सामाजिक

बोन्साय

Taxonomy upgrade extras: 

'चौकट राजा' हा चित्रपट पाहिल्यापासूनच 'बोन्साय' या प्रकाराबद्दल मनात काही प्रमाणात अढी होती. पण हे नक्की कसं करतात याबद्दल अनेक प्रश्नही होतेच. एक दिवस राजधानीच्या शहरात भेटायचं आहे तर आर्बोरिटमला जाऊन बोन्साय गार्डन पाहू, असं २ विरूद्ध शून्य अश्या प्रचंड मताधिक्याने ठरलं. नेहेमीप्रमाणे जरूरीपुरतं इंप्रेशन मारण्याएवढी माहिती आपल्याला असावी या विचाराने मी विकीपिडीयावरचं बोन्सायचं पानही वाचलं.

परंपरा आणि नव्या जाणीवा ("पेड्डामानिषी"च्या निमित्ताने )

Taxonomy upgrade extras: 

या संकेतस्थळावर कालपरवाच झालेल्या पेड्डामनिषी किंवा "हाफ सारी" समारंभाच्या चर्चेने अनेक मुद्दे-प्रतिमुद्दे पुढे आले. विषयाशी संबंधित बर्‍याचशा मुद्द्यांचा परामर्ष त्या धाग्यावरच घेतला गेला आहे. तरी या निमित्ताने काही अधिक खोलवरचे मुद्दे पुढे येतात असं वाटलं म्हणून हा नवा धागा.

एकंदर चर्चा वाचल्यानंतर दोन प्रमुख मुद्दे समोर आले असं वाटलं.

स्ट्रेट फ्रॉम द हार्ट .

Taxonomy upgrade extras: 

कुठलीही चळवळ एका विशिष्ट हेतु च्या प्रचारासाठी अन्य्याया चा विरोध करण्यासाठी सुरु होत असते. समलैंगिक चळवळ ही समलैंगिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात काम करते. समलैंगिक हे ही इतरांसारखेच सामान्य आहेत त्यांना त्यांची लैंगिकता जोपासण्याचा हक्क आहे. आदि महत्वपुर्ण अशा हक्कासाठी ही चळवळ काम करते. माझा या चळवळीला विरोध नाही. त्यांच्या हक्कांची व स्वातंत्र्याची मी कदर करतो. मात्र मला या चळवळीने जे सध्या एक नकारात्मक वळण घेतलेले आहे त्याविषयी आणि दुसरी बाब म्हणजे त्यांच्यातही काही दोष आहेत त्या विषयी आता इथे माझे म्हणणे मांडायचे आहे. या चळवळीतल्या लोकांची एक नकारात्मक बाजु देखील आहे.

डान्स बार व बैलांचे हाल - उर्फ - बंदी - एक उठवणे

Taxonomy upgrade extras: 

डान्स बार व बैलांचे हाल उर्फ बंदी - एक उठवणे
.

बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी मागे घेणाच्या केन्द्रसरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही बंदी तूर्त तरी कायम राहणार आहे. मागच्या महिन्यात ही बंदी मागे घ्यावी म्हणून सातारा की कोल्हापूर भागात राष्ट्रीय हमरस्ता अडवला गेला होता. या आंदोलनानंतरही ही बंदी उठवली नाही, तर यापेक्षाही उग्र आंदोलन करावे लागेल अशी धमकीही देण्यात आली होती. तू मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, अशा प्रकाराने ती नंतर उठवल्याचे दिसले.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक