इतर

सिंधुआज्जींच्या चमत्कारिक कहाण्या

अनेक वर्षे विस्मृतीत गेलेल्या सिंधुआज्जींची प्रकर्षाने आठवण झाली, आणि त्यांच्या आठवणी जणू चलचित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोरून झरझर गेल्या.

आमच्या सोसायटीत तळमजल्यावरील एक बिऱ्हाडात सिंधुआज्जी एकट्याच रहायच्या. म्हणजे त्या आणि त्यांचे पाळीव प्राणी. सिंधुआज्जींकडे एक काकाकुवा, फिशटॅन्कमधले मासे, एक पांढरीधोप मनीमाऊ, आणि एक झिपरे अस्वल होते. स्लाॅथ्या अस्वलाचे खेळ करून त्या स्वतःच्या टाईमपासची सोय करत. (अर्थार्जनासाठी त्यांचे एक प्रोटेक्शन रॅकेट होते.)

ललित लेखनाचा प्रकार: 

पावसातल्या आठवणी

असा पाऊस कोसळत असला, की मन आपसूक भूतकाळाकडे धाव घेतं. सगळ्या चिंता क्षणात विसरल्या जातात, आणि ऐंशीच्या दशकातलं ते निरागस बालपण डोळ्यांसमोर येतं.

असा पाऊस कोसळत असला, तरी शाळेत जावं लागायचंच. डोक्यावर इरलं, पाठीवर दप्तर, एका हातात डबा-वाॅटरबॅग आणि दुसर्‍या हातात चित्रकला-हस्तकला यांच्या सामानाची पिशवी असा जामानिमा करून आम्ही शाळेत जायचो. एवढं करून शाळेला सुट्टी दिली असेल तर जरा रागच यायचा. मग कॅन्टीनमध्ये वडापाव किंवा गोभी मांचुरियन खाऊन अंगात जरा ऊब यायची आणि आम्ही घरी परतायचो.

ललित लेखनाचा प्रकार: 

सामान्यांच्या विचित्र आवडी --१४ टॅन आणि तिमा

फार दिवसापासून जे डोक्यात होतं ते १४ टॅन ह्यांचा http://www.aisiakshare.com/node/6957 हा धागा पाहून वर आलं. आपल्याकडे "लोकप्रिय" , "फेमस" वगैरे आवडी म्हटल्या की त्या आपोआप सामान्य, नॉर्मल समजल्या जातात. मला तरी खूपदा त्याच्याशी जोडून घेणं, आवडून घेणं जमत नाही. आणि "ह्यात आवडण्या सारखं काय आहे?" असा प्रश्न पडतो. काही ठळक उदाहरणं म्हणजे वडापाव, पावभाजी आणि मिसळपाव ह्या पदार्थांचा उदोउदो.

ललित लेखनाचा प्रकार: 

चोरीचा मामला

दुपारपास्नं डोकं जड झालं होतं. दोनच दिवस झाले होते, पण विथड्राॅअल सिम्प्टम्स् मेजर जाणवायला लागले होते.

शेवटी असह्य झालं. ताडकन् लाथेनं पांघरूण फेकलं, टीशर्ट घातला आणि घराबाहेर पडलो. मह्याला हाक मारली. तो बहुतेक माझी वाटच बघत होता भेंजो.

आमची हाऊसिंग सोसायटी जरा गावाबाहेर आहे. ("एक्स्क्लुझिव एक्स्क्लेव्ह" अशी जाहिरात केलेली बिल्डरने. भेंजो मराठी रंगार्‍याची वाट लागली असणार जोडाक्षरं लिहिताना.) तर मेनरोडवरनं खाली येणारा रस्ता वळतो तिथे जरा सुनसान असतं. लाईटपण पोरांनी क्रिकेट खेळताना फोडलीय आणि एवढ्या लांब सोसायटीने सीसीटीव्हीपण नाही लावलाय.

ललित लेखनाचा प्रकार: 

कल्ला

मुंबईतनं आलेलो इथे. सगळे बोललेले की लहान गावात कशाला जाताय तुम्ही म्हणून. पण हे काय लहान गाव नाही, आणि मोठं शहरपण नाय वाटत. मालाडला स्टेशनजवळ घर होतं आपलं मस्त. पोरं जास्तकरुन गुजराती. मेहुल, राजेश, निलेश अशी. थोडी आपल्यासारखी. मराठी. परब, कांबळी, करमरकर वगैरे. पण इथे सगळेच मराठी. आणि बोलायला भेंडी एका वाक्यात १-२ शिव्या तर येणार म्हणजे येणारच! शिवाय इथलं घर मोठं आहे. ४ खोल्या आहेत. मस्त एरिया आहे, झाडीबिडी आहे आजुबाजुला. शाळा आहे जरा लांब पण काय फरक पडत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

