated New Landscape - by Peggy Orenstein, Harper. ( गब्बरने वाचलेले नाही तरी हे असे इथे डकवण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न विचारू नये. )

Born again on the Mountain - अरुणिमा सिन्हा. एवरेस्ट वर पोचणारी पहिली अपंग स्त्री, तिची कहाणी. आत्मचरित्र टाईप पण एका लेखकाची मदत घेऊन लिहिलेले पुस्तक.

चांगले आहे.

The Curious Incident of the Dog in the Night-Time हे एक भारी पुस्तक आहे … दोन वर्षांपूर्वी वाचलं होतं. आज दुसरच पुस्तक शोधताना अचानक हातात आलं आणि त्यात माझा एक तास गेला .

जे शोधत होते ते पुस्तक हे : An Astronaut's Guide to Life on Earth
भारतात विकत घेतलंय अजून वेष्टनातच आहे. वसंत आणि वासंतिक सुट्टी सुरु झाल्याप्रीत्यर्थ हे आज बाहेर काढले !

-सिद्धि

भारतात विकत घेतलंय अजून वेष्टनातच आहे. वसंत आणि वासंतिक सुट्टी सुरु झाल्याप्रीत्यर्थ हे आज बाहेर काढले !

प्रतिभासाधनेस अखेर वेळ मिळाला म्हणायचा.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोण प्रतिभा आणि कोण साधना ? डोंबल …
वेळ तर कसा जातो कळत नाही . Sad काय करायचं बाबा , पोटापाण्याच्या व्यथा …. शिवाय संसार कोणाला चुकलाय ?

-व्यथित सिद्धि

-सिद्धि

'वेष्टन', 'वासंतिक सुट्टी' वगैरे वाचून एकदम गटणे दिसले म्हणून म्हटले.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो बरोबर. पण मग spring break आणि packing ला नॉन - पुस्तकी मराठीत काय म्हणावे ?

लिहिताना जाणवतं कि बोली मराठीत किती इंग्रजी वापरली जाते . आणि मग शुद्ध मराठीत भाषांतर करताना आमचा सखाराम होतो ! Smile

-सिद्धि

प्याकिंग असा शुद्ध मराठी शब्द उपलब्ध आहे.

बाकी स्प्रिंग ब्रेक = पाडव्याची सुट्टी म्हटले तर अजून जास्त माणसातले वाटावे. Smile

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याकरिता 'स्प्रिंग तुटणे' किंवा ('जगबुडी'च्या धर्तीवर) 'स्प्रिंगतुटी' (किंवा प्युरिष्टांकरिता 'स्प्रिंगतूट') कसा वाटतो?

किंवा 'टॉइंऽऽऽऽग!!!!!!' असा ध्वन्यनुकारीसुद्धा (ओनोमॉटोपोइक) बनवता येईल, हवे तर.

बाकी स्प्रिंग ब्रेक = पाडव्याची सुट्टी म्हटले तर अजून जास्त माणसातले वाटावे. (स्माईल)

बोले तो, bar mitzvah किंवा bat mitzvah = (मुलाची किंवा मुलीची) मुंज म्हटले, तर जसे अगदी घरच्यासारखे वाटेल, तसे "माणसातले" म्हणताय काय?

("अरे, परवा त्या अमक्यातमक्याच्या मुलीची मुंज झाली, तिथे गावातली झाडून सगळी प्रतिष्ठित मंडळी (बटूस आशीर्वाद देण्यासाठी) उपस्थित होती, बरे का! गेला बाजार हजारएक तरी पान उठले असेल.")

("सत्यनारायणाच्या प्रसादाला लाल मद्य आणि केक नावाचे एका प्रकारचे खाद्य...")

("हा लिमया तिथेच असतो ना गिळायला." "मग आपण खाणावळच बदलू." "नको. निमकराच्या खाणावळीतली डुकराच्या मांसाची तळलेली भजी...")

..........

१, २ उद्धरणाची चूभूद्याघ्या.

क्युरियस इन्सिडन्ट ... फार फार भारी पुस्तक आहे. प्रथमपुरुषी निवेदन प्रकार जमलाय एकदम.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हो. ह्यातला क्रिस्तोफर आणि शेल्डन कूपर हे दोघे जरा सारखे वाटतात मला. शिवाय His idea of numbering the chapters using prime numbers is very unconventional.

-सिद्धि

अ‍ॅन रँड लिखित "द आर्ट ऑफ फिक्शन"

"लिखाणकामातले ठोकताळे" या विषयांवर एकेकाळी पुस्तकं यायची. आपल्याकडे ना सी फडके यांच्या "प्रतिभासाधन" वगैरे पुस्तकांची बरीच चेष्टा झाली. आणि ती योग्यच होती. प्रतिभासाधन हे काम ना सी फडक्यांच्या कादंबर्‍यांइतकंच मजेशीर आहे.

या प्रकारामधलं अ‍ॅन रँडचं, १९५७च्या सुमारास प्रसिद्ध झालेलं "द आर्ट ऑफ फिक्शन" हे पुस्तक म्हणता येईल. रँडच्या विचारसरणीचा अमेरिकेतल्या लोकांवर आणि पर्यायाने जगातल्या इतर भागातल्या वाचकांवर - विशेषतः तरुण वाचकवर्गावर - बराच प्रभाव होता/आहे. तिच्या कादंबर्‍यांधून तिने प्रसृत केलेली विचारसरणी, त्यातलं बरंवाईट हे सर्व एका वेगळ्या धाग्याचा विषय होईल.

१९५० च्या दशकात काही निमंत्रितांकरता रँडने व्याख्यानं दिली. त्यात बहुतांशी उमेदवारीच्या काळातले लेखक वगैरे प्रकारची मंडळी होती. प्रस्तुत पुस्तक म्हणजे त्या व्याख्यानांचंच ट्रान्स्क्रिप्ट.

कथानकाची बांधणी - मुख्य म्हणजे अमूर्त संकल्पनांची मूर्त घटकांनी केलेली बांधणी ही कशी महत्त्वाची आहे हे या पुस्तकात रँडने चांगलं समजावलेलं आहे. अनेकदा भलेभले लेखक त्यांना जे तात्विक विचार सांगायचेत किंवा ज्या अमूर्त संकल्पना मांडायच्या आहेत त्यांना व्यक्तिरेखांच्या कृतींवाटे मांडण्यात अपयशी ठरतात आणि मग निवेदक किंवा व्यक्तिरेखांच्या तोंडी त्या अमूर्त संकल्पना सुभाषितरूपाने येतात आणि मग त्याला प्रचारकी रूप येतं हा मुख्य विचार चांगला विशद करून मांडला आहे.

आपल्या अबोध मनामधे विषयाबद्दलची नेमकी कल्पना तयार करणं, प्रसंग, व्यक्तिरेखा, जागा, कालावकाश यांच्या संदर्भातल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, त्या अबोध मनामधे झिरपू देण्याची प्रक्रिया चालू ठेवणं याबद्दलचे रँडने मांडलेले विचार लेखक आणि वाचकांना विचार करण्यासारखे आहेत. "What is colloquially called “inspiration” – namely, that you write without full knowledge of why you write as you do, yet it comes out well – is actually the subconscious summing-up of the premises and intentions you have set yourself."

लिहिण्यामगच्या आपल्या हेतूंबद्दलचं भान जागं ठेवणं आणि त्याचबरोबर मनात येत असलेल्या विचारप्रक्रियेला "सेन्सॉर" न करणं यातला समतोल लेखकाने साधावा असं रँड म्हणते.

या आणि अशासारख्या मार्मिक आणि उपयुक्त गोष्टी लिहिताना रँड स्वतःला व्हिक्टर ह्युगो, लेव टोल्स्टॉय वगैरेंपेक्षा मोठी असल्याचं सांगते.काफ्का, गर्ट्रुड स्टाईन, जेम्स जॉईसला उपर्युक्त चौकटीत न बसल्याबद्दल त्यांची निंदा करते. Smile तो सगळा भाग प्रबोधनाच्या ऐवजी मनोरंजनाच्या डिपार्टमेंटमधे टाकता येईल. एकंदरीत पुस्तक वाचनीय आहे.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

या आणि अशासारख्या मार्मिक आणि उपयुक्त गोष्टी लिहिताना रँड स्वतःला व्हिक्टर ह्युगो, लेव टोल्स्टॉय वगैरेंपेक्षा मोठी असल्याचं सांगते.काफ्का, गर्ट्रुड स्टाईन, जेम्स जॉईसला उपर्युक्त चौकटीत न बसल्याबद्दल त्यांची निंदा करते. (स्माईल) तो सगळा भाग प्रबोधनाच्या ऐवजी मनोरंजनाच्या डिपार्टमेंटमधे टाकता येईल. एकंदरीत पुस्तक वाचनीय आहे.

Smile फारच अपेक्षित! द रोमँटिक मॅनिफेस्टोही असंच होतं आणि त्यातला बहुसंख्य भाग हेच सांगणारा होता. आता रँडच्या नावाने कानाला खडे!

धन्यवाद, नेहमीच्या रँडभक्तांना हे दाखवलेत काय? Wink

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजूनतरी माझा वरचा प्रतिसाद ॠण श्रेण्यांनी वगैरे झाकला गेलेला नाही. त्यामुळे वेगळा काय "दाखवायचा" ? Wink

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हो पण त्यांचा फोरम वेगळाय ना. Wink

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रशियन परीकथा वाचतेय .

रशियन भाषेत वाचताय की कसे?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही.मराठी अनुवाद ." वासिलीसा आणि इतर गोष्टी "..

धन्यवाद.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१६व्या शतकातील जागतिक इतिहासकारांबद्दल अतिशय तुफान, ट्रेलब्लेझिंग स्टाईलमध्ये विवेचन करून युरोसेंट्रिकांना झोडणारा संजय सुब्रह्मण्यमचा हा पेपर वाचला.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तंजावरच्या मराठी राज्यातील क्लासिकल म्युझिक, त्या लोकांचे युरोपियन क्लासिकल म्युझिकशी आलेले संबंध, कर्नाटक आणि हिंदुस्थानी परंपरेत गाणे-बजावणे शिकलेले लोक युरोपियन संगीत कसे शिकले, राजा सर्फोजी दुसरा याने एक युरोपियन क्लासिकल बँड कसा तयार केला, हा बँड कलकत्त्यापर्यंत जाऊन कसा परफॉर्म करत असे, युरोपियन संगीतातच त्यांनी काय इनोव्हेशन केले, इ.इ. बद्दल प्रोफेसर इंदिरा विश्वनाथन पीटरसन यांचा एक अतिरोचक पेपर वाचला. King Serfoji II of Thanjavur and European Music हे त्याचे नाव. हा पेपर इथे जाऊन डौनलोडवता येईल.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संगीताच्या क्षेत्रात संबंध प्रस्थापित झाले व इतके पुढे गेले होते म्हंजे नृत्याच्या क्षेत्रात सुद्धा काही झालं असेलच अशी आशा करायला हरकत नाही.

युरोपियन डान्समध्ये या लोकांनी काय काय केले हे माहिती नाही, मात्र भरतनाट्यम् या नृत्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय याच दरबाराचे आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथे सगळीकडे "आंजावर" शब्द वाचायची सवय झाल्याने आधी समजलंच नाही, "तंजावर" काय भानगड आहे Smile

पेपरसाठी धन्यवाद. बाकी सर्फोजी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स होते असं वाटतं. आयुर्वेदातही त्यांनी बरंच काही करून ठेवलंय ते हेच सर्फोजी का?

ओह येस, हेच ते सर्फोजी. ब्रिटिशांनी पॉवर काढून घेतली तरी उरलेल्या संपत्तीचा चांगला विनियोग केला, निव्वळ बाईबाटलीवर पैसा खर्च नै केला हे मोठेच योगदान म्हटले पाहिजे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुस्तकछपाईच्या क्षेत्रातही. नवविद्याकलानिधी नावाचा छापखाना काढून बरीच पुस्तकं छापवून घेतली. १८०६ साली छापलेले 'बालबोधमुक्तावलि' (इसापाच्या गोष्टी) हे मराठीतल्या आद्य छापील पुस्तकांपैकी एक!

हे इसापनीतीचे सर्वांत प्राचीन मराठी भाषांतर आहे. झालंच तर स्वतः रचलेल्या कुरवंज्या (कुरवंजी/ची = संगीत नाटक) देखील रोचक आहेत. घरी एक 'देवेंद्र कुरवंजी' नामक नाटक आहे, त्यात सूत्रधार आणि सूत्रधारीण दोघेही जगाच्या भूगोलाबद्दल चर्चा करताना दाखवलेत. 'इंग्ल्यांड, लाप्ल्यांड, रशिया, इ........सर्वे देश बाई जाण' इ.इ.

इंदिरा विश्वनाथन पीटरसन या सर्फोजींवर काम करणार्‍या बहुधा सद्यमितीच्या सर्वांत अग्रगण्य रिसर्चर असाव्यात. त्यांचे कैक पेपर्स त्यांच्याशी निगडित आहेत.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

The most effective ally of terrorism is complacency एम्जे अकबर यांचा लेख.

विशेषतः खालील वाक्यातला अधोरेखित भाग विनोदी -

Indian Muslims, with their unique history, are at heart culturally cosmopolitan, drawing their living ideology from the Quranic injunction “La qum deen o qum wa il ya deen (To you, your faith, to me, mine)”.

मार्क हॅडन या ब्रिटीश लेखकाची, २००३ सालची "द क्युरियस इन्सिडंट ऑफ द डॉग इन द नाईट टाईम" ही कादंबरी.

पुस्तकाच्या नावापासूनच तिच्याबद्दल कुतुहल वाटत होतं.सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने, मला हे कुणीतरी आधीच सांगितलं होतं की ऑटिस्टीक मुलाच्या दृष्टीकोनातून लिहिलेली ही कादंबरी आहे. ही महत्त्वाची बाब माहिती नसती तर या कादंबरीला कसा सामोरा गेलो असतो, याची कल्पना करणं रोचक वाटतं.

इंग्लंडमधल्या एका परगण्यात राहाणार्‍या, क्रिस्टोफर नावाच्या ऑटिस्टीक मुलाला शेजारच्यांचा कुत्रा मरण पडलेला आढळतो. सुरवातीला कुत्र्याची मालकीण आणि पर्यायाने पोलीससुद्धा क्रिस्टोफरवरच संशय घेतात. परंतु क्रिस्टोफर शेवटी त्या घटनेचा छडा लावतो. या दरम्यान क्रिस्टोफरच्या जगामधे - अगदी त्याच्या जवळच्या कुटुंबीयांच्या संदर्भात - बरीच उलथापालथ होते. एका छोट्या कालावधीत घडलेल्या या घटानांमधून क्रिस्टोफर अचानक मोठा होतो. कथानक म्हणावं तर ते इतकंच.

ही सर्व गोष्ट सांगणारा निवेदक म्हणजे क्रिस्टोफरच. ती सांगताना तो त्याच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाची ओळख करून देतो. एकाच वेळी उत्तम आय क्यू असलेला, गणित नि शास्त्रविषयात उत्तम गती असलेला आणि त्याच वेळी ऑटीझममुळे आजूबाजूच्या व्यक्ती, संस्था, पर्यावरणाशी विविक्षित स्वरूपाचं नातं असलेला १४-१५ वर्षांचा मुलगा. त्याला समोरचा माणूस त्याच्याकडे बघत नसला तर त्या माणसाला नेमकं काय म्हणायचं आहे ते कळत नाही. एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ असू शकतात, बोलण्याचा टोन, त्याचा संदर्भ यानुसार गोष्टींचे अर्थ बदलतात हे त्याला अनाकलनीय वाटतं. माणसं -प्रसंगी जवळची माणसं - आपल्या सोयीकरता, स्वार्थाकरता किंवा गुंतागुंतीचे प्रसंग टाळण्याकरता खोटं बोलतात हेच त्याच्या हिशेबी बसत नाही. क्रिस्टोफरच्या या संदर्भातल्या विवेचनातून आपल्याला आपल्या जगातल्या गुंतागुंतीची, त्यातल्या आपल्या विसंगतींची जाणीव होते. ही जाणीव करून दिली जात असताना त्यातल्या विनोदामुळे हसू येतं नि त्याच वेळी आपण या मानवी स्थितीबद्दल अंतर्मुख होतो.

क्रिस्टोफरच्या गणित किंवा शास्त्रविषयामधे अतिरिक्त गती असणं हा योगायोग नाही; तो त्याच्या ऑटिस्टीक स्थितीचा एक अपरिहार्य भाग आहे. गणित-शास्त्रातल्या गोष्टी नेमक्या असतात; फसव्या नसतात. एकाच वेळी अनेक अर्थांची गुंतागुंत त्यात नाही. क्रिस्टोफर आपल्याशी गप्पा मारताना त्याचं सर्वात आवडतं स्वप्न सांगतो. त्या स्वप्नात तो सोडून जगातले सर्व लोक मेलेले आहेत. हे "हेल इज द अदर पीपल" या सार्त्रच्या विधानाची आठवण करून देणारं वाटतं. मानवी व्यवहार जिथे "नॉर्मल" माणसांना समजत नाहीत तिथे ऑटिस्टीक मुलाला असह्य होऊन "न रहेगा बाँस न बजेगी बाँसुरी" असं वाटावं हे अर्थपूर्ण वाटतं.

एकंदरीत, एका चौदा पंधरा वर्षाच्या मुलाने कुत्र्याच्या संशयास्पद मृत्यूबद्दल लिहिलेली ही छोटीशी कादंबरी "मर्डर मिस्टरी" नाही, ती "यंग अडल्ट" विभागातली हलकीफुलकी कथा नाही. (किंवा ती "इतकीच" नाही!) आणि गंभीर, गुंतागुंतीच्या आशयाला वर्णन करत असताना ती त्याचवेळी गमतीशीर - प्रसंगी विनोदी सुद्धा - बनते. "अम्हांस आम्ही पुन्हा पहावे, काढून चष्मा डोळ्यांवरचा" हे क्रिस्टोफर आपल्याला नकळत शिकवून जातो. क्रिस्टोफरच्या या उलाघालीच्या दरम्यान आपण त्याच्या जगाबद्दलच्या दृष्टीकोनातल्या विनोदाने हसतो, त्याच्या बुद्धीमत्तेने स्तिमित होतो, त्याच्या झालेल्या पंचाइतीमुळे - विशेषकरून जवळच्या माणसांसंबंधी त्याच्या झालेल्या पेचप्रसंगांमुळे आपल्याला त्याच्याबद्दल अपार सहानुभूती वाटते, आणि शेवटी या सार्‍यावर आपल्या खास पद्धतीने त्याने विजय मिळवल्यावर त्याला स्वतःलाच मोठं झाल्याची जाणीव होते त्यावेळी आपल्या ओठांवरही स्मित येतं.

अनेक वर्षांमधे इतकं उत्तम दर्जाचं वाचलं नव्हतं. मार्क हॅडनला मी सलाम करतो.

कादंबरीतली क्रिस्टोफरची काही वाक्यं :

“I think prime numbers are like life. They are very logical but you could never work out the rules, even if you spent all your time thinking about them.”

“Prime numbers are what is left when you have taken all the patterns away. I think prime numbers are like life. They are very logical but you could never work out the rules, even if you spent all your time thinking about them.”

“Sometimes we get sad about things and we don't like to tell other people that we are sad about them. We like to keep it a secret. Or sometimes, we are sad but we really don't know why we are sad, so we say we aren't sad but we really are.”

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

क्युरियस इन्सिडन्ट आवडली असेल तर -

द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स
लेखक: केइगो हिगाशिनो

ही कादंबरीही तुम्हाला आवडेल.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शोधतो. थँक्स.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

शोधले. वाचले. बर्‍याच प्रमाणात आवडले. "क्युरियस इन्सिडंट" इतके आवडले नाही इतकं म्हणतो. मात्र निश्चितच वाचनीय होते.
याबद्दल अधिक वेळ मिळाल्यावर. सध्या आभार मानतो आणि याबद्दल अधिक लिहिण्याकरतां रुमाल टाकून ठेवतो.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कादंबरी वाचून झाली परंतु इथे येऊन त्याबद्दल सांगण्याइतपत वेळ मिळत नव्हता.

सस्पेन्स कादंबरी प्रकारामधे जे उपप्रकार असतात त्यामधे "पैचान कोन" हा एक जसा प्रकार तसा "आधी केले मग सांगितले" हा दुसरा प्रकार. वरची कादंबरी दुसर्‍या प्रकारातली. जो गुन्हा होतो तो कुणी कसा केला ते यात गुलदस्त्यात ठेवलेलं नाही. त्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेगाराने चिरेबंदी काम केल्याने, तपास करणार्‍यांना किती कठीण जातं आणि गुन्हेगाराच्या तोडीच्या बुद्धीमत्तेचाच कुणीतरी तपासकामात आल्यावर तपास कसा लागायला लागतो - आणि तरीही गुन्हा सिद्ध करणं हे अशक्यप्राय कसं ठरत जातं असं याचं स्वरूप.

गुन्ह्यामधे वेगवेगळ्या कारणांनी गुंतलेल्या व्यक्तींची गणित आणि इतर शास्त्रांच्या संदर्भातली संभाषणं हा पुस्तकातला सर्वाधिक आकर्षक भाग मला वाटला. P=NP या गणिती समस्येबद्दल मी ऐकलं होतं. त्याच्याबद्दलचं विवेचन हे कथानकाच्या समस्येशी आणून जोडणं हा भाग जमला आहे. गुन्ह्यांचं "वॉटरटाईट" वाटेल असं स्वरूप, त्यामागची "प्रतिभा", आणि शेवटी गुन्ह्याचा पुरता छडा गुन्हेगाराच्या स्वतःच्या काही समीकरणांमुळे लागणं - थोडक्यात गुन्ह्याच्या तपासाचा कंट्रोल जवळपास पूर्णपणे गुन्हेगाराच्या जवळ असणं हे मती गुंगवून ठेवणारं. वरील बाबींमुळे मला प्रिय असलेल्या "ब्रेकिंग बॅड" या सिरियलची थोडी आठवण मला झाली.

व्यक्तीरेखांच्या मनातल्या आणि चेहर्‍यावर दिसणार्‍या भावनांच्या चित्रणामधे "मिनिमालिझम" जाणवला. गुन्हेगार हा जरी थंड डोक्याने - परंतु अचूक प्रकारे - काम करत असला आणि म्हणून त्याचा सर्व आविर्भाव भावनारहित असला, तरीही बाकी बहुतांश पात्रांच्या मनातल्या भावनांच्या चित्रणाच्या जवळजवळ अभावामुळे मला हा जपानी संस्कृतीचाच एक भाग असावा किंवा कसे अशी शंका आली. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

एकूणात वाचनीय प्रकार. "क्युरियस इन्सिडंट" आणि हे पुस्तक यांच्या मधलं साम्य फारतर "कुणाचा तरी खून नि लावलेला छडा" इतपतच आहे. "Cerebral Nature of the narrative"या दृष्टीने दोन्ही कादंबर्‍या फार वेगळ्या आहेत असं मला वाटलं. नंतर या कादंबरीबद्दल गूगल केलं असतां "दृष्यम्" हा गाजलेला (?) सिनेमा यावर आहे असं कळलं. चूभूदेघे.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

परदेशी कंपनीत गुंतवणूक करणार्‍या भारतीय नागरिकांसाठी नेमके काय (भारतीय नियमांनुसार) बेकायदेशीर आहे ?

---------------

टॅन्स हेवन्स च्या समर्थनार्थ - ह्या पनामा पेपर्स मुळे टॅक्स हेव्हन्स चा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे असं वाटतं. श्रीमंतांनी आपली संपत्ती वाचवून ठेवू नये ती आम्ही (राजकीय नेते व WPoS मंडळींचे तारणहार) या ना त्या मार्गाने टॅक्स करू तेव्हाच ती वैध मानली जाईल या चक्रम भूमिके मुळे टॅक्स हेव्हन्स बदनाम झाले. टॅक्स हेव्हन्स असणे हे कसे योग्य आहे त्याबद्दल. आणखी इथे - टॅक्स हेव्हन्स मुळे एक मस्त परिणाम होतो. अनेक देशांतले (स्वतःला WPoS मंडळींचे तारणहार मानणार्‍या) राजकीय नेत्यांवर एक प्रकारचा दबाव राहतो. त्यांनी टॅक्स रेट वाढवला की कॅपिटल त्या देशांतून निघून बाहेरच्या देशांत (जिथे टॅक्स रेट कमी आहे तिथे) जाते. त्या नेत्यांच्या देशातली गुंतवणूक कमी होते.

डॅन मिचेल म्हणतो तसे - राजकीय नेत्यांना टॅक्स हेव्हन्स चे महत्व समजावून सांगणे म्हंजे - Sort of like convincing thieves that it’s a good idea for houses to have alarm systems.

---------------------------

Christine Lagarde: Women need “skin as thick as an old crocodile” to get to the top - स्त्रियांना उच्चपदावर पोहोचण्यासाठी मनाने अतिकठोर/खंबीर बनणे गरजेचे आहे. टफ बनणे गरजेचे आहे.

दोन गोष्टी आहेत गब्बु.

१. भारतासारख्या ठीकाणी काळा पैसा हा फक्त टॅक्स चोरीचा पण कायदेशीर रित्या मिळवलेला पैसा नसतो. भारतातला मेजॉरीटी काळा पैसा हा भ्रष्टाचारातुन आलेला आहे.

२. पैसा टॅक्स हेवन्स मधे नेणे चुक नाहीये, एकतर तो लपवुन नेला जातो आणि तिथे त्याचे अकाउंटीग होत नाही आणि ट्रेसेबिलिटी रहात नाही, हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे.

स्त्रियांना उच्चपदावर पोहोचण्यासाठी मनाने अतिकठोर/खंबीर बनणे गरजेचे आहे. टफ बनणे गरजेचे आहे.

म्हणजे पुरुषांनी फार हळवे वगैरे असलेले चालते असे काही आहे का?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्त्रियांना उच्चपदावर पोहोचण्यासाठी मनाने अतिकठोर/खंबीर बनणे गरजेचे आहे. टफ बनणे गरजेचे आहे.

सिमोन द बोव्हारचं वाक्य आठवलं. ती म्हणाली होती की स्त्रिया देशाच्या प्रमुखपदी पोहोचल्या म्हणून काय सामाजिक न्याय, समानतेची साथ प्लेगसारखी पसरली नाही.

दुव्यातली काही वाक्यं गंमतीशीर (अधोरेखन माझं) -
... women still needed “skin as thick as an old crocodile” to get to the top in what is too often a macho world.
Lagarde said when asked about what Ferguson termed the current “nasty macho streak in politics” where men were making the most of their masculinity in sometimes embarrassing way.

थोडक्यात, स्त्रियांपेक्षा पुरुषांना माचोपणा जास्त जमतो, त्यांना त्याचा फायदा मिळतो आणि ही गोष्ट लज्जास्पद आहे, असं क्रिस्तीन लागार्द म्हणत आहेत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इंग्रजी फिक्शन वाचणार्‍यांसाठी पर्वणी - या पुस्तकाच्या लेखकाने १९४५ पासून आजपर्यंत प्रकाशित झालेल्या अनेक फिक्शन पुस्तकांचा आढावा यात घेतलेला आहे. लेखकाचा स्वतः चा ब्लॉग पण आहे - इथे

-------------------

नोकरी मधे स्त्रियांविरुद्ध भेदभाव केला जातो व त्यांना (एकाच कामासाठी) पुरुषांपेक्षा कमी पगार दिला जातो असा होरा बाळगणार्‍यांसाठी प्रश्न -

Here are some question for those many people who believe sincerely that women are significantly underpaid and that the reason for this underpayment is ignorance, prejudice, bigotry, or misogyny on the part of producers who produce goods or services in part by employing human labor:

  1. Do you believe that if producers who manufacture goods with metal suddenly become irrationally bigoted against aluminum that the price of aluminum as an input in production would fall relative to the prices of steel, tin, and other metals and would remain ‘too’ low?
  2. Do you believe that if producers who manufacture wooden furniture were stupidly prejudiced against pinewood grown in Alabama that the price of Alabama pinewood would be, and would remain, significantly lower than the price of similar-quality pinewood grown in Mississippi and in Georgia?
  3. Do you believe that if American oil-company executives come to hate Russians that American oil companies could thereby purchase crude oil from Russia at prices significantly below the prices that they pay for similar-grade crude oil produced elsewhere?
  4. Do you believe that if clothing retailers were prejudiced against Asians that they would therefore be able to acquire, year in and year out, clothing made in Asian at prices significantly lower than the prices that these retailers pay for similar-quality clothing made in Europe and South America?

The Seven Habits of Highly Depolarizing People

समाजात एक प्रकारचे मानसिक ध्रुवीकरण (राजकीय व सामाजिक) नसावे असा सामाजिक चर्चेचा एक अंडरटोन असू शकतो. मानसिक ध्रुवीकरण हे अनिष्ट आहे ह्या गृहितकामुळे. पण काही लोक या ध्रुवीकरणाचे विरोधक असतात व हे ध्रुवीकरण कमी करण्याचा यत्न करतात. अशा लोकांबद्दल.

ग्लोरिया स्टेनेम या रॅडिकल स्त्रीमुक्तीवादी स्त्रीचे पुस्तक वाचते आहे. या लेखिकेने लिहीलेले हे माझे पहीलेच पुस्तक. यामध्ये आकर्षण व प्रेम यासंबंधी जो मजकूर तिने लिहीला आहे तो मला रोचक वाटतो-
.
तिच्या मते आकर्षण किंवा प्रेम हे बरेचदा, दोन व्यक्तींमधील physical अंतर जास्त असेल किंवा कोणी एक व्यक्ती मरण पावली तरच यशस्वी होताना दिसते. No wonder romance is sucker of distance or bereavement. याचे कारण हेच आहे की प्रेमामध्ये व्यक्ती स्वतःमधील सुप्त गुणावगुण समोरच्या व्यक्तीवर आरोपीत करत असते. उदाहरणार्थ - भावनाप्रधान मुलांना लहानपणी शिकविले जाते की "रडूबाईसारखा मुलूमुळू रडतोस काय? Be a man" किंवा महत्त्वाकांक्षी किंवा धाडसी मुलींना "Tomboy" किंवा पुरुषी म्हणून हिणवले जाते. यामध्ये ते ते गुण दाबून टाकण्यात समाज यशस्वी होतो. पुढे हेच गुण ही मुले दुसर्‍या व्यक्तीवरती आरोपित करुन प्रेमात पडताना दिसतात. विशेषतः स्त्रिया sucker for romance जास्त का असतात तर फारच कमी समाजमान्य अशा प्रकट गुणांची स्त्रियांमध्ये समाज अपेक्षा करतो. व जे गुण अपेक्षित असतात ते देखील बहुसंख्य गुण हे lame असतात, ते नसते तर स्त्रियांचे जास्त कल्याण झाले असते अशा प्रकारचे असतात. याउलट पुरुषांमध्ये समाजास अपेक्षित असणार गुण हे सकारात्मक व भरपूर असतात. अर्थात स्त्रियांचे अधिक दमन होते व पुढे स्त्रियांना तेच गुण एखाद्या व्यक्तीवर आरोपित करण्याची जास्त गरज भासते.
.
कधी विचार केलाय की प्रेमात पडलेल्या व्यक्तीला, प्रेमात असताना इतके मंत्रमुग्ध, heady, संपूर्ण झोकून दिल्याप्रमाणे, पूर्ण, अतिशय पूर्ण का वाटते, प्रेमामध्ये मर्यादा विरघळून जातात, एक संपूर्ण एकात्मतेची, समाधी अवस्था का साध्य होते याचे कारण हे आहे की व्यक्ती स्वतःच्याच दुर्लक्षित भागाशी romance करते. आणि ही भारावलेली अवस्था तेव्हाच साध्य होते जेव्हा प्रेमपात्र हे दूर असते किंवा मृत्यु पावून असाध्य असते. ज्या क्षणी एकमेकांबरोबर २ व्यक्ती राहू लागतात, त्याक्षणी illusion दूर होते व वास्वविकता समोर येते की दुसर्‍या व्यक्तीला तिचा इगो आहे, तिची काही एक प्रतिमा आहे, गुणावगुण आहेत व ही व्यक्ती केवळ आपल्या दुर्लक्षित प्रतिमेचे आरोपण नाही.
जितकी low self esteem तितकी प्रेमात पडण्याची वारंवारीता जास्त. कारण आपल्यात नसलेले किंवा आपल्यात दमन केले गेलेले गुण आपण तितक्या प्रखरतेने अन्य व्यक्तीत शोधतो. जेलसीचे (मत्सर) प्रमाण देखील व्यक्ती जितकी असुरक्षित व अपूर्ण तितके अधिक असल्याचे जाणवते कारण अपूर्णतेमुळे अधिकाधिक चीडीने, जिकीरीने, पूर्णत्वाचा शोध घेतला जातो. अर्थात "स्त्रीपुरुष भेदभाव - low self esteem - आकर्षण्/प्रेम - मत्सर - प्रेमाची अप्राप्यता - त्यामुळे येणारी lower self esteem - परत स्त्रीपुरुष भेदाभेद -...." हे चक्र मारक एकंदरच ठरते.

महत्त्वाकांक्षी किंवा धाडसी मुलींना "Tomboy" किंवा पुरुषी म्हणून हिणवले जाते. यामध्ये ते ते गुण दाबून टाकण्यात समाज यशस्वी होतो. पुढे हेच गुण ही मुले दुसर्‍या व्यक्तीवरती आरोपित करुन प्रेमात पडताना दिसतात. विशेषतः स्त्रिया sucker for romance जास्त का असतात तर फारच कमी समाजमान्य अशा प्रकट गुणांची स्त्रियांमध्ये समाज अपेक्षा करतो. व जे गुण अपेक्षित असतात ते देखील बहुसंख्य गुण हे lame असतात, ते नसते तर स्त्रियांचे जास्त कल्याण झाले असते अशा प्रकारचे असतात. याउलट पुरुषांमध्ये समाजास अपेक्षित असणार गुण हे सकारात्मक व भरपूर असतात. अर्थात स्त्रियांचे अधिक दमन होते व पुढे स्त्रियांना तेच गुण एखाद्या व्यक्तीवर आरोपित करण्याची जास्त गरज भासते.

(१) जो समाज काही अपेक्षा करतो, दमन करतो त्या समाजात स्त्रिया असतात की नसतात ? का समाज हा फक्त पुरुषांचाच बनलेला आहे ?
(२) सिस्टिम च्या समस्यांसाठी फक्त सिस्टिम बाहेरचे च जबाबदार असतात ? समाज स्त्री कडून अपेक्षा वेगळी करतो, दमन करतो ... की झालं स्त्रियांचं दमन - असं आहे का ... खरंच ? जिचं दमन केलं जाते ती दमन करण्यास तयार च बसलेली असते का ? दमनाची सुरुवात झाली रे झाली की हार मानून बसते - असं आहे का ?
(३) It is very easy to convince ANYBODY that he/she has been repressed/oppressed. नैका ?

(१) जो समाज काही अपेक्षा करतो, दमन करतो त्या समाजात स्त्रिया असतात की नसतात ? का समाज हा फक्त पुरुषांचाच बनलेला आहे ?
(२) सिस्टिम च्या समस्यांसाठी फक्त सिस्टिम बाहेरचे च जबाबदार असतात ? समाज स्त्री कडून अपेक्षा वेगळी करतो, दमन करतो ... की झालं स्त्रियांचं दमन - असं आहे का ... खरंच ? जिचं दमन केलं जाते ती दमन करण्यास तयार च बसलेली असते का ? दमनाची सुरुवात झाली रे झाली की हार मानून बसते - असं आहे का ?
(३) It is very easy to convince ANYBODY that he/she has been repressed/oppressed. नैका ?

(१) स्त्रियाही असतातच.पण परंपरागत ब्रेन्वॉश्ड झालेल्या असतात. ज्याप्रमाणे लहानपणी अ‍ॅब्युझ झालेल्या व्यक्तीच पुढे अब्युझ perpeyrateदिसतात त्याम्प्रमाणे.यातही स्टेइनमन यांचे म्हणणे आहे की ९०% अअ‍ॅब्युझ हे पुरषांकडुन होतात तर १०% स्त्रियांकडुन. परंतु त्या १०% चा गवगवा इतका अधिक केला जातो. याऊलट लहान मुली या प्रौढ व्यक्तींच्या शिकार बनणे आदि गोष्टींना एक प्रकारे ग्लॅमरच दिले जाते.
(२) होय ही सुरुवात लहानपणापासून होते. जितक्या लवकर मुलांचे स्पिरिट ब्रेक केले जाइल, तितके पालक एक्स्पोझ होण्याची शक्यता कमी.
(३) असच काही नाही चांगल्या गोष्टीही लक्षात आणुन देऊ शकता. जर त्या तशा असतील तर.

जाताजाता : हा तक्ता पहा.

Based on the BLS data for 2014

--

आता फक्त - बरं मग ? (किंवा - का विचारू नको ?) असे प्रश्न विचारू नका म्हंजे मिळवली.

हाच मुद्दा आहे की समाजात स्त्रियांमध्ये, खास "पुरुषी" गुण इतके सप्रेस केलेले आहेत की तशा स्त्रियाच अतिशय कमी आढळतात. हे समाजाच्या प्रत्येक विभागात प्रतिबिंबित होणारच.

हाच मुद्दा आहे की समाजात स्त्रियांमध्ये, खास "पुरुषी" गुण इतके सप्रेस केलेले आहेत की तशा स्त्रियाच अतिशय कमी आढळतात. हे समाजाच्या प्रत्येक विभागात प्रतिबिंबित होणारच.

आमचा मुद्दा हा आहे की फेमिनिस्ट स्त्रिया या सगळ्याचे खापर नेहमी समाजावर फोडून रिकाम्या होतात. स्वतःला व स्त्रियांना दोषहीन मानतात.

दुसरे लेन्स वापरून बघितले तर - स्त्रियांची समस्या घरात जास्त असते. घरातले पुरुष हे समस्याजनक जास्त वागतात. राम, पांडव हे घरातलेच लोक होते की ज्यांनी स्त्रियांचे दमन केले. दुर्योधन हा सुद्धा घरचाच माणूस नव्हता का ? घरातल्या लोकांना सोडून देऊन अख्ख्या समाजाला ब्लेम करणे आणि जोडीला स्वत ओनरशीप न घेणे हे काही तितकेसे पटत नाही.

उदाहरण देतो - (ही तुलना नाही. फक्त उदाहरण आहे.)
जसं समाजवादी/मार्क्सवादी असंच गृहित धरतात की उद्योजक हे शोषणाशिवाय दुसरं काही करतच नाहीत. उद्योजकांना दुसरा धंदाच नसतो की काय ?
कॅपिटलिस्ट लोक कसे - मार्केट फेल्युअर अस्तित्वात असते - हे थेट मान्य करतात.
तसं मार्क्सवाद्यांनी कधी मान्य केल्याचं मला दिसलं नाही - की हो प्रोलेटेरिएट मधे समस्या असतात.

-

आमचं एक बेष्ट सजेशन आहे - स्त्रियांनी आधी स्वतःला रिफॉर्म करावं. नंतर स्वतःच्या घरात बदल घडवून आणावेत. नंतर समाजाला रिफॉर्म करावं.

(माझी बायको म्हणते तसं - स्त्रियांचं युद्ध (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेष्ट) हे घरातच असल्यामुळे तो इतरांच्या (उदा. आदीवासींची समस्या) समस्यांपेक्षा खूप वेगळा मामला आहे.)

स्त्रियांनी आधी स्वतःला रिफॉर्म करावं. नंतर स्वतःच्या घरात बदल घडवून आणावेत. नंतर समाजाला रिफॉर्म करावं.

आयुष्य असं सिरीअली चालत नसतं पॅरलल चालतं.

आमचा मुद्दा हा आहे की फेमिनिस्ट स्त्रिया या सगळ्याचे खापर नेहमी समाजावर फोडून रिकाम्या होतात. स्वतःला व स्त्रियांना दोषहीन मानतात.

असच काही नाही. स्टेइनेम म्हणते की "टिपिकल फेम्म्म्म्मिनाइन" स्त्रियांमध्ये सेल्फ एस्टीम कमी आढळते याउलट "कन्व्हेन्शनली पुरुषी" स्त्रियांमध्ये स्वतंत्र वृत्ती, स्वावलंबन हे गुण अधिक विकसित झालेले आढळतात तसेच सेल्फ एस्टीमही जास्त आढळते.
.
आता वरेल उदाहरणात स्टेइनेम स्त्रियांना दोष देतेच आहे की. त्यांना जाणीव करुन देतच आहे की.
.
पण अधिक वाचून अधिक लिहीते.

आयुष्य असं सिरीअली चालत नसतं पॅरलल चालतं.

मुद्दा सहर्ष मान्य.

( आम्ही हाच मुद्दा वेगळ्या शब्दात मांडतो. पण ते असोच. )

फारच फॉर्मल भाषा आहे..

आढावा म्हणून चांगला लेख आहे. पण नवीन काही मिळालं नाही. Sad

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"अ करियर ऑफ एव्हिल" हे रॉबर्ट गालब्रेथचं (म्हणजे जे के रोलिंगचं) पुस्तक अ‍ॅमेझॉनवर सध्या सस्त्यात उपलब्ध झालं आहे. तरी इच्छुकांनी लाभ घ्यावा.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मध्यन्तरी वाचनात आलेला हा ब्लॉग.

http://meethkitikhave.blogspot.in/

उल्का

बाजारात जाताना फ्री फ्लो ह्या कृत्रिम मिठाला पर्यायी नैसर्गिक मिठाची अर्थात, खडेमीठ आणि सेंधवची मागणी करा

पण नैसर्गिक मिठात आयोडिन नसते ना? टीव्ही वर च्या आयोडाईज्ड मीठाच्या सरकारी जाहीराती दाखवतात त्या आठवल्या (थायरोईड वाल्या).

आपल्याला माहीती नसतानाही आपण कसे अत्मविश्वासपूर्वक बोलत असतो, वागतो त्याबद्दलचा हा लेख.

We are all confident idiots.
___________

नैतिकता या विषयावरील एकदम झकास लेख आहे
वाचनिय आहे. सुरुवातच इतकी छान आहे. नंतर येणारी उदाहरणे देखिल एकदम पूरक आहेत.
____________

हॉरर मुव्ही पेक्षाही भयानक सत्य कथा - इन्टरनेट क्राइम वरती
http://jezebel.com/one-womans-dangerous-war-against-the-most-hated-man-o...
_________
दिखाऊपणा किंवा vulgar display of wealth या विषयावरील हा लेख-
http://www.theatlantic.com/magazine/archive/2008/07/inconspicuous-consum...

http://sanskritdocuments.org/scannedbooks/marathi_oudl_Jan2012.htm

या लिंकवर बरीच जुने मराठी पुस्तकं आहेत. व पु काळेंच एक पुस्तक सापड्लं!

http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/10769

१९१३ सालचं एक पुस्तक , द पीपल ऑफ इंडिया, http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/12007

मजा येईल वाचायला अस वाटतय..

बादवे - उस्मानिया विद्यापीठ हे जगातलं सर्वात भेदभावविरहित विद्यापीठ असावं. स्त्री-पुरुष, आडवं-उभं गंध, हिंदू-मुस्लिम असले चिल्लर भेदभाव त्यांच्या खिजगणतीतही नाहीत. उस्मानिया मोठा प्लेयर आहे: सजीव-निर्जीव असा भेदभावही ते करत नाहीत. ज्याप्रमाणे सजीव नोकरदारांना शनि-रवि सुट्टी असते, त्याप्रमाणे त्यांच्या निर्जीव सर्व्हर्सनाही ते तशीच सुट्टी देतात. त्यामुळे मशारनिल्हे लिंका वीकेंडास चालणार नाहीत.

त्याचप्रमाणे सर्व्हर्सना वार्षिक २५ दिवस रजा, अहोरात्र काम करण्याबद्दल ओव्हरटाईम, एल टी ए आणि सेवेच्या संधिकाली ग्रॅच्युईटी देतात की नाही याची चौकशी चालू आहे.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हाहा. कोणीतरी त्यांची सगळी पुस्तके डाउनलोड करुन ठेवली पाहिजे, कधी गायब होतील सांगता येत नाही.

एडीट. साईट परत सुरू झाली..

सगळीकडे नोकरशाही आहे! उस्मानियाचे माहित नाही, पण आमच्या संस्थेत सो-शु, १०-५.३०च सर्वर्स चालू असतात. आम्ही खूप प्रयत्न करूनही त्या वेळांआधी, किंवा नंतर चालू ठेवत नाहीत. म्हणजे संपूर्ण लायब्ररी कॅटेलॉग, वगैरे बंद. एक तर विजेचे बिल. सर्वर कायम चालू ठेवण्याचा खर्च छोट्या संस्थांना नेहमी पेलवतोच असे नाही.
पण अजून महत्त्वाचे कारणः सर्वर चालू आणि बंद करणार्‍याची तशी नेमलेली सरकारी पोस्ट असते. त्यामुळे त्याला हात लावायचा अधिकार फक्त त्याला असतो. कुणी त्यात कारभार केला तर पुढे सगळ्याच पोस्टींमध्ये लोक लुडबुड करायला लागतील, असं स्टाफ असोसियेशनचं म्हणणं असतं. वर तो नसताना सर्वर मध्ये काही बिघाड झाला तर कोण त्याला तोंड देणार? पुन्हा तेच - एक में लुडबुड, सब को डेंजर. त्यामुळे त्याच्या कामाच्या वेळातच सर्वर चालतो. कधी कॉनफरन्स साठी शनिवारी नेट आणि वायफाय लागलं तर खास आधी ट्रिप्लिकेट मधे, थ्रू प्रॉपर चॅनेल, आम्हाला अर्ज डिस्क्लेमर सहित देऊन भरावा लागतो.
आमच्याकडे जुन्या पुस्तकांचे भले मोठे डेटाबेस नाही हेच बरे आहे.

जुन्या पुस्तकांचे भले मोठे डेटाबेस नाही हेच बरे आहे.

हे बरे आहे???????????????? असो.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवघड आहे.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

the moon is always female- Marge Piercy या कवितेच्या पुस्तकाचे पारायण करते आहे. एखाद्या कवितेबद्दल माझ्या मनात आलेले विचार याच धाग्यात याच प्रतिसादात देते. कृपया पाचर मारु नये/बूच लाऊ नये/रुमाल टाकला आहे .....वगैरे वगैरे Wink
___
Cutting the grapes free poem ही कविता आज पारायण करताना अधिकच आवडली. या कवितेमध्ये द्राक्षाची दिवसगणिक मादक होत जाणारी वारुणी आणि प्रगल्भ होत जाणारी स्त्री असे रुपक आहे.
.
वसंतआगमनाच्या अगदी प्रारंभी एखाद्या क्रुसिफाय केलेल्या चेटकिणीच्या हडहडलेल्या हातापयांप्रमाणे दिसणार्‍या द्राक्षवेलीच्या काटकुळ्या शाखा, वसंतागमनानंतर हिरव्याजर्द सर्पिल दिसू लागतात आणि त्यांच्यातून कलिका फुटु लागतात. हळूहळू याच कळ्यांच्या जागी जांभळी, काळी , पिवळी बाळद्राक्षे जोम धरु लागतात. एखाद्या प्रियकराच्या ऊष्ण बोटांच्या स्पर्शने टरारुन आलेल्या स्तनाग्रांसम बाळद्राक्षे, पुरुषाच्या वृषणासम जांभळी, काळी टप्पोरी द्राक्षे. या द्राक्षांवरती दंश करुन, चावे घेऊन, कीडे, सुरवंट, फुलपाखरे त्यातील रस प्राशन करतात, जीभा लाललाल, जांभळ्या करुन घेत.
.

Now the grapes swell in the sun yellow
and black and ruby mounds of breast
and testicle, the image of ripe flesh
rounding warm to the fingers. The wasps
and bees drone drunken, our lips, our
tongues stained purple with juice and sweet

.
स्त्री ही तशीच वयात येताना रक्त सांडते, पहीला पुरुष चाखताना रक्ताळते, अपत्यास जन्म देताना एवढेच नाही तर जन्म दिला नाही तरी रक्त सांडते. हे जे तिचे प्रगल्भ होत जाणे आहे हेच मूर्तिमंत काव्य. हीच द्राक्षातील वारुणी. काल परवा तारुण्यात झिंग असणारी पण त्याहुनही कितीतरी अधिक पटींनी प्रगल्भ वयात नशा देणारी.
.

We bleed when we blossom from the straight
grainy pine of girlhood. We bleed when we taste
first of men. We bleed when we bear and when
we don't. Vine from my blood is fermented
poetry and from yours wine that tunes my sinews
and nerves till they sing instead of screeching

.
द्राक्षाची वेल- जसा मुसळधार पावसाचा मारा, गारपीटीचा तडाखा, दुष्काळाची झळ आणि गारठून टाकणारा हिमप्रपात सहन करुनही, योग्य वेळी प्रगल्भ झाल्यावर द्राक्षा-द्राक्षात रस टच्चून भरला जातो,तसेच स्त्रीचे फक्त वय वाढत नसून, पुस्तकी किंवा अनुभवगम्य ज्ञानाने ती परिपूर्ण होत जाते.
असे असतान, अमरत्वाची अभिलाषा कोण धरेल बरं? अमर तर दगडगोटे असतात. सृष्टी चक्राच्या तलावरती नाचत नाचत जी मादक वारुणी द्राक्षे धारण करतात, जी लोभस प्रगल्भता स्त्रीमध्ये येते ती अमर दगडगोट्यांच्या नशीबी कोठून! आणि म्हणूनच काळाच्या जुलमी रेट्याखाली माझ्या रंध्रारंध्रातून प्रवाहीत होत जाणारी रक्तवारुणी कोणीही चाखली नाही, तिचा आस्वाद घेतला नाही तर तिच्य नशीबी फक्त आंबट्ट व्हिनेगर होणे असते.
मला अमरत्व नको, मला चिरतारुण्य नको तर कालप्रवाहात वहात जात वारुणी होणं मला आवडेल.

The press of the years bear down
on us till we bleed from every pore
yet in our cells sun is stored in honey
ready to be spilled or to nurture.
Like wine I must finally trust myself
to other tongues or turn to vinegar.

____________
याच पुस्तकातील अन्य एका गर्भपात या विषयावरील कवितेसंबंधी पूर्वी मी हा धागा काढला होता - http://aisiakshare.com/node/1918 (झैरात)

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.