पुण्यात १६ एप्रिल २०१२ रोजी विठोजी होळकरांच्या २११ व्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम

विषय : विठोजीराजे होळकर यांची पुण्यात झालेली हत्या व त्यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली
प्रमुख वक्ते : संजय सोनवणी (इतिहास संशोधक)
अध्यक्ष : महेन्द्र गजेन्द्रगडकर (वरिष्ठ पत्रकार)
स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे - ३०
दिनांक : १६ एप्रिल २०१२, सोमवार
वेळ : संध्याकाळी ५.३० वाजता
आयोजकः महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठान, पुणे
=========================================================================

या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग युट्युब वर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
इच्छुकांनी अवश्य पहावे की या कार्यक्रमात नक्की कोणते विचार मांडण्यात आले होते

विठोजी होळकर स्मृतीदिनानिमित्त पत्रकार भवन, पुणे येथे झालेले वक्त्यांचे विचारमंथन

Part 1 : http://www.youtube.com/watch?v=bLcbm7UJVVM

Part 2 : http://www.youtube.com/watch?v=FN7U22Tzg0k

Part 3 : http://www.youtube.com/watch?v=Ktw9m_QKSJI

Part 4 : http://www.youtube.com/watch?v=rKzOfbUMZpU

Part 5 : http://www.youtube.com/watch?v=dlRYn9zhAGE

Part 6 : http://www.youtube.com/watch?v=HzJu0wV7h58
=========================================================================

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

विठोजी होळकर कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ,

उत्तम प्रश्न विचारलास.
विठोजी होळकर हे यशवंतराव होळकर यांचे ज्येष्ठ बंधू होते. शनिवारवाड्यासमोर त्यांना हत्तीच्या पायाखाली देऊन मारण्यात आले.
या दुव्यावर हा इतिहास वाचायला मिळेल. या ब्लॉगवरील लेखातील रंजितपणा सोडला तरी दुर्दैवाने इतिहासातली सत्य घटना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर दुवा वाचला. त्यावरील माहिती इतिहास म्हणता येणार नाही. फारच एकांगी, अपूरे तपशील आहेत. एखादे 'विवक्षित' उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेली माहिती आहे.
असो. माहितीबद्दल आभार
ब्लॉग वाचून या व्यक्तीच्या नावाने अचानक सभा बोलावण्यामागे एकूणच प्रकार काय व का असावा याचा अंदाज आला.

अश्या सभांना उत्तेजन देणे मी इष्ट समजत नसल्याने मी जाणार नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सदर दुवा वाचला. त्यावरील माहिती इतिहास म्हणता येणार नाही. फारच एकांगी, अपूरे तपशील आहेत. एखादे 'विवक्षित' उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेली माहिती आहे.अ
यावर सहमत आहे. पण घटना मात्र खरी आहे. म्हणूनच तुला म्हटले होते की रंजिततेकडे लक्ष देऊ नकोस Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>त्यावरील माहिती इतिहास म्हणता येणार नाही. फारच एकांगी, अपूरे तपशील आहेत. एखादे 'विवक्षित' उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेली माहिती आहे.<<

प्रस्तुत घटनेत दुसर्‍या बाजीरावाचा सहभाग होता. उत्तर पेशवाईचा हा काळ एकंदर मराठी साम्राज्याला लाजिरवाणाच होता. इथे आणि इथे त्याविषयी थोडी माहिती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहभाग नव्हता असे म्हणणे नाही. फक्त त्या दुव्यावरचा लेखनाचा 'उद्देश' इतिहास सांगणे हा वाटला नाही इतकेच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विठोजीस बाजीरावाने हत्तीच्या पायी देऊन मारले आणि त्याचे प्रेत शनिवारवाडयासमोर कुजत पडून दिले हा उद्वेगकारक इतिहास सत्य आहे आणि बाजीरावाची त्याबद्दल निंदाच केली पाहिजे.

पण 'स्मृतिदिन' साजरा केला जावा असे कोणते शतकृत्य विठोजीने केले आहे?

वस्तुस्थिति अशी आहे की मराठेशाहीच्या शेवटच्या दिवसात बाजीराव, विठोजी, यशवंतराव, दौलतराव शिंदे, सर्जेराव घाटगे हे एकाहून एक गणंग दौलतीच्या नेतेपदी असल्याने एल्फिन्स्टन, वेलस्ली, माल्कम अशा मुरब्बी आणि बारा गावचे पाणी प्यायलेल्यांच्या पुढे दौलतीचे दुसरे काही होणे शक्य नव्हते. 'उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे?'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मनातले नेमक्या शब्दात पकडले आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाजीराव, विठोजी, यशवंतराव, दौलतराव शिंदे, सर्जेराव घाटगे हे एकाहून एक गणंग

गणंगांच्या यादीत यशवंतराव होळकरांचे नाव आल्याचे पाहून आश्चर्य वाटले. केवळ पुणे लुटले हेच कारण असेल तर ते "गणंग" म्हणायला पुरेसे नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराजा यशवंतराव होळकरांनी पुणे ना जाळले ना लुटले...
-संजय सोनवणी

यशवंतरावांना लावण्यात आलेला एक असह्य कलंक म्हणजे त्यांनी पुणे संपुर्ण लुटले, जाळले व प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. यशवंतरावांनी ज्यांची घरे लुटली ती फक्त शिंदें-समर्थकांची व बाजीरावाच्या सल्लागारांची. एकच वाडा जाळला तोही म्हाळुंग्याला, पुण्यात नव्हे. हा वाडा दौलतरावाचा सरदार अंबुजी इंगळे याचा होता. याशिवाय यशवंतरावांनी अन्य कोनावर जुलुमजबरदस्ती केली, लुटालुट केली वा होळकरी दंगा म्हणतात तसा प्रकार केलेला नाही वा तशा स्वरुपाचा एकही पुरावा आस्थित्वात नाही. तरीही आजही अगणित लोकांच्या मनात त्यांची एक खलपुरुष म्हणुनच प्रतिमा रंगवली गेलेली आहे...हे एक अघटितच आहे, पण त्याबद्दल पुढे.

यशवंतराव मोठ्या पेचात सापडले होते. पेशव्याची गादी रिक्त झाली होती. फौजेचे तनखे थकु लागले होते. पुण्यातही स्मशानशांतता होती. वाणी-उदीम दुकाने उघडत नव्हते. बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. काहीतरी त्यांनाच करावे लागणार होते.
त्यांनी स्वता: व्यापा-यांना आपापले व्यवसाय सुरु करायला सांगितले. जेथे वाद होते तेथे भाव बांधुन देण्यातही पुढाकार घेतला. चिंचवदमद्धेही महाराजांनी जीवन सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. लोकांमद्धे भय होते ते आधी दुर करायला हवे होते. हळुहळु पुण्यातील लोकजीवन सुरळीत होवू लागले.
दरम्यान त्यांच्या मातोश्री, पत्नी व कन्या मुक्त केल्या गेल्या होत्याच. खंडेराव व त्याची माता मात्र अन्य ठिकाणी कैदेत असल्याने ती सुटका साधली नाही. पती-पत्नीची पुनर्भेट तब्बल ५ वर्षांनी झाली होती. भिमाबाई आता सहा वर्षांची झालेली होती. तिचे बालपणही पहायला न मिळालेला हा अभागी पिता. एवढा काळ हा सारा परिवार शिंदेंच्या कैदेत होता. सीतेला ज्या प्रकारे रावणाच्या कैदेत अनेक वर्ष काढावी लागली त्याचीच ही दुर्दैवी पुनराव्रुत्ती. या नीचपणाबद्दल मराठी इतिहासाने दौलतराव शिंद्यांचे वाभाडे काढल्याचे मी कधी कोठे वाचलेले नाही.

बाजीराव येत नाही हे स्पष्ट होताच यशवंतरावांनी मोरोबादादा व बाबा फडके यांच्या मार्फत अम्रुतरावाला निमंत्रित करुन त्याला पेशव्यांतर्फे कारभार करायला लावायचे त्यांनी ठरवले. . पुण्यातील बाजीरावाच्या काळात अडगळीत फेकल्या गेलेल्या काही जुन्या मुत्सद्द्यांचे पुनरुज्जीवन करण्यत आले. अम्रुतराव तेंव्हा जुन्नर येथे होता. त्याला ही संधीच होती. तो पुण्याला आला. १२ नोव्हेंबर १८०२ला त्याने कारभार हाती घेतला. पेशवा होण्याचे त्याचे जुने स्वप्न. पेशव्याचा प्रतिनिधी म्हणुन काम पहायलाही त्याची हरकत नव्हती...पण आता बाजीराव पुण्याला असा येत नाही हे स्पष्ट झाल्यावर त्याने यशवंतरावांशी करार केला. या करारानुसार यशवंतरावांनी अम्रुतरावाला खालीलप्रमाणे मदत करायची होती...
१. रायगडावर कैदेत असलेल्या सवाई माधवरावाच्या पत्नीला, यशोदाबाईला मुक्त करुन अम्रुतरावाचा मुलगा तिला दत्तक घ्यायला लावायचा आणि त्याच्यासाठी पेशवाईची वस्त्रे सातारकर छत्रपतींकडुन देववायची.
२. या बाल-पेशव्याचा प्रतिनिधी म्हणुन अम्रुतरावने दौलतीचा कारभार पहायचा.
३. अम्रुतरावाला यशवंतरावांनी पुर्ण संरक्षण द्यायचे व शिंद्यांचा बंदोबस्त करायचा.
या बदल्यात अम्रुतरावाने यशवंतरावांना युद्धखर्च व हा वरकड खर्च यासाठी एक कोटी रुपये द्यायचे.

परंतु यशोदाबाईंना रायगडावरुन सोडवुन आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.बाजीराव तेंव्हा रायगडावरुन निसटुन सुवर्णगडावर जावून पोहोचला होता. यशवंतरावांनी मग मानेंना साता-याला पाठवुन खुद्द अम्रुतरावासाठी पेशवाईची वस्त्रे आणुन दिली व आपला शब्द पाळला. पण काही ना काही कारणाने (बव्हंशी कारणे त्याच्या सल्लागारांनीच निर्माण केली होती.) अम्रुतरावाची ती वस्त्रे स्वीकारण्याची हिम्मत झाली नाही. अम्रुतरावानेही पैसे देण्यासाठी चालढकल सुरु केल्यावर मात्र यशवंतरावांनी त्याच्यावर दबाव वाढवला. शहरातील श्रीमंतांवर पट्टी बसवुन पंचविस लाख उभे करण्याचा निर्णय अम्रुतरावाने व त्याच्या कारभा-यांनी घेतला. वसुलीचे काम हरीपंत भावेवर सोपवण्यात आले. हा अम्रुतरावाचा सरदार होता. त्याला मदत म्हणुन काही यशवंतरावांचेही लोक द्यावेत अशी अम्रुतरावाने विनंती केल्यावरुन यशवंतरावांनी सरदार नागो जीवाजी, हरनाथसिंग व शेखजी हे तीन सरदार दिले.
म्हणजेच अम्रुतरावाच्या आदेशानेच पुण्यात पट्टी वसुली सुरु झाली होती. या वसुलीचे नेत्रुत्व त्याचाच सरदार हरीपंत भावे हा करत होता. मी माझे निष्कर्ष मांडण्याआधी, कितीही पुर्वग्रहदुषित असली तरी, अन्य इतिहासकारांनी याबाबत काय लिहिले आहे ते त्यांच्याच शब्दात मांडतो...

१. रियासतकार श्री. गो.स. सरदेसाई: (मराठी रियासत, खंड ८) ..".गांवांत एकच हाक झाली. कोणी तांब्या ठेवून पैसा देत नाही. पैसा न मिळाल्यास पठाणांचे हवाली करितात. प्राणांशी गांठ आहे, ब्राह्मण म्हणजे तुच्छ, श्रीहरीचा कोप प्रजेवर झाला. होळकराचे लोकांनी तमाम शहर लुटून घरोघर खणत्या लावून द्रव्य, भांडे, सोने, रूपे, जवाहीर, कापड यांची लूट केली. तोफखाना लुटला. सोन्याची अंबारी अमृतरावांनी होळकरास दिली. पुढे राजकारण सिद्ध होत नाही असे अमृतरावास दिसों लागले, तेव्हा त्यांनीही रात्रीस लोक व कारकून पाठवून लोकांच्या घरांत शिरून घरे खणून चीजवस्त जे सांपडेल ते आपल्या डेऱ्यास नेत गेले. पुण्यांत कोणी गृहस्थ नामांकित पाहून त्याजवर पठाणांस वरात देऊन पाठवावे, पठाणांनी त्यांस धरून मारहाण मनस्वी करावी. वीरेश्वरभट कर्वे व जिवाजीपंत नेने मारतां मारतां मेले. याप्रमाणे शहर बेजार झाले. पौषापासून चैत्र वद्य १४ पावतो चार महिने अमृतरावाचे दरवडे पुण्यास चालू होते. हरि भाव्याने लोकांचे सामान लुटून ब्राह्मणभोजने घातली. चिंचवडास बहुत उपद्रव लागला. ब्राह्मण विष खाऊन मरतात. दर असामी एक तोळा अफू पदरी बांधून आले होते. होळकरांनी आज्ञा वंदन करून तेच बैठकेस मना चिठ्ठी देऊन चिंचवडास हुजरे पाठवले.'

रियासतकारांचे हे विवेचन परस्परविरुद्ध आहे हे ठळक शब्दांतील विधाने वाचताच लक्षात येईल. पण सर्वप्रथम म्हनजे पुर्वग्रहदुषित असुनही रियासतकार यशवंतरावांनी पुणे जाळले असे कोठेही म्हणत नाहीत.
दुसरे असे कि "होळकराचे लोकांनी तमाम शहर लुटून घरोघर खणत्या लावून द्रव्य, भांडे, सोने, रूपे, जवाहीर, कापड यांची लूट केली. तोफखाना लुटला. सोन्याची अंबारी अमृतरावांनी होळकरास दिली..." हे विधान पुरेपुर विसंगतीने भरलेले आहे. जर होळकरांचेच लोक लुट करत होते तर लुटुन आनलेली सोन्याची पालखी होळकरांनाच देनारा अम्रुतराव कोण? हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. होळकरांच्याच लोकांनी लुट केली तर ती होळकरांकडेच जाणार हे उघड आहे. म्हणजेच काय वाट्टेल ते करुन यशवंतरावांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. लुट करणारे अम्रुतरावाचेच लोक होते हेही येथे ठळक होते.
तिसरे विधान अजुन महत्वाचे आहे. "पौषापासून चैत्र वद्य १४ पावतो चार महिने अमृतरावाचे दरवडे पुण्यास चालू होते. हरि भाव्याने लोकांचे सामान लुटून ब्राह्मणभोजने घातली..." या वाक्क्यात मात्र चार महिने सतत अम्रुतरावाचे दरोडे चालु होते असे स्पष्ट म्हटले आहे. वाक्य स्वयंस्पष्ट आहे. त्याचा सरदार हरी भावे काय लायकीचा होता हेही येथे स्पष्ट होते. लोकांचे सामान लुटुन ब्राह्मनभोजने घालणारा हा नालायक. यशवंतराव पुण्यात १३ मार्च १८०३ पर्यंत होते. पौष महिना साधारणपणे जानेवारीत येतो. अम्रुतराव पुण्यात १९ एप्रिलपर्यंत होता. येथे हा चार महिन्याचा कालावधी जुळतो. याचा अर्थ असा कि यशवंतराव जोवर पुण्यात होते तोवर ज्या वसुल्या केल्या जात होत्या त्या फक्त श्रीमंत नागरिकांकडुन आणि तोही फारसा जुलुम जबरदस्ती न करता. पण यशवंतराव निघुन गेल्यानंतर आणि बाजीराव इंग्रजी फौजेसह पुण्याला यायला निघाला आहे हे कळताच अम्रुतरावाने पुणेकरांवर मिळेल तेवढे धन काढुन घेण्यासाठी अत्याचार केले व त्याचे पाप मात्र यशवंतरावांच्या माथी थोपले असेच स्पष्ट्पणे म्हणावे लागते.
रियासतकारांचे शेवटचे वाक्य हे चिंचवडच्या देवस्थानाच्या ब्राह्मणांबाबत आहे. अम्रुतरावाने त्यांच्यावरही वसुलीचा रोखा काढला होता व ते वसुलीसाठी नादले जात होते. यशवंतरावाणी स्वत: तो रोखा रद्द करुन त्यांची परत पाठवणी केली आहे.

आता आपण दुस-या पुराव्याकडे वळुयात.
२. मराठ्यांचा इतिहास खंड - ३ ( संपादक :- अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खरे )
प्रकरण ८ ) ले. सुमन वैद्य
"...१८०२ पर्यंत होळकराने शिंद्यांचे सामर्थ जवळपास संपुष्टात आणले. ते पाहून अमृतरावाने पेशव्याच्या विरोधात चाललेल्या कारस्थानांना गती दिली. यासाठी मोरोबा फडणीस व बाबा फडकेची त्यास मदत होती. यशवंतरावाने दक्षिणेत येऊन पेशव्यास पाठिंबा देणाऱ्यांचे पारिपत्य करावे, खुद्द पेशव्यास पकडून शासनाची सर्व सूत्रे अमृतरावाकडे सोपवावीत. शिंद्यांचा पराभव करून दक्षिणच्या राजकारणातून त्याचे समूळ उच्चाटन करावे. या बदल्यात अमृतरावाने होळकरास एक कोटी रूपे रोख द्यावेत, मल्हारराव होळकराचा* मुलगा खंडेराव यास होळकर घराण्याचा प्रमुख व यशवंतरावास त्याचा प्रतिनिधी म्हणून मान्यता द्यावी असे ठरले. ( * हा मल्हारराव तुकोजी होळकराचा मुलगा )
बाजीराव पुणे सोडून गेल्यावर यशोदाबाईस पुण्याला आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यशोदाबाईच्या मांडीवर अमृतरावाचा मुलगा विनायकबापू यास दत्तक देऊन त्यास पेशवा बनविण्याचा त्यांचा विचार होता. यशोदाबाई रायगडावर कैदेत होती. तिला सोडवून आणायला फौज पाठवली पण याचवेळी बाणकोटच्या खाडीत ब्रिटीश आरमार आल्याने होळकराची फौज मागे आली.
जानेवारी १८०३ मध्ये दौलतराव शिंदे दक्षिणेत येत असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे अमृतराव गडबडून गेला. त्याशिवाय होळकर व अमृतराव यांच्यात तंटा निर्माण झाला. अमृतरावाने बोलल्याप्रमाणे १ कोट रुपये होळकरास दिले नाहीत. तेव्हा त्याने ते पुण्यातून सक्तीने वसूल केले. त्या लुटालुटीत अमृतरावाचा देखील सहभाग होता. मार्च १८०३ मध्ये होळकराने पुणे सोडले. जाताना औरंगाबाद, बीड, पैठण इ. तालुक्यांत त्याने मनसोक्त लुटालूट केली. ब्रिटीश फौज पुण्यानजीक आल्यावर १९ एप्रिल रोजी अमृतराव पुणे सोडून गेला. पुण्यात त्याने जी काही लुटालूट केली त्या लुटीतील संपत्ती हत्ती, उंट, गाड्या यांवर लादून नेली. वाटेत चाकण, राहुरी, संगमनेर व पंचवटीसह नाशिक हा सर्व मुलुख त्याने लुटून फस्त केला."

रियासतकार व सुमन वैद्य यांच्या माहितीत फरक आहे हे उघड आहे. अम्रुतरावाने यशवंतरावांना १८०२ मद्धेच ते उत्तरेत असतांनाच संपर्क साधुन एक कोटीच्या बदल्यात त्यांनी दक्षीणेत येवून शिंद्यांचा बंदोबस्त करावा व खुद्द पेशव्यास पकडुन सर्व सुत्रे अम्रुतरावाकडे सोपवावीत हे विधानच मुळात अनैतिहासिक आहे हे आतापर्यंत मी यशवंतरावांचा जो इतिहास मांडला आहे त्यावरुन स्पष्ट होते. बाजीरावापेक्षा अम्रुतराव बरा असे यशवंतरावांचे मत होते हे खरे असले तरी बाजीरावाला हटवुन/अटक करुन अम्रुतरावाला पेशवा बनवायचे असते तर पुण्याच्या लढाईअगोदरच यशवंतरावांनी अम्रुतरावाला आपल्याकडे बोलावून घेतले असते व बाजीरावाला पाठलाग करुन, पकडुन अम्रुतरावाला पेशवा बनवले असते. तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे ही हकीगत निराधार वा ऐकीव गप्प आहे असे म्हणता येते. बाजीराव परत येत नाही व दौलतीला कारभारी नाही हे स्पष्ट झाल्यानंतरच अम्रुतरावाला पुण्याला बोलावुन घेण्यात आलेले आहे.
अम्रुतराव पुणे सोडुन गेला तेंव्हा त्याने जी लुट हत्ती...उंट...गाड्यांवर लादुन नेली ती पहाता पुण्याचाच नव्हे तर नशिक, पंचवटी, राहुरी, चाकणचाही खरा दरवडेखोर कोण हे लगेच लक्षात येते. येथे अम्रुतरावाचे पाप यशवंतरावांवर ढकलण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. म्हणजेच जीही काही लुट झाली ती अम्रुतरावाने १३ मार्च ते १९ एप्रिल १८०३ च्या दर्म्यान केलेली आहे, तत्पुर्वी जी काही वसुली झाली त्यातील काही हिस्सा यशवंतरावांना खर्चापोटी अम्रुतरावाने दिलेला दिसतो. अम्रुतरावाने शेवटपर्यंत यशवंतरावांना एक कॊटी रुपये दिले नाही हेही वास्तव आहे. खरे तर या मोहिमेत यशवंतरावांचे आर्थिक नुकसानच झालेले आहे. त्यामुळे परततांना त्यांनी औरंगाबाद, बीड ई. भागातुन खंडण्या वसुल केल्या असतील तर त्याचा दोष कोणाचा आहे? येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे कि तत्कालीन राजकीय स्थितीत युद्धखर्च हा जिंकलेल्या जहागिरदार ते तेथील श्रीमंत नागरिकांकडुनच वसुल केला जात असे. तो सहजी मिळाला नाही तरच लुटालुट केली जात असे. त्यात काहीही वावगे मानले जात नसे.
अम्रुतरावाचे वैगुण्य कमी करण्यासाठी होळकरांचाच खोटा पण मोठा बागुलबुवा उभा करण्याचा प्रयत्न तत्कालीन कारभारी व लेखकांनी केलेला दिसतो.
३. आता आपण काही अप्रत्यक्ष पुराव्यांकडे वळुयात. बाहेरगावच्या सरदारांना, सावकारांना पुण्यात जे जे काही घडते त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पुण्यात खास बातमीदार (अखबारनविस) ठेवलेले असत. अशाच एका वेंकट बल्लाळ या बातमीदाराने हरि विट्ठल नावाच्या आपल्या मालकास पुण्यातुन पत्र गेले होते. त्या पत्रात "पदरचे सरदार होळकर व शिंदे यांची लढाई पुणेंयावर होवून महाराज वसईस गेले..." एवढाच उल्लेख आहे. होळकरी दंगा वा लुटालुटीचा कसलाही उल्लेख या पत्रात नाही. पत्रलेखक पुण्यातीलच असल्याने त्याने असे काही घडले असते तर नक्कीच उल्लेख केला असता.
जागतिक किर्तीचे इतिहासकार सर जदुनाथ सरकार आपल्या Fall Of The Mughal Empire Vol.5 (1789-1803) या प्रसिद्ध ग्रंथात होळकरांनी उज्जैन, कोटा, मंदसोर, भानसोडा...अशा असंख्य ठिकाणी यशवंतरावांनी खंडण्या वसुल केल्याचे ठलकपणे नमुद केले आहे. काही लुटींबाबतही लिहिले आहे. पण पुण्यात मात्र कसल्याही प्रकारची लुट झाली नसुन फक्त ठराविक श्रीमंतांवर पट्टी लावुन जे देत नव्हते त्यांच्याकडुनच सक्तीने वसुली केली असे नमुद करतात. जर एवढा गहजब ज्या लुटी व जाळपोळींबाबत केला जातो तसे असते तर त्यांनी त्याचाही नक्कीच उल्लेख केला असता.
इंग्रज हे यशवंतरावांचे हाडवैरी होते हे जगजाहीर आहे. पण ब्यरी क्लोज वा त्यानंतर पुण्याचा रेसिडेंट बनलेला एल्फिस्टनसुद्धा जाळपोळीबाबत काहीएक नमुद करत नाही.
१-१०-१९४३चा शाहीर खाडिलकरांच्या पोवाड्यात यशवंतरावांचे बव्हंशी जीवन चित्रीत केलेले आहे पण त्यातही पुण्याच्या जाळपोळी वा लुटालुटीचा उल्लेख नाही.
"झुंज" या यशवंतरावांवरील कादंबरीच्या प्रस्तावनेत (येळकोट) लेखक ना. सं. इनामदार यांनीही होळकरांनी पुणे जाळले, पुर्णपणे लुटले या अफवांना कसलाही आधार नाही असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे.
काही इतिहासकार व यशवंतराव समर्थक "कदाचित इंग्रजांसोबत बाजीराव येत आहे , त्याला येथे कसलीही रसद मिळु नये म्हणुन यशवंतरावांनी "दग्दभु" धोरण स्वीकारले असावे व पुणे जाळले-लुटले असावे असे लंगडे समर्थन करतांना दिसतात. पण मुळात त्याची गरज नाही कारण ते खरे नाही. बाजीराव वसईच्या तहान्वये इंग्रजांचे सार्वभौमत्व मान्य करुन त्यांच्यासह पुण्यात आला व १३ मे १८०३ रोजी पुन्हा गादीवर बसला. दग्दभु धोरनांतर्गत जर खरेच जाळपोळ झाली असती, पुणे पुर्ण लुटुन फस्त झाले असते तर बाजीराव कसा गादीवर बसु शकला असता? शहरात नागरिक तरी नकोत काय? असले तर ते काय जळक्या वाड्या-घरांत इतके दिवस राहिले असते काय? आणि ज्या इंग्रजांनी बाजीरावाला आपला अंकित केले त्यांनी असला काही प्रकार झालाच असता तर त्याच्या तपशीलवार नोंदी केल्या असत्या. कारण बाजीराव इंग्रजांसह पुण्यात येण्याच्या आदल्याच दिवशी अम्रुतरावाने त्याच्याबरोबरीलही कथित अवाढव्य लुटीसह पुणे सोडले होते.
थोडक्यात जे स्पष्ट दिसते ते असे...पुणे जाळले गेले नाही. पुण्यातील श्रीमंतांकडुन काही प्रमानात (जेमतेम पाच ते दहा लाख रुपये) वसुली केली गेली. अम्रुतरावाकडुन , म्हनजे पुण्यातुन, पुर्ण पैसे मिळणे अशक्य आहे हे दिसताच यशवंतराव पुणे सोडुन ससैन्य-सपरिवार निघाले. यशवंतराव निघुन गेल्यानंतर आणि इंग्रज बाजीरावासह येत आहेत हे कळाल्यानंतर अम्रुतरावाने मात्र सरळसोट लुटच केली. त्याला मात्र लुटच म्हणावे लागते कारण आता त्याला पट्टी वसुल करण्याचा कसलाही अधिकारच उरलेला नव्हता. तो आता या नव्या राजकीय घडामोडीमुळे पुण्यात चक्क उपटसुंभ ठरला होता. त्याला तसा स्वत:साठी लोकांकडुन एक पै सुद्धा जमा करण्याचा अधिकार नव्हता. तरीही त्याने संधीसाधु बनत लुट केलेली दिसते. सुमन वैद्य यांचे म्हनणे अतिरंजित असले तरी अम्रुतरावाने ब-यापैकी संपत्ती पुण्यातुन गोळा करुन नेलेली दिसते.
अशा स्थितीत अम्रुतरावाबद्दलही आजवर कोणी बोलतांना दिसत नाही. त्याला कोणी सजा देण्याची मागणी सोडा साधा गुन्हेगारही ठरवल्याचे दिसत नाही. यशवंतरावांनी लाखोंचे सैन्य आणुन शिंदेंच्घा फडशा पाडला होता. त्यांनी युद्धखर्च मागणे स्वाभाविक होते. तो तर दिला नाहीच, आणि ज्याचे कार्यकर्तुत्व फक्त पेशव्याचा भाउ आणि पेशवा न आल्यास पेशवा व्हायला उताविळ उमेदवार एवढेच, त्याने पुणे लुटावे, स्वत:चे खिसे भरावेत आणि त्याच्याकडे कोणी बोटही दाखवु नये?
बदनाम करावे ते यशवंतरावांना?
कारणाखेरीज काही होत नाही. येथे कारण आहे आणि ते आपल्या जातीयवादात दडलेले आहे. या जातीयवादी किडीने आपलाच खरा इतिहास पोखरुन टाकला आहे. खरे महानायक बदनाम करुन विस्म्रुतीच्या कालांधारात फेकण्याचे अधम कार्य या वावडीबहाद्द्रांनी केले आहे. इतिहासकारही दुर्दैवाने त्याला अपवाद नाहीत ही खंत आहेच.
यशवंतरावांची पुणे स्वारी त्यांना त्यांचा कबिला मुक्त करता आला एवढ्यापुरतीच यशस्वी झाली. खंडेरावाला सुभेदारीची वस्त्रे द्यायला पेशवा नव्हताच. त्यामुळे तेही कार्य अपुरेच राहिले. शिंदे तर अजुनही उत्तरेतच ठाण मांडुन बसले होते...आता कसला सुलह? पेशवा सरळ इंग्रजांकडे शरणागत होत पळाला होता. पेशवाई वसईच्या कराराद्वारे गहाण टाकुन शिवरायांचे स्वराज्य बुडवले होते. यशवंतरावांच्या स्वारीमुळेच पेशव्याला इंग्रजांचा आश्रय घ्यावा लागला हा आरोपही धादांत असत्य आहे कारण इंग्रजांना मिळण्याचे बाजीरावाचे बेत १८०० सालापासुन चालुच होते व युद्धाआधी १०-१२ दिवस आधीही तो इंग्रजांच्याच गुप्तपणे संपर्कात राहुन कराराचे मसुदे बनवायच्या मागे होता हे आपण आधी पाहिलेच आहे. यशवंतराव शेवटपर्यंत त्याने पुण्यात यावे व फैसला करावा यासाठी मन वळवायचा प्रयत्न करत होते....पण तरीही बाजीरावाच्या या निंद्य पापाचे खापरही, अगदी सर जदुनाथ सरकारही, यशवंतरावांवर फोडतात याला काय म्हणावे?
ज्यु धर्मात पापी माणसे एक मेंढा विकत घेवुन त्याच्या डोक्यावर आपली पापे समंत्रक टाकत आणि त्याचा बळी देत असत. असे केले म्हणजे तो माणुस पापमुक्त झाला असे समजले जाई. मला हे सर्व लिहित असतांना वाटतेय कि तत्कालीन समाजाने यशवंतरावांवर आपली सारीच पातके ढकलण्याचाच निर्धार तर केला नव्हता ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अखेरचा सार्वभौम राजा

-संजय सोनवणी

संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता यशवंतराव होळकर यांची दोनशेवी पुण्यतिथी येत्या २८ ऑक्टोबरला आहे. त्या निमित्ताने यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध...

यशवंतराव होळकरांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.
यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटनींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी िशदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण िशद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांना स्वत:ला इंदोरी गादीची हाव कधीच नव्हती, हे त्यांच्या सर्व कृत्यांवरून सिद्ध होते. आणि हे सर्व प्रांत त्यांनी जिंकलेले होते. एका अर्थाने त्यांनी संपूर्णपणे नव्याने राज्याची पायाभरणी केली होती. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.
दौलतराव िशद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागून आपत्ती कोसळवल्या. दुसऱ्या मल्हाररावांचा खून केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वणवण भटकावे लागले. रघोजी भोसल्यांनीही विश्वासघात केला. त्या क्षणापासून यशवंतरावांचे जीवन पूर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत: आपला मार्ग निर्माण केला, स्वत:च स्वत:चे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरू ठेवली.

अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे की यशवंतरावांनी युद्धात शत्रूच्या भीषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटूपुटूची युद्धे करून शत्रूला सन्मानपूर्वक जिवंत घरी धाडण्यासाठी?

पेशव्यांकडे व दौलतरावांकडे त्यांच्या सतत त्याच मागण्या होत्या.. खंडेरावाला व होळकरी परिवाराला मुक्त करा, होळकरी प्रांतांवरले जप्तीचे हुकूम मागे घ्या, दौलतरावांशी समेट करून द्या. खरे तर तोवर त्यांची स्वत:चीच शक्ती एवढी वाढली होती की पेशव्यांवर आक्रमण करून पेशवाई बुडवून ते आपल्याला हवे ते साध्य करू शकत होते. पण त्यांनी पेशव्यांच्या मसनरीचा, त्यांच्या सर्वोच्च अधिकारांचा नेहमीच आदर ठेवला. पेशव्यांनी त्यांचा थोरला भाऊ विठोजीरावाला अत्यंत क्रूरतेने ठार मारले. शत्रूलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापाच्या भरात आततायी कृत्य करणे त्यांनी टाळले. तत्पूर्वी िशद्यांनी मल्हारराव (दुसरा) या सावत्रभावाचीही हत्या केली होती. पेशवे नव्हेत तर िशदे हेच आपले शत्रू आहेत, एवढीच खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत: ऐन जंगेत उतरून जो पराक्रम गाजवला त्याचे गुणगान त्यांचा कट्टर शत्रू मेजर माल्कमही करतो. खरे तर पेशव्यांनी यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दूरदृष्टी दाखवली असती, तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते, हे यशवंतरावांनी एकटय़ाच्या जिवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरून सहज स्पष्ट होते.
त्यांनी पुणे जाळले-लुटले हा धादांत खोटा आरोप करून पुणेकर सनातन्यांनी त्यांना महाराष्ट्रात पुरते बदनाम करून टाकले. अगा जे घडलेच नाही त्याच्या खोटय़ा रसभरीत कहाण्या बनवल्या गेल्या. पेशवा पळून गेला. त्याला परत आणायचा यशवंतरावांनी पराकोटीचा आटापिटा केला.. पण पेशवा पेशवाई इंग्रजांना विकून बसला. त्याचेही खापर जदुनाथ सरकार यशवंतरावांवरच फोडतात. एवढे होऊनही यशवंतरावांनी कोठेही पेशव्यांबद्दल कटू उद्गार काढलेले नाहीत. ही बाब यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळाच प्रकाश टाकते. पण पुणेकरांनी त्यांची गणना ‘प्रात:काळी ज्यांची नावे घेऊ नयेत’ अशा त्रयीत करून टाकली. बंडवाला होलकर.. होळकरी दंगा असे शब्दप्रयोग वापरले. लाखावरच्या सन्याचा अधिपती, स्वतंत्र सार्वभौम राजाला त्यांनी बंडखोर-दंगेखोर ठरवले. मराठीत यशवंतरावांवर फारसे का लिहिले गेले नाही, जेही लिहिले गेले ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्यांची बदनामी करणारेच होते यात शंका नाही.
वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. िशदेंशी परंपरागत हाडवैर असूनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असूनही त्यांनी िशदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणले. िशदेंनी काय केले, तर होळकरांच्याच नाशाच्या योजना आखल्या. जर नर्मदेच्या तीरी हे िशदे व भोसले मनात कपट न ठेवता होळकरांची साथ देत तिघे इंग्रजांविरुद्ध र्सवकष लढा देते तर? यशवंतराव दिल्लीवर चालून गेले तेव्हाच भोसले यशवंतरावांच्या सूचनेनुसार खरेच कलकत्त्यावर चालून जाते तर? किंवा आपापल्या बळावर इंग्रजांशी सुनियोजित लढा देते तर? पण तसे झाले नाही. यशवंतरावांतील धगधगते राष्ट्रप्रेम आणि इंग्रजांचा खरा धोका त्यांना समजलाच नाही. त्याची परिणती त्यांच्याच अवमानास्पद पराभव व मांडलिकत्वाच्या तहांत झाली.
यशवंतरावांच्या दूरदृष्टीला दाद देत असता या करंटय़ा सरदारांच्या आत्मघातकी कृत्यांबाबत कोणालाही रोष वाटणे स्वाभाविक आहे.

यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे.

यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मोन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत तब्बल २५० मल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सन्य ठार झाले..
यामुळेच अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे की यशवंतरावांनी युद्धात शत्रूच्या भीषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटूपुटूची युद्धे करून शत्रूला सन्मानपूर्वक जिवंत घरी धाडण्यासाठी? यशवंतरावांचे युद्ध धोरण शक्यतो आक्रमकच असे. ते तसेच असले तरच विजय मिळतात. कर्नल फोसेटवर त्यांनी इशाऱ्याची लढाई केली त्यातही त्यांनी त्याच्या दोन पलटणी कापून काढल्या. त्यामुळे इंग्रज वचकला. कधी आक्रमक व्हायचे, कधी शत्रूला सावकाश जेरीस आणत मग संपवायचे, कोठे युद्ध टाळायचे याचे त्यांचे स्वत:चे आडाखे होते आणि ते बव्हंशी यशस्वी झालेले आहेत. यशवंतरावांच्या या आक्रमकतेचा व कथित क्रौर्याचा फटका सामान्य माणसाला बसल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळेच आजही उत्तर भारतात यशवंतरावांचे पवाडे गायले जातात.
‘िहदवाणा हलको हुवा
तुरका रहयो न तत
अग्र अंगरेजा उछल कियौ
जोखाकियौ जसवंत..’
(िहदुस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. िहदू समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पूर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खूश झाले आहेत.) असे कवी चन सांदुने यशवंतरावांच्या मृत्यूनंतर लिहिले, यावरून उत्तर भारतात या पहिल्या स्वातंत्र्ययोद्धय़ाचा केवढा सन्मान आहे, याची मराठी वाचकांना कल्पना यावी.
खरे तर इंग्रजी सन्य हे त्यांच्या सन्यापेक्षा खूप प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. भारतातच काय फ्रान्समध्ये नेपोलियनलाही धूळ चारणारे हे इंग्रजी सन्य. त्यात इंग्रजांनी यशवंतरावांवर कोण सोडला तर जनरल जेरार्ड लेक. अत्यंत अनुभवी आणि कडवा सेनानी. त्याला यशवंतरावांनी भरतपूरच्या युद्धात धूळ चारली. त्याचा पराभव हा इंग्रजांच्या जिव्हारी लागणारा होता. जनरल स्मिथ, कर्नल मोन्सन, मरे, फोसेटसारख्या दिग्गजांचा पराभवही यशवंतरावांनी लीलया केला. याचे कारण म्हणजे यशवंतरावही आधुनिकतेचे भोक्ते होते. इंग्रजांएवढी नसली तरी त्यांच्या सन्याला त्यांनी पाश्चात्य शिस्त लावली होती. पेंढाऱ्यांसारख्या तशा बेशिस्त आणि बेबंद सन्यालाही त्यांनी आपल्या कडव्या शिस्तीच्या जोरावर कह्य़ात ठेवले होते. उज्जन व पुण्यावरील मोठय़ा विजयानंतरही त्यांनी पेंढाऱ्यांना शहरे लुटू दिली नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना हात-पाय तोडायच्या शिक्षा दिल्या. इंग्रजांनीही त्यांच्या या कठोर शिस्तप्रियतेचे कौतुक केले आहे. याउलट अन्य सरदारांच्या सन्यातील पेंढाऱ्यांचे वर्तन होते. खुद्द दौलतरावांच्या सन्यातील पेंढाऱ्यांनी पुणे, पुण्याचा परिसर ते पेशव्यांच्या अखत्यारीतील महाराष्ट्र किती निर्दयतेने लुटला याची अंगावर शहारा आणणारी वर्णने माल्कमनेच केलेली आहेत. पेंढारी त्यासाठीच कुप्रसिद्ध होते. पण यशवंतरावांनी त्यांच्या या वृत्तीवर कठोरपणे लगाम घालत त्यांच्या पराक्रमी प्रवृत्तींचा पुरेपूर उपयोग करून घेतला, यातच त्यांच्या सन्य व्यवस्थापनक्षमतेची चुणूक दिसते.

अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही.

इंग्रजांनी यशवंतरावांना सतत लुटारू व दरवडेखोर-बंडखोर असे उल्लेखून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती इंग्रजांची जुनीच रीत आहे. शिवरायांनाही ते लुटारूच म्हणत असत. स्वाभाविक आहे. शत्रूची बदनामी करण्याची संधी कोणी सोडत नाही. पण वास्तव हे आहे की यशवंतरावांनी शत्रूकडून रीतसर खंडण्या वसूल केल्या. ज्यांनी नकार दिला त्यांच्याच विभाग-महालांची लूट केली. पण असे करत असताना त्यांनी हात लावला तो फक्त श्रीमंतांना. सामान्यांना नाही अन्यथा उत्तर भारतात त्यांचा जनमानसात सन्मान राहिला नसता. भवानी शंकर खत्रीने त्यांच्याशी गद्दारी केली नसती तर त्याच्या हवेलीला आजही ‘निमकहराम की हवेली’ असे म्हटले नसते. सन्य पोटावर चालते आणि त्याचा खर्च हरलेल्यांकडून वसूल करण्याची जुनी रीत आहे. अगदी आजही ती चालू आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जपान ते जर्मनीवर ज्या जबरी खंडण्या लादल्या तो इतिहास तर अगदी अलीकडचाच आहे.
शत्रूला बदनामच करायचे झाले की कोणतेही कारण पुरते याचे हा आरोप म्हणजे एक नमुना आहे, यापलीकडे त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.
तत्कालीन िहदवी राज्यकर्त्यांमध्ये आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. १८५७चे बंडही जे झाले ते स्वत:ची संस्थाने सुरक्षित ठेवण्याकरता. राष्ट्रासाठी नाही. दुसऱ्या बाजीरावाला फक्त आपल्या गादीची पडली होती. निजाम, टिपु, बडोद्याचे गायकवाड, उत्तरेतील शिख महाराजे, नबाब, रजपूत राजे हे सर्वच आपापल्या संस्थानांपुरते पाहात होते आणि त्यामुळेच ते इंग्रजांचे मांडलिक/अंकितही बनत गेले. पण यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते.. तर संपूर्ण देश होता. त्यासाठी ते सर्व राजेरजवाडय़ांना, िशदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..‘पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.’ पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता..’ स्वराज्याची आठवण करून देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात.
एक राष्ट्र, परकियांची हकालपट्टा व एतद्देशियांचा अंमल हेच त्यांच्या संघर्षांमागील खरे आणि एकमेव कारण आहे. आणि १८०३ला त्यांनी सुरू केलेला हा संघर्ष मुळात स्वत:साठी नव्हताच, कारण त्यांचे स्वत:चे राज्य सुरक्षित होतेच. त्यांनी उत्तरेत १८०३ पासून ज्या मोहिमा केल्या त्या सर्वस्वी अन्य राजसत्तांना जागे करत इंग्रजांविरुद्ध बळ एकवटवण्यासाठी. त्यांनी ज्याही १८०३ नंतर लढाया केल्या त्या सर्वच्या सर्व इंग्रजांविरुद्धच्या आहेत. एतद्देशियांविरुद्ध एकही नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व लढायांत-युद्धांत ते अजिंक्य राहिले आहेत हेही उल्लेखनीय आहे.
माल्कम म्हणतो ते खरेच आहे. यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे. खरे तर नेपोलियनच यशवंतरावांपासून तर शिकला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण यशवंतराव आधी झाले. नेपोलियन पाठोपाठ. वाटर्लूचे युद्ध १८१५ मध्ये झाले. आणि भारतात अनेक फ्रेंच तेव्हा तत्कालीन राजकीय व सामरिक घटनांची नोंद घेत होते व त्या आपल्या मायदेशी कळवत होते. त्यातून नेपोलियन काही शिकलाच नसेल असे म्हणता येत नाही. या युद्धात भरतपूरच्या युद्धातील काही सेनानी नंतर सामील झाले होते. तेही म्हणतात भरतपूर वाटर्लूपेक्षा अवघड होते. हीच यशवंतरावांना जागतिक योद्धय़ांनी दिलेली सलामी आहे.
यशवंतराव िहदू धर्माचे अभिमानी जरी असले तरी त्यांनी अन्यधर्मीयांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. अमिरखानाला तर ते सगा भाई मानत असत. अक्षरश: हजारोंचे मुस्लिम सन्य त्यांच्या पदरी होते. फ्रेंच-इंग्रज असे ख्रिस्ती सेनानी व सनिकही त्यांच्या पदरी होते. त्यांच्या सन्यात भिल्लांसह सर्व जातींचे लोक होते. दरबारात ब्राह्मण कारभारी होते. स्त्रियांबाबत त्यांची भूमिका उदार होती. आपली कन्या भीमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजे-रजवाडय़ांच्या स्त्रिया या जनान्यात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबाईंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते. त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहू शकल्या. इंग्रजांना अखेर त्यांचा खूनही गफुरखानाला विकत घेऊनच करावा लागला. त्यांचा खून करण्याचे एकमेव खरे कारण म्हणजे त्या जिवंत असता आपल्याला होळकरी राज्य गिळता येणार नाही याची त्यांना पटलेली खात्री.
यशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितूर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले.
यशवंतरावांचे सर्वात मोठे आणि शिवरायांनंतरचे अद्वितीय कार्य म्हणजे त्यांनी जानेवारी १७९९ मध्ये करून घेतलेला वैदिक राज्याभिषेक. या राज्याभिषेकाची कधीच चर्चा होत नाही. यशवंतरावांना पेशव्यांनी अधिकृत कधीच राजवस्त्रे दिली नाहीत. तरी लोकमान्यतेसाठी व अन्य सरदारांनी आपले महत्त्व जाणावे व आपल्या कार्यात साथ द्यावी म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. एका धनगराचा आधुनिक काळातील हा एकमेव राज्याभिषेक. त्याचे ऐतिहासिक मोल अद्याप आपल्याला समजावयाचे आहे.

यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली.

यशवंतरावांना िहदी, पíशयन, उर्दू, मराठी व संस्कृत भाषा येत असत हे वेगवेगळ्या ठिकाणी माल्कमनेच नोंदवून ठेवले आहे. ते स्वत: सर्वच शस्त्रास्त्रे उत्तमरीत्या चालवत असत. बंदुकीवर त्यांचे विशेष प्रेम होते. एकदा नेमबाजीचा सराव करत असता तोडा फुटून झालेल्या स्फोटात त्यांचा उजवा डोळा जायबंदी झाला होता. नंतरही त्यांचे बंदूकप्रेम कधी कमी झाले नाही. भालाफेकीत तर त्या काळात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता, असे माल्कमने गौरवाने नोंदवले आहेच. ते स्वत: उत्तम हिशेब तपासनीस होते, त्यामुळे महसूल-खंडणी वसुलीत कारकून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नसे. तोफांच्या कारखान्यात स्वत: तोफा ओतण्याचे कामही त्यांनी केले, यावरून त्यांची ध्येयावरची अथांग श्रद्धा सिद्ध होते.
आता प्रश्न असा उपस्थित राहतो की बाजीराव पेशव्यांनी दौलतराव िशदेंच्या एवढे कह्य़ात जाऊन यशवंतरावांचा एवढा दुस्वास का करावा? यशवंतरावांच्या उत्तरेतील पराक्रमाच्या वार्ता कानावर येत असता त्यांचा उपयोग दौलतीसाठी का केला नाही? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत व या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. कारण पेशवाईच्या अस्तामागे पेशव्यांचे यशवंतरावांबाबतचे चुकलेले धोरण आहे, हे तर उघड आहे.
इतिहासावरून तीन गोष्टी ठळक होतात त्या अशा-
१. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर महादजी िशदेंचे प्रस्थ पुणे दरबारात वाढले. त्यांच्यानंतर आलेल्या दौलतरावाने तेच स्थान कायम ठेवण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला. पेशव्याला आपल्या अंकित ठेवण्याचा सतत प्रयत्न केला, इतका की पेशवे िशदेंचे वर्चस्व झुगारण्यासाठी इंग्रजांच्या मदतीसाठी सन १८०० पासूनच प्रयत्न करत होते, पण तेव्हा ते ब्रिटिशांच्या अटी मानण्याच्या परिस्थितीत नव्हते. अहिल्याबाईंनी तुकोजीरावांना होळकरी राज्याचा सेनापती नेमले असले व विविध युद्धांत सेना घेऊन ते सामील होत असले, तरी ते अहिल्याबाई असेपर्यंत अधिकृत शासक नसल्याने राजकारणात पेशव्यांनी त्यांना सामील करून घेतले नाही. अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही. तेथून त्यांचे सारेच आडाखे फसत गेले. दौलतरावाच्या सनिकी शक्तीवर बाजीरावाचा फाजील विश्वास होताच. पुढे यशवंतरावांनी तो आत्मविश्वास धुळीला मिळवला.
२. दुसरे असे की यशवंतरावांना पेशव्याने वा दौलतरावाने ‘औरस’ कधीच मानले नाही. अनौरसाकडे पाहण्याचा खास पेशवाई हिनत्वाचा दृष्टिकोन येथे आडवा आला व कसलीही माहिती नसताना त्यांनी यशवंतरावांना एक ‘बंडखोर’ अशीच उपाधी देऊन पेशवाईचा शेवटपर्यंत शत्रूच मानले. त्यामुळे बाजीरावाने यशवंतराव व िशद्यांत सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न केला नाही. िशद्यांनी तसा प्रयत्न फेटाळूनच लावला असता कारण ‘अनौरसाशी काय समझोता करायचा?’ या उद्दाम भावनेतच तो राहिला. पुढेही त्याने यशवंतरावांच्या ऐक्याच्या व इंग्रजांविरुद्धच्या लढय़ाच्या ज्या हाका दिल्या त्याला नीट प्रतिसाद का दिला नाही, याचे उत्तर याच खास तत्कालीन मराठी सनातनी वृत्तीत आहे.. भोसलेंबाबतही हेच म्हणता येईल. प्रत्यक्षात यशवंतरावांनी कोणाहीबाबत कटुता ठेवली नव्हती हे आपण पाहिलेच आहे.
३. पहिले बाजीराव हे जातीभेदातीत बुलंद व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे अनेक नवी लढवय्यी घराणी पुढे आली हे वास्तव आहे, पण पुढील पेशवाई ही मात्र फाजील वर्णाहंकाराची होती. पानिपतच्या युद्धकाळातील घडामोडींतच जातीयवादाच्या पाऊलखुणा उमटताना आपल्याला दिसतात. पानिपतच्या पराजयामागे हा छुपा जातीयवाद होता. पानिपतच्या युद्धात मसलतींत मल्हाररावांना डावलले जात होते. ब्राह्मण - मराठा- अन्यजातीय अशी त्रिभागणी उत्तर-पेशवाईच्या काळात झालेली दिसते. एका धनगराला मराठा राजमंडलात बरोबरीचे स्थान द्यावे काय, अशा सुप्त प्रवाहांच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे यशवंतरावांना न मोजण्याचे धोरण दुसऱ्या बाजीरावाने कायम ठेवले असे दिसते. ‘इंग्रजांच्या वर्चस्वाखाली जाणे श्रेयस्कर, पण यशवंतराव होळकरांच्या नको..’ असा निर्णय दुसऱ्या बाजीरावाने घेतला असेल तर त्याची जातीय मनोभूमिका आपण समजावून घेऊ शकतो. पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कसलाही विचार पेशव्याने केला नाही हे दुर्दैवी आहे. त्याने यशवंतरावांच्या आवाहनांना प्रतिसाद देऊन परत पुण्याला यायला हवे होते.. पण तसे झालेले नाही.
१७९७ ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कलकत्त्यावर आक्रमण करून एकटय़ाच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजून घेतले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे.
जेम्स व्हीलर नावाचा पाश्चात्य इतिहासकार यशवंतरावांबद्दल लिहितो-
" The life of Yashwant Rao Holkar was one of unceasing struggle and peril, endured with the abounding high spirits for which he was renowned. He experienced the murder of one brother by Sindhia and the public execution of another by the Peshwa. He took lightly even the loss of an eye by the bursting of a matchlock; jesting at the belief that a one-eyed man is wicked, he exclaimed that he had been bad enough before but would now surely be the guru or high priest of roguery. He was generous as well as witty, and his wildness was pardoned as part of the eccentricity of genius. He was of superior education as well as superior mental abilities, a skilled accountant and literate in Persian as well as Marathi.
" No member of his race ever possessed the gift of guerilla warfare in such higher measures as did Yashwant Rao Holkar. His resources were always slight, but his energy and hopefulness boundless. When for the war that now followed he announced to his troopers that they must gather their own rewards and these conditions were accepted with enthusiasm. His reputation was such that, even when himself a fugitive from Scindiaks army, he had been continually strengthened by desertions from his pursuer. His personal courage was of the kind which soldiers most esteem, that of such leaders as Ney and Lannes, and he never lost his personal ascendancy until he lost his reason. "

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांचा खांदा बंदूक ठेवायला वापरला गेला त्यांपैकी एक विठोजी होळकर.

अवांवरः बापू गोखल्याने इंग्रजांशी खडकी येथे लढाई केली. खडकीत बापू गोखल्याची काहीही स्मृती, निशाणी, समाधी दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऋ शी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ॠशी सहमत. कोल्हटकरांशीही सहमत. जे दुवे दिले गेले आणि सहभागी कोण होणार आहे हे बघता एकंदर रोख लक्षात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

अन्यायाविरुद्ध लढलेल्या
विठोजी होळकरांची क्रुर हत्या..

अन्यायी-अत्याचारी राजव्यवस्थांविरुद्धचे उठाव जगाला नवे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही, प्रसंगी आप्तस्वकियांशीही संघर्ष करत मोगल राज्यव्यवस्थेविरुद्ध उठाव करुन स्वराज्याची स्थापना केली होती. सर्वच उठाव यशस्वी होत नाहीत. अयशस्वी बंडखोरांना पकडून कैदेत टाकणे अथवा ठार मारल्याच्या घटनाही अगणित आहेत. परंतु अशाच स्वातंर्त्यासाठी उठाव केलेल्या विठोजीराजे होळकर यांना मात्र जी क्रुरातिक्रुर शिक्षा दिली गेली तिला ग. ह. खरेंसारख्या इतिहास संशोधकानेही 'अत्यंत नीच दर्जाचा खुनशी सुड' असे संबोधले आहे, कारण जगाच्या इतिहासात अशी शिक्षा कोणालाही दिली गेल्याचे उदाहरण नाही.

का दिली गेली अशी शिक्षा? काय पाश्र्वभूमी आहे या शिक्षेची? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी थोडे इतिहासात जावे लागेल. तुकोजीराजे होळकरांच्या मृत्युनंतर होळकरांची सर्व संस्थाने हडपण्याचा दुसरा बाजीराव व दौलतराव शिंद्यांनी घाट घातला. त्याची सुरुवात म्हणून दुसरे मल्हारराव होळकर या पराक्रमी वारसाची पुणे येथे मारेकरी घालून सप्टेंबर रोजी पुणे येथे मल्हाररावांचे हत्या केली गेली. विठोजीराजे व यशवंतराव होळकर या भावंडांना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले. सारे संस्थाने दौलतरावाने घशात घातल्याने ती पुन्हा जिंकून घेण्याखेरीज यशवंतरावांसमोर पर्याय राहिला नाही. खानेदेशात मुक्कामी असता खुद्द नाना फडणिसाने होळकर बंधुंना साकडे घातले कि बाजीरावाच्या नादानीने रयतेची रया गेली आहे. दौलतरावाचे पेंढारी सर्वत्र रयतेचीच लुट करत आहेत. सामान्य स्त्रीयांचीच काय सरदारांच्या बायकांची अब्रुही शनिवारवाडय़ात लुटली जात आहे, तेव्हा दुसर्‍या बाजीरावास हटवून अमृतरावास अथवा मनास येईल त्यास पेशवा करावे व रयतेला सुखाचे दिवस दाखवावेत.

स्वत: होळकरांनी हा अन्याय डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला असल्याने व त्या दोघा भावंडांच्या बायका व नवजात मुले शिंद्यांच्या कैदेत असल्याने त्यांच्याही मनात बाजीरावाबद्दल चीड होतीच. परंतु आधी उत्तर हिंदुस्तान स्वतंत्र करायचा हे यशवंतरावांचे ध्येय असल्याने त्यांनी दक्षिणेची जबाबदारी विठोजीराजेंवर सोपवली. त्यानुसार विठोजीराजे अवघी तीन-चारशे स्वारांची फौज घेवून पुण्याकडे निघाले. वाटेत त्यांना अनेक असंतुष्ट छोटे-मोठे सरदारही सामील झाले. मग विठोजीराजेंनी एकामागून एक पेशवे व शिंद्यांची ठाणी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्र पेटला. खुद्द अमृतराव पेशव्यांनी विठोजीराजेंना सनदा लिहुन दिल्या. नाना फडनिसाचा मागून पा¨ठबा होताच. या प्रकाराने हबकलेल्या पेशव्याने नानाला अटक करून मग बालकृष्ण बावनपागे या सरदारास प्रथम विठोजीराजेंवर पाठवले. परंतु खुद्द बावनपागेंचा बाजीरावाच्या अन्यायी वर्तनाचा रोष असल्याने ते विठोजीराजेंनाच सामील झाले. याशिवाय येसाजी रामकृष्ण, बाजीबा व कृष्णराव मोदी असे अनेक शिंद्यांचे सरदारही येवून सामील झाले. या सर्वाचे नेत्रृत्व स्वीकारत विठोजीराजेंनी सोलापूर, करकुंभ, पंढरपूर अशी अनेक स्थाने त्यांनी मुक्त केली. दरम्यान बाजीरावाने सरदार पानशांना विठोजीराजांचे व त्यांना सामील सरदारांचे पारिपत्य करायला पाठवले. पण सोलापूर येथे विठोजीराजांनी पानशांचा पूर्ण पराभव केला. इतका की पानशांना तोफखाना सोडून पळून जावे लागले. हीच गत बाळाजीपंत पटवर्धन या पेशव्याच्या सरदाराची झाली.

आता आपली पेशवाई रहात नाही हे लक्षात येताच बाजीरावाने 1800 च्या डिसेंबरमद्धेच इंग्रज रेसिडेंट लोजमार्फत इंग्रजांचे संरक्षण मिळवायचा प्रयत्न सुरु केला. हे समजल्यावर विठोजीराजे अजूनच चवताळले..कारण इंग्रजांशी पेशव्याने करार केला तर स्वराज्य बुडाले हे त्यांना समजत होते. यशवंतराव होळकरही या वृत्ताने अस्वस्थ झाले. त्यांच्या सल्लय़ाने विठोजीराजे वेगाने पुण्याच्या दिशेने निघाले. बाजीराव हे वृत्त समजताच घाबरला. त्याने तातडीने नाना पुरंदरे, गणपतराव पानसे व बापु गोखले या मातब्बर सरदारांना सर्व फौजेनुसार विठोजीराजेंना अटकाव करण्यास पाठवले. मार्च 1801 मध्ये जेजुरीजवळ उभयपक्षांमध्ये धमासान युद्ध झाले. या युद्धात विठोजीराजेंचा पराजय झाला. त्यांना अटक करुन पुण्यात आणण्यात आले. विठोजींना क्रुर शिक्षा द्यायचा दुसर्‍या बाजीरावाचा बेत आहे हे समजताच नरसिंह विंचुरकर हे मातब्बर सरदार धावत बाजीरावास भेटण्यास आले व विठोजीराजांना मारु नये, अशी विनवणी केली. पण रियासतकार सरदेसाई यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे..' परंतु व्यसनांध मनुष्याप्रमाणे बाजीरावाने विंचुरकरांचे म्हणणे झिडकारले..' बाजीराव त्याकाळी सर्वस्वी सर्जेराव घाटगे, बाळोबा कुंजीर व दौलतरावाच्या आहारी गेलेला होता. त्याने विठोजीराजेंना शिक्षा काय द्यायची याची विकृत आखणी करुन ठेवलेली होती. (क्रमश:)

संजय सोनवणी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुनील,ऋषिकेश,अरविंद कोल्हटक,....
विठोजी होळकरांनी भारतभूमिला इंग्रजांपासून वाचवण्यासाठी आयुष्य खर्ची घातले ......हे पुरेसे नाही का ?.
तुम्ही या कार्यक्रमाच्या उद्देश विषयी जो हेतू पाहत आहात किंवा शंका घेत आहात .....त्यामध्ये तुमचा हेतू आणि कुजकी मनोवृती याचा दर्प येत आहे ....बायील वेड्या २र्य बाजी राव पेशव्या सारखे इंग्रजांना साथ देऊन मातृ भूमीशी प्रतारणा तर केली नाही ना विठोजी रावांनी .. ज्या होळकरांनी मराठा सरदारांच्या बायका पानिपत च्या मैदानातून बाहेर काढल्या ....मराठ्यांचा झेंडा अटकेपार नेला(कोणाला हवे असल्यास ऐतिहासिक संदर्भ देऊ ..आम्ही शिकलेले आहोत . आणि आपले आयडी पण trak करत आहोत .. ) त्यांचा च उत्तर अधिकार्यावर हि वेळ आणली पेशव्याने तेही इंग्रजाशी हात मिळवणी करून .................
आणि राहिले बापू गोखले यांचे ...तर तुम्ही स्वत का पुढाकार घेत नाही स्मारकासाठी ....
लिहिताना सांभाळून लिहावे ...आमच्या भावना दुखवू नये ....कोणाला जास्त स्पष्टीकरण हवे असल्यास सांगावे ...हव्या त्या भाषेत उत्तर मिळेल ..पत्ता नाही दिला तरी चालेल ..आम्ही तो तुमच्या ip address वरून काढू ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.....त्यामध्ये तुमचा हेतू आणि कुजकी मनोवृती याचा दर्प येत आहे

हे स्पष्टच आहे की तुम्ही माझा वरचा प्रतिसाद नीट वाचलेला नाही. कारण तो वाचला असता तर असे काही लिहिले नसते!

मी यशवंतराव होळकरांना सरसकट गणंग म्हणण्यास विरोधच केला आहे.

याचे कारण - यशवंतरावांनी पुणे लुटले (कारण काहीही असो) हे जितके सत्य आहे तितकेच हेदेखिल सत्य आहे की, जेव्हा बहुसंख्य संस्थानिक ब्रिटिशांशी तह व्हावा म्हणून आर्जव-पत्रे घेऊन रांगेत उभे होते तेव्हा तहाची कागदपत्रे घेऊन स्वतः ब्रिटिश यशवंतरावांकडे गेले होते! खुल्या मैदानात ब्रिटिशांना धूळ चारणारा हा लडवय्या होता.

अर्थात त्यांचे नाव घेऊन जर ह्या कार्यक्रमात काही जातीपातीवाचक भाषणबाजी होणार असेल तर त्यालाही माझा विरोध असेल, हे स्पष्ट आहे. कारण एखादी व्यक्ती थोर म्हणजे त्याची संपूर्ण जमात थोर किंवा एखादी व्यक्ती नीच म्हणून त्याची संपूर्ण जमात नीच, ही सरसकट विचारसरणी मला पटणारी नाही.

मला वाटते, माझे म्हणणे आता नीटपणे मांडले गेले आहे. सबब सदर धाग्यावरील हा माझा शेवटचा प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ऋषिकेश ......तुजा बाप होता विठोजी होळकर ......आपल्या मर्यादेत राहून बोल ......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचकांनी आपले म्हणणे गांभीर्याने घ्यावे अशी प्रतिसादकाची अपेक्षा असली तर कृपया संयत भाषा वापरावी, भावनिक लिखाणशैली अनुसरू नये व व्यक्तिगत टिप्पणी टाळावी. ऐतिहासिक माहिती ज्या ग्रंथांतून उद्धृत केली आहे त्यांचे संदर्भ दिल्यास तुमचे म्हणणे अधिक वजनदार होईल हेही लक्षात ठेवावे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंतातुर जंतू तुला माझी एकट्याची च भाषा संहत वाटत नाही काय ???
बाकीचे काय दिवे लावत आहेत ते पहा ...लोकांच्या प्रतिक्रिये मुळे आमच्या ऐतिहासिक आदर्श पुरुष्यांची बदनामी होत आहे ...
वेळीच आवर घाल तू याला ...नाहीतर तुमच्या ही बुद्धीला जंतू संसर्ग झाला असेल तर सांगावे .....पुणे cyber cell ला अधिकृत तक्रार देण्याचा विचार आम्ही करत आहोत ...अखेरचे आणि निर्वाणीचे सांगणे आहे ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मर्यादा न सोडता मतभेद व्यक्त करणे हे लोकशाही प्रक्रियेला पूरक असते. सबळ मुद्दे मांडून विरोधकाचे म्हणणे खोडून काढता येणे शक्य असतानाही जर सवंग उपाय योजले जात असतील तर मग प्रतिसादकर्त्याच्या हेतूविषयी संदेह निर्माण होतो. हा संदेह दूर करणे हे सर्वस्वी प्रतिसादकाच्या हातात असते. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती - व्यक्तिगत टिप्पणी टाळून ऐतिहासिक माहिती संदर्भासहित द्यावी. मग लोकांचे मतपरिवर्तन होऊ शकेल. याउप्पर मला काही म्हणायचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंतातुर जंतू --आपले नाव लपवून ठेऊन खोडसाळ आणि २ र्याच्या भावना दुखावणार्या गोष्टी लिहिणार्यांनी दुसर्याला लोकशाही विषयी सांगू नये ...
मला ही काय सांगायचे नाही आता कारण शहाण्याला शब्दाचा मार आणि कुचाळक्या करणार्याला जोड्याचा .....
आम्ही तक्रार केली आहे ..परिणाम भोग आता ...तू कोण आहेस ते हि कळेल सविस्तर सामोरा समोर बोलू आपण ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंतातुर जंतू बघ रे संदर्भ बघ सचिन ने दिलेला ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर विषयावर प्रकाश टाकू शकेल अशी काही माहिती संदर्भांसहित द्यावी हेच मी म्हणत होतो. ती दिल्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दोन प्रहर माथ्यावर दिवस होता आलेला

रावबाजी पेशवा पोटभर जेवलेला

अन् पक्वान्नांची ढेकर देतच आला

शनिवार वाडयाच्या सज्जामध्यें बैसला

चघळीत सुपारी खालीं इषारा दिला

शनिवार वाडयापुढ़ं खेळ होता सुरु झाला

होळकर विठोजी हत्तीपायिं थांबला

केली खून लाविलं हत्ती पिटाळायाला.

यशवंतरावाची भावजय कोमला

धाय धाय मोकलुन विनवि बाजीरावाला

परि दया नव्हति पेशव्याला, हंसुं लागला

हालहाल करून ! हाल होता हंसुन ! जरी चिंध्या करुन

यशवंतरावाचा भाऊ ठार मारिला...

तुम्ही ऐका हो राघुबा दाजी

पदोपदीं जरी अपमान् होळकराचा झाला

महाराष्ट्र धर्माचा वारकरी एकला

महाराष्ट्र ध्वजा होति प्राणाहुन प्रिय त्याला

त्याचा दाखला शाहिरा हातीं आज लागला

पुण्याजवळ वानवडीला गेला शाहिर मुजर्याला

- शाहीर अमर शेख

( मराठेशाहीअखेरचा अद्वीतीय स्वातंत्र्यवीर श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर , लेखक नरहर रघुनाथ फाटक. या पुस्तकामधील वीरश्रेष्ठ यशवंतराव होळकर, शाहीर अमर शेख यांचे पोवाडा मधील काही भाग.....)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचले.

आज हा कार्यक्रम आहे. कोणी उपस्थित रहाणार असल्यास ह्या कार्यक्रमाचा वृत्तांत जरुर द्या. विशेषता वर विवाद झालेल्या काही मुद्द्यांवर भाष्य, नवी माहिती मिळाल्यास.

अवांतर - पब्लीक फोरम मधे आयपी ट्रॅक कसे करावेत व त्या वरुन पत्ता कसा काढावा याचा धागा जाणकारांनी काढल्यास आजवर समाजात संगणकीय तांत्रीक ज्ञानात जे सदस्य मागे पडले आहेत अश्या तंत्रज्ञानदुर्बल घटकांचा उद्धार होईल. कृपया माहिती मिळावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिव छत्रपतिचे ३ जिल्ह्य पुरते मर्यादित राज्य आपल्या स्वकर्तुत्वावर उत्तरेत स्तापनारे व् मराठे शाहीचे झेंडे उत्तर भारत भर फडकवानारे सुभेदार मल्हार राव होळकर याच्यावर जेव्हा बजिरावाने सौशय घेतला तेव्हा या निष् कलंक व जरीपरटक्यiशी इमान रखानारया मल्हारबाने ....स्वतःह वर घेतलेल्या खोट्या सौषयाचे निराकार करण्या साठी पुणे दरबारातील शिपाई असलेल्या राणोजी शिन्देला पेशाव्य करावी राजेशाहिची वस्त्रे देऊ केलि व उत्तरेत राजा बनवून मान दिला त्यांच्याच तालमित वाढलेले शिंद्यानी पुढे सत्तेच्या लालसा पोटी होळकरlशी बेमानी करुन इतके निकृष्ट कृत्य करने अपेक्षित न्हवते .. याला छत्रपति म्हणून जवाबदार असलेला पेशवा ही या अपराधात तितकाच दोषी आहे...
.
आमची लढाई अन्याय विरुध आहे कृपया त्याला जातीय रूप करून बदनाम करू नये..

विठोजीराव होळकर हे राजपुत्र व होळकरांचे लायक वंशज होते दुर्दावाने त्याच्या दक्षिनेतिल पराक्रमाची दखल कुठल्याच एतिहसकराने घेतली नहीं त्या मूले त्यांच्या विषयी कुठे वाचानासा उअपल्भा होऊ शकले नहीं ..

अlपल माहित नहीं पण आमच्या रक्तात जिजlउचा शिवबा अजूनही जिवंत आहे ....जो आपल्या सम्पूर्ण कार्यकालत एकच शिकवण शिकवून गेला अन्याय असेल तिथे लढा मग तो कोणीही असो ... आई भावनी सदैव आपल्या पाठीशी आहे ........जगदम्ब ..जगदम्ब,.जगदम्ब

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा

बरीच चर्चा झाली की
मित्रांनो, प्रकृती ठीक नसल्या कारणाने ऑनलाईन येऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व.
पण या धाग्यावर अगोदरच साधकबाधक अशी चर्चा झाली आहे.
तेव्हा अधिक काही लिहित नाही.

पण 'ऐसी अक्षरे'च्या वाचकांसाठी या भाषणाची ध्वनिचित्रफित लवकरच मी उपलब्ध करुन देईन. (शक्यतो युट्युब वर लोड करेन)
भाषण ऐकून वाचकांना मत ठरवण्यास सोपे पडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकाळमध्ये आलेली या कार्यक्रमाविषयीची बातमी

From Newspaper Cuttings

लवकरच या कार्यक्रमाच्या व्याख्यानाच्या व्हिडिओ लिन्क्स देईन.

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कार्यक्रमाच्या व्हिडिओ लिंक्स मुख्य धाग्यावरच उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

धन्यवाद,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिलाच दुवा रोचक आहे. त्यात गणपतीची प्रार्थना केलेली दिसली. हा गणपती कुठला असा प्रश्न पडला. हे व्हीडीओ यू ट्यूबवर सागरभंडारे अशा नावाने चढवलेले दिसतात. संजय सोनवणी आणि त्यांचे, येथेही झळकून गेलेले, समर्थक गण यांची गणपतीविषयी भूमिका काय आहे, त्या भूमिकेत या व्हीडीओतील प्रार्थना बसते का, बसत असल्यास कशी वगैरे उपप्रश्न पडले.
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रामो,

माफ कर मित्रा, पण हे असले अर्थहीन प्रश्न आणि उपप्रश्न तुझ्यासारख्या विचारमंथन करणार्‍या व्यक्तीने उपस्थित करावेत याचा खरोखर खेद वाटला.
मूळ प्रश्नाशी हे सर्व प्रश्न कोणत्यातरी अँगलने संबंधित आहेत काय?
जिज्ञासूंसाठीच हा कार्यक्रम अपलोड केला आहे. वक्त्यांनी विचार काय मांडले आहेत हे ऐकून जर विचारमंथन (करायचे असले तर) झालेले अधिक आवडेल.

कोणत्याही कार्यक्रमाला शूटिंग हे कॉन्ट्रॅक्ट देऊन केले जाते, त्याच प्रमाणे हे एका व्यावसायिक शूटिंग करणार्‍या संस्थेकडून / व्यक्तीकडून केले आहे.
त्यांनी शूटिंगची डिव्हीडी कशी सजवायची हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.

माझी भूमिका एवढीच आहे की हे सर्व व्हिडिओ मी स्वतः अपलोड केले आहेत. याबद्दल मी माझ्या मागील एका प्रतिसादात अगोदरच सांगितले होते. श्री.संजय सोनवणी हे माझे मित्र असल्यामुळे त्यांनी मला या कार्यक्रमाचा हा वृत्तांत पाठवला होता एवढेच.

असो.

या सर्व कार्यक्रमाच्या एमपी थ्री पण अपलोड केल्या आहेत
हा तो दुवा : http://www.4shared.com/account/dir/ONIKfIFH/_online.html#dir=184632498

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सागर, तुला खेद वाटला त्याबद्दल दिलगीर आहे. हे प्रश्न आणि उपप्रश्न अर्थहीन आहेत, या तुझ्या मताचा आदर आहे.
प्रश्न आणि उपप्रश्न अर्थहीन नाहीत, हे मात्र नक्की. इतिहाससंशोधन वगैरे करणाऱ्यांना त्यातील अर्थ नेमका कळेल याची मला खात्री आहे. ती मी सांगत बसणार नाही, कारण मी त्या शिक्षणाचा वसा घेतलेला नाही. मी प्रश्न विचारणार, कारण या संशोधकांनी, आपण काही शिकवत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. त्यांना प्रश्न करावे लागतील.
व्हीडीओ शुटिंग कुणी केलं याच्याशी मला देणंघेणं नाही. कार्यक्रमाचा वृत्तांत अशा स्वरूपात व्हीडीओ लोड केले जातात तेव्हा त्यातील गणेशवंदनेचा रेलेव्हन्स पाहिला जाणारच. मी आधीही तुझ्याच धाग्यावर संजय सोनवणी यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरेही मिळालेली नाहीत.
त्या पुस्तकात संजय सोनवणी यांनी काही मनोगत लिहिले आहे. त्यात सागर भंडारे असा नामोल्लेख आहे. तो तुझाच आहे का? असेल तर, भूमिकांबाबत तुला स्पष्टता ठेवावी लागेल (म्हणजेच प्रश्न अर्थहीन कसे हे मांडावे लागेल किंवा तशी 'उत्तरे देण्याची जबाबदारी माझी नाही, कारण मी त्यांचा वकील नाही', असे म्हणावे लागेल. व्हीडीओ कुणी शूट केला यावर ते भागणार नाही, कारण प्रश्न नेमके आहेत.). तसे न केले तर तू केलेले लेखन हे अर्धवट प्रवक्तेगिरीचे ठरेल, निदान माझ्या मते. शुभेच्छा!
विषय पुस्तक आणि सामाजिक मुद्यांवरील भूमिकांचा आहे. तुझी आणि संजय सोनवणी यांची मैत्री हा स्वतंत्र आणि पूर्णपणे तुझा वैयक्तिक मामला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रामो मित्रा,

माझ्या मताचा आदर करुन तू सविस्तर लिहिलेस त्याबद्दल आभारी आहे.
तुझ्या मतांचाही आदर मला आधीही होता व आत्ताही आहे. त्यामुळे तुझ्या एकेक मतांच्या अनुषंगाने थोडे विवेचन करण्याचा प्रयत्न करतो.

प्रश्न आणि उपप्रश्न अर्थहीन नाहीत, हे मात्र नक्की. इतिहाससंशोधन वगैरे करणाऱ्यांना त्यातील अर्थ नेमका कळेल याची मला खात्री आहे. ती मी सांगत बसणार नाही, कारण मी त्या शिक्षणाचा वसा घेतलेला नाही. मी प्रश्न विचारणार, कारण या संशोधकांनी, आपण काही शिकवत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. त्यांना प्रश्न करावे लागतील.
व्हीडीओ शुटिंग कुणी केलं याच्याशी मला देणंघेणं नाही. कार्यक्रमाचा वृत्तांत अशा स्वरूपात व्हीडीओ लोड केले जातात तेव्हा त्यातील गणेशवंदनेचा रेलेव्हन्स पाहिला जाणारच.
-

याचा रेलेव्हन्स म्हणजे काय हे तू नेमके स्पष्ट करुन सांगितलेस तर त्यावर काही भाष्य करता येईल. कारण "पुण्यात १६ एप्रिल २०१२ रोजी विठोजी होळकरांच्या २११ व्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम" या केवळ कार्यक्रमाची माहिती देणार्‍या धाग्यावर गणेशवंदना आणि विठोजी होळकर यांच्या हत्येचा स्मृतीदिन या दोघांचा काही संबंध आहे असे मला अजिबातच वाटत नाही. या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव होळकर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेले होते (जे मुख्य माहितीतच दिलेले होते) संजय सोनवणी हे केवळ एक प्रमुख वक्ते म्हणून या कार्यक्रमात होते. तसेच श्री. महेन्द्र गजेन्द्रगडकर हे अध्यक्ष होते व त्यांनीही त्यांचे विचार मांडलेले आहेत.
तुझा आक्षेप नेमका कोणावर आहे ते कळाले नाही. या कार्यक्रमाच्या विषयाला आहे का प्रत्यक्ष संजय सोनवणी यांच्यावर आहे? सोनवणींवर रोख असेल तर तुझे प्रश्न किमान या धाग्यावर तरी अर्थहीन आहेत. विठोजी होळकर स्मॄतीदिनाशी गणेशवंदनेचा प्रश्न निगडीत असेल तर माझ्या अल्पमतीला काही कळाले नाही. त्याचा संबंध कसा आहे हे तू स्पष्ट करुन सांगावेस ही विनंती.

मी आधीही तुझ्याच धाग्यावर संजय सोनवणी यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे मिळालेली नाहीत.
याबद्दल मात्र मी दिलगीर आहे. कारण प्रकृतीकारणास्तव मी ऑनलाईन आलोच नव्हतो त्यामुळे तुझ्या प्रश्नांची दखल घेता आली नाही. त्या धाग्यावर तुझे प्रश्न पाहून तिथे उत्तरे देईन.

त्या पुस्तकात संजय सोनवणी यांनी काही मनोगत लिहिले आहे. त्यात सागर भंडारे असा नामोल्लेख आहे. तो तुझाच आहे का? असेल तर, भूमिकांबाबत तुला स्पष्टता ठेवावी लागेल (म्हणजेच प्रश्न अर्थहीन कसे हे मांडावे लागेल किंवा तशी 'उत्तरे देण्याची जबाबदारी माझी नाही, कारण मी त्यांचा वकील नाही', असे म्हणावे लागेल. व्हीडीओ कुणी शूट केला यावर ते भागणार नाही, कारण प्रश्न नेमके आहेत.). तसे न केले तर तू केलेले लेखन हे अर्धवट प्रवक्तेगिरीचे ठरेल, निदान माझ्या मते. शुभेच्छा!

होय संजय सोनवणी यांनी त्यांच्या मनोगतात उल्लेख केलेला सागर भंडारे तो मीच आहे. त्यांना काही संदर्भ शोधून देण्यात मी मदत केली होती.
भूमिकांबाबत स्पष्टता म्हणजे नेमके काय? हे माहिती करुन घ्यायला आवडेल. पुस्तकाशी संबंधीत असेल तर ती चर्चा तेथे करुयात. बाकी तू म्हणतोस तसे " 'उत्तरे देण्याची जबाबदारी माझी नाही, कारण मी त्यांचा वकील नाही'," हे आवडले. मी खरोखर त्यांचा वकील नाहिये Smile
पण जे खरे आहे ते खरे आणि जे खोटे आहे ते खोटे या एकाच तत्त्वावर मी आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे पाहतो. त्यामुळे तुझ्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकलो तर मला आनंदच आहे. पुस्तकांशी संबंधित चर्चा त्याच धाग्यावर करुयात.

अजून एक विनंती अशी की प्रकृतीकारणास्तव नियमितपणे यायला जमत नाहिये. तेव्हा प्रतिसाद देण्यात उशीर झाल्यास आधीच क्षमा मागतो. मी प्रतिसाद नक्की देईन याची खात्री बाळग.

धन्यवाद मित्रा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरुणांनी इतिहास वाचावा पण तो दोष किंवा आरोप करण्यासाठी नाही; तर घटनेमागचे सत्य जाणून घेण्यासाठी वाचावा. इतिहास हा प्रेरणा घेण्यासाठी असतो, असे मत इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.

हे उद्धृत आधी मुद्दाम देतो. ते दिल्याने संजय सोनवणी यांची भलामण मी करत नाहीये. कारण इतिहासाविषयी हीच भूमिका असते अभ्यासामध्ये. ते एक वैश्विक सत्य मानले जाते. ते सोनवणी यांनी आज सांगितलेले नाही. तरीही, त्यांची ही भूमिका आहे याची नोंद येथे मुद्दाम घेतली आहे. या धाग्यावरचे इतर काहींचे वर्तन आणि त्याखालीच हे बातमीच्या कात्रणातून येणारे उद्धृत पुरेसे बोलके आहे. 'दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे' असा प्रकार खरोखर नसेल तर संजय सोनवणी यांनी या धाग्यातील मांडणीविषयी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, इथं किंवा त्यांच्या ब्लॉगवर - जसा त्यांनी तुझा लेख आपल्या ब्लॉगवर टाकला आहे. त्यांनी ब्लॉगवर ती स्पष्ट केली तर तिचा दुवा येथे तू द्यावास.

"पुण्यात १६ एप्रिल २०१२ रोजी विठोजी होळकरांच्या २११ व्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम" या केवळ कार्यक्रमाची माहिती देणार्‍या धाग्यावर गणेशवंदना आणि विठोजी होळकर यांच्या हत्येचा स्मृतीदिन या दोघांचा काही संबंध आहे असे मला अजिबातच वाटत नाही.

वाटणे, न वाटणे हा मुद्दाच नाही. विठोजींच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची माहिती देणे एवढाच हा धागा राहिलेला नाही. वरचे प्रतिसाद नीट पहावेत. धागा माहितीपुरता राहिला नसल्याने, त्यासंदर्भात 'इतिहासाबाबतचा दृष्टिकोन काय' हा प्रश्न येणारच. तोच मी करतो आहे. त्याचसंदर्भात ही 'गणेशवंदना' कुणाची हे कळले पाहिजे. इतिहासाबाबतचा दृष्टिकोन त्यातून समजणार आहे. साधा प्रश्न आहे - या इतिहास संशोधकांच्या मते गणपती कोण, आर्य की अनार्य? गणपतीला आर्य मानत देशी इतिहास मांडला जातोय का? असेल तर ही भूमिका रोचक आहे, अभ्यासता यावी. गणपती अनार्य असेल तर वंदना कशी केली जाते, हे पाहावे लागेल. ते गणपतीला अनार्य मानण्याच्या एकूण भूमिकेत कसे बसते, हेही पहावे लागेल. त्यातून इतिहासाबाबतचा दृष्टिकोन समजेल आणि मगच मांडल्या गेलेल्या इतिहासाकडे वाचकाने कसे पहायचे हे ठरवता येईल.

तुझा आक्षेप नेमका कोणावर आहे ते कळाले नाही. या कार्यक्रमाच्या विषयाला आहे का प्रत्यक्ष संजय सोनवणी यांच्यावर आहे?

व्यक्तीला आक्षेप कशासाठी? माझा नाही. कार्यक्रमाच्या विषयासंदर्भात काही प्रश्न आहेत (आक्षेप नाही); त्या व्यक्तीमधील इतिहास संशोधकाची पात्रता काय आहे हे मात्र वाचक म्हणून समजून घेणे मला आवश्यक वाटते. त्याविषयी माझे प्रश्न आहेत, त्या पुस्तकाच्या धाग्यावर. त्यांची उत्तरे आली की पाहू.

मी खरोखर त्यांचा वकील नाहिये

या माहितीबद्दल धन्यवाद. पण तुझी भूमिका तशी दिसत नाही. इतिहासकाळात घडलेली एक घटना की रंजकता या मुद्यावर वर तू जे लिहिले आहेस ते पुन्हा एकदा पहावे. तिथे तू इतिहास म्हणून काही दुवा देतो आहेस. पुढे, त्यातील रंजितता वजा करावी असा सल्ला देतोस आणि ती घटना खरी आहे असेही म्हणतोस. घटना खरी ती निव्वळ घटना म्हणून, की तिच्या संदर्भचौकटीसह? संदर्भचौकट काय आहे? अशा 'एक घटना' इतिहासात किती आहेत आणि त्याविषयी या इतिहास संशोधकांची भूमिका काय आहे हे तू सांगू शकत नसशील तर येथे (किंवा कोठेही) अशा पद्धतीचे लेखन करण्याआधी विचार केला पाहिजे. विठोजींची पुण्याई असो वा नसो, ती असेल तर तशी मांडली पाहिजे, नसेल तर ती भूमिका घेतली पाहिजे. तू त्यापैकी एकही भूमिका घेत नाहीस, कार्यक्रमाची प्रसिद्धी माहितीपुरती न करता त्यात गुंतलेल्या व्यक्तींची भलामण करीत करतोस* आणि पुन्हा नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतोस, असे हे दिसते. इतिहास, त्याची चिकित्सा याविषयी हे उचित नाही.
*पुस्तकाच्या धाग्यावरही असेच झाले आहे, ते पुस्तक म्हणजे ग्रंथ, त्यासाठीचा अभ्यास वगैरेचं कवित्त्व आहे. तिथं परिचयासोबत 'या पुस्तकासाठी मी मदत केली आहे आणि तसा उल्लेख मनोगतात आहे' हे लिहिले असते तर अधिक स्पष्टता राहिली असती. त्यानं काय फरक पडतो, असा प्रश्न करता येतो. त्याचं उत्तर सोपं आहे, या परिचयाला त्या पुस्तकातील एक हितसंबंधी घटकच लेखक असल्याने किती महत्त्व द्यायचे हे वाचकाला ठरवता आले पाहिजे.
प्रकृती लवकर बरी होवो या शुभेच्छा. त्यानंतर या विषयावर बोलूच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गणेशवंदनेबाबतच एवढी चर्चा झडावी याचे खरेच आश्चर्य वाटले. केवळ उत्तर देण्यासाठी मी या संस्थळाची सदस्यता घेतलेली आहे. सागर माझे वकील किंवा प्रवक्ते नाहीत, परंतु त्यांना माझ्याबाबत आत्मियता वाटत असल्याने व मी शक्यतो सोशल नेटवर्कींग साईट्स शक्यतो टाळत असल्याने (खुप वेळ जातो.) सागर यांना जे आवडते ते नेहमी प्रसिद्ध करत असतात. त्याबाबत त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला चढवणे योग्य नव्हते. असो.

आता गणेश वंदनेबाबत. हा कार्यक्रम कोणी आयोजित केला? मी नाही. मी वक्ता होतो. कोणी आपली डी.व्ही.डी. कशी सजवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी गणेशाच्या ऐवजी बुद्ध-महावीर अथवा अन्य कोनाच्यही वंदना टाकल्या असत्या तरी त्यात मी हस्तक्षेप करणारा व आक्षेप घेणारा कोण? परंतु विचारलेच आहे तर उत्तर देतो. गणेश तथा गणपती ही असुर सम्स्कृतीची देवता होती व आहे. आर्य नांवाचा वंशच कधी अस्तित्वात नसल्याने आर्य-अनार्य अशा वायफळ संकल्पनांवर आताही आपल्यासारखे लोक विश्वास ठेवतात याचे आश्चर्य वाटते. हेही असो. ऋग्वेदात गणपतीला विघ्नांचा देव मानलेला असून यद्न्याआधी त्याला मुंजवत पर्वतावर निघून जा असे आवाहन करणा-या ऋचा आहेत. वैदिक समाज हा यद्न्यसंस्था पाळणारा होता. मुर्तीपुजा ही मुळात अवैदिक आहे. शिव, गणपती, स्कंद आदि सर्वच देवता, ज्या प्रतीक रुपात अथवा मुर्तीरुपात पुजल्या जातात त्या अवैदिक होत. शिवाला "स्मरारि" (यद्न्यांचा विध्वंसक) म्हणतात हे आपनास द्न्यात असेलच! किंबहुना "पुजा" हा शब्द मुळ संस्कृत नसून द्राविडी आहे व त्याचा अर्थ "माखणे" असा होतो. त्यामुळे गणेश वंदना वैदिक नाही तर सरळ अवैदिक आहे. मी अवैदिक आहे. त्यामुळे मला गणेशवंदनेचा का खेद वाटेल? दुसरे असे कि वैदिकांसाठी गणेश गेल्या काही शतकापुर्वीपर्यंत विघ्नकर्ता होता तर अवैदिकांसाठी विघ्नहर्ता होता.

पुढचे असे कि माझी पात्रता ठरवण्यासाठी आपण प्रश्न विचारत आहात असे म्हणता. धन्य आहे तुमची. कोणीही कोणाचीही पात्रता ठरवायला कधी खरा "पात्र" असतो काय? प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पुर्वग्रहाने दुषित असतो व त्याचे प्रतिबिंब त्याच्या लेखनात/विचारांत पडते. फारतर पुर्वग्रहाची तीव्रता व्यक्तिपरत्वे कमीअधिक असते एवढेच. आपण पुर्वग्रहदुषित मनाने प्रश्न विचारत आहात हे त्याच मानवी स्वभावाचे चिन्ह आहे.

शेवटचे असे कि कोणत्याही इतिहासलेखकाची भुमिका समजावून घ्यायची असेल तर उत्तम मार्ग म्हणजे त्याचे लेखन मुळातुनच वाचणे. समजावून घ्यायची नसेल तर सरळ दुर्लक्ष करणे. पण संपुर्ण पुस्तकच प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी पुन्हा येथे उतरवण्याची अपेक्षा बाळगणे कितपत योग्य आहे?

सागर हे "पुस्तकातील हितसंबंधी" आहेत हा आपला आरोपही हास्यास्पद असाच आहे. संशोधन करत असतांना संदर्भांसाठी अनेकांची मदत घेतली जाते, व त्यांच्याबाबत ऋणनिर्देश करणे हे लेखकाचे कर्तव्य असते. संदर्भ पुरवणा-यांच्या मतांचा व लेखकाच्या मतांशी काहीएक संबंध नसतो. लेखक आपापल्या मगदुराप्रमाने अन्वयार्थ काढत जातो. ऋणनिर्देश केला म्हणजे ज्यांचे ऋण मान्य केले ते "हितसंबंधी" होतात हा अजब तर्क आहे. सागर यांना पुस्तक आवडले...त्यांनी लिहिले. त्यांनी अन्य अनेक लेखकांच्या कृतींवर भरभरुन लिहिले आहे, पण तेथे मात्र असे बाष्कळ विवाद उत्पन्न केले गेले असल्याचे मला दिसले नाही. मग येथेच का, या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही माहित आहे, फक्त तुम्ही ते मान्य करणार नाही एवढेच! त्यामुळे पुन्हा असो.

मन:पुर्वक धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. मुद्यांची नोंद घेतली आहे.
पात्रतेचा मुद्दा ज्या रीतीने वैयक्तिक घेतलेला दिसतो ते पाहता ही चर्चा कुठं चालली आहे हे दिसते.
या धाग्यावर यापुढे लिहित नाही. पुस्तकाच्या धाग्यावर उत्तरे मिळाल्यानंतर भूमिका ठरवेन. त्यानंतर, आवश्यकता असल्यास लिहीन.
सागर, खालच्या प्रतिसादातील गैरसमज यासंदर्भात - माझे कसलेही गैरसमज नाहीत. खुल्या मनाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मिळालेली उत्तरे येथेच वाचकांना मिळताहेत. मला अधिक भाष्य करण्याची गरज वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्मर म्हणजे कामदेव. कामदेवाचा वैरी म्हणून शिव स्मरारी| आता असं असताना इथे या शब्दाचा आणि यज्ञाचा संबंध काय? सेकंडरी सोर्सेसवरून माहिती घेतली की असं होतं!

शिवाने दक्ष-यज्ञ-विध्वंस केला आहे! बाकी वैदिक-अवैदिकबद्दल आपले संदर्भांचे सोयीस्कर अर्थ लावून, सोयीस्कर भागाची ठिगळं लावून केलेलं विवेचन कुणीही जाणता अभ्यासक मान्य करणार नाही!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

१६ एप्रिल पुन्हा आला की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

श्रामो मित्रा,

गैरसमजातून तू बाहेर यावेस व उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे सत्य समजून घ्यावेस असे मला वाटते.
स्वतः संजय सोनवणीं यांनीच सर्व बाबी स्पष्ट केल्यामुळे मला बोलायची गरज नाहीच आहे.
पण अजून काही थोडी स्पष्टता यावी यासाठी

'या पुस्तकासाठी मी मदत केली आहे आणि तसा उल्लेख मनोगतात आहे' हे लिहिले असते तर अधिक स्पष्टता राहिली असती.

स्वतःचे गुणगान करणे हे माझ्या स्वभावात नाही त्यामुळे अशा गोष्टी वेळ आल्याखेरिज मी सांगत नाही. तू प्रश्न विचारलास म्हणून तो खुलासा केला एवढेच.

बाकी तुझे माझ्यावरील आरोप पाहून मोठी मौज वाटली. एक लक्षात घे की श्री. संजय सोनवणी व माझा तू हितसंबंधी म्हणून संबंध जोडू पाहतो आहेस त्याला काही अर्थ नाही. त्यांचे विचार व माझे विचार स्वतंत्र आहेत. जे चूक ते चूक व जे बरोबर ते बरोबर हा माझा स्वभाव आहे. मला जे पटते तेच मी लिहिले आहे, त्यासाठी मला कोणी भरीला पाडू शकत नाही. त्यात तुला कवित्व दिसत असेल तर त्याला मी काही करु शकत नाही. तो सर्वस्वी तुझ्या मानसिकतेचा प्रश्न आहे. पु.ल. देशपांडे, कुरुंदकर, सुहास शिरवळकर, अशा कित्येकांबद्दल मी असेच भरभरुन लिहिलेले आहे. त्यात तुला कधी कवित्व दिसले नाही, मग आताच का?

असो, पुस्तकाच्या धाग्यावर सवडीने लिहिनच

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0