गद्य

दंगा कथा - एक अनुभव- छोटे शैतान

मला आठवते तो ऑगस्टचा महिना होता. त्या दिवशी रविवार होता. रविवारी चांदनी चौक बंद राहत असले तरी लाल कुआँ या परिसरातील सर्व दुकाने उघडी होती. चांदनी चांदनी चौक बाजाराच्या मागच्या बाजूला एक रस्ता हौजकाजी पर्यंत जातो. त्या भागाला लाल कुआँ असे म्हणतात. ऑगस्टचा महिना हा दिल्लीत पतंगबाजीचा मौसम. लाल कुआँ हा बाजार पतंग आणि मांजा साठी संपूर्ण दिल्लीत प्रसिद्ध होता. गोटूला मांजाच्या काही चरख्या विकत घ्यायच्या होता. मांज्याच्या १०० गजाच्या एका चरखीत १२५ गज मांजा असतो. १५-२० गज सुट्टा मांजा विकून त्याला काही पैसा कमवायचा होता. गोटू चा उल्लेख मागे हि एका गोष्टीत केला होता.

ललित लेखनाचा प्रकार: 

बस प्रवास

ठहराव .मौन.silence.शांतता.pause - या विषयाबद्दल लेख वाचत होते. लेख खूप आवडत होता. लेखकाचे म्हणणे होते की कोणत्याही शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्या शब्दाच्या अलीकडली व त्या शब्दाच्या पलीकडली या दोन्ही शांततांना फार महत्त्व असते. या शांत जागा नसत्या तर शब्दच नसते केवळ एक सततचे आवाज एवढेच ऐकू आले असते. गदारोळात काहीही ना उमजले असते ना कशाचा अर्थ लागू शकला असता.
.

ललित लेखनाचा प्रकार: 

अखेर नियती नमली

अवंतिकाबाई बळवंतराव देशपांड्यांच्या चैतन्यचं आज लग्नं होतं. चैतन्य हा अवन्तिकाबाईंचा दुसरा
मुलगा. दोन मुलं नि माहेरवाशीण म्हणवून घ्यायला एक मुलगी, असं आदर्श कुटुंब होतं त्यांचं. देवानी
त्यांना सारं काही भरभरून दिलं होतं. त्या सगळ्या वैभवाचा त्या चवीचवीनं उपभोग घेत होत्या. कशा-
-कशाची म्हणून उणीव नव्हती त्यांच्या संसारात.

ललित लेखनाचा प्रकार: 

दंगा कथा : छोटू

बालपणाची गोष्ट. माझे वय १२-१३ वर्षांचे असेल. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पाईच निघत असू. नया बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतिया खान असा शाळेत जाण्याचा मार्ग. शाळेत पोहचायला पाऊण एक तास लागायचा. रोज सकाळ -दुपार जवळपास ३-३ किलोमीटर पाई चालण्यामुळे चप्पल आणि जोड्यांचे बारा वाजयचेच. मोतिया खान जवळ एक चांभार होता. ५-१० पैश्यात तो जोडे आणि चप्पला दुरुस्त करून द्यायचा. छोटू त्याचा मुलाचे नाव. त्याचे वय हि आमच्याच जेवढेच होते. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते.

ललित लेखनाचा प्रकार: 

माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे?

माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे हे वाक्य एकूण पकाऊच. जन्मापासून ज्या गोष्टीला भवतालातली एक म्हणून गृहित धरली, तिच्यावर प्रेम आहे असं एकदम उठून म्हणणं भंपकच. तर प्रेमबिम बाजूला ठेवू या. मला हीच भाषा येते. बस.

ललित लेखनाचा प्रकार: 

माझी बोली भाषा

मिसळपाव वर बोली भाषेत भाषेत साहित्य पाठविण्याचा संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते. एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो. शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत नाही. मराठीतील बोली भाषेचा प्रश्नच येत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

चौकातली फाशी

"भर चौकात टांगायला पाह्यजे या सगळ्या साल्यांना!"

