भाषा

स्वागत २०१४ च्या दिवाळी अंकांचे - १: अक्षर

निळू दामलेंचा 'पंतप्रधान विकणे आहे' हा लेख नेत्याचे मार्केटिंग या अभिनव कल्पनेचा वेध घेणारा आहे. परंतु हा बव्हंशी तपशीलाच्या, माहितीच्या पातळीवरच राहतो. विश्लेषण, विवेचन फारसे खोल जाताना दिसत नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

गंमत जंमत!

स्वाती व प्राची (दोघीं, सुमारे चार वर्षाचे असावेत) रोज काहीना काही खेळ खेळत असतात. समोर दिसेल त्या वस्तूंचा वापर करत खेळाच्या प्रकारात विविधता आणत असतात. परंतु त्यांचे खेळ नेहमीच नावीन्यपूर्ण असतात. कधी खोटा खोटा स्वयंपाक, कधी शाळा, कधी प्रवासाचे ठिकाण, कधी आजी आजोबांची, शेजार्‍यापाजार्‍यांची हुबेहूब नक्कल, आगगाडी, विमान, बाग इ.इ कुठलाही विषय असो, दोघी मनापासून खेळतात. त्यांच्या खेळात काही वेळा प्रत्यक्ष कृतीपेक्षा बडबड जास्त असते. व ती बडबड इतर कुणी ऐकत असल्यास त्यातील एक अवाक्षरही कळत नसते. तसे पाहता त्यांच्या संवादात नेहमीचेच शब्द असतात. परंतु त्यातून काहीही अर्थबोध होत नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा

BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे

अधिवेशन गीत स्पर्धा

हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे.

गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी.
विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

टेक्निकल रायटींगबद्द्ल माहिती हवी आहे.

' Technical writing / instructional designing ' या क्षेत्राबद्द्ल माहिती हवी आहे.

(१) या क्षेत्रातले नोकर्‍यांचे तसेच फ्रीलान्सिंग कामाचे स्वरुप, संधी याबद्द्ल माहिती हवीय.

(२) या क्षेत्रात कामासाठी स्वत:ला तयार करायचे असेल तर कोणती कौशल्ये शिकायला हवीत?आणि कशी?

(३) टेक्निकल रायटिंग (नुसतं software Tools नव्हेत तर content generation) चे प्रशिक्षण देणार्‍या चांगल्या संस्था कुठ्ल्या? यातले online courses करायचे असल्यास कोणत्या संस्थेचे करावेत?

आंतरजालावरून शोधलेल्या काही संस्था म्हणजे TECHTOTAL ,TWB , TECHNOWRITES आणि ibruk.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जुन्या मराठीचे नमुने

कलकत्त्याजवळील सेरामपूर छापखान्यामध्ये मिशनरी कामाचा भाग म्हणून अनेक पुस्तके देशी भाषांमधून छापली जात. मराठी शब्दकोश, व्याकरण अशी काही पुस्तके १८०५ ते १८२५ च्या काळामध्ये तेथे छापण्यात आली. 'A Grammar of the Mahratta Language' नावाचे एक पुस्तक १८०५ साली W. Carey, Teacher of the Sungskrit, Bengalee and Mahratta Languages in the College at Fort William ह्यांनी तेथे छापवून घेतले. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये Vidyunath, Cheif Mahratta Pundit in the College at Fort William ह्यांनी लेखकास साहाय्य केले असा उल्लेख आहे. (इंग्रज सत्ताधारी कामास उपयुक्त म्हणून शिक्षक नेनून त्यांच्याकडून देशी भाषा शिकत असत. संस्कृत, मराठी, बंगाली अशा भाषांसाठीच्या शिक्षकांस 'पंडित' आणि फारसी, उर्दू, अरेबिक ह्यांच्या शिक्षकांस 'मुन्शी' असे म्हणत असत. 'हॉब्सन-जॉब्सन' अशा मजेदार नावाच्या शब्दकोशात इंग्रजांच्या वापरातील पण हिंदुस्तानी भाषांपासून निर्माण झालेल्या शब्दांचा संग्रह आहे. तेथे 'मुन्शी',चा उगम अरेबिक 'मुन्सिफ'पासून दाखविला आहे. साधारणतः ह्याच दर्जाचे एतद्देशीय लोक न्यायखात्यातील सर्वात खालच्या पातळीवरच्या 'मुन्सिफ' ह्या हुद्द्यावर नेमले जात.) व्यापारी पत्रव्यवहारासाठी Moorh लिपीचा उपयोग सर्वत्र केला जात असला तरी Devu Nuguri लिपि सर्व वरच्या दर्जाच्या पुस्तकांसाठी वापरली जाते आणि व्याकरणातील बारकावे दाखविण्यासाठी ती अधिक उपयुक्त आहे म्हणून पुस्तक त्या लिपीमध्ये आहे असाहि उल्लेख प्रस्तावनेमध्ये आहे. पुस्तक books.google.com येथे e-book ह्या स्वरूपात येथे उपलब्ध आहे.

पुस्तकाच्या अखेरीस काही पानांवर भाषा कशी बोलली आणि वापरली जाते ते कळावे म्हणून काही संवाद छापले आहेत. मोल्सवर्थ-कँडी आणि त्यांचे पंडित ह्यांनी वळण लावण्यापूर्वी मराठी भाषा कशी होती हे दिसावे, तसेच तत्कालीन व्यवहारांची माहिती व्हावी अशासाठी त्यातील दोन संवाद खाली चित्ररूपाने चिकटवीत आहे.












धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

दिल्या घेतल्या वचनांची...

काही दिवसांपूर्वी बसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघातांचा’ हे वाक्य लिहिलेलं वाचलं आणि अचानक लक्षात आलं, की ‘शून्य’ हे संख्यावाचक विशेषण वापरलं की त्याचे विशेष्य अनेकवचनात वापरले जाते.

हे नेहमीच होते असे नाही. जसे, काही बसेसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’ हे वाक्य मी वाचले आहे. परंतु जास्त करून शून्यचे विशेष्य
एकवचनात वापरले तर खटकते, असे माझ्या लक्षात आले.
उदा.
* आज शून्य मूल आले होते. (* चा अर्थ- हे वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहे)
आज शून्य मुले आली होती.
* मी आज शून्य पोळी खाल्ली.
मी आज शून्य पोळया खाल्ल्या.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं नवीन अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप

नमस्कार मंडळी.

सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप तय्यार केले आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे अ‍ॅप निशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध आहे.

कित्त्येक वेळा आरत्या म्हणताना चुकतात किंवा आपल्याला शब्द आठवत नाहीत. अश्यावेळी, "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅप जरूर उपयोगी पडेल अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

तत्र श्लोकचतुष्टयम्|

"काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला।
तत्रापि च चतुर्थोऽङ्कस्तत्र श्लोकचतुष्टयम्॥"

(काव्यप्रकारांमध्ये ’नाटक’ हा प्रकार रमणीय, नाटकांमध्ये ’शाकुन्तल’, शाकुन्तलामध्ये त्याचा चौथा अंक आणि त्या अंकामध्ये ’चार श्लोक’.)

हा श्लोक ऐकून पुष्कळांना माहीत असतो.  ह्यामध्ये उल्लेखिलेले चार श्लोक म्हणजे निश्चित कोणते असा प्रश्न मला जाणवला.  तो मी तज्ज्ञांना विचारला असता चार निरनिराळी मते समोर आली.  त्यांचे हे संकलन.

पहिले मत असे सांगते की दाक्षिणात्य विचारानुसार हे श्लोक क्र. ६,९,१७,१८ असे आहेत.  ते खालीलप्रमाणे:

क्र. ६
यास्यत्यद्य शकुन्तलेति हृदयं संस्पृष्टमुत्कण्ठया
कण्ठस्तम्भितबाष्पवृत्तिकलुषश्चिन्ताजडं दर्शनम्।
वैक्लव्यं मम तावदीदृशमहो स्नेहादरण्यौकसः
पीडयन्ते गृहिणः कथं नु तनयाविश्लेषदुःखैर्नवैः॥

(पिता काश्यपमुनि म्हणतात) आज शकुन्तला जाणार ह्या विचाराने माझे हृदय सैरभैर झाले आहे, अश्रु थांबवलेला माझा गळा भरून आला आहे, अरण्यात निवास करणार्‍या माझी जर प्रेमामुळे अशी विक्लव स्थिति झाली आहे तर सामान्य गृहस्थ कन्याविरहाच्या दु:खाने किती व्यथित होत असतील?

क्र. ९
पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु या
नादत्ते प्रियमण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम्।
आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः
सेयं याति शकुन्तला पतिगृहं सर्वैरनुज्ञायताम्॥

(काश्यपमुनि अरण्यातील वृक्षांना उद्देशून) तुम्हाला पाणी दिल्याशिवाय जी स्वत: पाणी पिऊ शकत नाही, आभूषणे धारण करण्याची हौस असतांनाहि तुमच्यावरील स्नेहामुळे जी तुमचे पान तोडत नाही, तुम्ही फुलांनी फुलण्याच्या प्रसंगाआधीच जिचा उत्सव सुरू होतो, अशी ही शकुन्तला पतिगृही जायला निघते आहे.  तिला सर्वांनी त्यासाठी सम्मति द्यावी.

क्र. १७
अस्मान् साधु विचिन्त्य संयमधनानुच्चैः कुलं चात्मन
स्त्वय्यस्याः कथमप्यबान्धवकृतां स्नेहप्रवृत्तिं च ताम्।
सामान्यप्रतिपत्तिपूर्वकमियं दारेषु दृश्या त्वया
भाग्यायत्तमतःपरं न खलु तद्वाच्यं वधूबन्धुभिः॥

(काश्यपमुनि शकुन्तलेच्या सोबतीला निघालेल्या आपल्या शार्ङ्गरवनामक शिष्याबरोबर दुष्यन्ताला संदेश देतात) संयम हेच धन मानणार्‍या आमचा आणि स्वत:च्या उच्च कुलाचा विचार मनात ठेवून, तसेच आम्हा बान्धवांच्या साहाय्याशिवाय तुझ्या मनात हिच्याविषयी जी प्रेमभावना निर्माण झाली ती ध्यानात ठेवून आपल्या अन्य पत्नींसारख्याच समान स्थानाची ही एक असे तू हिच्याकडे पहावेस.  ह्या पलीकडील सर्व भविष्याच्या आधीन आहे, वधूच्या संबंधितांनी ते बोलावयाचे नसते.

क्र. १८
शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने
भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः।
भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी
यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामाः कुलस्याधयः॥

(काश्यपमुनि शकुन्तलेस उद्देशून) मोठयांची सेवा कर, अन्य सवतींशी मैत्रिणींप्रमाणे वाग, पतीने राग केला तरी रुष्ट होऊ नकोस, सेवकांशी आदरपूर्वक वर्तणूक ठेव आणि स्वभाग्यामुळे गर्व बाळगू नकोस.  असे करणार्‍या स्त्रिया गृहिणी म्हणून आदरास पात्र होतात, ह्याउलट वागणार्‍या कुटुंबाला खाली नेतात.

दुसर्‍या मतानुसार भाषान्तरकार एम. आर. काळे हेच श्लोक क्र. ६, १८, १९, २० असे सांगतात. पैकी क्र. ६ आणि १८ वर दिले आहेत.  उरलेले दोन असे:

क्र. १९
अभिजनवतो भर्तुः श्लाघ्ये स्थिता गृहिणीपदे
विभवगुरुभिः कृत्यैस्तस्य प्रतिक्षणमाकुला ।
तनयमचिरात् प्राचीवार्कं प्रसूय च पावनं
मम विरहजां न त्वम् वत्से शुचं गणयिष्यसि ॥

बाळे, उच्चकुलीन पतीच्या श्लाघ्य अशा गृहिणीपदी पोहोचलेली आणि त्याच्या स्थानाला साजेशा अशा त्याच्या कार्यांमध्ये सदैव गुंतलेली अशी तू पूर्व दिशेने सूर्याला जन्म द्यावा तसा लवकरच पुत्राला जन्म दिल्यानंतर मजपासून दूर गेल्याच्या दु:खाला मागे टाकशील.

क्र. २०
भूत्वा चिराय चतुरन्तमहीसपत्नी
दौष्यन्तिमप्रतिरथं तनयं निवेश्य।
भर्त्रा तदर्पितकुटुंबभरेण साकं
शान्ते करिष्यसि पदं पुनराश्रमेऽस्मिन्॥

(मी पुन: ह्या तपोवनात केव्हा येईन असे शकुन्तलेने विचारल्यावर काश्यपमुनि उत्तर देतात) दिगन्तापर्यंतच्या पृथ्वीची सपत्नी म्हणून दीर्घ काळ गेल्यावर, ज्याच्यासमोर दुसरा रथी उभा राहू शकत नाही अशा दुष्यन्तपुत्राचा विवाह करून दिल्यानंतर आणि सर्व कुलभार त्याच्यावर सोपविल्यानंतर ह्या शान्त अशा आश्रमात पतीसह तू पुन: परतशील.

तिसरे मत ’शतावधान’ नावाच्या टीकाकाराच्या हवाल्याने असे सांगते की हे श्लोक क्र. १७, १८, १९, २० असे आहेत.  ह्यांची भाषान्तरे वर दिलीच आहेत.

शेवटच्या मतानुसार हे श्लोक क्र. ६,९,१०,११ असे आहेत.  त्यापैकी क्र. ६ आणि ९ वर दिलेच आहेत.  उरलेले दोन श्लोक असे:

क्र. १०
अनुमतगमना शकुन्तला तरुभिरियं वनवासबन्धुभि:।
परभृतविरुतं कलं यथा प्रतिवचनीकृतमेभिरीदृशम्॥

(वरील श्लोकापाठोपाठ कानी पडलेला कोकिळेचा सूर ऐकून काश्यपमुनि अरण्यानिवासातील बंधु असे जे वृक्ष त्यांनी शकुन्तलेच्या गमनाला मधुर कोकिलगानाच्या प्रतिवचनाने अनुमति दर्शविली आहे.

क्र. ११
रम्यान्तर: कमलिनीहरितै: सरोभि-
श्छायाद्रुमैर्नियमितार्कमयूखताप:।
भूयात्कुशेशयरजोमृदुरेणुरस्या:
शान्तानुकूलपवनश्च शिवश्च पन्था:॥

(आकाशवाणी)  कमलवेलींमुळे हिरव्या दिसणार्‍या सरोवरांनी रमणीय केलेला, दाट सावल्यांच्या वृक्षांमुळे सूर्यकिरणांचा ताव नियंत्रित झालेला, ज्यातील धूळ कमळाच्या केसरांप्रमाणे मृदु आहे असा, जेथील वारा शान्त आणि अनुकूल आहे असा हिचा मार्ग मंगल होवो.

(रणरागिण्यांसाठी वैधानिक चेतावणी - कालिदासाने जेव्हा हे लिहिले तेव्हा ’मिळून सार्‍याजणी’चे अंक त्याच्या वाचनात आले नव्हते म्हणून त्याच्याकडून असे पुरुषप्रधान विचारांचा उदोउदो करणारे लेखन झाले. त्याच्या वतीने मीच क्षमायाचना करतो.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 

शुद्धलेखन चिकीत्सक

मोझिलाच्या फायरफॉक्सवर मराठी शुद्धलेखन चिकीत्सकाचं अॅड-अॉन आहे. Marathi (India) Dictionary 9.3 असं सध्या माझ्या फायरफॉक्समधे दिसतं. यात नवे शब्द, आपल्या संगणकातल्या शब्दकोशात टाकण्याची सोय आहे.

लेखन करताना जो खोका दिसतो, किंवा चॅट, इमेल लिहीताना 'कंपोज'च्या खोक्यात अशुद्ध शब्द अधोरेखित होतात. अर्थातच या चिकीत्सकाला पुलेशु, किंवा प्रकाटाआ किंवा ल्यापटॉप असे शब्द समजत नाहीत. पण आपल्या संगणकापुरतं आपण त्याला शहाणं करू शकतो. 'पोटऱ्या' हा शब्द त्याला समजला नाही तेव्हा आश्चर्य वाटलं, पण साधारणपणे हा चिकीत्सक उपयुक्त आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - भाषा