भूमीशी - परिसराशी नातं सांगणार्‍या मराठी कविता

आपला गाव, आपला परिसर ह्यांविषयीची आत्मीयता आणि त्यांच्याशी असलेलं नातं पुष्कळ लोकांना जगण्याचं बळ देतं आणि स्मरणकातरही बनवतं. मराठीत अशा भावना ज्यात प्रकट झालेल्या आहेत अशा वेगवेगळ्या काळातल्या आणि वेगवेगळ्या जाणीवा व्यक्त करणार्‍या कवितांच्या मी शोधात आहे. राष्ट्राभिमान किंवा देशाभिमान अशा भावनांपेक्षा आपल्या भूमीशी किंवा परिसराशी असलेल्या व्यक्तिगत जिव्हाळ्याच्या नात्याची भावना ज्यात व्यक्त होते आहे अशा कविता हव्या आहेत. त्याचप्रमाणे वस्तू किंवा व्यक्तीशी नातं नको आहे, तर गाव, नदी, भूमी अशा गोष्टींशी नातं सांगणार्‍या कविता हव्या आहेत.

कविता गाजलेली असावीच असा आग्रह नाही. कवितेला काही साहित्यिक मूल्य मात्र असावं. (हे अर्थात व्यक्तिसापेक्ष आहे हे मान्यच आहे.) नावाजलेल्या कवीच्या कवितांचाच विचार करायचा आहे. पटकन सुचणारी काही उदाहरणं -

कविता ऑनलाईन मिळाली तर ह्या धाग्यावर दुवा द्या. अन्यथा कवितेचं शीर्षक, कवीचं नाव आणि कोणता संग्रह, प्रकाशन वगैरे माहिती सांगा. प्रतिसादात पूर्ण कविता टंकून दिलीत, तर उत्तमच!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

माझ्या गोव्याच्या भूमीत - बोरकरांची ही कविता चटकन आठवली. हा दुवा
- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासून गुळगुळीत झाली आहे पण तरीही..

कवी : माधव केशव काटदरे ('माधव' या नावाने कवितालेखन)
कविता : हिरवे तळकोकण
संग्रह : फेकलेली फुले (स्रोत खात्रीलायक नाही)
वर्ष : १९२१ (स्रोत खात्रीलायक नाही)
------------
सहय़ाद्रीच्या तळी शोभिते हिरवे तळकोंकण,
राष्ट्रदेविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन !
झुळझुळ गाणे मंजुळवाणे गात वाहती झरे,
शिलोच्चयांतुनी झुरूझुरू जेथे गंगाजळ पाझरे;
खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे
दरिखो-यांतुनि माणिकमोती फुलुनि झांकले खडे;
नील नभी घन नील बघुनी करि सुमनी स्वागत कुडा,
गोमेदांच्या नटे फुलांनी बरसातिंत तेरडा!
कडेपठारी खेळ मरूतासह खेळे हिरवळ,
उधळीत सोने हसे नाचरे बालिश सोनावळ!
शारदसमयी कमलवनाच्या तरल्या शय्येवरी
मदालसा स्वच्छंद लोळती जलदेवी सुंदरी!
कविकाव्यांतुनी तशी जींतुनी स्र्वते माध्वी झरी,
आमोदा उधळीत फुले ती बकुळींची मंजरी;
हिरव्या पिवळय़ा मृदुल दलांच्या रम्य गालीच्यावरी
स्वप्नी गुंगति गोकर्णीची फुले निळी पांढरी!
वृक्षांच्या राईत रंगती शंकुत मधु गायनी
तरंगिणीच्या तटी डोलती नाग केतकीवनी!
फुलपाखरांवरूनी विहरती पुष्पवनांतिल परी,
प्रसन्नता पसरीत वाजवून जादुची पांवरी!
शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी
रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावूनी;
रोपे त्यांची बनुनी पसरली नाचत चोहींकडे!
अजुनि पहाया! मंडित त्यांनी कोकणचे हे सडे;
इतिहासाला वार्ता ज्याची श्रुत नाही जाहली,
दंतकथांसह विस्मृती ज्याची होऊनिया राहिली
‘झिम्मा खेळे कोंकणचा तो नृपाळ’ म्हणती मुली
‘गळे वसंती टपटप जेव्हा आंब्याची डाहळी!’
पिकले आंबे गळुनी भूतळी रस जोंवरि वाहतो
वनदेवींसह झिम्मा खेळत तोवरि नृप राहतो.
कुठे आढळे फळभाराने लवलेली आंवळी,
कुठे गाळिती भुळभुळ अपुली पक्व फळे जांभळी,
कुठे हलवितो पिंपळपाने पिंपळ पारावर,
कुठे वडाच्या पारंबीवर झोंके घे वानरं!
कुठे बेहड्यावरि राघूस्तव विरही मैना झुरे,
प्राणविसांवा परत न आला म्हणूनी चित्त बावरे!
मधमाशांची लोंबती पोळी कुठे सात्त्विणावरी
रंग खेळती कुठे प्रमोदे पांगारे शेवरी!
पोटी साखरगोटे परि धरि कंटक बाहेरूनी
झुले कुठे तो फणस पुरातन रहिवासी कोंकणी.
कोठे चिंचेवर शठआंबा करि शीतल सांउली,
म्हणूनी कोपूनी नदी किनारी रातंबी राहिली!
निर्झरतीरी रानजाईच्या फुलल्या कुंजातुनी
उठे मोहमयी संगीताचा अस्फुट कोठे ध्वनी!
कुठे थाट घनदाट कळकिचा त्यांत संचरे कुणी
पुंगी बजावित फंदी मुशाफर दर्यापुर सोडूनी!
कुठे सुरंगी मुकुलकुलांच्या सस्मित वदनांतुनी
दरवळलेला परिमळ सेवित फिरती अपसरा वनी!
कोरांटीची नादवटीची नेवाळीची फुले
फुलुनि कुठे फुलबाग तयांनी अवघे श्रंगारिले!
नीललोचना कोंकणगौरी घालुनि चैत्रांगणी
हिंदोळय़ावर बसविती जेव्हा अंबा शुभदायिनी,
हळदीकुंकू तदा वटिता नसे प्रसादा उणे,
पिकली म्हणूनी रानोरानी करवंदे तोरणे.
औदुंबरतरू अवधुताचा छायादे शीतल,
शिवयोग्याचा बेल वाढवी भावभक्तीचे बळ;
बघुनि पांढरी भुतपाळ वेताळ काढितो पळ
आइनकिंजळ करिती मांत्रीकमंत्रबळ दुर्बळ!
गडागडावर निवास जेथे मायभवानी करी.
राहे उधळीत फुले तिथे खुरचांफा चरणांवरी!
पानफुलाच्या वाहुनि माळा अंजनिच्या नंदना,
तिजवर वरूनी वैधव्याच्या रूइ चुकवी यातना!
चिंवचिंव शब्दा करित निंवावर खार भराभर पळे
भेंडि उंडिणीवरी बैसुनी करकरती कावळे;
लज्जारंजित नवयुवतींच्या कोमल गालासमं
रंगुनि काजु, भरले त्यांनी गिरी डोंगर दुर्गम!
तिथे मंडलाकार मनोहर नर्तन आरंभुनी,
रूसल्या सखिची घुमत पारवा करितो समजावणी!
विविध सुवासी हिरवा चांफा चकीत करी मानस,
मंदमंद मधु गंध पसरिते भुइचांफा राजस,
हंसे उपवनी अधरेन्मीलित सुवर्णसंपक कळी,
पाडुनी तुळशीवरी चिमुकली हलती निज सांउली!
पराग पिवळे, धवल पाकळय़ा, परिमळ अंबर भरी
घालित रूंजी भ्रमति भृंग त्या नागचंपकावरी!
सौगंधिक उच्छ्वास सोडिती प्राजक्ताच्या कळय़ा,
लाजत लाजत हळुच उघडितां निज नाजुक पाकळय़ा
त्या उच्छ्वास पिउनि बिजेचा चांद हर्षनिर्भरी
होउनिया बेभान नाचतो निळावंतिच्या घरी!
धुंद सिंधुला मारवेलिची मर्यादा घालून
उभी सैकती कोंकणदेवी राखित तल कोंकण;
निकट माजली निवडुंगांची बेटे कंटकमय,
आश्रय ज्यांचा करूनी नांदती कोचिंदे निर्भय,
मागे त्यांच्या डुले नारळी पोफळिचे आगर
पुढे विराजे निळावंतिचे निळेच जलमंदिर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही चौथी/पाचवीला पाठ्यपुस्तकात होती (त्यामुळे कविता निश्चितच १९८४ पूर्वीची आहे). आठवणीतून देत आहे.

कवितेचे शीर्षक - 'इथे' किंवा 'आम्रतरू'

आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निजसाउली
मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे पायांतळी

आणिक पुढती झरा खळाळत खडकांतुन चालला
साध्या भोळ्या गीतामध्ये अपुल्या नित रंगला

काठीं त्याच्या निळी लव्हाळी डुलती त्यांचे तुरे
तृणांकुरांवर इवलाली ही उडती फुलपाखरे

खडा पहारा करिती भवती निळेभुरे डोंगर
अगाध सुंदर भव्य शोभते माथ्यावर अंबर

दुर्मिळ ऐशी देई शांतता सदा मला हे स्थल
ऐकु न येई इथे जगाचा कर्कश कोलाहल

व्याप जगाचा विसराया मी येई इथे सत्वर
अर्ध्या मिटल्या नयनी बघते स्वप्ने अतिसुंदर

शांतविले मी तप्त जिवाला इथे कितीदा तरी
कितीदा यावे तरी येथली अवीट ही माधुरी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अखेरचा हा तुला दंडवत" हे एक चट्कन आठवलं.

मावळप्रांतीच्या गावाची नुसती आठवणच नाही, तर एका कठीण सामाजिक परिस्थितीत अडकलेल्या स्त्रीचा खिन्न नॉस्टॅल्जिया आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एक खेडे

- केशवसुत

सह्यगिरिच्या पायथ्याला सुपीक
रम्य खोरे कोकणामधी एक;
नदी त्यामधुनी एक वाहताहे,
एक खेडे तीवरी बसुनि राहे.

वरुनि सुंदर मंदिरे न त्या ठायी
परी साधी झोपडी तिथे पाही,
मन्दिरांतुनि नांदते रोगराईल
झोपड्यांतुनि रोग तो कुठुनि राही?

रोग आहे हा बडा की मिजासी,
त्यास गिर्द्यावरि हवे पडायासी;
झोपड्यांतिल घोंगड्यांवरि त्यास
पडुनि असणे कोठले सोसण्यास?

उंच नाहित देवळे मुळी तेथे,
परी डोंगर आहेत मोठमोट्।ए;
देवळी त्या देवास बळे आणा,
परी राहे तो सृष्टिमधे राणा.

उंच डोंगर ते, उंच कडे भारी,
पडे धो धो ज्यांचियावरुनि वारी;
भोवताले रान ते दाट आहे;
अशा ठायी देव तो स्वये राहे!

स्तोत्र ओढे थांबल्यावीण गाती;
सूर वारे आपुला नित्य देती,
वृक्षगण तो नाचुनी डुल्लताहे;
अशा भक्तीच्या स्थळी देव राहे!

अशी नैसर्गिक भव्यता उदास
तया खेड्याच्या असे आसपास;
तसा खेड्याचा थाट तोहि साधा
भव्यतेला त्या करितसे न बाधा.