असं भर चौकात टांगायच्या जमान्यात मी जन्माला आले नाही. पण मला संधी मिळाली तर निश्चितच माझ्या वर्तनाने मी चारचौघांत लाज आणणार नाही.

ऑफीसमध्ये कधीपासून बतावणी करायला सुरुवात केली आहे, हल्ली जरा जास्त बायकी त्रास व्हायला लागला आहे, अशी. फाशीच्या दिवशी सुट्टी का घेतली असं कोणी विचारणार नाही. त्रास नक्की होतोय का नाही हे शोधायचं मशीन अजूनपर्यंत आलेलं नाही. त्यामुळे फाशीच्या ठिकाणी सहज जाता येईल. त्रासदायक दिवसांत ऑफिसात गेले नाही म्हणून कोणाला दुःख होणार नाही याची मला खात्री आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

जंटलमन्स गेम - ९ - किम ह्यूज.. द गोल्डन बॉय

क्रिकेटच्या खेळात वैयक्तिक कौशल्याला महत्वं असलं तरी अखेर क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे असं नेहमी म्हटलं जातं. अनेकदा वैयक्तीक कामगिरीपेक्षाही संघातील सर्वांची मिळून कामगिरी कशी होते यावर मॅचच्या जयापराजयाचं पारडं झुकत असतं. अर्थात यालाही अपवाद आहेतच! चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे १९७५ च्या वर्ल्डकपमधली 'गॅरी गिल्मोर मॅच' म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सेमी-फायनल! एखादा खेळाडू एकहाती मॅच कशी जिंकतो याचं हे उत्कृष्टं उदाहरण! आणखीन एक उदाहरण म्हणजे १९८३ च्या वर्ल्डकपमधली भारत-झिंबाब्वे मॅच आणि त्यातली कपिलदेवची १७५ रन्सची इनिंग्ज!

ललित लेखनाचा प्रकार: 

व्हॅलेन्टाईन : स्पर्धेसाठी

काल :
स्मशानात जाऊन मी बसतो. नेहमीच बसतो. आजही बसलो होतो. थडग्यावर बसून तंबाखू खायला फार बरं वाटतं. एकदा किक बसली का तुझ्या आठवणीत शिरता येतं.

तुझ्या केसातला मोगऱ्याचा गजरा आणि त्याचा तो गंध,
बांगड्यांची किणकीण आणि छमछम ते पैंजण,
ढळढळीत दुपार आणि ऊसाचं रान.

तुझ्या वैभवाचा मला स्पर्श झाला...

काय पण व्हॅलेन्टाईन, मी इथं वर बसलोय बार भरत, आणि तू थडग्यात..

आज:
मी व्हिस्की पीत नाही पण हा ग्लास फक्त तुझ्यासाठी. मला आवडतात म्हणून ही गुलाबाची फुलंही सोबत. तुलाही आवडतील याची खात्री आहे.
काल रॉजर म्हणत होता, वील यू बी माय व्हॅलेन्टाईन?
हाऊ क्यन आय डिल विथ धिस्?

ललित लेखनाचा प्रकार: 

संत्री (व्हॅलेन्टाईन्स डे साठी कथा)

एक आटापाट शहर होते. आटपाट शहरातील एका भरपूर रहदारीच्या आटपाट रस्त्यावर एक आटपाट चौक होता, त्या आटपाट चौकातले फुटपाथ संध्याकाळच्या वेळी भाजीवाले आणि फळवाल्यांनी आणि खाण्या पिण्याच्या गाड्यांनी अडवलेले असत, ऑफीसहून घरी परतताना स्त्री-पुरुष त्या चौकातल्या रहदारीतच बाजूला आपापल्या दुचाकी, कार दाटीवाटीने उभ्याकरून भाजीपाला फळे घेत.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य