एप्रिल दिनवैशिष्ट्य

एप्रिल दिनवैशिष्ट्य

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०

१ एप्रिल
जन्मदिवस : रक्ताभिसरणाचा शोध लावणारा, वैद्यकशास्त्र संशोधक विल्यम हार्वी (१५७८), मानसोपचारतज्ञ अब्राहम मास्लो (१९०८), लेखक मिलन कुंदेरा (१९२९), क्रिकेटपटू अजित वाडेकर (१९४१)
पुण्यस्मरण : नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ लेव लंदाऊ (१९६८), गायक मार्व्हिन गे (१९८४), स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते एस.एम.जोशी (१९८९)
--
१ एप्रिल ते ६ एप्रिल : राष्ट्रीय अंधत्त्व प्रतिबंध आठवडा
वर्धापनदिन : कोलकाता संग्रहालय (१८७८), पोस्टखात्याची बचत सेवा योजना (१८८२), मुंबईचे अग्निशमन दल (१८८७), भारतीय विमानदल (१९३३), भारतीय रिझर्व बॅंक (१९३५), ओडिशा (उत्कल दिन - १९३६), C.B.I. (१९६३), प्रोजेक्ट टायगर (१९७३), दूरदर्शन (१९७६), अ‍ॅपल (१९७६), जीमेल (२००४)
एप्रिल फूल्स डे
१८२६ : इंटर्नल कंबस्टन इंजिनासाठी सॅम्युएल मोरी याला पेटंट.
१८६९ : भारतात नवा घटस्फोटाचा कायदा लागू.
१९१२ : भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीला हलवणार अशी अधिकृत सूचना जारी.
१९२२ : भारतात इन्कम टॅक्स कार्यान्वित.
१९५४ : भारतातल्या फ्रेंच वसाहती भारताच्या नियंत्रणाखाली आल्या.
१९५७ : भारतात दशमान पद्धतीची नाणी-नोटा प्रमाणित (१₹=१००पै). त्यानुसार पोस्टाची तिकीटेही जारी.
१९५७ : बीबीसीने स्पगेटीच्या झाडाची अफवा प्रसारित केली.
१९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.
१९९७ : हेल-बॉप धूमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ.
२००१ : जगात सर्वप्रथम नेदरलंड्समधे समलैंगिक विवाहांना मान्यता.
२००१ : युगोस्लावियाचे माजी नेते स्लोबोदान मिलोसेविच यांना युद्धातल्या गुन्ह्यांबद्दल अटक.

२ एप्रिल
जन्मदिवस : अतिवास्तव कलेतला अग्रणी चित्र-शिल्पकार मॅक्स अर्न्स्ट (१८९१), कवी, अभिनेते आणि राजकारणपटू हरींद्रनाथ चट्टोपाध्याय (१८९८), गायक उस्ताद बडे गुलाम अली खान (१९०२), दिग्दर्शक गजानन जागीरदार (१९०७), अभिनेता अजय देवगण (१९६९), अभिनेता मायकल फासबेंडर (१९७७)
पुण्यस्मरण : पेशवे बाळाजी विश्वनाथ (१७२०), परीकथाकार हान्स क्रिस्टिअन अॅंडरसन (१८०५), मोर्सकोडचा जनक सॅम्युएल मोर्स (१८७२), अणूवजन शोधणारा नोबेलविजेता थिओडोर रिचर्ड्स (१९२८), रणजी ट्रॉफी ज्यांच्या नावे दिली जाते ते क्रिकेटपटू रणजितसिंहजी (१९३३), मॅग्नेटो-हायड्रो-डायनॅमिक्समधल्या कामासाठी नोबेल मिळवणारा हानेस आलवेन (१९९५), गायक गजानन वाटवे (२००९)
--
आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन
जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन
१६७९ : सम्राट औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.
१७५५ : सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांचा कब्जा.
१९६८ : '२००१-स्पेस ओडिसी' या चित्रपटाचा प्रीमियर
१९७० : आसाममधून टेकड्यांचा प्रदेश वेगळा करून मेघालय राज्य अस्तित्त्वात आले.
१९७५ : कॅनडामध्ये जगात तेव्हा सर्वात जास्त उंचीचा म्हणजे ५५५.३५ टॉवर बांधून पूर्ण झाला.
२०११ : अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर भारत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी.
२०१३ : फुकुशिमामधून किरणोत्सारी पाण्याची समुद्रात गळती.

३ एप्रिल
जन्मदिवस: कादंबरीकार नाथ माधव (१८८२), 'टाईम', 'फॉर्च्यून', 'लाईफ' आणि 'स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड' ही नियतकालिके सुरू करणारा हेन्री लूस (१८९८), स्वातंत्र्यसैनिक, समासुधारक आणि भारतीय कलांच्या पुनरुज्जीवनात मूलगामी सहयोग देणाऱ्या कमलादेवी चटोपाध्याय (१९०३), फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (१९१४), अभिनेता मार्लन ब्रांडो (१९२४), गायक हरिहरन (१९५५), अभिनेता अलेक बॉल्डविन (१९५८), विनोदवीर, अभिनेता एडी मर्फी (१९६१), अभिनेत्री जयाप्रदा (१९६२), पॉप गायिका नाझिया हसन (१९६५), नर्तक, नृत्यदिग्दर्शक प्रभु देवा (१९७३)
पुण्यस्मरण: छ. शिवाजी महाराज (१६८०), प्राच्यविद्या संशोधक डॉ. वा. वि.मिराशी (१९८५), गणितज्ञ मेरी कार्टराईट (१९९८)
---
१८८५ : वेगवान पेट्रोल इंजिन बनवणाऱ्या गोटिलीप डाईमला यांना इंजिन रचनेचे पेटंट मिळाले.
१८९५ : ऑस्कर वाईल्डची अपकीर्ती करणारा खटला सुरू. वाईल्ड समलैंगिक असल्याने त्याची रवानगी तुरुंगात झाली.
१९२७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपादित 'बहिष्कृत भारत' पत्राचा पहिला अंक वितरित झाला.
१९३३ : एव्हरेस्ट शिखरावरून पहिले विमान गेले.
१९४८ : जेजू, द. कोरिया इथे नागरी युद्धातून सामूहिक हत्याकांड.
१९७३ : मोटोरोला कंपनीच्या मार्टीन कूपर यांनी पहिल्या मोबाईल फोनमधून बेल लॅब्जमधे पहिला कॉल केला.
१९७५ : अनातोली कारपॉव्हविरोधात बॉबी फिशरने लढत नाकारल्यामुळे कारपॉव्ह विश्वविजेता बनला.
१९८१ : पहिला सहज हलवता येण्यासारखा संगणक सॅन फ्रान्सिस्कोमधे प्रदर्शित.
१९८४ : भारताचा पहिला अवकाश यात्री राकेश शर्मा याची अंतराळ प्रवासास सुरुवात.
१९९८ : प्रवासी बॅगा बनवणाऱ्या 'सॅमसोनाईट'च्या पहिल्या भारतीय प्रकल्पाचे उद्घाटन.

४ एप्रिल
जन्मदिवस: चित्रकार मॉरीस दी फ्लामिंक (१८७६), पत्रकार, नाटककार, कवी माखनलाल चतुर्वेदी (१८८९), प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आंद्रेई तारकोवस्की (१९३२), अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्यु (१९६५), अभिनेत्री आणि मॉडेल लिझा रे (१९७२)
पुण्यस्मरण: समान हक्कांसाठी लढा देणारे 'कृष्णवर्णीयांचे गांधी' मार्टिन ल्युथर किंग ज्यु (१९६८), अभिनेत्री ग्लोरिया स्वानसन (१९८३), कवी, साहित्यिक, पत्रकार सच्चिदानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय (१९८७), 'स्क्रॅबल'चा जनक आल्फ्रेड मोशर बट्स (१९९३)

----

स्वातंत्र्य दिन : सेनेगल
आंतरराष्ट्रीय भूसुरुंग जागरुकता आणि मदत दिन

१९०५ : हिमालयातील कांगरा व्हॅलीमध्ये भूकंप २०,००० व्यक्ती मृत्यूमुखी
१९२४ : महात्मा गांधी यांनी 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या वृत्तपत्रांचे संपादकपद स्वीकारले.
१९४९ : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.
१९६९ : कृत्रिम हृदय बसवण्याचा पहिला प्रयोग डॉ. डेंटन कूली यांनी केला
१९७५ : बिल गेट्स आणि पॉल अॅलन यांनी भागीदारीत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली
१९७९ : पाकीस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांना फाशी
२०१३ : बांधत असलेली इमारत कोसळल्याने मुंब्र्यात सत्तरपेक्षा जास्त बळी

५ एप्रिल
जन्मदिवस: लेखक, शिक्षक आणि कृष्णवर्णीयांचे नेते बुकर टी. वॉशिंग्टन (१८५६), दलित नेते जगजीवनराम (१९०८), अभिनेता ग्रेगरी पेक (१९१६), विद्वान लेखक रफिक झकेरिया (१९२०)
पुण्यस्मरण: स्त्रीशिक्षिका, समाजसुधारक पंडिता रमाबाई (१९२२), प्रारणाचे जनुकांवर होणारे परिणाम शोधणारा नोबेलविजेता हर्मन मुलर (१९६७), 'वॉलमार्ट'चा प्रणेता सॅम वॉल्टन (१९९२), अभिनेत्री दिव्या भारती (१९९३), लेखिका लीला मजुमदार (२००७), साहित्यिक, लेखन, छायाचित्रकार, चित्रकार, पर्यावरणवादी पूर्णचंद्र तेजस्वी (२००७), इतिहासकार मोहम्मद इशाक खान (२०१३)

---

राष्ट्रीय समुद्र संपत्ती दिवस

१६६३ : शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानाची बोटे छाटली.
१७९४ : फ्रेंच राज्यक्रांती : क्रांतीचा एक नेता जॉर्ज दाँतों यावर सरकार उलथवण्याच्या कटाचा आरोप ठेवून त्याचा गिलोटीनवर शिरच्छेद.
१८०४ : नोंद झालेला पहिला अशनी स्कॉटलंडमधे पडला.
१९२२ : अमेरीकन बर्थ कंट्रोल लीग (पुढे प्लॅन्ड पेरेंटहूड) ची सुरुवात.
१९४९ : भारतात स्काऊट गाईडची स्थापना.
१९५७ : भारतात कम्युनिस्टांचा प्रथम विजय, केरळ विधानसभेत बहुमत आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद मुख्यमंत्रीपदी.
१९७९ : भारतातल्या पहिल्या नाविक वस्तुसंग्रहालयाचे मुंबईत उद्घाटन

६ एप्रिल
जन्मदिवस : चित्रकार राफाएल (१४८३), कोलेस्टेरॉल आणि मेदाम्लांच्या चयापचयाबद्दल शोध लावणारा नोबेलविजेता फ्योदोर लिनन (१९११), टेझर बंदुकीचा जनक जॅक कव्हर (१९२०), पेशींमधल्या क्रियांबद्दल संशोधन करणारा नोबेलविजेता एडमंड फिशर (१९२०), डी.एन.ए. मॉडेल शोधणारा जेम्स वॉटसन (१९२८), 'नॅशनल फिल्म आर्काईव्ह'चे संस्थापक पी.के. नायर (१९३३), अभिनेत्री सुचित्रा सेन (१९३१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ होर्स्ट स्टॉर्मर (१९४९), क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (१९५६), चित्रपट अभिनेता, निर्माता संजय सुरी (१९७१)
पुण्यस्मरण : चित्रकार, धातूकलाकार, गणिती, सैद्धांतिक अलब्रेख्त द्युरर (१५२८)

--

१६५६ : चंद्रराव मोरे याचा शिवाजी महाराजांनी पराभव करुन रायगड किल्ला सर केला.
१८१४ : नेपोलियन सत्तेवरून पायउतार आणि त्याची एल्बाला रवानगी.
१८६९ : पहिल्या थर्मोप्लास्टिक सेल्युलॉईडचे (celluloid) पेटंट.
१८९६ : आधुनिक ऑलिंपिक खेळांचे अथेन्समध्ये उद्घाटन. रोमन सम्राट थेडोसियस पहिला याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
१९१७ : पहिले महायुद्ध - अमेरिकेची जर्मनीविरोधात युद्धघोषणा.
१९१९ : म. गांधींच्या आदेशानुसार रॉलेट कायद्याविरोधात हरताळ पाळण्यात आला.
१९३० : म. गांधींचा दांडी सत्याग्रह.
१९४२ : विशाखापट्टणम आणि काकीनाडा बंदरांवर जपानी विमानांचा बॉंबहल्ला; बंगालच्या उपसागरात जपानी आरमार.
१९६५ : 'अर्ली बर्ड' हा पहिला दळणवळण उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थिर झाला.
१९७३ : गुरू, शनी, सौर वारे आणि वैश्विक किरणांचा अभ्यास करणारे पायोनियर-११ अवकाशात सोडले.
१९९८ : पाकिस्तानने मध्यम पल्ल्यांच्या क्षेपणास्रांची (भारतावर मारा करण्याची क्षमता असणारी) चाचणी केली.
२०१० : नक्षलवाद्यांशी लढताना दान्तेवाडा जिल्ह्यात ७६ सीआरपीएफ जवानांना वीरमरण.

७ एप्रिल

जन्मदिवस : रोमँटिक कवी विल्यम वर्डस्वर्थ (१७७०), सतारवादक पंडित रविशंकर (१९२०), सिनेदिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कोपोला (१९३९), अभिनेता जितेन्द्र (१९४२), सिनेअभिनेता जॅकी चॅन (१९५४), सिनेदिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा (१९६२), सिनेअभिनेता रसेल क्रो (१९६४)
पुण्यस्मरण : चित्रकार एल ग्रेको (१६१४), फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड (१९४७), कवी राजा बढे (१९७७), नर्तक केलूचरण महापात्र (२००४), फाळके पुरस्कारविजेते छायालेखक व्ही.के. मूर्ती (२०१४)
--
जागतिक आरोग्य दिन
११४१ : साम्राज्ञी माटिल्डा इंग्लिश राज्यकारभार करणारी प्रथम स्त्री ठरली.
१८२७ : जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता.
१९४८ : जागतिक आरोग्य संघटेनेची स्थापना.
१९४० : बुकर टी वॉशिंग्टन अमेरिकन पोस्टल स्टँपवर दिसलेले प्रथम कृष्णवर्णीय ठरले.
१९५५ : पोर्तुगीजांनी गोवा सोडावा अशी मागणी गोवा कॉंग्रेसच्या अधिवेशनात मंजूर.
१९६४ : आय.बी.एम. तर्फे सिस्टम/३६० (System/360) ची घोषणा.
१९६९ : आंतरजालाचा प्रतीकात्मक जन्मदिवस.
१९७८ : अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जिमी कार्टर यांनी न्यूट्रॉन बॉंबची निर्मिती पुढे ढकलली.
२००१ : 'नासा'चे 'मार्स ओडिसी' यान मंगळाच्या दिशेने निघाले.

८ एप्रिल
जन्मदिवस : पानांमधल्या हरितद्रव्यातला प्रकाशाशिवाय होणाऱ्या रासायनिक क्रिया - कॅल्व्हीन सायकल - शोधणारा नोबेलविजेता मेल्व्हीन कॅल्व्हीन (१९११), गायक, संगीतकार व संगीतसैद्धांतिक पं. कुमार गंधर्व (१९२४), यूएनचे माजी अध्यक्ष कोफी अन्नान (१९३८), अभिनेत्री रॉबिन राईट (१९६६)
पुण्यस्मरण : हुतात्मा मंगल पांडे (१८५७), लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (१८९४), गायक भास्करबुवा बखले (१९२२), कानातल्या तोल साधणाऱ्या यंत्रणेचा शोध लावणारा नोबेलविजेता रोबर्ट बरानी (१९३६), अभिनेता नानासाहेब (गोपाळ गोविंद) फाटक (१९७४), चित्रकार व शिल्पकार पाबलो पिकासो (१९७३), उद्योजक वालचंद दोशी (१९५३), सुपरफ्लुईडिटीचा शोध लावणारा नोबेलविजेता प्योत्र कापीत्सा (१९८४), ॲलर्जीविरोधक औषध शोधणारा नोबेलविजेता दानिएल बोव्हेत (१९९२), बहुमाध्यमी कलाकार सोल लेविट (२००७), संगीतज्ञ शरन रानी बाखलीवाल (२००८)
--
बुद्धाचा जन्मदिवस - जपान
१९११ : हायकी ओनस यांनी सुपरकंडक्टिव्हिटीचा शोध लावला.
१९२४ : केमाल अतातुर्क यांनी तुर्कीमधली शरीया न्यायालये बंद केली.
१९२९ : भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी संसदेच्या मोकळ्या जागेत बॉम्ब फोडले व पत्रके फेकली.
१९५० : भारत-पाकिस्तानमध्ये लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षऱ्या.
१९९२ : टेनिसपटू आर्थर ॲशला एड्स झाल्याचे जाहीर.
२००८ : इमारतीच्या बांधकामातच पवनचक्क्या असणारी पहिली इमारत बहारीनमधे पूर्ण झाली.

९ एप्रिल
जन्मदिवस : कवी बोदलेर (१८२१), छायाचित्रकार एडवर्ड मयब्रिज (१८३०), इतिहासतज्ज्ञ आणि लेखक राहुल सांकृत्यायन (१८९३), 'प्लेबॉय'चा निर्माता ह्यू हेफनर (१९२६), सरोदवादक शरन रानी बाखलीवाल (१९२९), अभिनेत्री जया बच्चन (१९४८)
पुण्यस्मरण : आधुनिक युरोपियन साहित्याच्या आरंभाचा महत्त्वाचा लेखक राबले (१५५३), विचारवंत फ्रान्सिस बेकन (१६२६), आख्यानकाव्यकार वामनपंडित (१६९५), वास्तुविशारद फ्रँक लॉईड राईट (१९५९), लेखक शंकरराव खरात (२००१), स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्ती आंद्रेआ ड्वॉर्किन (२००५), सिनेदिग्दर्शक व निर्माता शक्ती सामंत (२००९), सिनेदिग्दर्शक सिडनी ल्यूमेट (२०११)
--
जलसंधारण दिवस.
जागतिक कोकणी दिवस (गोवा).
स्वातंत्र्यदिन - जॉर्जिया (१९९१).
१८६० : एदुआर्द-लेऑन स्कॉत दे मार्तिनव्हीय याने मानवी आवाजाचे पहिले ज्ञात मुद्रण केले.
१८६७ : रश्याकडून अलास्का विकत घेण्याचा ठराव अमेरिकेत संमत.
१९६७ : बोईंग-७३७ चे पहिले उड्डाण
२००३ : सद्दाम हुसेनची कारकीर्द संपुष्टात.

१० एप्रिल
जन्मदिवस : आंतरराष्ट्रीय कायदा या संकल्पनेचे जनक ह्यूगो ग्रोशस (१५८३), पुलित्झर पारितोषिकाचा जनक जोसेफ पुलित्झर (१८४७), पिट्युटरी ग्रंथीतून रक्तशर्करा नियंत्रित होते हा शोध लावणारा नोबेलविजेता बर्नार्दो हूसे (१८८७), उद्योजक घनश्यामदास बिर्ला (१८९४), अर्थशास्त्रज्ञ, सहकार चळवळीचे आधारस्तंभ धनंजयराव गाडगीळ (१९०१), नाटककार मो. ग. रांगणेकर (१९०७), प्रयोगशाळेत क्लिष्ट रचनेचे नैसर्गिक पदार्थ बनवणारा नोबेलविजेता रॉबर्ट वुडवर्ड (१९१७), जनुकीय कोड शोधणारा नोबेलविजेता मार्शल निरेन्बर्ग (१९२७), गानसरस्वती किशोरी आमोणकर (१९३१)
पुण्यस्मरण : संत व कवी गोरा कुंभार (१३१७), विदुषी आणि रामदासस्वामींची मानसकन्या वेणाबाई (१६७८), ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर (१९३७), किसानबंधू डॉ. पंजाबराव देशमुख (१९६५), पंतप्रधान मोरारजी देसाई (१९९५), IVF आणि अन्य प्रजनन पद्धतींचा प्रणेता नोबेलविजेता सर रॉबर्ट एडवर्ड्स (२०१३)
--
१८७५ : स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
१९१२ : जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचा पहिला आणि शेवटचा प्रवास सुरू.
१९५३ : हॉलिवूडच्या मोठ्या स्टुडिओचा पहिला रंगीत त्रिमितीय (3 D) चित्रपट 'हाऊस ऑफ वॅक्स' प्रदर्शित झाला.
१९७२ : जैविक अस्त्रांच्या निर्मितीवर बंदी आणणारा पहिला बहुदेशीय 'जैविक अस्त्र करार' ७४ देशांनी स्वीकारला.
१९८२ : भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह 'इन्सॅट वन्'चे उड्डाण.
१९९८ : उत्तर आयर्लंड आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक शांतता करार.
१९९१ : कृत्रिम उपग्रहांचा वापर करून चक्रीवादळाचे पहिल्यांदा निरीक्षण.
२०१० : स्मॉलेन्स्क (रश्या) विमानतळावर पोलिश एअरफोर्सचे विमान कोसळून राष्ट्राध्यक्षांसकट ९६ लोक मृत्युमुखी.

११ एप्रिल
जन्मदिवस : मेंदूतील पेशींच्या बिघाडामुळे होणाऱ्या पार्किन्सनचे कारण शोधणारे डॉ. जेम्स पार्किन्सन (१७५५), लेखक, विचारवंत व समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले (१८२७), कस्तुरबा गांधी (१८६९), चित्रकार जामिनी रॉय (१८८७), गायक, अभिनेता कुंदन लाल सहगल (१९०४), 'सोनी' कंपनीचा सहनिर्माता मासारू इबुका (१९०८), क्रिकेटपंच बिली बावडन (१९६३)
पुण्यस्मरण : अणूवजनानुसार आवर्तसारणीची कल्पना मांडणारे रसायनशास्त्रज्ञ ज्युलियस लोथर मेयर (१८९५), वनस्पतीशास्त्रज्ञ ल्यूथर बरबँक (१९२६), 'मैला आंचल' आणि 'तिसरी कसम'साठी प्रसिद्ध साहित्यिक फणीश्वर नाथ 'रेणू' (१९७७), साहित्य अकादमी पुरस्कारविजेते लेखक विष्णु प्रभाकर (२००९)
--
रेल्वे सप्ताह
पहिला अ‍ॅपल कंप्युटर 'अ‍ॅपल-I' या नावाने उपलब्ध.
१९३० : ऋषिकेश येथील प्रसिध्द लक्ष्मण झुला लोकांसाठी खुला करण्यात आला.
१९३० : पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.
१९५५ : चीनचे प्रमुख झू एनलै यांना मारण्याच्या प्रयत्नात एअर इंडियाच्या 'कश्मिर प्रिंसेस' विमानात स्फोट, विमान दक्षिण चीन समुद्रात कोसळले.
१९५७ : ब्रिटनने सिंगापूरच्या स्वराज्यास मान्यता दिली.
१९७० : 'अपोलो १३'चे प्रक्षेपण.
१९७९ : युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन पदच्युत.
१९८३ : ५५व्या ऑस्कर सोहळ्यात 'गांधी' चित्रपटाला ८ पुरस्कार प्राप्त.

१२ एप्रिल
जन्मदिवस: जैन तीर्थंकर महावीर (४९९), सौरडागांचा अभ्यासक एडवर्ड मॉंडर (१८५१), 'आनंद' या मुलांच्या मासिकाचे संस्थापक-संपादक, 'मराठी शब्दरत्नाकर' हा मराठी-मराठी शब्दकोश, बंगाली-मराठी कोश रचणारे वासुदेव गोविंद आपटे (१८७१), स्नायूंमधे ऑक्सिजनचा वापर आणि चयापचय यांचा अभ्यास करणारा नोबेलविजेता ऑटो मेयरहॉफ (१८८४), नोबेलविजेता अर्थशास्त्रज्ञ यान टिंबरजेन (१९०३), लेखक पु. भा. भावे (१९१०), चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (१९२४), अभिनेता अँडी गार्सिया (१९५६)
पुण्यस्मरण: संस्कृत अभ्यासक महेश चंद्र भट्टाचार्य (१९०६), नेत्रपटलातल्या रंगद्रव्याचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉर्ज वॉल्ड (१९९७), 'स्मायली'चा जनक हार्वी बॉल (२००१), द. भारतीय अभिनेता राजकुमार (२००६), कवी आणि नाटककार मोहित चट्टोपाध्याय (२०१२)

---

स्वातंत्र्यदिन : सिरीया (१९४६)

१९३६ : पंडित नेहरूंनी कॉंग्रेस अधिवेशनात समाजवादाचा पुरस्कार केला.
१९६१ : सोवियेत संघाचा युरी गागारिन अंतराळात जाणारा प्रथम माणूस ठरला.
१९७५ : कंबोडियात यू.एस.चा पराभव. राजधानी प्नॉम पेन्ह साम्यवादी पक्ष ख्मेर रुजच्या ताब्यात
१९८१ : कोलंबिया अंतरिक्षयानाचे पहिले उड्डाण
१९९४ : 'युझनेट'वर सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली.
२००१ : इंडोनेशियात ८.५ आणि ८.२ रिश्टर क्षमतेचे लागोपाठ दोन भूकंप
२००९ : अतितेजीमुळे झिंबाब्वेने अधिकृतरित्या झिंबाब्वीय डॉलरचा त्याग केला.

१३ एप्रिल
जन्मदिवस : अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करणारे थॉमस जेफरसन (१७४३), भारतातले पहिले ('श्री पुंडलिक' नाटकाचे) चित्रीकरण करणारे दादासाहेब तोरणे (१८९०), नाटककार, नोबेलविजेता सॅम्युअल बेकेट (१९०६), स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत दत्ताजी ताम्हणे (१९१३), रश्यन ग्रँडमास्टर आणि राजकारणी गॅरी कास्परॉव्ह (१९६३), गायिका अॅलिसा मेंडोंसा (१९९०)
पुण्यस्मरण : इतिहास व भाषा विषयांमधील संशोधक व लेखक, मुंबई मराठी संशोधन मंडळाचे संस्थापक अ. का. प्रियोळकर (१९७३), अभिनेता बलराज साहनी (१९७३), लेखिका म्युरिएल स्पार्क (२००६), संगीतकार दशरथ पुजारी (२००८)
--
१७३१ : सातारचे शाहूराजे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्यात वारणेचा तह होऊन स्वराज्याचे दोन भाग झाले.
१७९६ : अमेरिकेत पहिला हत्ती आला. तो भारतातून पाठवला होता.
१८२९ : ब्रिटिश संसदेने रोमन कॅथॉलिक व्यक्तींना धर्मस्वातंत्र्य दिले.
१८४९ : ऑस्ट्रो-हंगेरियन हाब्सबर्ग साम्राज्यातून हंगेरी स्वतंत्र प्रजासत्ताक झाले.
१८७० : न्यू यॉर्कमधे मेट्रापोलिटन म्युझियम ऑफ आर्टची स्थापना.
१९१९ : जालियनवाला बाग हत्याकांड, ३७९ ठार.
१९४८ : भुवनेश्वर ही ओदिशा राज्याची राजधानी करण्यात आली.
१९७० : अपोलो १३मधील ऑक्सिजन टँकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
१९८४ : भारताने सियाचेन ग्लेसियरवर ताबा मिळवला.
२००६: देवदासी प्रथेचे उच्चाटन करणारे ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर.

१४ एप्रिल
जन्मदिवस : इतिहासकार आर्नोल्ड टॉयन्बी (१८८९), शनिची कडी, टायटन हा उपग्रह आणि दोलकाचे घड्याळ शोधणारा ख्रिस्तियन हॉयगन्स (१६२९), सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले (१८३३), हेलन केलरची शिक्षिका ॲन सुलीव्हान मेसी (१८६६), भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलित नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१), अभिनेत्री शांता हुबळीकर (१९१४), गायिका शमशाद बेगम (१९१९), सरोदवादक उस्ताद अली अकबर खान (१९२२), लेखक द.मा. मिरासदार (१९२७), विद्युतवाहक पॉलिमर्सचा शोध लावणारा नोबेलविजेता ॲलन मॅकडिरमिड (१९२७), गायिका, अभिनेत्री राजेश्वरी सचदेव (१९७२)
पुण्यस्मरण : चित्रकार जॉन सिंगर सार्जंट (१९२५), गणितज्ञ एमी नोथर (१९३५), तत्त्वज्ञ रमण महर्षी (१९५०), अभियंता, स्थापत्यविशारद मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या (१९६२), प्रसिद्ध भाषातज्ञ, इतिहासकार, 'व्होल्गा से गंगा तक'चे लेखन राहुल सांकृत्यायन (१९६३), प्रसिद्ध स्त्रीवादी आणि लेखिका सिमोन दी बोव्व्हार (१९८६), उद्योगपती राम प्रसाद गोएंका (२०१३), लेखक विलास सारंग (२०१५)
--
आंबेडकर जयंती
अभियंता दिन (भारत, विश्वेश्वरैय्या यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ)
१६९९ : गुरु गोविंद सिंग यांनी 'खालसा'ची स्थापना केली.
१७३६ : चिमाजीअप्पांनी जंजिऱ्याच्या सिद्दीचा पराभव केला.
१८२८ : नोआह वेबस्टर यांनी पहिल्या शब्दकोशाचा प्राधिकार घेतला.
१८६५ : जॉन विल्कस बूथने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यावर गोळी झाडली. लिंकन यांचे दुसऱ्या दिवशी निधन झाले.
१८९४ : 'कायनेटोस्कोप' वापरून पहिल्या व्यावसायिक चलत्चित्र दाखवणाऱ्या आस्थापनेचे न्यू यॉर्कमधे उद्घाटन.
१९१२ : टायटॅनिक जहाज हिमनगाला रात्री धडकून दुसऱ्या दिवशी बुडले.
१९४४ : मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या मालबोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
१९८१ : पहिले अवकाशयान, कोलंबिया, STS-1 याने आपली पहिली चाचणी यात्रा संपवली.
१९८६ : बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ बळी. गारांच्या वजनाचा हा विक्रम अबाधित आहे.
१९८८ : यू.एस.एस.आर.ने अफगाणिस्तानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
१९९४ : भारताने गॅट करारास मान्यता दिली.
२००३ : Human Genome प्रकल्प पूर्ण. ९९.९९% अचूकतेने ९९% जनुकांचा क्रम समजला.

१५ एप्रिल
जन्मदिवस : गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार लिओनार्दो दा विंची (१४५२), द्रवांच्या गतीचा अभ्यास करणारा लेनॉर ऑयलं (१७०७), लेखक हेन्री जेम्स (१८४३), समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहाइम (१८५८), विद्युतक्षेत्रातला स्टार्क परिणाम शोधणारा नोबेलविजेता योहानेस स्टार्क (१८७४), प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारा नोबेलविजेता निको टिंबरजेन (१९०७), गीतकार हसरत जयपुरी (१९२२), मराठी कवी सुरेश भट (१९३२), सारंगीवादक उस्ताद सुलतान खान (१९४०), लेखक जेफ्री आर्चर (१९४०), नोबेलविजेता रॉबर्ट लेफ्कोविट्झ (१९४३), अभिनेत्री, पटकथालेखिका एमा थॉमसन (१९५९), गायिका, अभिनेत्री सामंथा फॉक्स (१९६६), 'हॅरी पॉटर'साठी प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन (१९९०)
पुण्यस्मरण : कवी मोरोपंत (१७९४), कवी सेझार वालेहो (१९३८), लेखक रॉबर्ट म्यूजिल (१९४२), नोबेल नाकारणारा लेखक आणि तत्त्वज्ञ जॉं-पॉल सार्त्र (१९८०), लेखक जाँ जने (१९८६), अभिनेत्री ग्रेटा गार्बो (१९९०)
--
जागतिक आवाज दिवस.
हिमाचल राज्य स्थापना दिन.
१७५५ : सॅम्युएल जॉन्सन यांचा इंग्लिश शब्दकोश प्रकाशित.
१८१७ : थॉमस गॅलॉडेट आणि लॉरॉं क्लेर यांनी कर्णबधीरांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१८९२ : 'जनरल इलेक्ट्रिक' तथा GE ची सुरुवात.
१८९५ : रायगड किल्ल्यावर लोकमान्य टिळक यांच्या हस्ते 'शिवजयंती' उत्सवास सुरुवात.
१९२३ : मधुमेहावर उपचार म्हणून इन्सुलिन बाजारात उपलब्ध.
१९१२ : टायटॅनिक बोटीला जलसमाधी. १५१७ बळी.
१९५१ : आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे 'भूदान' चळवळ सुरु केली.
१९९५ : जागतिक व्यापार संघटनेची स्थापना.
२०१३ : बॉस्टन मॅरेथॉनमध्ये स्फोट, ३ ठार.
२०१९ : गॉथिक वास्तुकलेचा उत्कृष्ट आविष्कार असलेल्या पॅरिस येथील नोत्र दाम चर्चला आग.

१६ एप्रिल
जन्मदिवस : कार्बन डायॉक्साईडचा शोध लावणारा जोसेफ ब्लॅक (१७२८), नोबेलविजेता लेखक आनातोल फ्रांस (१८४४), तेलुगु समाज आणि साहित्यात क्रांती घडवून आणणारे समाजसुधारक कंडुकुरी वीरेसलिंगम (१८४८), पहिले विमान बनवणाऱ्या राईट बंधूंपैकी विल्बर राईट (१८६८), सिनेअभिनेता व दिग्दर्शक चार्ली चॅप्लिन (१८८९), नर्तक व नृत्यरचनाकार मर्स कनिंगहॅम (१९१९), अभिनेता पीटर युस्तिनॉव्ह (१९२१), लेखक किंग्जले अ‍ॅमिस (१९२२), लेखक आणि कलाकार मदनजीत सिंह (१९२४), मॉडेल आणि अभिनेत्री लारा दत्ता (१९७८)
पुण्यस्मरण : चित्रकार फ्रान्सिस्को गोया (१८२८), मादाम तुसॉंची संस्थापक, शिल्पकार मारी तुसॉं (१८५०), इतिहासकार व विचारवंत अ‍ॅलेक्सिस द तोकव्हील (१८५९), डीएनएची रचना शोधण्याचे श्रेय न मिळालेली रोझालिंड फ्रँकलिन (१९२०), सिनेदिग्दर्शक डेव्हिड लीन (१९९१), साहित्यिक व समीक्षक गो.मा. पवार (२०१९)

---

१८५३ : बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर भारतात पहिली प्रवासी रेल्वे धावली.
१८६२ : Emancipation Act अन्वये वॉशिंग्टन डी.सी. येथील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.
१९१९ : म. गांधींनी जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून एक दिवसाचा उपवास आणि प्रार्थना आयोजित केली.
१९२२ : गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनात विश्वभारती विद्यापीठ सुरू केले.
१९२२ : मुळशी सत्याग्रहाची सुरुवात.
१९४३ : अल्बर्ट हॉफमनने LSDच्या गुणधर्मांचा शोध लावला.
१९७० : चांद्रयान अपोलो-१३ पृथ्वीवर सुरक्षित परतले.
२००१ : भारत आणि बांग्लादेशात मेघालयाच्या काही भागावरून पाच दिवसांचा सीमाकलह.

१७ एप्रिल
जन्मदिवस : संतकवी सूरदास (१४७८), ब्रिटिशांविरोधात तमिळनाडू भागात उठाव करणारा धीरन चिन्नामलाई (१७५६), कोशकार यशवंत रामकृष्ण दाते (१८९१), जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान सिरीमाओ बंदरनायके (१९१६), सिनेदिग्दर्शक लिंडसे अँडरसन (१९२३), माजी पंतप्रधान चंद्रशेखर (१९२७), बिलिअर्डसपटू गीत सेठी (१९६१), तमिळ अभिनेता विक्रम (१९६६), अभिनेत्री जेनिफर गार्नर (१९७२), क्रिकेटपटू मुथैया मुरलीधरन (१९७२), 'स्पाईस गर्ल' गायिका व्हिक्टोरिया बेकहम उर्फ पॉश स्पाईस (१९७४), अभिनेता सिद्धार्थ (१९७९)
पुण्यस्मरण : संशोधक व राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७९०), 'भारत सेवक समाजा'चे आजीव सदस्य श्रीनिवास शास्त्री (१९४६), शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (१९७५),, राजा केळकर संग्रहालयाचे संचालक दिनकर गंगाधर केळकर (१९९०), वनस्पतीशास्त्रज्ञ, महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी या संस्थेचे माजी संचालक डॉ.वामन दत्तात्रय वर्तक (२००१), कन्नड लेखक वसंत दिवाणजी (२०१२), कवी, पत्रकार नित्यानंद मोहपात्रा (२०१२), गायक पं. शरद साठे (२०१९), लेखक, अनुवादक, कोशकार, ग्रंथपाल श्री.बा. जोशी (२०२१)

---
१३९७ : जेफ्री चॉसरने प्रथमच आपल्या 'कँटरबरी टेल्स' सांगितल्या.
१९५२ : भारताची पहिली लोकसभा स्थानापन्न.
१९६१ : पिग्सच्या आखातातील आक्रमण - क्युबात फिडेल कॅस्ट्रोची कम्युनिस्ट राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
१९७० : चांद्रयान अपोलो १३ मधले अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
१९७१ : बांगलादेश प्रजासत्ताकाची स्थापना.
१९७३ : कुरियर कंपनी फेडेक्सची सुरुवात.

१८ एप्रिल
जन्मदिवस : पेशवे सवाई माधवराव (१७७४), स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे (१८५८), चित्रकार विश्वनाथ नागेशकर (१९१०), उद्योजक मुकेश अंबानी (१९५७), वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल (१९५८), अभिनेत्री पूनम धिल्लों (१९६२)
पुण्यस्मरण : स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे (१८५९), स्वातंत्र्यसेनानी चाफेकर बंधू (१८९८), भौतिकशास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन (१९५५), प्राच्यविद्या संशोधक, भारतरत्न पां. वा. काणे (१९७२), प्राचीन काळात लांब अंतराच्या समुद्रसफरींची शक्यता तपासणारा शास्त्रज्ञ थॉर हेयरडाहल (२००२)
--
स्वातंत्र्यदिन : झिंबाब्वे (१९८०)
जागतिक वारसा दिवस
१३३६ : दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना झाली.
१९३० : सूर्यसेन यांच्या नेतृत्त्वाखाली चितगावच्या शस्त्रागारावर हल्ला.
१९१२ : टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.
१९४६ : 'लीग ऑफ नेशन्स' विसर्जित.
१९४६ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाची द हेग, नेदरलंड्समध्ये स्थापना.
१९५५ : बांडुंग, इंडोनेशियामध्ये पहिली आशिया-आफ्रिका परिषद.
१९६० : लंडनमध्ये हायड्रोजन बॉम्बविरोधात ६०,००० लोकांचे निदर्शन.
१९६१ : परराष्ट्रीय संबंधांमधला व्हिएन्ना करार मान्य झाला.
१९७५ : आर्यभट्ट हा भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह आकाशात सोडला गेला.

१९ एप्रिल
जन्मदिवस : पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक (१८९२), उद्योगपती पीटर दी नरोन्हा (१८९७), युरेनियमपेक्षा जड १० मूलद्रव्यांचा शोध लावणारा नोबेलविजेता ग्लेन सीबोर्ग (१९१२), गायिका मालती पांडे-बर्वे (१९३०), क्रिकेटपंच डिकी बर्ड (१९३३), अभिनेता अर्शद वारसी (१९६८), टेनिसखेळाडू मारिया शारापोव्हा (१९८७)
पुण्यस्मरण : रोमँटिक कवी लॉर्ड बायरन (१८२४), उत्क्रांतिसिद्धांताचा जनक, जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन (१८९२), क्यूरी परिणाम आणि रेडीयमवर संशोधन करणारा नोबेलविजेता पिएर क्यूरी (१९०६), क्रांतिकारक अनंत कान्हेरे कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे (१९१०), पर्यावरणवादी, लेखक जिम कॉर्बेट (१९५५), लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर (२००८), वृत्तपत्रउद्योजक सिवंती आदीतन (२०१३), अॅनिमेशनपट आणि चित्रपटदिग्दर्शक भीमसेन (२०१८), सिनेदिग्दर्शिका सुमित्रा भावे (२०२१)
---
सायकल दिन
UN मँडरीन भाषा दिवस.
१५३६ : बाबरने दिल्लीच्या इब्राहिमखान लोदीचा पराभव करुन मोगल साम्राज्य स्थापन केले.
१८३९ : १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात.
१९१० : क्रांतिकारक अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांना ठाणे कारागृहात फाशी.
१९१९ : अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.
१९२७ : मे वेस्ट या अमेरिकन अभिनेत्रीला 'सेक्स' नाटकातल्या बीभत्सपणासाठी दहा दिवसांचा कारावास.
१९७१ : पहिले स्पेस स्टेशन 'सॅल्यूट-१' अवकाशात.
१९७५ : 'आर्यभट्ट' हा भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह रश्याच्या साहाय्याने अवकाशात सोडला गेला.
१९८७ : 'द सिंप्सन्स' मालिकेची मर्यादित सुरूवात.
२०११ : ४५ वर्षांनंतर क्यूबाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीमधून फिडेल कॅस्ट्रोचा राजीनामा.

२० एप्रिल
जन्मदिवस : चित्रकार ओदिलाँ रेदाँ (१८४०), चित्रकार जोन मिरो (१८९३), संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य सोनोपंत दांडेकर (१८९६), उडिया लेखक गोपीनाथ मोहंती (१९१४), 'याहू'चा सहनिर्माता डेव्हीड फिलो (१९६६),
पुण्यस्मरण : 'ड्रॅक्युला'चा लेखक ब्रॅम स्टोकर (१९१२), बासरीवादक पं. पन्नालाल घोष (१९६०), 'दुर्दैवी रंगू' ह्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक व भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य (१९६८), कवी शकील बदायुनी (१९७०), 'रुचिरा'कार कमलाबाई ओगले (१९९९)

---

४/२० - आंतरराष्ट्रीय गांजा संस्कृती दिवस.

१२३३ : 'इन्क्विझिशन'ची सुरुवात.
१६५७ : न्यूयॉर्कमधल्या ज्यू लोकांना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
१७७० : कॅप्टन कुकच्या जहाजांना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
१८६२ : लुई पास्चर आणि क्लोद बर्नार यांनी अचानक जीवोत्पत्तीचा सिद्धांत खोडणारा प्रयोग पूर्ण केला.
१८६५ : समुद्र वा तलावातल्या पाण्याची पारदर्शकता मोजू शकणाऱ्या सेची चकतीचा पहिला प्रयोग पियेत्रो सेचीने दाखवला.
१९०२ : मेरी आणि पिएर क्यूरी यांनी रेडियम क्लोराईड पिचब्लेंडमधून वेगळे केले.
१९३९ : मध्य प्रांतातील मराठी विभागाचे एकीकरण करून विदर्भ नावाचा नवीन प्रांत बनविण्याची शिफारस करणारा ठराव प्रांतिक कायदेमंडळात संमत झाला.
१९७२ : इंजिनातल्या बिघाडावर मात करून अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
१९९२ : जी.एम.आर.टी.ची पहिली अँटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.
१९९९ : कोलंबाईन रक्तपात - अमेरिकेतल्या कोलंबाईन शाळेत दोघांनी केलेल्या बेछूट गोळीबारात त्यांच्यासह १५ मृत. शस्त्र बाळगण्याचे अमेरिकन स्वातंत्र्य त्या निमित्ताने चर्चेत.
२००१ : चीनमध्ये मानसिक आजारांच्या यादीतून समलैंगिकतेला वगळले.
२००२ : वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर याने २९वे शतक काढून ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
२०१२ : ५००० किमीपर्यंत माऱ्याची क्षमता असणाऱ्या 'अग्नि-५' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
२०१३ : फुकुशिमा दाईची अणूऊर्जा प्रकल्पातला शेवटचा रिअॅक्टर बंद.

२१ एप्रिल
जन्मदिवस : साहित्यिक, पर्यावरणावादाचा जनक समजला जाणारा जॉन म्युअर (१८३८), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रासाठी नोबेलविजेता, शास्त्रीय पद्धत यावर काम करणारा पर्सी ब्रिजमन (१८८२), जीवनसत्त्वांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल केरर (१८८९), चित्रकार ज. द. गोंधळेकर (१९०९), चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आर. सी. तलवार (१९१०), साहित्यिक सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन (१९१०), अभिनेता अँथनी क्विन (१९१५), क्रिकेटपटू एस. वेंकटराघवन (१९४५)
पुण्यस्मरण : "सारे जहां से अच्छा"चा कवी मुहंमद इक्बाल (१९३८), द्रविड चळवळीला चालना देणारा तमिळ कवी भारतीदासन (१९६४), अभिनेत्री निगार सुलताना (२०००), गज़ल गायिका इक़बाल बानो (२००९), भारतात समलैंगिकतेचा पहिला अभ्यास करणाऱ्या, गणितासाठी गिनेस बुकात नाव असणाऱ्या शकुंतलादेवी (२०१३)

--

सचिव दिन.

इ.पू. ७५३ : रोमन सम्राट रॉम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.
१५२६ : इब्राहिमखान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मोघल सत्तेची भारतात स्थापना.
१६५९ : शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट.
१७२० : बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवेपदी.
१७८२ : राजा बुद्ध योद्फा चुलालोक याने रात्तानकोसिन शहराची (बँकॉक) पायाभरणी केली.
१९५२ : पहिला सचिव दिवस (अनेक देशांमधला धर्मनिरपेक्ष सुट्टीचा दिवस) साजरा झाला.
१९४४ : फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९३२ : नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
१९८९ : तिआनानमेन चौकातील आंदोलनास प्रारंभ. क्रांतिकारी नेते हु याओबांग यांच्या स्मरणार्थ एक लाख विद्यार्थी जमा झाले.
१९९२ : सौरमालेबाहेरच्या PSR 1257+12 या पल्सारभोवती फिरणाऱ्या पहिल्या ग्रहाचा शोध.
२००९ : हत्तीगोठा (ता. धानोरा) इथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला करून १६ पोलिसांची हत्या केली.
२०१९ : कोलंबो येथे अनेक ठिकाणी आत्मघातकी बाँबस्फोट; इस्टरच्या निमित्ताने चर्चमध्ये जमलेले सुमारे २५० भाविक आणि इतर जण ठार.

२२ एप्रिल
जन्मदिवस : लेखक हेन्री फील्डिंग (१७०७), तत्त्वज्ञ इमानुएल कांट (१७२४), कानातल्या तोल साधणाऱ्या यंत्रणेचा शोध लावणारा नोबेलविजेता रॉबर्ट बरानी (१८७६), गायिका अंजनीबाई मालपेकर (१८८३), लेखक व्लादिमिर नाबोकॉव्ह (१८९९), अणुबॉंब बनवण्याच्या प्रकल्पाचा प्रमुख भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमर (१९०४), नोबेलविजेती न्यूरॉलॉजिस्ट रीटा लेव्ही-मोंटाल्चिनी (१९०९), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (१९१२), सिनेनिर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा (१९१४), व्हायलिनवादक येहुदी मेनुहीन (१९१६), गायिका, अभिनेत्री कानन देवी (१९१६), नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ डॉनल्ड क्रॅम (१९१९), चित्रकार रिचर्ड डिबेनकॉर्न (१९२२), भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक केळकर (१९२९), अभिनेत्री उषा किरण (१९२९), अभिनेता जॅक निकल्सन (१९३७), विज्ञानविषयक लेखक बाळ फोंडके (१९३९), फूटबॉलपटू काका (१९८२)
पुण्यस्मरण : लेखक मिगुएल द सर्व्हांटेस (१६१६), पहिला बाजीराव (१७४०), कोशकार, संस्कृतचे अभ्यासक व 'शाळापत्रक' मासिकाचे पहिले संपादक श्रीकृष्णशास्त्री रघुनाथशास्त्री तळेकर (१८८०), रॉल्स-रॉईसचा सहनिर्माता अभियंता हेन्री रॉईस (१९३३), चित्रकार व शिल्पकार केट कोलवित्झ (१९४५), लेखक वि. वि. बोकील (१९७३), अणुभंजनाचा शोध लावणाऱ्यांपैकी एक फ्रीत्झ श्ट्रासमन (१९८०), छायाचित्रकार ॲन्सेल ॲडम्स (१९८४), दोन मूलद्रव्य आणि प्रतिप्रोटॉन शोधणारा नोबेलविजेता एमिलीओ सग्रे (१९८९), कर्नाटक शैलीचे व्हायलिनवादक, गायक, संगीतकार लालगुडी जयरामन (२०१३), माजी सर्वोच्च न्यायाधीश आणि बलात्कारप्रतिबंधक कायद्याशी संबंधित समितीचे अध्यक्ष जगदीश शरन वर्मा (२०१३)
--
जागतिक वसुंधरा दिवस (१९७० पासून)
१८६४ : 'नाणे कायदा १८६४' नुसार सगळ्या अमेरिकन नाण्यांवर In God We Trust छापण्यास सुरुवात.
१९४४ : लढाईत हेलिकॉप्टरचा प्रथम वापर अमेरिकन सैन्याने 'चायना-बर्मा-इंडिया थिएटर'मधील लढाईत केला.
१९७७ : ऑप्टिकल फायबरचा टेलिफोन संदेशवहनासाठी प्रथम वापर.
१९७९ : विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले.
१९९३ : 'नेटस्केप'चा पूर्वावतार 'मोझेईक'ची १.० आवृत्ती आली.

२३ एप्रिल
जन्मदिवस : चित्रकार जे.एम.डब्ल्यू. टर्नर (१७७५), पुंजसिद्धांताचा जनक, नोबेलविजेता माक्स प्लान्क (१८५८), समाजसुधारक पंडिता रमाबाई (१८५७), समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे (१८७३), संगीतकार सेर्गेई प्रोकोफिएव्ह (१८९१), सुएझ कालवा प्रश्न सोडवणारा कनेडीयन पंतप्रधान लेस्टर पीअर्सन (१८९७), आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवलप्रवाहावर संशोधन करणारा नोबेलविजेता बर्थिल ओहलिन (१८९९), गायिका अन्नपूर्णादेवी (१९२७), अभिनेत्री शर्ली टेंपल (१९२८), गायक-संगीतकार रॉय ऑर्बिसन (१९३६), पार्श्वगायिका एस. जानकी (१९३९), दिग्दर्शक मायकल मूर (१९५४), अभिनेता मनोज बाजपेयी (१९६९), टेनिसपटू दानियेला हांतुखोवा (१९८३), अभिनेता देव पटेल (१९९०)
पुण्यस्मरण : नाटककार विल्यम शेक्सपिअर (१६१६), कवी विल्यम वर्डस्वर्थ (१८५०), गायक उस्ताद बडे गुलाम अली खाँ (१९६८), सिनेदिग्दर्शक सत्यजित राय (१९९२), गायिका शमशाद बेगम (२०१३)

---

जागतिक ग्रंथ दिन
जागतिक प्रताधिकार दिवस
संयुक्त राष्ट्रांचा इंग्रजी भाषा दिन

१९२७ : 'बालदिना'ची सुट्टी साजरी करणारा टर्की हा पहिला देश ठरला.
१९४२ : हिटलरपासून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेला ज्यूवंशी लेखक श्टेफान झ्वाईग आणि त्याची पत्नी यांनी आत्महत्या केली (२२ किंवा २३ एप्रिल). वाढती असहिष्णुता, वर्चस्ववाद आणि नाझी विचार यांमुळे मानवजातीच्या भविष्याविषयी सर्व आशा संपुष्टात आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. "I think it better to conclude in good time and in erect bearing a life in which intellectual labour meant the purest joy and personal freedom the highest good on Earth"
१९६७ : अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह याला घेऊन रश्याचे अंतराळयान सोयुझ-१ अंतराळात.
१९७१ : रझाकार आणि पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आता बांग्लादेश) मध्ये ३००० हिंदूंची कत्तल केली.
१९८४ : एड्स होण्यामागे कारणीभूत असणाऱ्या एच.आय.व्ही. विषाणूचा शोध.
१९९३ : मतदान करून एरित्रियनांनी इथिओपियापासून स्वातंत्र्याचा कौल दिला.
२००५ : 'यूट्यूब'चा सहनिर्माता जावेद करीम याने पहिला व्हिडीओ यूट्यूबवर चढवला.

२४ एप्रिल
जन्मदिवस: यंत्रमागाचा शोध लावणारा एडमंड कार्टराईट (१७४३), लेखक अँथनी ट्रॉलॉप (१८१५), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट वीनं (१८७३), चित्रकार विलेम द कूनिंग (१९०४), सिनेअभिनेता, लेखक, निर्माता व दिग्दर्शक राजा परांजपे (१९१०), द. भारतीय अभिनेता राजकुमार (१९२९), अभिनेत्री शर्ली मॅक्लेन (१९३४), गायिका व अभिनेत्री बार्बारा स्ट्राइसंड (१९४२), डीएनएमधली माहिती आरएनएमध्ये प्रसारित होते हे शोधणारा नोबेलविजेता रॉजर क्रॉनबर्ग (१९४७), फॅशन डिझायनर जाँ-पोल गोल्तिए (१९५२), लोककलावंत तीजन बाई (१९५६), क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (१९७३)
पुण्यस्मरण: लेखक डॅनिएल डीफो (१७३१), गायक दीनानाथ मंगेशकर (१९४२), चित्रकार जामिनी रॉय (१९७२), उद्योगमहर्षी शंतनूराव किर्लोस्कर (१९९४), अभिनेत्री, नाट्यदिग्दर्शिका व निर्माती पर्ल पदमसी (२०००)

--

जागतिक प्रयोगशाळा-प्राणी दिन
भारतीय जलसंपत्ती दिन.
प्रजासत्ताक दिन : गाम्बिया (१९७०)
वंशविच्छेद स्मृती दिन : आर्मेनिया
लोकशाही दिन : नेपाळ

१८०० : 'अमेरिकन लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'ची स्थापना
१८९१ : ऑस्कर वाइल्डलिखित पुस्तक 'द पिक्चर ऑफ डोरिअन ग्रे' प्रकाशित.
१९१४ : पुंज सिद्धांतामधला महत्त्वाचा फ्रँक हर्ट्झ प्रयोग जर्मन भौतिक संघटनेसमोर दाखवला गेला.
१९१५ : आर्मेनियन वंशविच्छेद - इस्तंबूलमध्ये आर्मेनियन वंशाच्या २५० बुद्धिवादी आणि नेत्यांना अटक; पुढे ऑट्टोमन साम्राज्यभर झालेल्या आर्मेनियन वंशविच्छेदाची ही सुरुवात होती. सुमारे ८ ते १५ लाख मृत. आजही तुर्कस्तानात ह्या हत्याकांडाच्या उल्लेखाला तुर्कस्तानचा अवमान केल्याच्या आरोपाखाली शिक्षा होऊ शकते.
१९२२ : ब्रिटिश साम्राज्य बिनतारी (रेडिओ) टेलिग्राफने जोडण्याची योजना कार्यान्वित; इंग्लंडमधून कैरोशी संदेशवहन सुरू.
१९२३ : सिगमंड फ्रॉईडने त्याचा मानसशास्त्रीय सिद्धांत Das Ich und das Es (The Ego and the Id) या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला. त्यात मांडलेल्या इगो, इड आणि सुपर-इगोच्या संकल्पनांनी आधुनिक मानसशास्त्राचा पाया घातला.
१९६७ : रश्याचे अंतराळयान सोयुझ-१ कोसळून अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी
१९७० : चीनचा पहिला उपग्रह 'डॉँग फँग हॉँग-१'चे प्रक्षेपण
१९८१ : आय.बी.एम.ने पहिला वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.
१९९० : खगोलातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचे प्रथम निरीक्षण करणाऱ्या हबल अवकाशदुर्बिणीचे प्रक्षेपण
२००५ : जगातला पहिला क्लोन केलेला कुत्रा जन्माला आला.
२००६ : नेपाळचा राजा ग्यानेंद्रने ४ वर्षांपूर्वी बरखास्त केलेल्या संसदेला पुन्हा मान्यता दिली.
२०१३ : बांगलादेशातील सर्वात भीषण औद्योगिक अपघात - औद्योगिक इमारत कोसळून ११२९ कामगार ठार; २५०० जखमी.

२५ एप्रिल
जन्मदिवस : ब्रिटनमधली राजेशाही संपवण्यात सहभागी राजकारणी ऑलिव्हर क्रॉमवेल (१५९९), लेखक वॉल्टर द ला मेअर (१८७३), भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ शोधणारा नोबेलविजेता मार्कोनी (१८७४), इलेक्ट्रॉनच्या कक्षांबद्दल सिद्धांत मांडणारा नोबेलविजेता वोल्फगँग पावली (१९००), गणितज्ञ आंद्रेई कोल्मोगोरोफ (१९०३), 'मराठी नियतकालिकांची सूची' हा तीन खंडांचा कोश तयार करणारे 'केसरी-मराठा ग्रंथशाळे'चे संस्थापक ग्रंथपाल शंकर नारायण बर्वे (१९१०), गायिका एला फिट्झजेराल्ड (१९१७), अभिनेता अल पचिनो (१९४०), ABBA पैकी एक गायक ब्यॉर्न ओल्व्हानेस (१९४५), अभिनेत्री रेने झेल्वेगर (१९६९),
पुण्यस्मरण : तापमानाचे एकक सुचवणारा आंदर्स सेल्सियस (१७०१), गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ सिमेऑं प्वासॉं (१८४०), ग्राफिक डिझायनर सॉल बास (१९९६), पत्रकार आणि बालसाहित्यकार पंढरीनाथ रेगे (१९९९), गायक पं. राजन मिश्रा (२०२१)

---

डीएनए दिन
जागतिक मलेरिया जागरूकता दिन
क्रांती दिन : पोर्तुगाल

१८५९ : सुएझ कालव्याच्या बांधकामाची ब्रिटिश आणि फ्रेंच अभियंत्यांकडून सुरूवात.
१९४६ : पत्री सरकारच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माफी दिल्याची घोषणा
१९५३ : पुनरुत्पादनाचे गुपित असलेली डीएनएची रचना प्रथम प्रकाशित झाली.
१९६१ : रॉबर्ट नॉईसला इंटिग्रेटेड सर्किटचे पेटंट मिळाले.
१९७२ : पोलरॉईड कंपनीने ताबडतोब फोटो छापून देणारा SX-70 कॅमेरा बाजारात आणला.
१९७४ : पोर्तुगालमध्ये जनतेने उठाव करून लोकशाही आणली.
१९८२ : रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात
१९८३ : अंतराळयान 'पायोनियर १०' प्लूटोच्या पलीकडे पोचले.
१९८९ : श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३ लाख २० हजार तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.

२६ एप्रिल
जन्मदिवस : भूशास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर (१९००), सर्वोच्च न्यायालयाचे माजी, मुख्य न्यायाधीश सर्वमित्र सिकरी (१९०८), अभिनेता जेट ली (१९६३)
पुण्यस्मरण : गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (१९२०), समाजसुधारक रमाबाई रानडे (१९२४), उच्च दाबाच्या औद्योगिक रसायनशास्त्रातील नोबेलविजेता कार्ल बॉश (१९४०), लेखक चिं.त्र्यं. खानोलकर (१९७६), शंकर-जयकिशन यांच्यापैकी शंकर सिंग रघुवंशी (१९८७)

---

जागतिक 'बौद्धिक संपदा' दिवस.

१५६४ : नाटककार विल्यम शेक्सपिअरला बाप्तिस्मा दिला, जन्मतारीख माहित नाही.
१८०३ : लेग्ल (फ्रांस)मधल्या उल्कापातामुळे उल्कांचे अस्तित्त्व मान्य झाले.
१९३७ : जर्मन 'लुफ्तवाफ'ने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. त्याचे परिणाम पाहून पाब्लो पिकासोने 'गर्निका' हे चित्र काढले.
१९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उदघाटन.
१९६२ : नासाचे 'रेंजर-४' हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
१९६४ : टांगानिका व झांझिबार यांनी एकत्र येऊन टांझानिया स्थापन केला.
१९८१ : डॉ. मायकल हॅरीसन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात सर्वप्रथम गर्भाशय उघडून अर्भकावर शस्त्रक्रिया केली.
१९८६ : चर्नोबिल इथे जगातली सगळ्यात भीषण अणू-दुर्घटना.

२७ एप्रिल
जन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)
पुण्यस्मरण : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)

--

स्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)
मुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.

१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.
१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.
१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.
१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.
१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.
१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.
१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.
२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.

२८ एप्रिल
जन्मदिवस : चित्रशाळेचे संचालक, लो. टिळकांचे सहकारी वासूकाका जोशी (१८५४), वायूमेघातून धूमकेतू तयार होतात हा सिद्धांत मांडणारा, रेडिओ खगोलशास्त्रज्ञ यान ओर्त (१९००), गणितज्ञ कूर्ट ग्योडल् (१९०६), ऑस्ट्रियन व्यापारी ओस्कार शिंडलर (१९०८), लांबोर्गिनी व्यवसायाचा जनक फेर्रूच्चिओ लांबोर्गिनी (१९१६), लेखक वसंत नरहर फेणे (१९२६), ऑस्करविजेती पहिली भारतीय महिला व सिनेवेशभूषाकार भानू अथैय्या (१९२९), लेखक मधु मंगेश कर्णिक (१९३१), अभिनेत्री पेनीलोपे क्रूझ (१९७४)
पुण्यस्मरण : पहिला बाजीराव (१७४०), ज्ञानपीठविजेते कन्नड साहित्यिक व्ही. के. गोकाक (१९९२),क्रिकेटपटू रमाकांत देसाई (१९९८)

--

१९१६: लो. टिळकांनी महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना केली. बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्टा हे अध्यक्षपदी होते.
१९२० : होमरूल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड.
१९३२ : पिवळ्या तापावर लस उपलब्ध झाली.
१९४५ : इटालियन विरोधकांकडून हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी याची गोळीबार करून हत्या.
१९५२ : अमेरिकेने जपानचा ताबा सोडला.
१९६७ : प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अलीने सैन्यात जाण्यास नकार दिला.
१९७६ : अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली अटक झालेल्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
१९८६ : चर्नोबिलच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी रश्याने ती मान्य केली.
२००१ : डेनिस टिटो हा पैसे देऊन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ पर्यटक झाला.
२००३ : 'ॲपल'ने 'आयट्यून' स्टोरची सुरुवात केली.

२९ एप्रिल
जन्मदिवस : गणितज्ञ, डॉक्टर व विनोदी लेखक जॉन आरबथनॉट (१६६७), चित्रकार राजा रविवर्मा (१८४८), गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता आँरी प्वॉंकारे (१८५४), ग्रीक कवी कॅव्हाफी (१८६३), ४० पेटंटे घेणारे आणि २०० शोध नावावर असणारे वैज्ञानिक शंकर आबाजी भिसे (१८६७), समस्थानिकांबद्दल संशोधन करण्यासाठी नोबेल मिळवणारा हॅरल्ड उरे (१८९३), जाझ पियानोवादक व संगीतकार ड्यूक एलिंग्टन (१८९९), सिनेदिग्दर्शक, कवी व छायाचित्रकार माया दरेन (१९१७), तबलावादक अल्लारखा (१९१९), पाश्चात्य संगीतसंचालक झुबिन मेहता (१९३६), अभिनेत्री, गायिका, बालसाहित्यिक व भाषांतरकार माधुरी पुरंदरे (१९५२), अभिनेता डॅनिएल डे ल्यूईस (१९५७), अभिनेत्री मिशेल फीफर (१९५८), टेनिसपटू आंद्रे आगासी (१९७०), अभिनेत्री उमा थर्मन (१९७०), गायक आनंद भाटे (१९७१), क्रिकेटपटू आशिष नेहरा (१९७९)
पुण्यस्मरण : ग्रीक कवी कॅव्हाफी (१९३३), तत्त्वज्ञ लुडविग विटगेनश्टाईन (१९५१), समीक्षक श्री. के. क्षीरसागर उर्फ श्रीकेक्षी (१९८०), सिनेदिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉक (१९८०), अभिनेता मोहन गोखले (१९९९), सिनेदिग्दर्शक, गीतकार व लेखक केदार शर्मा (१९९९), अर्थतज्ज्ञ जॉन केनेथ गॅलब्रेथ (२००६), LSDचा शोध लावणारा रसायनशास्त्रज्ञ अल्बर्ट हॉफमन (२००८), अभिनेता इरफान खान (२०२०)
--

आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस (आधुनिक बॅलेचा जनक जाँ-जॉर्ज नोव्हेरच्या जन्मदिनानिमित्त)
जपानी 'गोल्डन वीक'ला प्रारंभ
वर्धापनदिन : वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड

१९३७ : फिलिपिनो स्त्रियांना मताधिकार मिळण्यासाठी मतदान; ९०% जास्त मते मिळून स्त्रियांना मताधिकार मिळाला.
१९४५ : डाखाऊ छळछावणी मुक्त; जर्मनीची दुसऱ्या महायुद्धात बिनशर्त शरणागती, युद्ध सुरूच.
१९४६ : जपानी सम्राट तोजो आणि २८ इतर जपानी नेत्यांवर युद्धगुन्ह्यांबद्दल खटला सुरू.
१९५३ : जगातल्या प्रथम 3-D दूरचित्रवाणीचा कॅलिफोर्नियात प्रयोग.
१९६१ : लुशियानो पाव्हारोत्तीच्या ऑपेरा कारकीर्दीला सुरुवात.
१९६८ : 'हेअर' संगीतिकेचा ब्रॉडवेवर पहिला प्रयोग.
१९८२ : चीनच्या लोकसंख्येने १०० कोटींचा आकडा गाठला.
१९९१ : बांगलादेशात भीषण चक्रीवादळ; १,३८,००० मृत.
१९९२ : लॉस अँजेलेस येथे कृष्णवर्णीय रॉडनी किंगला मरहाण करताना सापडलेल्या चार श्वेतवर्णीय पोलिसांची खटल्याअंती निर्दोष सुटका; शहरात वांशिक दंगली सुरू; पुढे सहा दिवस दंगली चालू; सुमारे ५५ मृत व २,३०० जखमी.
१९९३ : 'सर्न'ने वर्ल्ड वाईड वेब हा प्रोटोकॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
१९९७ : रासायनिक शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याचा जागतिक करार लागू झाला.

३० एप्रिल
जन्मदिवस : गणिती, भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१७७७), भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके (१८७०), अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९०९), संगीतकार श्रीनिवास खळे (१९२६), सिनेदिग्दर्शिका जेन कॅम्पियन (१९५४), सिनेदिग्दर्शक लार्स व्हॉन ट्रायर (१९५६), क्रिकेटपटू रोहित शर्मा (१९८७)
पुण्यस्मरण : चित्रकार एदुआर माने (१८८३), 'स्पघेटी वेस्टर्न'चा दिग्दर्शक सर्जिओ लिओने (१९८९), अभिनेत्री अचला सचदेव (२०१२), अभिनेता ऋषी कपूर (२०२०)

--

आंतरराष्ट्रीय जाझ दिन.
१४९२ : स्पेनने कोलंबसाला दर्यावर्दी मोहिमेस जाण्याची परवानगी दिली.
१८९७ : जे.जे. थॉमसनने इलेक्ट्रॉनचा शोध लावल्याचे जाहीर केले.
१९३६ : वर्ध्याजवळ महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
१९४५ : दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव अटळ झाल्यावर क्रूरकर्मा हिटलरची आत्महत्या. सोव्हिएत सैनिकांनी बर्लिन येथील जर्मन संसदेवर (राइशस्टॅग) विजयी झेंडा फडकावला.
१९५२ : अॅन फ्रँकच्या दैनंदिनीचे इंग्लिशमध्ये भाषांतर.
१९७५ : सायगाववर कम्युनिस्ट फौजांचा ताबा. व्हिएतनाम युद्धाची अखेर.
१९९३ : टेनिसपटू मोनिका सेलेसवर चाकूहल्ला.
२००४ : इराकमधील अबु घ्राइब तुरुंगात अमेरिकन सैनिकांनी कैद्यांच्या केलेल्या छळाची छायाचित्रे आणि बातमी 'न्यू यॉर्कर'ने छापली. त्या घटनेचे जगभर पडसाद उमटले.
२००९ : क्राईस्लर कंपनीचे दिवाळे निघाले.