कोंबडी का पळाली?

अनादिकालापासून मानवाला पडलेले दोन प्रश्न, ज्या प्रश्नांची उकल अद्याप कोणी करू शकला नाही, ते म्हणजे

'आधी कोंबडी की आधी अंडे?'

आणि

'कोंबडी रस्त्याच्या पलिकडे का गेली?'

हे होत.

यापैकी पहिल्या प्रश्नापुढे मानवजातीने हात टेकले, परंतु दुसर्‍या प्रश्नाची उकल करण्याचे प्रयत्न अजूनही होत असतात. मोठमोठे तत्ववेत्ते, संत, ज्ञानी, राजनीतीज्ञ या प्रश्नाचे काय उत्तर देतील त्यासंबंधी रोचक आडाखे ढकलपत्रे, फेसबुक-पाने इत्यादींतून नेहमी वाचावयास मिळतात. मात्र आजवर समाधानकारक उत्तर कोणासही मिळाले नाही.

आमच्या मनात सहज आलेला हा विचार- आजवर मराठीतील मान्यवर लेखक-कवींना हा प्रश्न विचारला गेल्याचे ऐकिवात नाही. समजा हा प्रश्न त्यांना केला गेला असता तर त्यांचे काय उत्तर आले असते? आपण केवळ तर्कच करू शकतो का? 'ऐसी अक्षरे' च्या सदस्यांचे यावर काय मत? या संस्थळावर अनेक बहुश्रुत सदस्य येजा करीत असावेत. आपापल्या आवडत्या-नावडत्या लेखक अथवा कवीचे या प्रश्नावर काय उत्तर आले असते? माननीय सदस्यांसमोर आम्ही हा प्रश्न मांडत आहोत. अत्रे, पु.ल., जी.ए., व.पु., गडकरी, तेंडुलकर, फडके-खांडेकरादि मान्यवर ते आजच्या युगातील अवचट, दवणे, मनोहर यांची काय प्रतिक्रिया आली असती?

मान्यवर सदस्यांच्या मौलिक प्रतिक्रियांच्या अपेक्षेत आम्ही आहोत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (6 votes)

आमच्याकडून एक सँपल एंट्री आम्ही देत आहोत.

बालकवी - (उत्तर अर्थातच कवितेत)

काळे बिंद्रे डांबर रस्ते, दगड-खडी अन् काँक्रीट-भरले
ऐलतीरीच्या फुटपाथावरी, कोंबडराणी खेळत होती
खाचा-खळग्या-भेगांमधुनी, किडे खावे, प्यावे पाणी
याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या त्या मुर्गीला

भुरा-पांढरा गल्ली-श्वान, भुंकून गाजवी सारी लेन
तोच एकदा धावत आला, चुंबुनी बोले कोंबडिकेला
छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे गं पाहत होती?
कोण बरे त्या फुटपाथवरून, हळूच पाहते डोकावून?
तो कुक्कुट का गोजिरवाणा, आवडला अमुच्या राणीला?

माजमाजली तुर्‍यास पाहुनी, साधीभोळी कोंबडराणी
धूळभरल्या त्या रस्त्यावरूनी, कोंबडराणी चालत गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

बाकी प्रतिक्रिया नंतर...

अवचटांची नक्कल जंतूला जमेल. पेश्शल समीक्षकी प्रतिक्रियेसाठी मुक्तसुनीत. जीएंसाठी सन्जोप राव, पुलंसाठी भेटा 'न'वी बाजू, ऋषिकेश आणि नंदन. अरूंधती रॉय हव्या असतील तर श्रावण मोडक. अतिशय संतुलित प्रतिक्रिया हवी असल्यास बिपिन कार्यकर्ते. घासकडवी स्वतः सोडून इतर काही होऊ शकत नाहीत. पण ते स्वतःच भविष्यातले प्रसिद्ध साहित्यिक असल्यामुळे त्यांना असे करू द्यावे. दवण्यांसाठी मात्र नंदनला पर्याय नाही.

यामिनी जोगळेकर, शुभांगी भडभडे, विजया वाड, सुमती क्षेत्रमाडे, शैलजा राजे, स्नेहलता दसनूरकर यांच्यापैकी कुणाचं मत हवंच असेल तर मी प्रयत्न करेन.
वरची बालकविता वाचून मी स्वतःबद्दल केलेलं विधान मागे घेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"रस्त्याअलिकडच्या नाट्यगृहात नाना पुञ्जेञ्चा प्रवेश चालू असताना कोम्बडी नेमकी तिथे कडमडली असावी." - दिलीप प्रभावळकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रस्त्यापलीकडे का गेलात असं कुणालाही कधीही विचारू नये, कारण जीव कितीही क्षुद्र असला तरीदेखील त्याला
पलीकडची अोढ ही असतेच.
-वपु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

कोंबडी म्हणजे झुळूक. फडफडून जाते, अमाप कल्ला करून जाते. पण धरून ठेवता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कोंबडीच ती, पळेल नाहीतर काय करेल? हे काँग्रेसवाले धोतर वर खेचत तिच्या मागे लागले असणार! असले हरामखोर दहा हजार वर्षांत झाले नसतील...'
'कोंबडी रस्ता ओलांडून पळत होती. अंधार्‍या खोलीत खिडकीच्या गजाला धरुन रस्त्याकडे बघत दिगू उभा होता. संपूर्ण नागडा. त्याच्या केसाळ, थुलथुलीत शरीरावरुन घामाचे ओघळ सुटले होते. कोंबडीला बघून त्याला जनाआत्याच्या पोटर्‍या आठवल्या. गोर्‍या, किंचित सुटलेल्या, बघताक्षणी दात रोवावेत असे वाटणार्‍या जनाआत्याच्या पोटर्‍या, जनाआत्याचा सगळा गोरा देह...दिगूच्या चेहर्‍यावर एक वेडगळ हास्य आले.'
'निर्मलेने विषण्ण नजर उचलली. रस्त्यावर ऊन मी म्हणत होते. रंगीबेरंगी पिसांची एक कोंबडी रस्ता ओलांडत होती. तिच्यामागोमाग तिची चिमुकली, बर्फाच्या गोळ्यांसारखी दिसणारी पिले तुरुतुरु चालत होती. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका झुडुपात ती कोंबडी व तिची पिले शिरली. ग्रीष्माच्या वणव्यात ते झुडूप बाकी हिरवेगार होते. त्या हिरव्या पानांच्या मखमलीवर निळ्या रंगाची सुंदर फुले उगवली होती. रस्त्याच्या एका बाजूला रणरणते ऊन, तर दुसर्‍या बाजूला ती प्रसन्न फुले. आयुष्य असेच नसते का? निर्मलेच्या मनात आले.'
'तिनईकर घाईघाईने आत आले. त्यांच्या हातात अर्धवट मुंडी कापलेली, तडफडणारी कोंबडी होती. तिच्या अर्ध्या तुटक्या मानेतून अद्याप रक्त गळत होते. तिनईकरांनी विळी ओढली आणि एखादी शेवग्याची शेंग कापावी तशी त्या कोंबडीची मान धडावेगळी केली. एक आचका देऊन ती कोंबडी शांत झाली. तिनईकरांच्या चेहर्‍यावर एक हिंस्त्र, खुनशी हास्य आले..'

वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ROFL ROFL ROFL

आयला हा माणूस जर तिकडे असता तर त्यानं रान पेटवलं असतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे रान पेतवुन प्रानी पक्सी मर्न पावतिल न

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दंडवत देवा. दिवस चांगला जाणार माझा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सन्जोप राव, तुमच्यात असे आणखी किती 'सुप्त' लेखक आहेत? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीनही अप्रतिम!!!!!!!!!!!!! =)))))))))))

दंडवत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

लिहीणार होतो काहीतरी, पण संजोपरावांनी ओळीनी सर्व सिक्सर्स मारल्यामुळे बॉल शोधायला गेलो आहे. तो शोधण्यासाठी कोंबडीच्या ऐवजी मलाच रस्ता क्रॉस करावा लागणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधीचे चर्चाविषय बघता ही 'चर्चा' तिकडे 'मौज-मजेत' ज्यास्त फिट्ट बसेल नव्हे ? अधिक मौज येईल मग.. काय म्हणता सम्पादक ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'काळोख आता दिवसाला गिळून टाकत होता. झाडे धास्तावल्यासारखी अंग चोरून उभी होती. पलीकडल्या बाजूस असलेल्या मठातील निळे दिवे आता प्रकाशमान झाले होते. सुस्त अजगरासारख्या पसरलेल्या त्या निर्मनुष्य रस्त्याकडे एकटक पाहत ती उभी होती. आपले घर तुटले, सख्खी माणसे तुटली आणि सारे आयुष्यच नियतीच्या एका लहरीने उध्वस्त झाले. आपण ज्या वाटेने जाऊ म्हणत होतो ती वाटच अदृश्य झाल्यासारखी झाली. आतड्याचे कुणी उरले नाही. मुलांच्या आठवणीने तिला हलल्यासारखे झाले. येताना आपण मुलांचा नीट निरोप घ्यायला हवा होता. एडक्यासारखा गावभर हिंडू नकोस म्हणून थोरल्याला बजावायला हवे होते. धाकटीला एकदा पोटाशी धरायला हवे होते. पण कालचा प्रसंग आठवून पुन्हा तिच्या मनाचे शेण झाल्यासारखे झाले आणि ती निश्चयाने रस्ता ओलांडू लागली.'

'हे उदाहरणार्थ थोरच. म्हणजे या भंपक कोंबडीवरून आता हे लोक आमची परीक्षा वगैरे घेणार. इथे आहे तो अभ्यासक्रम पुरा करता करता आमची वाट लागली. त्यातून सुर्शा इथे नाही. म्हणजे भयंकरच. भंकस करायला कोणी नाही. रमी तिकडे. जबलपूरला. मद्रासमध्ये किती वेळ बसणार? सिग्रेटीसुद्धा संपत आल्यात. घरून पैसे मागवावेत तर वडील प्रश्न विचारणार. नकोच ते. आणि यांना कोंबडीचं कौतुक. कोंबडी. च्यायला.'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीए आवडले ! (फक्त 'एडक्यासारखा' ऐव़जी 'उंडग्या ढोरा'सारखा हवे होते नै ?)
नेमाडेंना आणखी ताणायला वाव होता पण छान !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्पल, मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्पल हे प्रचंड आवडलंय! एकदमच!

जीए स्टाईल वाचताना अगदी तळ्यात उतरणारी लक्ष्मी आली डोळ्यासमोर. मात्र नेमाडे अजून थोडे खेचू शकला असतात याच्याशी सहमत. आणि 'लायब्री' शब्दही आला असता तर अजून मजा आली असती.! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...

अमुक - 'एडक्यासारखा हिंडू नकोस' हे 'लक्ष्मी' या कथेतलं आहे..म्हणून तसंच ठेवलं.....:)

बिपिन - लक्ष्मी अचाट कथा आहे....हे वाचून तुम्ही ती कथा बरोबर ओळखलीत....आभार...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह ! मला वाटले की तुम्ही मनचे लिहीले आहे. 'लक्ष्मी' वाचून खूप म्हणजे खूपच वर्षे झाली आणि जीएञ्ची पत्रे प्रकाशित झाल्यावर त्याञ्च्या आईचे आवडते 'उंडगे ढोर' अधिकच ठळकपणे सामोरे आले म्हणून न राहवून उल्लेख करावासा वाटला. उत्तराबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जैसी कुक्कुटिया रस्ता वलांडी
घालोनि कामक्रोधाची अंडी
पिल्ले प्रगटती चिमखडी
हे गूढ कैचे!
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

धागा आता वाचला. मूळ धागा आणि सर्व प्रतिक्रिया हहपुवा.

वरील माणिकमोत्यांत आमचे सव्वाअडकाई पैशे :
१. "कोंबडी पळाली प्रगती झाली".

२. कोणी एक कोंबडी असे. ती रस्त्यापलिकडे राहात असे. रस्ता वलंडण्याचा निर्धारु करी. पावलापावला गणिक पुढे मागे पाही. तो एथील समग्रजनांना कैच्या कै लिहिणेंचा खटाटोप करावा लागे. इति कोंबडीचालणेंचा दृष्टांतु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

धमाल येतेय वाचायला. अजून येऊंद्यात. मोडक, तुम्ही फक्त आस्वाद घेऊ नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

प्रस्ताव आणि प्रतिक्रीया दोन्ही मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक कोंबडी दाणे टिपता
चावायाची नुसतीच काडी;
म्हणायची अन मनाशीच की
पैलतीरावर घालीन अंडी.

फडकावुनि मग उजवा पंख
आणि उडवुनी डावी तंगडी,
भिरकावुनि ती तशीच द्यायची
लकेर बेचव जैसा गवयी.

मुलाणियावर नजर राखणे;
सुरी पाहता गर्भगळित,
मुंडकी, चोचींचा ढीग पाहुनि
कुढत बसणे टिपे गाळीत.

स्वप्ने बघता पैलथडीची
मानेवरती सुराही फिरला;
एक मागता तंगड्या दोन
मुलाणी देई गिर्‍हाइकाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जब्बर जुळवणी ! एक दिलखुलास थाप (तुमच्या पाठीवर) आमच्यातर्फे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या माझ्या कोंबडीच्या वाटेला जाऊ नका
कारण ती ज्या वाटा बदलते आहे
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.
मोडून पडाल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हे आणि दृष्टांत...दोन्ही आवडले....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. कोंबडी पळालेली दाखवा, रू. पाचशे मिळवा.
२. संडे असो वा मंडे रोज रस्ता ओलांडे.
३. कोंबडीने रस्त्यापलीकडे पाहिले. नारळाएवढ्या अंड्यातून एक निरागस जीव बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. कोंबडी असली तिच्या मनातही मातेची ममता होतीच. तिच्या हृदयाची उलघाल झाली. काय करावे? रस्ता ओलांडून आपण आपल्या सर्व बंधनांना ओलांडावे का? मर्यादेची अदृष्य भिंत इतर कोणत्याही बंधनांपेक्षा मजबूत होती. पण मातेच्या हृदयाने तिला पुन्हा साद घातली. कोंबडीने रस्ता ओलांडला आणि अंड्यातून छोटे शहामृग बाहेर आले. त्याने हाक मारली, "आई". कोंबडीच्या रस्ता ओलांडण्याचे सार्थक झाले. आई ... असा शब्द आहे जिथे इतर सर्व शब्द संपतात. त्या ममतेला, त्या नात्याला माझा प्रणाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१.
इराणची चकणी कोंबडी पाहते तापलेल्या व सुस्थित
रस्त्यापलिकडे केकवर चढणारी क्रमिक बुरशी
क्वचित विचलीत करते तिचे लक्ष असुरक्षित
चालताना भोंगावणार्‍या वाहनांमधून उडणारी अकृत्रिम माशी

२.
विवर्त नभ एकटे सतत तापलेल्या झळा
उन्हांत जणु कोंबडी शोधिते त्या जळां
विवस्त्र मृगतंद्रिने कोंबडी चालते राघवा
तृषार्त बिलगे तिला सभय लेकुरांचा थवा

३.
चाल बाई चाल पुढे
मोज तुझे तुच रडें

रस्ता : नुस्ते एक डांबर
निष्ठूरपणे ओलांडून बघ
दिसेल खरे खाटिकजग
रक्ताविना सोलीव नग

दिसतील पाती लोहाची
फुटतील हाडें चुन्याची
पावले तुझी कातड्याची
खाटिकमाडी चढायची

एकेक अवंढा गळ्यातून
पावलो पावली जिरत जाय
मागे फिरू नकोस बाई
कुठे ठेवशील शिटात पाय !

४.
एक कोंबडी
द्या मज आणून
शिजवीन मी जी
स्वप्राणाने
भरून टाकीन
सर्व वाडगे
दीर्घ जिच्या
हिश्यां-रश्याने
ऐसी कोंबडी
द्या मजलागून..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चारही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर आहे हे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एकशेसत्तावीस वेळा शप्पत कोंबडीकडं टक लावून बघत बसलेलो. तर ती मॅडसारखी माझ्याकडं न बघता रस्ता ओलांडायली. तिच्याकडं बघताना मला जाईटलीला येतं तसं भरुन का काय ते आलेलं. जाईटली पण मॅडच आहे. आजोबांना पान कुटुन देते आणि त्या खलबत्त्यातलं चिमूटभर कुटलेलं पान शेवटी स्वतःच खाते. तिचे ओठ मग अगदी लालचुटुक होतात. आज्जी म्हणते की मोठा झालास की जाईटली बरोबर तुझं लग्न लावूया हं लंप्या. ई ! त्या शेंबडीबरोबर लग्न? वॅक! मग मी आज्जीच्या पोटाला इतक्या गुदगुल्या करतो की आज्जी रामाच्या देवळात जाईपर्यंत खुदुखुदु हसत बसते. आजोबा आपले उरलेलं पान चघळत सोप्यात फेर्‍या मारतात आणि म्हणतात."लंपूबुवा, बरंय बाबा तुमचं.." आता यात काय बरंय कुणास ठाऊक. आज पण कोंबडी रस्ता ओलांडताना मी बघीतलो आणि एकदम मला जाईटलीची आठवण झाली. ती निप्पाणीला तिच्या मामाकडं गेल्याय आणि चांगल्या सातशेत्रेपन्न दिवसानं येणाराय.तोपर्यंत आपले आजोबा, आज्जी, मी आणि ती रस्त्यापलीकडली कोंबडी. मग मी एकदम शहाण्या मुलासारखा आजोबांच्याकडं गेलो आणि म्हणालो. "आजोबा, तुम्हाला पान कुटुन देऊ?" तर आजोबा आता चष्मा न काढताच पेंगायलेले. मला एकदम मॅडसारखंच वाटायला लागलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लंपनच्या भावविश्वातून हा विचार करायला नकोच, असं मला वाटतं.
षट्कारांनंतर एखादा चेंडू उचलावा आणि तो सीमापार जाण्याऐवजी मिडविकेटवर जाऊन पडावा तसं झालं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रस्त्याच्या अलीकडे मी उभी आहे. का? मला काहि ठावकी नाही. विचार करू गेले तर माझ्यामागच्या मातीवरल्या पाउलखुणांपरते काहीही दिसत नाही.
ती माती पण कशी? रस्त्यापर्यंत माझी अविरत साथ करत आली. पण आता मात्र आवर घालून थांबली आहे. ह्या रुंद रस्त्याला जाणवत तरी असेल का? की कुणी एक मातीचा कण पलीकडच्या मातीच्या कणात मिसळून जाण्यासाठी म्हणून आसुसून माझ्या पावलासवे आला आहे..... मनाला कसोशीने समजावून मी पाय झटकला.
दयाघना, या कणाच्या स्मृतीचा शाप देण्यापेक्षा मला विस्मृती दिली असतीस तर ती मी चिरंतन वरदानासारखी मिरवली असती.....
निमाला. तोही विचार निमाला.
परमेशा, आता मी सगळे विचार त्यागले आहेत. माझ्या आधी न जाणे कीतीजणी या दाहक जाणीवेशी झुंजल्या असतील. जन्माला येउन फक्त "पलीकडे जायचं", "पलीकडे जायचं" हि आस मनी घेऊन मजसारख्या अनेक या स्थानावर थांबल्या असतील. विचारमग्न होऊन क्षणभर थबकल्या असतील आणि शेवटी...शेवटी...दिठी समोर स्थिर ठेऊन, निर्विचार होउन पलीकडे गेल्या असतील....
....आज मीही तेच करणार आहे....मी.....कुणी कोंबडी.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

भडक तुरे भडक तुरे नजरि भरुनि आले
मांसलतनु कुकडि-तुकडिजडित पथ जहाले

--------

इरेस पडले जर बच्चमजी
पल्याड रस्त्या जाइन मीही
चुकवुनि येत्या जात्या गाड्या
जरा झग्मगित नि फारहॉर्नी

म्हणाल म्हणजे मुर्गीच्या या
अता खरी जय चपळाईची
कुठे पूर्विची खुर्द बुद्रुकी
कुठे अता ही खास पुणेरी

--------

कोंबडी रोज रस्त्यावर जाते नकळे मज काही
गाडीस कधीही माझ्या पण ब्रेक लागला नाही

--------
मी धावते अखंड धावायचे म्हणून
धुंदीत या कशाला रस्त्यात जीव प्यारे

डरतात वाहनांना जे वातकुक्कुटांना
पाहून पाठ फिरवी, मज त्यांत ना गणा रे

मग्रूर सिग्नलांचा मी तोडला इशारा
कानात किंतु आले मग हॉर्न फक्त सारे

------------

पळाली पळाली ती कोंब्डी पळाली
रस्त्यास पारूनि फुटपाथि गेली

फुटपाथि जाऊन विचार केला
नमस्कार माझा तया कोंबडीला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांचे प्रतिसाद भारी आहेत.....

ती गेली तेव्हा खडखड...भरधाव तो टेम्पो गेला
धुळभरल्या लाटांमागे ठेवून लालिमा गेला...

ती नव्हती इंग्लिश बेचव...रुचकर ती गावठी होती
अर्ध्यातच डाव हा उधळे अन खाटिक व्याकुळ झाला

ती एकटी होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी माणसे सारी निर्लज्ज कोडगी होती

फुटपाथवर गमले मजला संपले आयुष्य प्रणयाचे
कोपऱ्यावर शून्यवत तेव्हा कोंबडा एकटा होता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माननीय सदस्यांनी या धाग्यावर जी षटकार-चौकारांची आतषबाजी चालवली आहे तिने आम्ही स्तिमित झालो आहोत. मध्यंतरानंतर अशीच टोलेबाजी अपेक्षित आहे, तोवर आम्ही एक चोरटी धाव काढून घेत आहोत.

जपत पिसारा शीट सोडणे - नामंजूर !
अन्‌ सिग्नलची वाट पाहणे - नामंजूर !
मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची
येईल त्या रिक्षाला डरणे - नामंजूर !

माझ्या हाती विनाश माझा ! कारण मी !
बर्गरच्या पॅटीतील बनते सारण मी !
केएफसीची किचन खुणविते ओकत धूर

रोग-प्रतिबंधके, औषधे ! दूर बरी !
गटारातुनि पाणी पिण्याची ओढ खरी !
हलाल होण्या रक्त वाहणे मज समजे,
पण रक्ताची ओढ- भडकणारा तंदूर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपत पिसारा शीट सोडणे - नामंजूर !

ROFL ROFL आवरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागाकाराने ह्या अत्यंत गहन प्रश्नावर या धाग्यात चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. प्रतिसादांमधून प्रतिभेचा जो पूर वहातो आहे त्याने मी अक्षरशः स्तिमित झाले आहे.
कवीवर्य भटांच्या शैलीत कोंबडी पळाल्याच्या दारूण प्रसंगाला व्यक्त करायचे झाल्यास,

तळपती मध्यान्ह अजूनी,
कोंबडे पळलीस काsss गं,
कोंबडे पळलीस का गं?
एवदढ्यातच त्या झुडुपी तू अशी घुसलीस का गं?

वाटला चटणी मसाला,
परतला कांदा जरासा,
तू अशी दडल्यामुळे मग,
बेत तो फसलाच नां गं?
कोंबडे पळलीस का गं?

बघ तुला पुसततोच आहे,
खाटकाचा जाड सुरा
तू तिथे अन् हा इथे तर,
एकटा झुरणार नां गं?
कोंबडे पळलीस का गं?

कोकलती पोटात माझ्या
कावळ्यांच्या आर्त हाका
या भुकेल्याच्या नशीबी,
आज तू येणार का गं?
कोंबडे पळलीस का गं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिभावान लेखक/कविंना साष्टांग दंडवत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही पाहिल का त्याला? तो हो तोच टोपीवाला ! करड्या दाढीचा, राकट पुरुषी केसाळ हाताचा आणि डोळे अगदी रोखून पाहणारे. डोळे मला तर त्याच्या डोळ्याची भीतीच वाटते बाई

त्या दिवशी मला इथे आणल गेलं. मालकानेच तर आणून सोडलं. रग्गड पैसे मोजले त्यान.खुराड्यात कोँबल मला. नंतर अंधार दाटून आला एकदम

आता मात्र तो येतोय. तेच ते राकट हात जवळ येतायेत. केसाळ लव असणारे
डोळ्यात पहा त्याच्या रक्त ऊतरलय.
गिऱ्‍हाईकाने आँर्डर दिलीय.
सुऱ्‍याच पात चमकतय.
जवळ आलाय तो खूपच.
खूपच जवळ आलाय.
आणि खाटकन सुरा फिरलाय.

थांबा जाऊ नका.
डोळ्यातल रक्त आणि ताटातल रक्त एक झालय.
मान तडफडतेय. अंग हलतय.
पिस काढली जातायेत.
पाय वेगळे होतायेत.
गरम पाणी आणल गेलय.

थांबा अजूनही थांबा.
जाऊ नका.
बरच बाकी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हे मस्तच आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

प्रस्ताव आणि लोकांचे कल्पक प्रतिसाद वाचून मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोंबडी,
तीन अक्शरांची ऊठ्बस लोकल मेनुकार्डात.
हे कोंबडी ,
तू व्हायला नको आहेस भोगबहाद्दर तंगडी काचेच्या प्लेट्मधली,
तू नको आहेस उबवायला वेद-उपनिषदांनी घातलेली
सटरफटर दुश्चिन्ह प्रसवणारी सहेतुक अंडी.
तू पसरायला हवीस सगळ्यांच्या डाळरोटीवर,
रस्सा होवून.

ती पहा रे ती पहा,
कोंबडीची अस्मिता आता पातेलंभर झालियए.
माझ्या ही आत्म्यानं आता 'रिपीट' चि गर्जना केलिये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण कोंबडी ?

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

तिच्या या रस्ता ओलाडण्याच्या नादात हातखंब्यास यस्टीन् मारली तिला! चांगले दोन तास खोळंबल्याचे आठवत असेलच.

---

खबरदार जर हात मारूनी खाल तिला चिंधड्या
उडवाल पिसा पिसा एवढ्या!
कुण्या गावचे खाटिक आपण कुठे चालला असे
रस्ता हा ओलांडून तीरसे?
झट्कन पकडा या मुर्गीला रावं उडी टाकुनी
असे का उभे खड्या अंगणी!
मूर्गी म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
तिला का ओळखले हो तुम्ही?
ही मर्द मराठ्याची मी मुर्गी असे
हाड ही तिचे लेचेपेचे नसे
त्या नसानसातून चविष्टरस हा वसे
खबरदार जर हात मारूनी खाल तिला चिंधड्या
उडवाल पिसा पिसा एवढ्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सगळ्यांना दंडवत__/\__
एकापेक्शा एकेक हुच्च प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रावसाहेबांची प्रतिभा हुच्च आहे. लै भारी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भवतु सब्ब मंगलम्

एकदा आमचा बोधीसत्त्व एक कुक्कुट म्हणून जन्माला आला. एका पाळीव प्राणी संकुलामध्ये तो अनेक कोंबड्यांचा धनी म्हणून मिरवीत असे.
त्या संकुलात पूर्वीपासून डुकरांची सत्ता होती. ही डुकरे सतत " सर्वजण समान आहेत, पण काही त्यातल्यात्यात जास्त समान आहेत" असे म्हणत असत आणि इतर प्राण्यांना अन्यायाची वागणूक देत. अशा या डुकरांचा नेपोलियन नामे राजा होता.
अशा संकुलवासांत काळ घालवित असतां बोधीसत्त्व मात्र त्या डुकरांना मुळीच घाबरत नसे. कां की, पहाट होताच तो एका उंच कौलारू छपरावर चढून एका पायावर उभे राहून सूर्यदेवतेची उपासना करत असे. त्याच्या तपाच्या तेजानें नेपोलियनचें काश्मिरी पाषाणांचें सिंहासन तप्‍त झालें. आपणाला या स्थानापासून कोण भ्रष्ट करूं पहात आहे या विवंचनेने नेपोलियननें संकुलाचें सूक्ष्म निरीक्षण केलें. तेव्हां बोधिसत्त्वाच्या तपश्चर्येचा हा प्रभाव आहे असें त्यास दिसून आले. तो तात्काल बोधिसत्त्वासमोर येऊन उभा राहिला व खिंकाळहास्य करीत म्हणाला, ''हा असा ताम्रवर्ण तापसी कोण बरें ? याचा वर्णच ताम्र आहे असें नाहीं तर याचा तुरा देखील ताम्रच आहे आणि याचे निवासस्थान देखील ताम्रच दिसतें. सर्वतोपरी याचें आचरण मला आवडत नाहीं.''

बोधीसत्त्वाने त्याच्या त्या उपरोधिक भाषणाला हें उत्तर दिलें ''हे नेपोलियन, केवळ पिसांच्या ताम्रपणानें प्राणी तामसी होत नसतो. कां कीं, अंतःकरणाच्या शुद्धतेनें श्रेष्ठ होत असतो. ज्या प्राण्याची कर्मे पापकारक असतात आणि त्यामुळें ज्याचें चित्त ताम्र झालेलें असतें तोच प्राणी तामसी होय.''

नेपोलियनला बोधिसत्त्वाच्या भाषणानें फार क्रोध झाला आणि तो म्हणाला, ''भो कुक्कुटा, तुला काहीच काम नाहीसे दिसते. कां की, हल्ली कोंबड्या फारच कमी अंडी घालत आहेत. यापुढे प्रत्येक कोंबडीकडून दररोज एकतरी अंडे मिळाले पाहिजे. अन्यथा तुला हे संकुल सोडून जावे लागेल.''

बोधिसत्त्व म्हणाला, "हे नेपोलियन, तुझा क्रोध मी समजू शकतो. क्रोध उत्पन्न होतांना अग्निकणाप्रमाणें लहान असतो खरा, परंतु तो आवकाश सांपडला म्हणजे सारखा वाढत जातो आणि ज्याच्या आश्रयानें वाढतो त्यालाच खाऊन टाकतो. म्हणून अशा क्रोधापासून मुक्त रहाण्याचा प्रयत्न तू करवास. द्वेष हा क्रोधाचा भाऊ आहे. डुक्कर, घोडे इत्यादि सर्व प्राणीजातीमध्यें या द्वेषाची बीजें आपोआप रुजतात आणि त्या द्वेषापासून क्रोध उत्पन्न होऊन त्यांची भयंकर हानि होत असते. राष्ट्रा-राष्ट्रांतील विवाद, भावां-भावांतील तंटे, मायलेकांचें वितुष्ट किंवा पितापुत्रांची भांडणें ही सर्व द्वेषामूलकच नव्हेत काय ? हा द्वेषवैरी तुझ्या शरीरांतून निघून गेला तर तू खरा सुखी होशील. लोभ हें सर्व पापांचें मूळ आहे. लोभामुळें प्राणी चोरी करण्यास प्रवृत्त होतो. लुटालुट, दुसर्‍या प्राण्यांवर नाहक हल्ले इत्यादि सर्व अनर्थपरंपरा या लोभाच्यामुळें उद्भवते. म्हणून हा भयंकर रोग तुझ्या अंतःकरणांतून नष्ट व्हावा ही माझी प्रार्थना आहे. स्नेह क्रोधलोभां इतका भयंकर नाही. तथापि, तो प्राणीजातीचा शत्रूच म्हटला पाहिजे. आपला आप्‍त कुकर्मी असला तर स्नेहामुळें त्याचे अवगुण झांकण्याचा आपण प्रयत्‍न करतों त्याची तरफदारी करून इतरांशीं भांडण्यास आपण प्रवृत्त होतों. एवढेंच नव्हे तर केवळ अशा स्नेहापायीं कर्तव्याकर्तव्यांचा आम्हांस विचार रहात नाहीं. म्हणून व्यक्तिविषयक स्नेह तुझ्या मनांतून नष्ट करावा अशी मी आपणास विनंति करितों.''

नेपोलियन बोधिसत्त्वाच्या या विवेचनानें अधिकच क्रुद्ध झाला आणि म्हणाला, ''तुझ्या या बाष्कळ बडबडीचा मला वैताग आला आहे. हे प्राणी संकुल सोडून तू ताबडतोब चालता हो.''
ज्या प्राणीसंकुलाचा राजाच असा बिथरला आहे त्या संकुलाचे भवितव्य फारच वाईट असणार हे बोधीसत्त्वाने ओळखले आणि आपल्या समस्त कोंबडी परिवारासह रस्त्यापलिकडच्या नव्या प्राणी संकुलाचा रस्ता धरला.
***

चर्चा प्रस्तावात विचारलेल्या दुसर्‍या प्रश्नातील कोंबडी बोधीसत्त्वाच्या परिवारातली होती. रस्ता ओलांडून नव्या संकुलात जाणारी ती शेवटची कोंबडी होय.

***

असे म्हणतात की बोधीसत्त्वाने केलेला उपदेश नेपोलियनने न मानल्याने त्या प्राणीसंकुलात बंडाळी माजली. डुकरांचे राज्य नष्ट करण्यास बोधीसत्त्वाने आपली 'क्रोधित पक्षी' नामक कोंबड्यांची फौज उभी करून डुकरांच्या निवासस्थानांवर हल्ले चढवले आणि शेवटी डुकरावर जय मिळवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोधिसत्व आणि ऑरवेल यांचा मिलाफ करू शकणाऱ्या तुमच्या प्रतिभेला सलाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो. विसुनाना _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

कवच्त कान चान माहिते दिले ध्न्य्वाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या प्रतिसादाच सोप मराठी भाषांतर कुठे मिळेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

खवचट खान छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

आपने तो भांडाही फोड दिया Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुराड्याच्या कुंपणावरून
धीरत्व धरून, उड्डाण करून
कुक्कुटचपला ती जाते
पथावरी त्या भिरभिरते
अंधुक आकृती तिज दिसती
त्या गाताती, कुक्कुटगीती;
त्या गीतींचे ध्वनी निघती
कुकुच्का गडे कुकुच्का...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"रस्ता पब्लिकचा आहे. तो कोंबडी ओलांडेल, नायतर बकरा ओलांडेल. तुम्ही आडवनारे कोन?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या कोंबडीला व्यायाम करायचा असेल. तुमचं ठीक आहे हो, खाता आणि झोपता. कोंबडीला आयटम बनण्यासाठी व्यायाम करणं भागच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL ROFL कोंबडी आयटम आयला!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोंबडी मोकाट मोकाट
वाटसरु येडीपिशी
किती हाकला हाकला
फिरु येई रस्त्यामधी

कोंबडी लहरी लहरी
करे पकाकपकाक
उंडारून उंडारून
फिरू येई रस्त्यावर

कोंबडी पाखरु पाखरु
तिला येत नसे उडता
तुरुतुरु रस्ता कापे
नका चिरडू मायबापा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुन्दर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंख नाही तुला
पाय नाही मला
खाटीक हा आला
मुलाण्याचा......
कोंबडीच्या शरिराचा रचनाबंध आपल्या स्वत:च्याच सावलीच्या भाग्याबरोबर भरकटतो की सावली त्याच्याबरोबर? मला माहीत नाही. माहीत करुन घेण्याचाही प्रश्न येत नाही. मुलाण्याचे श्वापदासारखे हिंस्त्र डोळे जेव्हा तिच्या सावलीच्या करुण डोळ्यांमध्ये सायंकाळच्या संतुराप्रमाणे किणकिणु लागतात, तेव्हा प्रचंड प्रतिभेचा हा संध्यामग्न पुरुष कुठुन न्याहाळत असावा या कोंबडीला? निद्रेच्या पलिकडुन कि अलिकडुन? तिचा जीवन औदुंबर आणि मुलाण्याच्या मृत्युच्या वेशीपलिकडे जिवंत असणार्‍या आणि नंतर रहाणार्‍या जिवित कातडीखालचे श्वास याचा संगम तिच्या मृत्यनेच होत असावा.
दोन नुकतीच जन्मलेली जुळी अर्भके निखार्‍यावर ठेऊन दिली तर त्यांचे काय होईल? जन्म आणि मुत्यु सुद्धा असेच सतत निखार्‍यात बांधलेले असतात...आपल्या अस्तित्वशोधाचे दुबळे पंख घेऊन, निखार्‍यासारखे दु:खवैभव उपभोगत असतात. त्यामुळे अनेकदा मलाच माझे अस्तित्व नकोसे होते. कुणा अज्ञाताकडे सोपवुन, घूंगराळ गाईंबरोबर राधेकडे निघुन यावे अशी जाणीव सतत आत्म्याच्या खोल डोहात लहरत रहाते.मग त्या कोंबडीचे काय? श्वापदी ओंजळीची तिला भिती नाही, भिती आहे ती शुन्य करुणेने शेवट्चं कुरवाळणार्‍या मुलाण्याच्या बर्फाळ स्पर्शाची! but alas, truth of inhuman sympathy in the last resort!
मग सांग कोंबडे, मीच करु ना माझी जपणुक? तु माझी हाक नक्की कुठुन घेशील? ती हाक तुझ्या अंगसंगाशी संलग्न होऊन अंधारावर निपचित पडेल. मी मुलाणी असलो म्हणुन काय झाले? भातुकलीच्या बाहुलीचे चार केस तुझ्यासारखेच माझ्याही ह्रदयात प्रार्थनेबरोबर पुरले तेव्हाच हे निश्चित झाले,'आपल्या अस्तित्वाचा गर्भ वैयक्तिक आभासातच आहे.'
माझ्याकडे सुरा आहे - मी मुलाणी आहे
मी मुलाणी आहे - माझ्याकडे सुरा आहे
तु पळत आहेस - तु कोंबडी आहेस
तु कोंबडी आहेस - तु पळत आहेस
यातलं सत्य काय? वास्तव काय? माहीत नाही. या बंधबंधाचे द्योतक ही मला ठाऊक नाही. फक्त इतकेच जाणवते आहे की 'सर्वांनी फूल व्हा! फूल व्हा' असे म्हणत दर्ग्यात विटेवर उभा ठाकलेला खिस्त माझ्यामागे उभा आहे आणि तुझ्यामागे, 'माझा सुरा.'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

हरवलेलं जहाज पुन्हा या किनार्‍याला पाहून कोंबडीने घाबरून रस्ता ओलांडला असावा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोंबडीचा जीव (शरीर्+आत्मा) टिनबंद करण्याचा मानस जसा कोंबडीला कळला, तसाच तुलाही कळला. आधीच कोंबडीशी एकरुप झालीस की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

ती गेली तेव्हा घों घों
ट्राफीक वहावत होता
बिनपरवान्याचे चेहरे
पोलीस ओळखित होता

तशि सांजही पोल्ट्रीमध्ये
येऊन थबकली होती
धंद्यास अंत गवसावा
अंड्यास माय गमवीता

ती ब्रॉयलर होती म्हणुनी
घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध
पीसांना उडवित होता

शेड्बाहेर गमले मजला
संपले भांडवल माझे
कंदील धूरकट दुरुनी
अंड्याला उबवित होता

हे चिकन चापतानाही
मज आता गहिवर नाही
व्याजात सोसायटीच्याही
चेअरमनचा वाटा होता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Broiler chickens are specifically raised for meat and are slaughtered at a certain weight. Most broilers reach the desired weight well before they are of egg laying age and therefore never get the chance to lay an egg, but they are quite capable of doing so.
-बरीच म्हातारी असावी ती ब्रॉयलर कोंबडी. मग पळू कशी शकली? (बहुतेक टुणूकटुणूक भोपळ्यात बसून गेली असेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-बरीच म्हातारी असावी ती ब्रॉयलर कोंबडी. मग पळू कशी शकली?

पळाली? छे छे, पळण्यावीषयी मी काहीच लिहिलेलं नाही. ती गेली.... रस्त्यापलिकडे गेली. पोल्ट्रीतली शेवटची होती, त्यामुळे अंडं घालेपर्यंत तग धरून होती.

(बहुतेक टुणूकटुणूक भोपळ्यात बसून गेली असेल.)

Smile कोंबडी भोपळ्यात बसून टणूक ठुुणूक करत जाते आहे हे चित्र गमतीदार आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती गेली.... रस्त्यापलिकडे गेली.

'रस्ता ओलांडण्या'चा असा अर्थ जर (ऐलतीर-पैलतीर वगैरे) घ्यायचा झाला, तर 'कोंबडीने रस्ता का ओलांडला?' या प्रश्नाचे उत्तर 'मरायला!' असे साधे-सोपे-सुटसुटीत व्हावे, नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर एकाहून एक प्रतिभावान मिमिक्री आर्टिस्टस आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वामनपंडित- कुक्कुटसुधा.

वनी खेळती बाळ ते कुक्कुटांचे
बहू देख हुंदाडती जे सदाचे
स्वकौशल्य ज्या गर्जनेतूनि नाना
बहू दाविती ते करीती तनाना

कुक्कूध्वनी दूरवरोनि ऐकुनी
तो अन्य त्या सर्वचि प्राणियांनी
पडताचि कानी जिव्हेस चाटिले
न तृप्त जे ते उदरीं भुकेले

तो कोंबडाही तिज न्याहळीता
झाला खरा पागल चेकळीता
तो चेकचेकाळुनि आरडे हो
कुक्कावली कानि सदा पडे हो

गेले तदा सत्वरिं पाहिजे हो
म्हणोनिया कुक्कुटि आरडे हो
गोळा करे आणि म्हणे पिलांसी
लंघू अता त्या मधल्या पथासी

मागुती जरिहि विश्व लगावे
भक्षण्यासि जरि मांस चटावे
पंजरी परमुखात चढावे
वा पलायन पळोनि करावे

हळुहळू बघते यकसारिखे
कुणि करेल जणों मज पारिखें
मम पिलांसि न वा मज जीवना
म्हणुनि लंघु पथा चि चलाचि ना

जैं लांघती पथ पिले सगळीच साची
तैं कुक्कुटी करित हुश्शचि एकदाची
धोका टळेचि बहु कामुक कुक्कुटाचा
वा त्यासवे इतर आणिक भक्षकांचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारिच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

व्ह्याय डीड चिकन क्रॉस द रोड? वर "सर" काय स्पष्टीकरण देतील ?
(ते देतील हे "निछ्छीत")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोस्त हो,

मला आवाहन केल्यामुळे मी इथे आलो आहे. नाहीतर असल्या जातीयवादी ठिकाणी लिहायची माझी आजिबात इच्छा नव्हती. पण खरे सत्य लोकांना कळालेच पाहिजे या एकमेव अट्टहासातून मी हे लिहितो आहे. असा प्रयत्न आजवर कुणीही केला नव्हता.

कोंबडीची सहजप्रक्रुती पाहिल्यास तिचा शैवधर्म अधोरेखित व्हावा. स्वैर संचारी आणि वैदिक धर्म न मानणार्‍या कोंबडीला मनुवादी व्यवस्थेकडुन त्यामुळेच धोका संभवत होता. हडप्पा येथील शैव संस्क्रुतीवरचे वैदिक आक्रमण पाहताच तेथील काही लोक नदी ओलांडून गंगेच्या खोर्‍यात स्थायिक झाले, तर काही लोक दक्शिणेकडे आले. ही आदिम शैव स्थलांतराची कथा या रूपकाद्वारे वर्णिली आहे. आपण यांचं मांस खाल्लंय हे लक्षात असू द्यावे! अरे वैदिकांनो तुमचं अस्तित्वच मुळात आमच्यामुळे आहे हे विसरू नका. समाजाच्या अवकाशाला असा ताण मिळेल की हे सर्व लोक एक दिवस पाचोळ्यासारखे उडून जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile Lol
फक्कड...
कोंबडीने रस्ता का ओलांडला? या मूळ प्रश्नाचं उत्तर देन्याचं टाळून, आपण सरशैली व्यवस्थित पकडली आहे हे नमूद करतो (आणि हे दोन शब्द संपवतो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! फक्त "समाजाच्या अवकाशाला असा ताण मिळेल की हे सर्व लोक एक दिवस पाचोळ्यासारखे उडून जातील." ऐवजी "समाजाच्या अवकाशाला असा ताण मिळेल की हे सर्व लोक एक दिवस कोंबडीच्या पिसाप्रमाने उडून जातील." असं वाचायला अजून मजा आली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

अनामिक जी,

आपली सुधारना निछ्छितच जास्त योग्य आहे. हबिणंदण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>तर काही लोक दक्शिणेकडे आले

उपक्रमावरील एका सदस्यांची आठवण होऊन (आणि उपक्रमचीही आठवण होऊन) डॉळे पाणावले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उपक्रमसारख्या शुद्धलेखन-दाक्षिण्यवादी संस्थळावरही असे लोक होते हे वाचून मजा वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती कोंबड्या वंचना
कितीदा करू पार रस्ता अशी मी
कितीदा करू प्रीतिची याचना

खुराड्यातले ना उमाळे उसासे
न ती आज अंगास आता पिसे
विझोनी अता यौवनाच्या मशाली
खुडुक जाहले, एक अंडे नसे

परी खांब रस्त्यावरी तो विजेचा
अविश्रांत राही उभा सोबती
पकडण्या तुला मार्ग ओलांडते मी
पळे तू पुढे आणि मी मागुती

किती कोंबडे ते नटोनी थटोनी
शिरी टाकिती माझिया अक्षता
तुर्‍यावाचुनी पण तुझ्या, कुक्कुटा रे
मला वाटते विश्व सारे वृथा

तुवा सांडलेले कुठे पोल्ट्रि फार्मात
वेचून स्वादिष्ट धान्यकणऽ
मला मोहवाया बघे कावळा हा
करू जात मजला व्यभीचारिणऽ

निराशेत फ्रस्ट्रेट होऊन बैसे
ऋषींच्या कुळी तो विफल पोपटऽ
पिसाटापरी चोच चोचीत घालुन
करी आर्जवे पारवा लोचटऽ

पिसारा पिसांचा उभारून दारी
पहाटे उभा मोर करण्या छळ
करी प्रीतिची मागणी बेशरम
पंख पंखावरी ठेवुनी कोकिळ

मिठी घालुनी कोंबड्याला परी मी
घेऊ गळ्याशी कसे पारवे
शहारून येते कधी अंग; तूझ्या
स्मृतीने उले अन्‌ सले तंदुर

गमे की तुझ्या सोबती आरवावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लांब चोचीतली बिडि प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद रस्ता मध्ये कोंबड्या अन्‌
असे खास मी कोंबडी सज्जनऽ
परी त्यास ओलांडल्यावाचुनी रे
घडावे कसे आपले मीलनऽ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

अतिशय दर्जेदार. शेवटून दुसरे अन तिसरे ही कडवी सर्वांत जास्त आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अत्यंत सुंदर, दर्जेदार. आणि भयंकर विनोदी. हसून हसून फुटलो असं मी सहसा म्हणत नाही, पण इथे इलाज नाही. दंडवत स्वीकारावा महाराजा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_ दंडवत

खुराड्यातले ना उमाळे उसासे
न ती आज अंगास आता पिसे
विझोनी अता यौवनाच्या मशाली
खुडुक जाहले, एक अंडे नसे

आधी कोंबडा की आधी अंडे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शि.सा.न. __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पाठ्यक्रमात आठवी ते दहावी दरम्यान बालकवी, केशवसुत वगैरेंच्या धाटणीच्या कविता(विशेषतः पारवा) एका झटक्यात डोळ्यासमोरुन गेल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा जुना धागा वर आल्याचे सार्थक झाले. नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा म्हणतात ती हीच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

विडंबन करण्याआधी मुळ कवितेच्या कवि/प्रकाशकाची परवानगी घेतली होती का कुणी? की सगळ्याच मुळ कविता प्रताधिकारमुक्त आहेत? ना,ही उगाच एक 'नारदीय' शंका मनात आली म्हणून बोललो!

प्रतिसादाला दिलेली श्रेणी: खवचट, भडकाऊ, खोडसाळ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

आदिस अबाबाच्या हॉस्पीटलातील नर्सेस
त्यांचे थुलथुलीत नितंब पाहून
आठवली बाजीराव रोड क्रॉस करणारी कोंबडी
बघताच हे नितंब वज्रमुठीने कुस्करावेत असे वाटायचे
पण धपापत उडणारे त्यांचे स्तन पाहून वाटे
मुठीला कामे तरी किती

कोंबडीच्या योनीप्रवासात मधे येणार्‍या ट्रक्सची कर्कश्श घरघर
केसाळ हिजड्याप्रमाणे मधेच उगवलेला तो वड
विस्फारून बघणारी घूस
चीत्कारणारी घुबडे
आणि रस्त्यावर कोंबडी

काळाने छेडछाड करू नये म्हणून
अंग च्रोरून
नवयौवन घुसळवत
नजरांमधील वखवख पिसांनी झटकत
एका कोंबडीने रस्ता क्रॉस केला
तेव्हा आदिस अबाबाच्या हॉस्पीटलमधील गच्च भरलेली नर्स
त्या स्त्री रुग्णाच्या नाकावरील ऑक्सीजनचा मास्क काढत होती
एका सजीवाने रस्ता क्रॉस केला
तेव्हा एका सजीवाने जन्म क्रॉस केला
आणि मी?
माझी नजर घुटमळली त्या नर्सच्या फुलारलेल्या पार्श्वभागावर

- दिलीप चित्रे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही स्वतःच्या पैशाने त्तज आणि दुसऱ्याच्या पैशाने विलायती दारू पिता का? (संदर्भ - ठणठणपाळ)

बाकी कविता भारी जमलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा किती भारी धागा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रचंड प्रतिभावंत लोक आहेत (होते ?) इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

बेस्ट ऑफ ऐसी यादीमध्ये या चर्चेचा नंबर खूप वर असेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'खवचट खान परत या', अशी मोहीम सुरू केली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय जबरदस्त धागा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्तं धागा!
माझ्या प्रतिभेलापण थोडिशी पिसं फुटतायत.
जरा थांबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या प्रतिभेला फुटलेली पिसे बघायला सगळे थांबलेले आहेत साती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

या प्रश्नाचं उत्तर अजून मिळत नाहीये .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

पुन्हा एकदा सर्व प्रतिसाद वाचले. इथल्या थोर प्रतिभावंतांना ज्याने एवढे लिहायला उद्युक्त केले, त्या खवचटखानांनी परत यावे, अदितीच्या मागणीला पूर्ण पाठिंबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कों- अवं संस्थळ लई न्यारं हितं काथ्याकूट वारं
ह्याला गरम गानं सोसंना
ह्याचा चर्चांचा हो तोरा, याचा सर्वर हाये कोरा
हितं सातीची लेखनी पोचंना!
हितं उदरभरनाची गोडी रं
नको फुकट छेडाछेडी रं

सं- कावो?

कों- अहो आयडी आयडीचा बाजार हितला, सालसूद घालतोय आलिमिली.

सं- बरं!

कों- आनि ग्यान वरपती विदा भुरकती
हितं पोली , त्या तिथं नली

सं- अगं कुक्कुट्सुंदरी, कीटकभक्षिनी, काय म्हनू तुला तू हायेस तरी कोन?

कों- कोन?
सं- व्हय व्हय कोन?

कों- छबीदार छबी मी खुर्राडी उबी
जशी चांदनी चमचम नभी
अहो खवचटा, नेटावरी बोभाटा , हे वागनं बरं न्हवं!

कोरस- अहो खवचटा, नेटावरी बोभाटा हे वागनं बरं न्हवं!

कों- चर्चेच गुर्हाळ भवतीन, फिरत आले मी गंमतीनं
रस्त्यावरनं चालू कशी, पाठलाग ह्यो टालू कशी
ह्यो ह्यो तुरंवाला, भलताच करतुया खोड्या हे वागनं बरं न्हवं!

(कों- कोंबडी, सं- संस्थळया, कोरस- कोरस!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL ROFL

झकास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त च साती तै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त पिसं काढली आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओहोहो!! झकासच! साती यांच्या फॅन क्लबात मी सामील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोंबडीवरून सुमडीत येऊन धागा पळाया लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लावणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सादर प्रणिपात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद सगळ्यांना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कों- अहो आयडी आयडीचा बाजार हितला, सालसूद घालतोय आलिमिली.

चुकून आयडी बायडीचा असं वाचलं अन जुन्या मालकांची आठवण झाली. त्याबरोबरच अनेक मुर्ग्या आठवून अंमळ हळवे झालो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कंट्रोल नायल्या, कंट्रोल!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

It is a truth universally acknowledged, that a single hen in possession of good feathers, must be in want of crossing the road for a cock.

Happy hens cross the road alike; every unhappy hen crosses the road its own way.

It was a bright cold day in April, and the hens were swimming crossing the road.

Someone must have slandered K the hen, for one morning, without having done anything truly wrong, it was arrested while crossing the road.

If you really want to hear about it, the first thing you'll probably want to know is where I crossed the road, and what my lousy childhood was like, and how my parents were roasted and all after they had me, and all that David Copperfield kind of crap, but I don't feel like going into it, if you want to know the truth.

Mother died today, crossing the road.

Mrs. Dalloway said she would fry the hen herself as it crossed the road.

All this crossing of the road happened, more or less.

It was an old hen who crossed the road in a skiff in the Gulf Stream and it had gone eighty-four days now without taking a fish.

It was a queer, sultry summer, the summer they electrocuted the Rosenbergs, and I didn't know what I was doing crossing the road in New York.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कोंबडी आधी कुठे होती? ऐलकाठ म्हणजे काय? मुळात रस्ता म्हणजे काय? सडकेला अस्तित्व असते. रस्ता हे भाववाचक नाव आहे. रस्त्याला अस्तित्व असते का? कोंबडी तरी आहे की होती? हा वाद आहे की अस्तित्वाचा वाद आहे की अस्तित्ववाद आहे?
(हे कुणाचेही विडंबन किंवा शैली नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(हे कुणाचेही विडंबन किंवा शैली नाही.) >>

बरोबर!
भाईगिरी असते तशी ही राहीगिरी आहे.

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साती Smile हे बरंय, गिर गिर राही.. (इत्ता इत्ता पानी..)
पण खरंच, राह बनी खुद मंज़िल..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Call me Chicken. Some years ago--never mind how long precisely --having little or no feathers in my tail, and nothing particular to interest me on this side of the road, I thought I would cross about a little and see the other side of the road.

He was an old rooster who clucked alone in a ditch on the Gulf street and he had gone eighty-four days now without crossing the road.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर - कोंबडीला वाटलं पळून रस्ता ओलांडावा तर तसे करण्याचा मुलभूत अधिकार तिला हवा. लोक अधिकार आणि हक्क यात गल्लत करतात. मला या घटनेचे स्पिल-ओव्हर इफेक्ट्स जास्त महत्वाचे वाटतात. म्हंजे - जर उत्पादन, संशोधन या क्षेत्रात भारतीय कोंबड्याना वाव मिळाला तर भारतात "चिकन कॅपिटल" जोरदार विकसित होऊ शकते. की जे इतर भारतीय खाद्यपदार्थ विक्री कंपन्यांमधे जाईल व तिथे महत्वाची भूमिका अदा करेल. किंवा कोंबडीच्या स्वतःकरताच संरक्षण सामुग्री बनवणार्‍या कंपन्या काढेल. शिवाय इन्फिरिअर गुड व नॉर्मल गुडसची सरप्लस होऊन फडतूस चिरडले जातील ते वेगळच.
खालील लिंका मी वाचलेली नैय्येत पण कोणाला इटरेस्ट असल्यास -
http://www.bloomberg.com/news/articles/2016-08-22/chicken-s-crossingover...
http://www.bloomberg.com/news/articles/2016-08-22/crossingover-india-f-1...
http://www.bloomberg.com/news/articles/2016-08-22/chicken-s-crossingover...
http://www.bloomberg.com/news/articles/2016-08-22/crossingover-india-f-1...
http://www.bloomberg.com/news/articles/2016-08-22/crossingover-a-blowick...
http://www.bloomberg.com/news/articles/2016-08-22/crossingover-india-f-1...
http://www.bloomberg.com/news/articles/2016-08-22/crossingover-india-f-1...
http://www.bloomberg.com/news/articles/2016-08-22/crossingover-india-f-n...
http://www.bloomberg.com/news/articles/2016-08-22/crossingover-india-f-1...

लगे हातो हा बिल माहेरचा व्हिडीओही पाहून टाका -
https://www.youtube.com/watch?v=6lnY6161617WAxs
_____

शुचि -
मस्त प्रश्न आहे.
.
टू गुड
.
Smile
.
गब्बर यांनी दिलेली शेवटून २३ वी लिंक वाचली आणि समजली. युहु!!
____

मनोबा - का, कशी, कोणासाठी ,केव्हा रस्ता ओलांडला हे प्रश्न अनुत्तरीत रहातातच.पण विचारतो कोण जो तो आपल्यात धुंदीत ढोल बडवतोय. चिकनची साला आख्खी लाइफच अशी आहे. कोंबडी विजेती नाही तर तिला रस्ता ओलांडण्याचाही हक्क नाही.
___

अनु - गब्बु कोंबडीने रस्ता ओलांडला म्हणुन "चिकन कॅपिटल" जोरदार विकसित कसे होऊ शकते. त्याकरता अपॉर्च्युनिटी कॉस्ट, एक्स्टर्नॅलिटीच्या इन्फ्लेशन इतकी हवी ना. तरच व्याज मिळून अ‍ॅब्सोल्युट अ‍ॅडव्हान्टेज मिळू शकतं. त्यापेक्षा मग थत्ते चाचांचं म्हणणं पटतय मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच.
१)एखादी चिक हेन दिसली तरी चिकन हार्टेड माणसाला उपयोग नाही. मग ती अल्याड असली काय किंवा पल्याड. मग पुढचे सगळे अर्थकारण (खरे तर अनर्थकारण) खारिज ठरते.
२) चिकन पॉक्स असलेल्या माणसाने चिक हेनकडे बघूसुद्धा नये. ती रस्ता ओलांडून आलेली पुन्हा क्रॉस करेल. डबल क्रॉस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

#१ एकदम सही! मस्तच.

अनर्थकारण

आहा!! सॉलिड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरी अजून कोणी उदगीरच्या कोंबड्यांविषयी कसं लिहिलं नाहीये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमी सरीयल आहे.

पण डंडी (Dundee) ह्या गावाचं नाव डाँडी असं लिहिणाऱ्यांना डंडा का मिळू नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक अ-कोंबडी प्रतिसाद. जालावरच्या गप्पांतली नक्कल करण्याचा प्रयत्न करतोय. ह्यात कोंबडीचा उल्लेख नाही.
म्हंजे सामाजिक,आर्थिक, राजकिय, मान्सशास्त्रातल्या आशयाची वाटतील अशी विधानं करायची. पण हाताला काहिच लागलं नै पायजे. मजा वाटते ते वाचायला.
त्यांच्या लायनीवरचं हे मी लिहून पाहतोय --

.
.
स्त्रियांच्या कामाची अचूकता अधिक असते. पण पुरुष बुद्धीमान असतात. त्यामुळे संसारात संतुलन टिकून राहते. तृतीयपंथीयांकडे ह्या दोन्ही गुणांचा संगम झालेला दिसतो. पूर्वी माणसे उंच होती. अलिकडे माणसांची नखे लांब झाली असली तरी उंची कमी झालेली आहे. आसपास हिरवाई दिसली की माणसाला भूक लागते.
.
.
२०१४ नंतरचा तो काळ होता.मोदी दणक्यात जिंकले होते. भारतात उन्माद वाढत होता. लोकांची दांडगाईची खुमखुमी वाढतच होती. तशातच साक्षी मलिक सारख्या एका स्त्रीनं कुस्तीतच पदक पटकावणं त्या वातावरणाला शोभणारच होतं. स्त्रिया अशी मारामारी करु लागल्याची, खुनशी बनल्याची त्या उन्मादात कुणाला ना खेद ना खंत. उलट सगळे साजरे करण्यात मग्न झाले तिचं यश. आपण हिंसक मार्गाचा गौरव करतोय, हेही त्या बेभान झुंडिंच्या लक्षात आलं नाही. ऑलिम्पिकचे चाहते आणि हे 'भक्त' एकच होते.
.
.
उदारीकरणातून हळूहळू धनिकांकडे अधिक पैसा येउ लागला. हा पैसा शोषण करण्याच्या उद्देशातून वापरला जाउ लागला. सर्वत्र शोषणाचे राज्य वाढत चालले. शोषणाच्या पहिल्या बळी ठरल्या त्या महिला. त्यांच्या स्वातंत्र्यावर सर्वप्रथम बंधनं आली. पुढचा नंबर गरिबांचा होता. गरिब , शोषित-स्त्रिया हा अर्थात निवडणुकीवर प्रभाव टाकण्याइतपत महत्वाचा घटक नव्हता. कारण पैशांची सौदेबाजी ही शोषक धनिकांशीच होत होती. उदारीकरणामुळं अधिकाधिक स्त्रिया घरात कोंडल्या जाउ लागल्या होत्या. त्या अधिकाधिक परावलंबी, पितृसत्त्ताक पद्धतीला शरण गेलेल्या अशा बनल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाच-सहा वर्षांत काही नवीन उत्तरे मिळाली असतील तर टाका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

मार्ग आमुचा रोखू शकतो दाणा ना चारा
खुराड्याची वीतभर कारा
कुक्कुटतेचा क्लकक्लक घुमवू उपनगरात
लंघुनी हमरस्ता सारा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हांस मुद्दलातच कोंबडी रस्त्याच्या पलीकडे का गेली ? वा असल्या प्रश्नांत काडीचाही रस नाही. आमच्या मते असे प्रश्न विलायती शिक्षणाने मस्तके बिघडवलेल्या तरुणांच्या मनांत हल्ली वारंवार नी सर्रास निपजत आहेत हे निव्वळ अधोगतीचे निदर्शक आहे असे आम्ही मानतो. हे प्रश्न विचारणारे तरुण विद्वान आहेत.( यांची विद्वत्ता आम्हांस कबुल आहे ) मात्र त्यांनी आपल्या विद्येचा उपयोग या प्रकारच्या बिनडोक प्रश्नांच्या मागे कुलंग्या कुत्र्याप्रमाणे जाण्यास करु नये. संस्थळावर असले लेख टाकुन मग संचालक काही तुम्हांस उत्तर देण्यास सांगत नाही अर्थात तुम्ही उत्तर दिलास त्यात संचालकांचा दोष नाही, असे कित्येकांचे म्हणणे आहे; पण असल्या पोरकट सबबीत काही अर्थ नाही. डोळझांपणे घालुन बैलास रहाटाला जुंपल्यावर मी काहीं तुला रहाट ओढणास सांगत नाही अशी जर यजमानाच्यातर्फे कोणी वकिली करुं लागला तर तो आपणास जितका उपहासास्पद करुन घेइल तितकाच वरील कोटीक्रम करणारा मनुष्य अजागळ होय. "कोंबडीचे प्रश्न हे आमचे प्रश्नच नव्हेत " म्हणुन जेव्हा आम्ही यांच्या स्वरुपांचे आविष्करण केले होते तेव्हा कित्येकांची आमच्यावर गैरमर्जी झाली होती. पण आज ज्या गोष्टी घडुन येत आहेत त्यावरुन आम्ही केलेले भाकीतच खरें होते; असे आता कोणाच्याही प्रत्ययास आल्याखेरीज राहणार नाही. कोंबडीप्रश्नापुढे प्रतिभा खर्च करण्या ऐवजी जर येथील लेखनपटु गृहस्थांनी थोडीशी नीती ची उदाहरणे देऊन एखादा चरित्रग्रंथ लिहिल्यास राष्ट्राचे नक्कीच हित साधेल असे आम्हांस प्रांजळपणे वाटते. शिवाय कोंबड्यावर बोलायचेच म्हटले तर नेटीव्हांच्या कोंबड्या या विलायती कोंबड्यापेक्षा नेहमीच सरस आहेत रस्ता असो वा जठर त्या नेहमी सहजतेने ओलांडतात. आम्हांस नेटीव्ह कोंबड्याच्या भविष्याविषयी उमेद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरडफळ्यावर गविंनी वाङ्‌मयीन जॅमिंगचा उल्लेख केला, त्यात या धाग्याचीही गणना करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोंबडीचे डोके ठिकाणावर आहे काय्?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0