सरळ साधेपण असे निसर्गाचे
मूल आवडते, केवि ते तयाचे
भव्यतेला आणील बरे बाधा?
निसर्गाचा थाटही असे साधा.

लहान्या त्या गावात झोपड्यांत
भले कुणबी लोक ते राहतात;
खपोनीया ते सदा सुखे शेती
सरळ अपुला संसार चालवीती.

अहा! अज्ञात स्थळी अशा माते
एक गवतारू खोप रहायाते,
शेतवाडी एक ती खपायाला
लाधती, तर किति सौख्य मन्मनाला!

तरी नसतो मी दरिद्री धनाने,
तरी नसतो मी क्षुद्र शिक्षणाने;
तरी होती ती स्वर्गसुखे थोडी,
तरी नसती कीर्तिची मला चाडी!

कीर्ति म्हणजे काय हो? एक शिंग :
प्रिय प्राणांही आपुलिया फु़ंक,
रखाडीला जा मिळूनिया वेगे;
शिंगनादहि जाईल मरुनि मागे!

कीर्ति म्हणजे काय रे? एक पीस :
शिरी लोकांच्या त्यास चढायास
छरे पडती पक्ष्यास खावयास;
मागुनी ते गळणार - हेहि खास.

पुढे माझे चालेल कसे ऐशी
तेथ चिन्ता त्रासिती न चित्तासी.
नीच लोकांला मला नमायास
वेळ पडती थोडीच ह्या स्थळास!

शेत नांगरणे पेरणे सुखाने,
फूलझाडे वाडीत शोभवीणे;
गुरेढोरे मी बाळगुनी काही
दूधदुभते ठेवितो घरी पाही.

कधी येता पाहुणा जर घराला
'तुझे घर हे' वदतोच मी तयाला;
गोष्टि त्याच्या दूरच्या ऐकुनीया
थक्क होतो मी मनी तया ठाया.

'असे जग ते एवढे का अफाट!
त्यात इतुका का असे थाटमाट!'
असे वदतो मी त्यास विस्मयेसी,
स्वस्थिती तरि तुळितो न मी जगाशी,

स्वर्गलोकी संपत्ति फार आहे,
इथे तीचा कोट्यांश तोहि नोहे;
म्हणुनि दु:खाने म्हणत 'हाय! हाय!'
भ्रमण अपुले टाकिते धरा काय?

तरी, स्वपथा जातात सोडुनीया
कुणी तारे तेजस्वि फार व्हाया;
तधी तेजाला लोळ दिसे साचा,
तरी अग्नी तो त्यांचिया चितेचा!

वीरविजयांच्या दिव्य वर्तमानी
कृष्ण कदने पाहतो न त्या स्थानी;
भास्कराच्या तेजाळपणी माते
डाग काळे दिसते न मुळी तेथे!

सूर्यचन्द्रादिक दूर इथुनि तारे
तसे जर हे मानितो अलग सारे,
जसे नेच्छू त्यावरी चढायास,
इच्छितो नच या जगी यावयास!

तेथ गरजा माझिया लहान्या त्या
सहजगत्या भागुनी सदा जात्या;
म्हणुनि माझे जग असे तेचि खोरे
सुखी मजला राखिते चिर अहा रे!

करमणूक, १७-१-९२

(धड न वाचल्यामुळे माझाही पोपट झाला आहे, पण मी काही माझे श्रम निर्दयपणे मिटवणार नाही. तेवढीच कुणाची एखादी टिचकी वाचेल :प)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कवी : विठ्ठल वाघ
संग्रह : काया मातीत मातीत
प्रकाशक : देशमुख अ‍ॅन्ड सन्स
वर्ष : कल्पना नाही. पण 'अरे संसार संसार' चित्रपट १९८१ साली आला. त्यामुळे कविता अर्थातच त्यापूर्वीची आहे.

दुवा

वरील दुव्यात मूळ कविता असावी असा कयास आहे कारण चित्रपटात गाण्याच्या चालीच्या सोयीने शब्दरचनेत काही बदल केले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझें घर

- बा. भ. बोरकर

तृप्त स्वतंत्र गोव्यांत केव्हां तरी केव्हां तरी
फेसाळल्या लाटांपाशी सिंधुसरितेच्या तीरीं
बांधीन मी छोटेंसेंच लाल चिरेबंदी घर
गार विलायती वेल चढवीन भिंतीवर

मागें विहीर कांठाची वर प्राजक्ताचें खोड
गर्द हिरवें न्हाणीशीं नीरफणसाचें झाड
केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा
त्यांत सवत्स कपिला, ओल्या चार्‍याचा नि सांठा

फुलपाखरांच्यासाठीं पुढें फुलझाडें चार
आंबा एकादा कलमी यावी म्हणुनियां खार
गारव्याच्यासाठीं कांहीं गार नाजूक पोफळी
नागमोडी त्यांच्यावर पानवेेली मिरवेळी

वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे
शेजारच्या माडावर पाहीन मी सोनसडे
कानीं समुद्राची गाज पुढें ग्रंथ स्वर्णाक्षरी
पारव्यांची कुजबुज खिडकीच्या गजांवरी

असा पहाटेला घेत हुक्क्या चहाची लज्जत
लिहीन मी भावगीतें तेथे घुमत घुमत
आणि येतां थोडा शीण बसूनियां गच्चीवर
रेखाटीन भोवतींचें चित्र एखादें सुंदर

जाळीं फेकणारे कोळी, त्यांच्या मासळीच्या होड्या
खपणारे वावराडी, त्यांच्या विसाव्याच्या विड्या
कधीं काजळता क्रूस कधीं उजळ घुमट
बांगड्यांशीं खेळणारा कधीं ओलेतीचा घट

आणि मग सेवीन मी जाईजुईचा गे भात
पोईंतल्या मासळीचा स्वाद घेत साथ साथ
वेताचिया खाटेवर थोडा बागेंत दुपारी
झोपेन मी घोळवीत तुझी अमली सुपारी

आणि सूर्यास्तास माझा रंगी घेऊन शिकारा
तुझ्या संगें जाईन मी इंद्रचंद्रांच्या माहेरा
कुणी भविष्याचा कवी आम्हां ऐकवील गाणी
ऐकेन तीं समाधानें डोळा घेऊनियां पाणी

थंडीवार्‍यात पश्मिनी शाल स्कंधीं घालशील
कांठीं उद्यांचा तो कवी प्रेमें मला सांभाळील
घरीं येतांच नातरें आनंदानें
म्हणतील, "सांगा गोष्ट किंवा म्हणा नवें गाणें."

रचूनिया सांगेन मी त्यांना गाण्यांतच कथा
जेणें जाणवेल त्यांना उद्यां दुसर्‍याची व्यथा
मग रेलून गच्चींत टक लावीन आकाशीं
दाट काळोखांतही मी चिंब भिजेन प्रकाशीं

असे माझे गोड घर केव्हां तरी केव्हां तरी
अक्षरांच्या वाटेनेंच उतरेल भुईवरी

चांदणवेल, कॉन्टिनेन्टल प्रकाशन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कदाचित या यादीतल्या सार्‍या कवितांना लेखातले निकष लागू पडणार नाहीत, तरीही चटकन आठवणार्‍या काही:

पितात सारे गोड हिवाळा - मर्ढेकर
या शेताने लळा लाविला असा की, या नभाने या भुईला दान द्यावे - महानोर
चित्रवीणा - बोरकर
तळ्याकाठी - अनिल
मुंबई, मुंबई, माझ्या प्रिय रांडे - ढसाळ
त्रिधा राधा - पु. शि. रेगे
निळाई - ग्रेस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरुतळी नामक एक कविता चौथीत अभ्यासाला होती. शांता शेळके यांची. कुणाकडे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ते तरुतळी, विसरले गीत? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या नभाने या भुईला दान द्यावे - महानोर - वेडी होते ही कविता वाचताना.

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती ही वास्तू

जिच्या पंखांखाली वाढलें,
जिच्या ओढीने कित्येक वर्षांनी आज
येथवर आलें... ती ही वास्तू :
सत्तेचाळीसच्या वणव्यांतील एक आहुती
ती ही वास्तू

विद्रूप उघड्या भिंती. कोसळलेले ढिगारे.
पण मला हें कांही दिसत नाही. मला दिअतें
हें स्वयंपाकघर
जिथे आईने भरभरून पानें वाढून दिलीं
आणि भरभरून आशीर्वाद घेतले.

हे देवघर
ज्याने मला प्रार्थना शिकविली : "ये ग लक्ष्मी,
बैस गे बाजे. माझें घर तुला साजे."

हें माजघर
जिथे मी ऐकलें पित्याच्या मुखांतून
मोरोपंतांचे महाभारत.

ही माडीवरची उंच खिडकी
जिच्या लाकडी गजांतून मी पाहिलें
हिरण्यकेशीच्या पुराचें लाल पाणी.

ही
मोठ्या दरवाजाची भव्य लाकडी चौकट
जिने आम्हांला शिकवली घराण्याची अस्मिता.

आज त्या वास्तूला
आकाशाने जवळ घेतलें आहे : तिचे जळकें डाग
त्याने हलक्या हाताने पुसले आहेत.
धरणीने तिला कुशींत घेतलें आहे :
आपल्या मायेचा हिरवा हात तिने
तिच्यावरून फिरवला आहे.

ती वास्तू आता आमची कुणाचीच नाही.
तिच्या उघड्या भिंती उन्हांत तळपत आहेत,
ठिकठिकाणी उंच गवत लोंबतें आहे,
खाचीफटींतून चिमण्यांनी संसार थाटला आहे,
देवघराच्या जागेंट एका कुत्रीने
आपली पिलावळ मोठ्या विश्वासाने ठेवली आहे.
ती वास्तू आता तृप्त आहे.
पण
हा दगडी चौकटीचा दरवाजा... बिनदाराचा.
रिकामा. दगडधोंडे रचून बुजविलेला. अभद्र.
किती मुका... किती केविलवाणा.
तो पाहूनच
माझे हात कसे थंड पडले आहेत.

- इंदिरा
बाहुल्या, मौज प्रकाशन

(याच संग्रहात 'ही जमीन', 'एवढी धरणी एवढें आकाश', 'भातुकली', 'बाळ उतरे अंगणी', 'दारापुढच्या आंब्याखालुन', 'आज माळ बेचैन आहे'.... आणि अनेक कविता भूमीशी - गावाशी - परिसराशी - घराशी नाते सांगणार्‍या आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एक कडवं आठवतंय एका कवितेचं, बहुतेक इंदिरा संतांची कविता असावी. पूर्ण कविता माहिती आहे का?

कुटुंबवत्सल इथे फणस हा
कटिखांद्यावर घेउनि बाळे
कथिते त्याला कुशल मुलांचे
गंगाजळीचे बेत आगळे

चेतनागुणोक्तीचे उदाहरण म्हणून एवढेच कडवे कुठल्या तरी व्याकरणाच्या पुस्तकात दिलेले होते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावगीतं/चित्रपटगीतं चालत असतील तर 'त्या तिथे, पलीकडे, तिकडे' (गदिमा), 'ते दूध तुझ्या त्या घटांतले' (भा. रा. तांबे) यासारख्या अगदी अर्क-टिपिकल (sic) काव्याचीही भर घालता येईल. कदाचित अनिलांचं 'केळीचे सुकले बाग'ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावगीतं / चित्रपटगीतंही चालतील. शिवाय, ग.दि.मा. आणि भा.रा. तांबे नावाजलेले आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा

दावा कोकणची निळी-निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी-हिरवी झाडी
भगवा आबोली फुलांचा ताटवा

कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा

सोडून दे रे खोड्या सार्‍या
शिडात शिर रे अवखळ वार्‍या
झणी धरणीला गलबत टेकवा

गाण्याची लिंक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

हाय!!! काळजात शिरलेलं गाणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातून आडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे
झाकोळुनि जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनि तयात बसला असला औदुंबर.
-बालकवी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा फाऊल आहे. यात भूमी/परिसर कोणता हे नक्की कळत नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत औदुंबर कुठेही असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गावाचं नाव गुंफून कविता करायला तो काय उखाणा आहे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर. पण चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणजे महाराष्ट्राची भूमी झाली असे म्हणता येईल. अगदी गावच पाहिजे असे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१)आज अचानक एकाएकी मानस लागे तेथे विहरू,
खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू.
पूर्व दिशेला नदी वाहते, त्यात बालपण वाहात येते. उंबरठ्याशी येऊन मिळते, यौवन लागे उगा बावरू.
माहेराची प्रेमळ माती, त्या मातीतून पिकते शेती. कणसांमधली माणिकमोतीं, तिथे भिरभिरे स्मृतीपाखरू.
आयुष्याच्या पाऊलवाटा, किती तुडविल्या येताजाता. परि आईची आठवण येता, मनी वादळे होती सुरू.
२) ना.धों महानोरांची-पूर्ण आठवत नाही: पक्ष्यांचे लाख थवे, गगनाला पंख नवे....
३) आंबोली येथले कवी (गुरुनाथ?)शेणई यांची 'आंबोली' याच नावाची सुंदर कविता आहे.
४)हिरवे कोंकण हे नंदनवन, इथे फुलांचे लाख सडे.
५)नदी किनारी ग मधले एकच कडवे: ढगांत होती सांज थांबली, धवळी धवळी वर बगळ्यांची संथ भरारी ग.
६)आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं.
७)त्या दिसा, वडाकडेन गडाद तिनसानां, मंद मंद वाजत आयलीं तुजीं गों पायंजणां. : आहे प्रेम कविता, पण वातावरणनिर्मिती छान उभी केली आहे. हेच 'जालो झिनझिनाट' बद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या दिसा, वडाकडेन गडाद तिनसानां, मंद मंद वाजत आयलीं तुजीं गों पायंजणां. : आहे प्रेम कविता,
ही कोणाची कविता आहे पुर्ण द्या ना प्लीज
कुठल्या बोलीतली आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषा कोंकणी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही बा.भ. बोरकर यांची कविता आहे.

कोकणी भाषेतील.

पु.ल देशपांडे यांच्या बोरकरांच्या कवितावाचनाच्या कॅसेट मध्ये आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मामाच्या गावाला जाऊया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गदिमांची 'माझा गाव' ही कविता शोधताना 'असे आमुचे पुणे'ही मिळाली:
http://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/23/162/Maze-...
http://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/23/4/Ase-Amu...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाड

हे एक झाड आहे: याचे माझे नाते
वार्‍याची एक झुळुक
दोघांवरून जाते
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे
जाणीवओले भास
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बाळगाणी
याच्या कटिखांदी
मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
याच्या पानावरच्या रेषा
माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सल
रुजते आहे झाड
माझ्या रक्ताच्याही पैल
कधी तरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे
जुने गाणे गाईन
नदीच्या अल्याडपल्याड..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

गोष्टी घराकडील मी वदतां गडया
गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे
झालें पहा कितिक हें विपरीत सारे !--
आहे घरासचि असें गमतें मनांस,
ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास !

ही देख म्हैस पडवैमधिं बांधलेली
रोमथभाग हळु चावित बैसलेली.
मित्रा ! गजांमधुनि या पडवीचिया रे
मौजा पहा क्षणभरी रजनीचिया रे !

डोळयांत बोट जरि घालूनि पाह्‍शील
अंधार तो अधिकची तुजला दिसेल ! --
अंधार-- जो फलक होत असे अम्हांस
चेतोनिबद्धजनचित्र लिहावयास !

आवाज ’ किरं ’ रजनी वदतेच आहे,
’घों घों ’ असा पवन नादहि बोलताहे;
ऐके पलीकडुनि बेडुक शेतभातीं
पर्जन्यसूक्त सगळे मनमोख्त गाती ?

हीं चारपांच चढूनी हळु पायठाणें
या ओसरीवर अतां जपुनीच येणें !
हें ऐक रे ’ टकटका ’ करितें घडयाळ
या शान्ततेंत गमतें कुटितेंच टाळ !

डावीस हा बघ निरेखूनि एक माचा
निद्रिस्थ त्यावरि पिता अतिपूज्य माझ्या.
त्याचा खरोखर न मी क्षण पुत्र शोनें !
तो सर्वदा जरि म्हणे मज पुत्र लोभें !

तातास या बघुनि या ह्रदयांत खातें,
होऊन हें ह्रदय विव्हळ सर्व जातें !
त्याच्या तरी पदयुगावरि या पडूनी
नाणूं तयास मग कां वद आंसवांनीं ?

ताताचिया बघ गडया उजवे कडेला
बापू असे तिथ बेरें अमुचा निजेला,
अज्ञान तो चपलधी परि बाल आहे
त्याचेविशीं मम मनीं अतिलोभ राहे !

बापू ! गडया ! ध्वज उभा करशील काय ?
तूं देशकारण करूं झटशील काय ?
बापू ! जनांत दिवटी धरशील काय ?
स्वातंत्र्यदेव मनसा भजशील काय ?

मित्र ! घरीं सुदुढ हस्त मदीय फार,
दारास आडसर घट्ट असेल थोर,
दाराचिया तर फटींतुन आंत जाऊं,
सानंद सुस्थित घरांतील सर्व गाऊं !

