गद्य

आईचं घर ( वाडा म्हणजे संस्कारांची खाण )

खरंच ! आईच्या घराशी माझं फार जवळचं भावनिक नातं आहे. माझा जन्मच मुळी शनिवार पेठेतला, १९५६ सालचा , माझ्या मोठया भावाचा , विनोद रावांचा ( आता रिटायर्ड कंपनी सेक्रेटरी ) माझ्या आधी दोन वर्ष, माझी धाकटी बहिण, वीणा ( पेंडसे - फडके ) माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान, जी सध्या ' आई रिटायर होतेय ' मधे आईची भूमिका करत असते. शनिवार पेठेत म्हणजे ३७३, शनिवार : कन्याशाळा ते सुयोग मंगल कार्यालय यांना जोडणाऱ्या गल्लीत . सुयोगच्या पलिकडे अहिल्यादेवी.

ललित लेखनाचा प्रकार: 

माझी पहिली सायकल

माझी पहिली सायकल ही ' फिलिप्स ' मेकची आणि ' मेड इन इंग्लंड ' होती आणि ती ही लेडीज सायकल होती , असं मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ; पण हे अगदी खरं आहे !..
त्याचं असं झालं की ,माझे वडिल हे म. न.पा मध्ये नोकरीला होते. त्यांची झाली बदली ऑक्ट्रॉय नाक्यावर बोपोडीला. ३७३, शनिवार पेठेतल्या आमच्या घरातून (आताची पेपर गल्ली ) , रोज बोपोडीला जायचं म्हणजे काहीतरी वाहनाची गरज होती. त्यांच्याच ऑफिसमध्ये 'हुसेन ' नावाचा एक सहकारी होता. दोघे अगदी जिवलग मित्र बनले होते. हुसेनच्या भावाचा नव्या-जुन्या सायकल्सचा ट्रेडिंगचा व्यवसाय होता रविवार पेठेत. पुणे तेंव्हा सायकलचं शहर होतं ..

ललित लेखनाचा प्रकार: 

करोना काळात कॅलिफोर्निया ते कोल्हापूर

करोनाचा उद्रेक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा

माझ्या मुलीच्या PhD प्रबंधाचे अंतिम सादरीकरण व पदवीदान समारंभासाठी आम्हीं मार्चमध्ये अमेरिकेत आलो. मेमध्ये पदवीदान समारंभानंतर परतायचे असा बेत होता. त्यानुसार २५ मेचे परतीचे तिकिट केले होते. पोहोचल्यानंतर आठ दिवसात करोना साथीने जोर धरला आणि सगळ्या जगाला वेढून टाकले. निरनिराळ्या सामाजिक माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांनी साथीचे उग्र स्वरूप समोर आले.

ललित लेखनाचा प्रकार: 

कंट्री सॉन्ग्ज

अमेरिकेत कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टर) नोकरीमध्ये खूप खूप गावे/शहरे फिरायला मिळाले. खूपशा राज्यात बरीच वर्षे काढल्याने, तेथील राहणीमान समजायला मदत झाली. गावाकडचे आयुष्य आणि शहरातले आयुष्य यात बरीच तफावत असते हे लक्षात आले. उदाहरणार्थ - शहर फार इंडिफरेन्ट असते, कोणाचे कोणाच्या आयुष्यात लक्ष नसते. कामास काम, बाकी तुम्ही तुमचे राजे. on your own . याउलट गावात प्रत्येकाला प्रत्येकजण माहीत असतो. आपुलकी असते पण पायात पायही असल्यासारखे वाटते. तुम्हाला काय सूट होते, तुम्ही ठरवायचे. शहरात उंच टोलेजंग इमारती तर गावात टुमदार, प्रशस्त घरे, खूप मोकळे परसदार, आवार.

ललित लेखनाचा प्रकार: 

कोव्हिड आला रे अंगणी - राजेंद्र कार्लेकर

मुंबईचे राजेंद्र कार्लेकर सांगताहेत आपले कोव्हिडचे अनुभव - १७ ऑगस्टला COVID-19करता रिपोर्ट काढला आणि वाटू लागलं की आपला नंबर लागणार. मी आणि बायको एकाच बोटीतील प्रवासी. दोघांनाही ताप होता आणि बायकोला वास येत नव्हता. घरात दोघंच असल्याने होम क्वारंटाईन होण्याची शक्यता होती. जरा बरं वाटलं. पाच महिन्यांनी ब्रेक मिळणार होता. आम्ही दोघेही बँकर असल्याने ऑफिस चालू होतंच गेले ५ महिने.

ललित लेखनाचा प्रकार: 

करोना: काही नोंदी आणि निरीक्षणे (भाग ४)

Rain and a leaf

ललित लेखनाचा प्रकार: 

पंधरा आणि सोळा ऑगस्टच्या (२०२०) काही नोंदी

नेमेचि येतो मग पंधरा ऑगस्ट. अर्थात लहानपणाच्या आठवणीत या दिवसाला त्याचा स्वतःचा उत्सवी असा रंग आहे , झेंडूच्या फुलांचा वास आहे, त्याच्याशी निगडित पेढे , बर्फी, बासुंदी कधी जिलेबीच्या चवीच्या आठवणी आहेत. परंतु जीवन प्रवाही आहे, आणि गेली काही वर्षे १५ ऑगस्ट फार वेगळा उगवतो. एक तर आपल्या नेहमीच्याच, ओळखीच्या वातावरणात हे उत्सव साजरे करणे आणि एक स्थलांतरित म्हणून हे उत्सव साजरे करणे यात खूप फरक आहे. अर्थात तुलना केली तर फरक आहे आणि तुलना केली नाहीच तर प्रत्येक अनुभव हा एकमेवाद्वितीयच आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

एका डॉक्टरची करोना बखर

पुणे येथील एक कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. चाबुकस्वार (वय वर्षे ६२) यांचा करोनाकाळातला अनुभव.

ललित लेखनाचा प्रकार: 

करोना काळातली निरीक्षणं, अनुभव (भाग ३)

करोना काळातली निरीक्षणं, अनुभव सांगताहेत म्रिन

ललित लेखनाचा प्रकार: 

माया नावाची संकल्पना

मध्यंतरी सॅम जेप्पी (https://www.youtube.com/c/sadasiva108/featured) या माझ्या आवडत्या ज्योतिषाचा एक व्हिडीओ यु ट्युबवरती पहात होते. चंद्राचे कुंडलीतील कारकत्व या विषयावरचा तो व्हिडीओ होता. आत्ता सापडत नाहीये. सापडला की देते. हा व्हिडीओ ऐकताना, मला एक विलक्षण माहीती सहज सापडुन गेली. इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. ज्योतिषात चंद्राला मायेचे कारकत्व दिलेले आहे. म्हणजे हा ग्रह मायेचा कारक आहे. जसे सूर्य आत्म्याचा कारक तसा चंद्र मायेचा कारक. दर वेळेला मी हे वाचत आलेले आहे. त्यावरती क्वचित चिंतन केलेले आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य