इंटलेक्चुअल निगेटिव्ह

आता हे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक अजिबातच नाही. जुन्या कोडॅक कॅमेऱ्यांची जी फिल्म यायची, त्यातली निगेटिव्ह. आजच्या पिढीला जुन्या फोटोची निगेटिव्ह दाखवली तर त्यांना ती कदाचित दुसऱ्या प्लॅनेटवरची गोष्ट वाटू शकते. मला कधी कधी प्रश्न पडतो की हे कम्पॅरिझन कुठून येतं ? आपलं दुसऱ्याशी कम्पॅरिझन करणं असो किंवा या पिढीचं दुसऱ्या पिढीशी, मग ती आधीची असो किंवा आलेली नवीन पिढी. कदाचित बदल पडताळून घेण्यासाठी माणूस हे कम्पॅरिझन करत आला असावा. न जाणता माणसाच्या प्रजातीत बदल होतो आहे हे तपासून घेतलं जात असेल आणि हे कधी थांबणार नाही. खरंतर हे थांबून चालणार सुद्धा नाहीच.

ललित लेखनाचा प्रकार: 

अध्यात्माला विनोदाचे वावडे नाही :)

अध्यात्मिक स्तोत्रे, मंत्र, पोथी, पुराणे वाचत असतेवेळीच लक्षात आले होते की स्तोत्रांतही बरेच प्रकार आहेत, स्तुती, कवच, भुजंगस्तोत्रे, अष्टके,नामावली, अभंग आणि अन्य काही. स्तुती, अष्टके आणि भुजंगस्तोत्रे. या प्रकारांत देवांचे स्तुतिपर वर्णन असते, अनेक सुंदर उपमा, रुपकांच्या लडी उलगडतात ज्या की मंत्रमुग्ध करुन सोडणाऱ्या असतात, उत्कृष्ट असे काव्याचे नमुने असतात. याउलट कवचांमध्ये काहितरी मागितलेले असते. उदाहरणार्थ त्या देवतेची विविध नावे गुंफुन माझे पूर्वेकडुन शंकर, पश्चिमेकडुन वामदेव, दक्षिणेकडुन त्र्यंबक, प्रवासात स्थाणु .... वगैरे रक्षण करो. म्हणजे यात देवांना कामाला लावलेले असते.उदा.-\

ललित लेखनाचा प्रकार: 

वात्रटिका : राधिकेचा फोन

गुरुनाथ शयाना सोबत गुटरगूं करत आहे, तेवढ्यात मोबाईलची घंटी वाजते,काहीसा वैतागून गुरुनाथ फोन उचलतो

गुरुनाथ: हं, बोल राधिका

राधिका: अहो, मला तुझी आणि शयानाची माफी मागायची आहे.

गुरुनाथ: का! म्हणून?

ललित लेखनाचा प्रकार: 

पुस्तक परीक्षण - युगंधर

पुस्तक परीक्षण - युगंधर: शिवाजी सावंत (लेखक: निमिष सोनार, पुणे)

2018 साली युगंधर मी एक अतिशय महत्त्वाची कादंबरी वाचली. सलग नाही तरी थोडी थोडी रोज अशी वाचली. "युगंधर" ही शिवाजी सावंत यांची मी वाचलेली पहिलीच कादंबरी. महाभारत, कृष्ण, भगवदगीता आणि श्रीमदभागवत या विषयांवर मला अखंडपणे वाचायला, लिहायला, चर्चा करायला आणि अभ्यासपूर्ण चिंतन करायला आवडते. याच हेतूने युगंधरही वाचली.

ललित लेखनाचा प्रकार: 

भेटी लागी जीवा: आत्तापर्यंत काय घडले?

भेटी लागी जीवा: आत्तापर्यंत काय घडले? लेखक: निमिष सोनार, पुणे

सोनी मराठी या वाहिनीवरची "भेटी लागी जीवा" ही खूप चांगली सिरीयल आहे. स्टार प्लस महाभारतातील शंतनू, कलर्स वरच्या सम्राट अशोक मधला बिंदुसार आणि सोनीवरच्या बाजीराव पेशवा मधला शाहू महाराज या दमदार भूमिकेनंतर बऱ्याच काळानंतर समीर धर्माधिकारी मराठीत आलेला आहे! आतापर्यंत "भेटी लागी जीवा" मध्ये काय घडले हे येथे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे यापुढचे एपिसोड जरी तुम्ही बघितले तरी ते समजतील!

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर