सलील वाघच्या कविता

कविता सलील वाघ

सलील वाघच्या कविता


सीआरडी आओ धूम मचाओ

दो नंबरका बालाजी हय
दोन नंबरका गनपती बप्पा
नंबर दोकी बैश्नौदेवी
लगाव दो नंबरपे पत्ता

येडा बनके पेडा खाओ
सीआरडी आओ धूम मचाओ

दो सादा दो मीठा पान
छप्पर फाडके दे भगवान

येडा बनके पेडा खाओ
सीआरडी आओ धूम मचाओ

जय बजरंग बल्ली
तोड दे दुश्मनकी नल्ली
कर दे मालामाल
हो जाने दो बेहाल

फ्रॉम दी बॉटम ऑफ दी हार्ट
टॉपटू बॉटम टॉपटू बॉटम
घंटोंका काम मिंटोंमे
मालभारी दाम सरकारी
बाबावाक्यं प्रमाणं
सब्र का फल हय मिठुवा मिठुवा

येडा बनके पेडा खाओ
सीआरडी आओ धूम मचाओ

बैठा कबिरा पेडपे
जवा नवीन पोपट गाए
मरे ढोरके चामसे
लोह भसम हो जाए

येडा बनके पेडा खाओ
सीआरडी आओ धूम मचाओ

(रेसकोर्स आणि इतर कविता, टाईम अँड स्पेस कम्युनिकेशन प्रकाशन, २००८)

---


पाटील - कांकरिया प्रोजेक्ट्स

स्मशानवाटिका डॉट कॉम सेंट्रलाईज एसी
अद्ययावत पाचशे प्रेते
जाळायची सोय बच्चेकंपनीसाठी
हॉर्सराईड रपेट क्लोज सर्किट टिव्ही
जेष्ठनागरिकांना पिकप फ्री
स्मशानकॅंपसमधेच अम्यूजमेंट पार्क क्लबहाऊस स्पा
ब्युटीपार्लर योगापॅसेज सोनाबाथ गेटटूगेदरची सोय
प्रकाशयोजना आणि दुःखधूनयुक्त टचस्क्रीन
ऑटोसंगीत शोकाहॉल एनाराय बीटेक भटजी
निर्गुणी श्लोक अस्थी लगेच मिळणार दोन
प्रेतांवर एक अंत्यसंस्कार फ्री हिरव्यागार
वनराईने वेढलेले निसर्गरम्य पिंडाला लव्हबर्ड्स शिवणार
दुमजली कारपार्किंगची सोय इष्टमित्र आप्तेष्टांना बोटींगची
सोय कवटी फुटेपर्यंत थांबायला नको ऑनलाईन रेकॉर्डिंग
तासात डिव्हिडी कुरिअरने हाडे चोवीस तासात घरपोच
स्वागतपेय मेंदी ज्योतिषी फेंगशुई सिक्ससिग्मा
आएसो सर्टिफाईड स्मशानपार्क
ऑनलाईन बुकींग चोवीसतास
क्रेडिटकार्ड स्वीकारतो
साईटव्हिजिट आजच बुक करा
स्मशानपॅरेडाईज डॉट कॉम पाचशे प्रेतांचा उंबरा

(रेसकोर्स आणि इतर कविता, टाईम अँड स्पेस कम्युनिकेशन प्रकाशन, २००८)

---


कंपनीतल्या कविता : भाग सात
(शेवटची कविता)

श्राद्ध घातलं कंपनीचं
    दिली मूठमाती
        इंद्रायणीकाठी

डोळ्यात भरून घेतला
    सगळ्या मावळाचा
        पॅनोरमा
            भंडाऱ्यावरून

हळहळायच्या
आत जागे झाले
स्वार्थ

जो तो त्याच्या त्याच्या
     मार्गानी गेला
बॅकवॉटरखाली गेलेल्या
अपराधानी हळहळला

हळहळायच्या
आत जागे झाले
स्वार्थ

इथून निघायच्या आधी
काढता पाय घेतला
बुडविली गाथा
सग्यासोयऱ्यांची टग्याटोणग्यांची
बॅकवॉटरमधे

इंटरव्ह्यूचे दिवस
मॅनपॉवर-रिडक्शनचे दिवस
कन्फर्मेशनचे दिवस
प्रेझेंटेशनचे दिवस
डिपार्टमेंटला कंप्यूटरमधे साप निघाल्याचे दिवस
रांगड्या भांडणतंट्याचे राजकारणाचे दिवस
कटकारस्थानांवर मात करण्याचे दिवस
कंपनीजवळ फ्लॅट बुक केल्याचे दिवस
जी वाट दूर जाते त्या
स्वप्नामधील गावाला जायचे दिवस
दिवाळी दसरा गणपती ईद पाडवा आकाड तळण्याचे दिवस

फेल झालेले प्रोजेक्ट
धसाला लावण्याचे दिवस
एकमेकांची गांडमारण्याचे आणि
पडत्या क्षणी एकमेकांना
सावरून घ्यायचे दिवस

या सगळ्या दिवसांना
तिलांजली देऊन
डोळे भरून साठवलं त्यांचं रुपडं
शेवटलं एकदा मनातून काढून टाकलं

यातला एकही दिवस
आठवणीच्या रजिस्ट्रीत
राह्यला नको व्हायला हवं
समूळ उच्चटन रजिस्ट्रीतूनच
म्हणून दिली
तिलांजली आणि इंद्रायणीकाठी खच्चून शिवी
भंडाऱ्यावरच्या पॅनोरमात विरली दोन्ही

जगलेल्यांना प्रश्न आता
जगायचं कसं
उरलेलं आयूष्य आता
वापरायचं कसं

आपल्या आपल्या कर्मानी
जगणारे जगले
आपल्या आपल्या गुणानी
मरणारे मेले

जाता जाता आता
सांगा एकमेका
इथं भेटलात देवा
तिथं भेटू नका

(सध्याच्या कविता, टाईम अँड स्पेस कम्युनिकेशन प्रकाशन, २००५)

---

सप्टेंबर दोन हजार तीन
(कंपनीतल्या कवितेत न बसलेली कविता)

हे माझं रक्तरंजित रक्त
उकळतं
सणकलेल्या प्रेशर कुकरच्या
लॉक इन रोस्टर दट्ट्यात
तसू तसू तासलेला
पेशन्स ताठलाय
आयुष्यावर ओरखाडतोय
गोरी छाती नाजूक गोरी कंबर
पारोसं ओटीपोट केस नसलेल्या
सफाचट काखा जय्यत
तयारीच्या
तटतटलेल्या तरतरीत पोटऱ्या आणि बाकीचं
अंग उरलेलं
तटतटून लगटून
शरीराच्या अस्तरांची लक्तरं अंतर्वस्त्रच्या इंपोर्टेड
वेशीला टांगलेली

मी धन्य व्हावं याची सगळी सोय
चोख

ज्वालाग्राही डिओड्रंडच्या
फवाऱ्यानिशी रक्त उकळतंय

मेंदूच्या वाफा होतायत
उंच उंच उंचावर लटकलेली
मधाची पोळी उधळून
शरीराच्या सापावर तुटून पडलीत

तासून तासून सोललेले
पेशन्स
फणा काढून डोलायला लागले आहेत

सगळी शरीरं खवळलीयत
साक्षात ब्रह्मकमळ
माझ्यापुढ्यात उमलून ठाकलं आहे

ते तुडवून पुढे जाईन
तर शाप लागेल
ते खुडून हातात घेईन
तर पाप लागेल

खुदा खैर करे!

(सध्याच्या कविता, टाईम अँड स्पेस कम्युनिकेशन प्रकाशन, २००५)

---

पुन्हा मुंबई : हॉट स्टॅंपींग

मुंबईच्या पावसाला
विषय असतो आणि विषयाला असते वस्तुस्थिती
वस्तुस्थितीला असतो विस्तार
विस्तारात विपर्यास
विपर्यासाची व्याप्ति
निर्मनुष्य

मधली बरीच वर्ष मी
आयुष्याबाहेर होतो

नोकरीनिमित्तानी कामानिमित्तानी
रोजगारानिमित्तानी कवितेनिमित्तानी

मनुष्यवस्तीपासून दूर

काळाची तन्यता
बोधाचं सातत्य

प्रमाणभाषेच्या रडारवर
न दिसू शकणारी
ओलसर जाणिवांची मूळं

भाषेची संगत सुटतीय
मुंबई पुन्हा अंगावर येतीय

भाषेची संगत सुटतीय

(सध्याच्या कविता, टाईम अँड स्पेस कम्युनिकेशन प्रकाशन, २००५)

सर्व प्रताधिकार लेखकाकडे आहेत. मजकूर पूर्णत: वा अंशत: प्रकाशित वा कुठल्याही माध्यमातून प्रसारित करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा कुठल्याही प्रसारित/प्रकाशित केलेल्या मजकुरासोबत प्रस्तुत लेखाचा 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील दुवा (weblink) देणे आवश्यक. ते शक्य नसल्यास ' 'ऐसी अक्षरे' - दिवाळी अंक २०१५ (http://aisiakshare.com/diwali15) मधून' असे नमूद करणे बंधनकारक राहील.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'पाटील-कांकरिया प्रोजेक्ट्स' विशेष आवडली. जळजळीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छ्या! एक कविता १००% पोचलीये असे खात्रीने वाटेल तर शपथ!
आमचीच मर्यादा! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

२री व ४थी आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पाटील-कांकरिया प्रोजेक्ट्स' विशेष आवडली.

असंच म्हणतो. बाजारीकरण आणि नवीन अपेक्षांच्या जंत्रीतून, चंगळवाद कसा बोकाळलाय हे सांगत,
जाहिरात माध्यमांतूनच कविता येते. देऊळ सिनेमामधल्या दत्त दत्त, दत्ताची गाय... या कवितेची आठवण झाली. ही दुसरी अधिक धारदार आहे, आणि वरच्या पहिल्या कवितेत जंत्रीचा वापर किंचित कंटाळवाणा आणि प्रेडिक्टेबल होतो.

बाकी कविता विशेष आवडल्या नाहीत. मुंबईची कविता विशेष सामान्य वाटली. काहीशा रोचक परिच्छेदाचे तुकडे करून कविता म्हणून मांडल्यासारखी आहे. पहिल्या कवितेत पहिली काही कडवी वृत्तसाधना केलेली आहे, आणि उरलेली कडवी वृत्त मोडलेलं आहे. यात मलातरी काही विधान न वाटता कवीचा आळस वाटला.

एकंदरीत बऱ्याच कवितांचा सूर 'हे सगळं कसं बाजारीकरण घाणेरडं आहे! त्यातून कसा ऱ्हास होतो आहे.' या टाइपाचा, पूर्वग्रहदूषित वाटला. कदाचित या मर्यादित कवितांच्या गुच्छामुळे तसं झाले असेल हेही शक्य आहे, पण मुलाखतीतूनही जाणवलं होतं. हा स्वर लोकांना अंतर्मुख करू शकतो खरा. कधी कधी तो स्वतःच्या सुखासीनतेबद्दल गिल्टी वाटणाऱ्यांच्या स्वबडवेपणाला खतपाणीही घालतो. पण त्यातून एक मर्यादित जीवनदृष्टी दिसते. त्यालाही हरकत नाही म्हणा, पण मला 'एका बाजूला ही घाण दिसते, दुसऱ्या बाजूला ताजे गुलाब फुलताना दिसतात' या क्लिष्ट आणि व्यापक दृष्टिकोन दिसलेला अधिक आवडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0