मित्रा ! इथें कितितरी मज हर्ष होई,
येथें हवा मधुर, निश्वबनांत येई,
नाहीं कधींहि बुधवारवनांत जैशी
वाटेवरी चतुरशिंगिचिया न तैशी !

मित्रा ! असा हळूच ये उजवे
खोली पहा पघळ ही किती ऐसपैस,
निद्रावश स्वजन येथ, बघूनि यास
हर्षाचिया न उकळया फुटती कुणास

ती एक खाट अवलोक समोर आतां
आहे सुषुप्तिवश तेथ मदीय माता,
तीचे कुशींत निजली दिसते मदीय
भीमा स्वसा, बधुनि ती मज हर्ष होय,

मत्कारणें स्तवुनि देव, निजावयातें
आलीस तूं खचित गे असशील माते !--
मोठे त्वदीय उपकार, जरा तरी ते
जातील का फिटूनियां तव पुत्रहस्तें ?

खालीं मदीय भगिनी दिसती निजेल्या,
गोष्टी जयांस कथितां न पुर्‍याच झाल्या !
ती कोण दूर दिसते ?-- निजली असूनी
जी श्वास टाकित असे मधूनीमधूनी !

कान्ताच ही मम ! -- अहा ! सखये ! मदीय
स्वप्नें अंता तुज गडे ! दिसतात काय ?--
आतां असो ! पण पुढें तुजला दिसेत
स्वप्ने तुझीं मग समग्र तुला पुसेन !

मागील दारीं सखया ! तुळशीस आतां
वन्दूं, जिला मम जनीं नमिला स्वमाथा !
सोडूनि गांव वळणें अमुच्या घराचें !
येऊं घरा परत खासगिवालियाचे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

जैत रे जैत मधील कितीतरी गाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रम्य अशा स्थानी,
रहावे रात्रंदिन फुलुनि !

मंजुळ घंटा सांज सकाळी,
गोकुळ गीते गातिल सगळी
हो‍उनि स्वप्नी गौळण भोळी,
वहावे यमुनेचे पाणी !

रंगवल्लिका उषा रेखिते,
सिंदुर भांगी संध्या भरते
रात्र तारका दीप लावते,
पहावे अनिमिष ते नयनि !

स्वैर पवन मग होईल विंझण,
चंद्रकोर धरी शुभ निरांजन
सृष्टीसखीची हो‍उनि मैत्रिण,
फिरावे गात गोड गाणी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

चंद्रकोर धरी शुभ निरांजन

सुंदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>भूमीशी - परिसराशी नातं <<<

या धाग्यावर हे थोडं अवांतर होईल, पण "कोसला" कादंबरीतलं हे वाक्य आठवतं.

"चिरंतन आहे शेवटी जागाच. वर्षं काय आपण मेलो की संपलीच."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा
नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
(श्रीपाद कृष्ण कोल्हटकर)

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ धृ. ॥

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ।
अंजनकांचनकरवंदीच्या कांटेरी देशा ॥
भावभक्तिच्या देशा, आणिक बुध्दीच्या देशा ॥
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा, ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी
निशाणावरी
नाचतें करीं ॥
जोडी इहपरलोकांसी
व्यवहारा परमार्यासी
वैभवासि वैराग्यासी ॥
जरिपटक्यासह भगव्या झेंडयाच्या एकचि देशा ॥
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ १ ॥

अपर सिंधुच्या भव्य बांधवा ! महाराष्ट्र देशा ।
सह्याद्रीच्या सख्या 'जिवलगा' महाराष्ट्र देशा ॥
पाषाणाच्या देहीं वरिसी तू हिरव्या वेषा ।
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा ॥
तुझिया देहीं करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ॥
मंगल वसती जनस्थानिंवी श्री रघुनाथांनी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी... ॥ २ ॥

भिन्न वृत्तिंची भन्न भिन्न हीं एक जीवसत्त्वें ।
तुझिया देहीं प्रकट दाविती दिव्य जीवतत्त्वें ।
चित्पावन बुध्दीनें करिसी तू कर्तबगारी ।
देशस्थाच्या खुल्या दिलाची तुजला दिलदारी ॥
कायस्थाचें इमान फिरवी रक्ताचा फेर ।
ठाक मराठी मनभट दावी तुझें हाडपेर ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ... ॥ ३ ॥

ठायीं ठायीं पांडव लेणीं सह्याद्रीपोटी ।
किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठीं ॥
तोरणगडचा, प्रतापगडचा, पन्हाळगडिंचाहि ।
लढवय्या झुंझार डोंगरी तूंच सख्या पाही ॥
सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हा, ही अंजनवेल ।
दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ... ॥ ४ ॥

तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकाेंडा ।
वहाण पायीं अंगि कांबळी उशाखालिं धोंडा ॥
विळा कोयता धरी दिंगबर दख्खनचा हात ।
इकडे कर्नाटक हांसतसे, तिकडे गुजरात ॥
आणि मराठी भाला घेई दख्खन कंगाल ।
तिकडे इस्तंबूल थरारे, तिकडे बंगाल ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ... ॥ ५ ॥

रायगडावर माय जिवाची गवळण बिनधोक ।
झोंक हिरकणी नांव ठेवुनी जाइ रोखठोक ॥
करीत पावन अर्पुनि पंचप्राणांचा पिंड ।
हिरडस-मावळचा श्रीबाजी, ती पावनखिंड ॥
करी रायगड रायरिचा तो जिजाइचा तान्हा ।
कोंडाण्याचा करि सिंहगड मालुसरा तान्हा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .. ॥ ६ ॥

रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला ।
पहिलावहिला अष्टांगांनीं प्रणाम हा त्याला ॥
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा
पुंडलिकांच्या, शिवरायांच्या, टिळकांच्या देशा ॥
अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडि तुझ्या नामा ।
वाल्मिकीचें शतकोटी यश विष्णुदास नामा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .. ॥ ७ ॥

मयूर कविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा ।
कवि कृष्णाच्या* निर्यमका हे महाराष्ट्र देशा ॥
*केशवसुत.
देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ ।
तिथेंच गीतारहस्य बसवी बुध्दीचा मेळ ॥
जिथें रंगलीं साधींभोळीं जनाइचीं गाणी ।
तिथेंच खेळे श्रीपादांची कलावती वाणी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .... ॥ ८ ॥

विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी ।
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी ..
तुला जागवी ऐन पहांटे गवळी गोपाळ
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ ॥
मर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी ।
उभा टाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी... ॥ ९ ॥

प्रभाकराची जडण घडण कडकडित म्हणायाला ।
दो हातांचा मुजरा माझा तुळशीरामाला ॥
भीमथडीहुनि चहुंमुलखांवर फिरले धारकरी ॥
भीम थडीवर चहुंमुलखांतुनि जमले वारकरी ।
आळंदीच्या ज्ञानोबांची भिंत घेत धांव ॥
पुंडलिकांचें नांव चालवी दगडाची नाव ॥
गोलघुमट घुमवीत सारखा नवलाची भाक ।
जेजूरीवर चढी पायरी उभी नऊ लाख ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ..... ॥ १० ॥
(राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज)

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥
(राजा बढे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गीत संस्कृतात आहे पण एकूणएक शब्द मराठीतहि चालतात.

वन्दे मातरम्।
सुजलां सुफलामं मलय़जशीतलाम्,
सस्यश्यामलां मातरम्।
वन्दे मातरम्।। १।।

शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्,
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्,
सुहासिनीं सुमधुरभाषिणीम्,
सुखदां वरदां मातरम्।
वन्दे मातरम्।। २।।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदरच. हे कोणाला नाही सुचलं.
वरचं महाराष्ट्रगीतही तसेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबईच्या कविता

- कामगार आहे, तळपती तलवार आहे (नारायण सुर्वे)
- गोलपिठा हा नामदेव ढसाळांचा कवितासंग्रह

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ही एक लहानशी भाषांतरित चारोळी, लिटिल विमिन या पुस्तकाचे भाषांतर शांता शेळके यांनी केले आहे, त्यातली. प्रा. भाअर ही कविता ज्यो ऊर्फ ज्योसेफाइन् हिला ऐकवतात -

देश ठावा का तुला तो
बहरलेली जेथ सुमने
बहरलेला जेथ ऋतू अन्
जेथ पक्षी गाती गाणे (हे बहुधा जर्मनीचे वर्णन आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ने मजसी ने परत मातृभूमीला..... सागरा प्राण तळमळला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निघालो घेऊन दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी

वाट वळणाची जीवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियात गंगा जाहली बोलकी
निघालो घेवून दत्ताची पालखी

- कवी (बहुतेक) प्रवीण दवणे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

१ "बाई दुखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा" पुर्ण कविता कोणाला माहीत असेल तर पेस्टावी.

२ "डोह इंद्रायणी
किती खोल खोल
बुडखा त्यास
सापडेना
अश्वथाम्याच्या
भाळी जखम
दाटे बोन्साय
चोहिकडे"
हि कविता माहिती असेल तर पुर्ण पेस्टावी

३ " झोपडी टपटपू लागते" हिसुद्धा पेस्टा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीणं फाटतया तिथेच ओवावा धागा गं
बाई दु:खाच्या कष्टानं लिपाव्या भेगा

द्यावा ऊन्हाला कधी आधार
गाव बुडणारा सोसावा पूर
काटे पायात खुडून ऊन ऊन्हांत झडून
बोरी बाभळीच्या होती बागा गं

इथे नात्यांची लागते झळ
होई जीवाची गा होरपळ
सारं हातचं देऊन,ऊन हातात घेऊन
कोण पराया? कोण सगा गं

माझं घावं ना मायाळू गाव
तुझ्या वेशीत रोज ही धाव
तुझं म्हणून गोड मानून
ठेव ओसरीत थोडी जागा गं

-अनामिक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहेराची वाट
आज माहेराले जानं
झाली झाली वो पहाट
आली आली डोयापुढे
माझ्या माहेराची वाट

रातदीन गजबज
असं खटल्याचं घर
सदा आबादी  आबाद
माझं 'आसोद' माहेर

माझ्या  माहेराच्या वाटे
तांडे पानाचे लागले
पानं कतरतो बारी
लागे बारीन येचाले

माझ्या माहेराच्या वाटे
रेलवाईचे फाटुक
आगगाडीचं येनंजानं
तिले कशाची आटक?

माझ्या  माहेराच्या  वाटे
"लौकी" लागली लागली
वाटच्या रे वाटसरा
तुझी तहान भागली

माझ्या  माहेराच्या  वाटे
पिव्वी  चिकनास खारी
पानी पावसाया आंधी
जाते धाब्याधाब्यावरी 

माझ्या  माहेराच्या  वाटे
देखा बाभयींच बन
चुल्हा  लहाडीच्यासाठी
घराघरात बैतन

माझ्या  माहेराच्या  वाटे
डाबा पाण्याच्या  लागल्या
म्हशी बसल्या  पान्यात
जशा वरमाई न्हाल्या

माझ्या  माहेराच्या  वाटे
देख मये चारोमेरी
गाडया ऊसाच्या चालल्या
बुधवारच्या  बाजारी 

माझ्या  माहेराच्या  वाटे
घंटया घुंगराचा नाद
येती जाती बैलगाडया
धुरकरी  घाले साद

मांघे पोत्यातून गये
गव्हा  - जवारीची धार
पाखराचा जमे बेत
दाने खाई झाले गार

माझ्या माहेराच्या वाटे
गायी म्हशीचं खिल्लार
गावामधी बरकत
दह्या दुधाची रे ढेर!

माझ्या माहेराच्या वाटे
कोनही भिकारी टकारी
आला भीक मांगीसनी
झोयी गेली समदी भरी 

माझ्या माहेराच्या वाटे
कोनही भीलीन बायजा
खाले उतारली पाटी
म्हने कटेलं लेयजा

माझ्या माहेराच्या वाटे 
जरी आले पायी फोड
पाय चालले चालले
अशी माहेराची ओढ

माझ्या माहेराच्या वाटे 
 जरी  लागल्या  रे ठेचा
वाटवरच्या  या दगडा
तुले फुटली रे वाचा!

“नीट जाय मायबाई
नको करु धडपड
तुझ्याच मी माहेराच्या
वाटवरला दगड!”

माझ्या माहेराच्या वाटे 
 माले लागली गुचकी
आली उडत उडत
एक दीसली, सायंकी 

माझ्या माहेराच्या वाटे 
 मारे सायंकी  भरारी
माझ्या  जायाच्याच आधी
सांगे निरोप माहेरी 

“ऊठ ऊठ भीमामाय
काय घरात बसली
कर गुरमय रोटया
लेक बहिनाई आली!”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"गोदाकाठचा संधिकाल"

गर्द वनी वा गिरीकंदरी
लपलेला दिनि तम, गरुडापरि
पंख आपुले विशाल पसरुन ये विश्वावरती.

पश्चिम-वारा वाहे झुळझुळ
कंपित होउनि हेलावे जळ
दूर तरूंच्या काळ्या छाया हळुहळु थरथरती.

जीर्ण वडाच्या पारंब्यातुनि
पंखांची क्षण फडफड करुनी
शब्द न करता रातपाखरे नदीकडे उडती.

कपारीत अन् दूर कुठोनी
सांदीमध्ये लपुनी बसुनी
अखंड काढी रातकिडा स्वर ते कानी पडती.

वळणाच्या वाटेवर चाले,
आतुर अंतर कातर डोळे,
झपझप पाउल टाकित कोणी खेड्यातिल युवती.

निळसर काळे वरती अंबर,
धूसर धूराच्या रेषा वर
पलिकडच्या घन राईमधुनी चढुनी मावळती.

अभ्रखंड तो अचल पांढरा
पडे पारवा झडुनि पिसारा
तेजहीन अन् दोन चांदण्या डोकावुनि बघती.
परि शुक्राचा सतेज तारा
पसरित गगनी प्रकाश-धारा
वीरापरि आत्मार्पण करण्या आलेला पुढती.

आणिक इकडे क्षितिजावरती
विडंबण्या शुक्राची दीप्ती
शहरामधल्या क्षीण दिव्यांच्या मिणमिणती ज्योति.

वाडा पडका नदीतटावर
भग्न आपुल्या प्रतिबिंबावर
गंगेमधल्या, खिन्नपणाने लावितसे दृष्टी.

देउळ ते अन् भग्न,
हटाने ध्येयनिष्ठ जणु जनाप्रमाणे
पडले तरिही जपुनी ठेवी ह्रदयातिल मूर्ति.

पाचोळ्यावर का ही सळसळ
कसली डोहावरती खळबळ
पाउल वाजे रजनीचे का येताना जगती ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट | सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट ||"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ही कविता प्रस्तुत थीमशी कितपत मिळतीजुळती आहे माहिती नाही. त्यात निर्देशित केलेल्या स्थळांबद्दल प्रेम जिव्हाळा काही नाही. मात्र त्या त्या स्थानाचं अचूक असं "स्थान" कवितेत आहे खरं.

मुंबईनं भिकेस लावलं
कल्याणला गूळ खाल्ला
ज्या गावाला नाव नव्हतं
पण एक धबधबा होता
तिथं एक ब्लँकेट विकलं
अन पोटभर पाणी प्यालो

पिंपळाची पानं चघळत
नाशकापर्यंत आलो
तिथं तुकाराम विकला
अन् वर खिमापाव खाल्ला
जेव्हा आग्रारोड सोडला
तेव्हा एक चप्पल तुटलं

न मागता मिळालेली
कांदाभाकर खाऊन ऊठलो
ढुंगणाखालची हॅवरसॅक
उचलून पाठीवर घेतली
मग दोन मैल विचार केला
अन परतायचं ठरवलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

व्हाट ऍन कविता सरजी. आवडली.
कोणाची आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरुण कोलटकरांची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

जुने कवि दिनकर गंगाधर केळकर (कवि अज्ञातवासी - हे आज राजा केळकर संग्रहालयाचे निर्माते म्हणून आपणांस अधिक परिचित आहेत) ह्यांनी १९२३ साली 'श्रीमहाराष्ट्र-शारदा' अशा नावाचे तेव्हा प्रथितयश असलेल्या कवींच्या कवितांचे एक पुस्तक संपादित केले होते. त्यांच्यापैकी काही कवि अजूनहि नावाजलेले आहेत, उदा.रे.टिळक, केशवसुत, भा.रा.तांबे, गोविंदाग्रज, माधव जूलियन, तर काहीची आठवण आता क्वचितच होते उदा. दत्त, गिरीश, रेंदाळकर, साधुदास, परशुरामपंततात्या गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर. ह्या पुस्तकातील तीन कविता येथे देत आहे.त्यापैकी पहिली 'सह्याद्रि' ही गंगाधर सखाराम मोगरे (१९५७-१९१५) ह्यांची, दुसरी 'पुण्यपुरीस' गिरीश - शंकर केशव कानिटकर (१८९३-१९७३) - ह्यांची आणि तिसरी 'खैबरखिंड' हरि सखाराम गोखले (१८९५-१९६२) ह्यांची आहे.

Sahyadri 1
Sahyadri 2
Sahyadri 3
Sahyadri 4
Sahryadri 5

Punyapuri

Khaibar Khind
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने