गद्य

चंदेरी:मियाजींच्या घरी जेवणाचा किस्सा

गेल्या वर्षी चंदेरीला गेलो होतो. दुपारच्या वेळी किल्याच्या भिंतीवर पत्रावळ ठेऊन जेवत असताना, खाली दूरवर पसरलेल्या चंदेरी नगरावर नजर केली. दूर कुठून ढोल ताश्यांचा आवाज येत होता, कुठली तरी मिरवणूक निघत होती. आपल्या मेहुणीला विचारल्यास कळले, आज रामापीरची जयंती आहे. रामापीरची शोभायात्रा निघत असेल. हिंदू- मुसलमान दोन्ही धर्माचे लोक रामा पीरला मानतात. हिंद-मुसलमान, सर्वजातीय लोक या शोभा यात्रेत भाग घेतात. चंदेरीची दुकाने हि आज बंद असतात. सकाळी जेवण बरोबर घेऊन अशोकनगरहून का निघालो होतो ते हि कळले.

(किल्याच्या भिंतीवरून दिसणारे चंदेरी शहर)

ललित लेखनाचा प्रकार: 

रेस...सिंहगड ते आयएटी पर्यंत...

हाईस्कूल मधे असतांना मी शेजारच्या मुलांसोबत रोज पहाटे जॉगिंग करितां जायचो खरा...! तेव्हां कल्पना देखील नव्हती की पुढे मला सिंहगडापासून रेस करावी लागेल.

बिलासपुरला वडील रेलवेत असल्यामुळे आम्ही रेलवे कालोनीत राहायचो. शहरात माझे काका होते-व्यंकटेश शंकर तेलंग. त्यांच्या खासगी लायब्ररीत कपाट भरून पुस्तकं होती (1970 च्या दशकात). लहानपणी मला त्या पुस्तकांचं भारी कौतुक वाटे. पण वाचण्याकरितां पुस्तक मागण्याची हिंमत होत नसे. कारण एक तर मराठी वाचनात गती नव्हती आणी दूसरं महत्वाचं कारण म्हणजे या काकांकडे सगळेच कसे जणूं जिराफच्या कुटुंबातले होते-ऊंचच ऊंच. त्यांच्या कडे बघूनच भीती वाटायची.

ललित लेखनाचा प्रकार: 

मराठीनी समृद्ध केलं...

मराठीशी जवळीक-साधल्यामुळेच मला जगातील सर्वोत्कृष्ट कृतींचा आनंद उपभोगता आला.

काही गोष्टी आयुष्यांत कां घडतांत, याला तात्पुरतं जरी उत्तर नसलं तरी त्याचे दूरगामी परिणाम सुखद असतात. मी बघितलेला पहिला इंग्रजी चित्रपट व इंग्रजी नावेल दोन्हीं हिटलरशी संबंधित होते, हा योगायोग असेल. चित्रपट होता चार्ली चैप्लिनचा-‘दि ग्रेट डिक्टेटर’, नावेल-इर्विंग वेलेस चं ‘दि सेवंथ सीक्रेट’

ललित लेखनाचा प्रकार: 

अजनी, एपी आणि ती उडी

खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडून उठलो. सामान घेऊन दारा जवळ पोचलो, इतक्यांत अजनी स्टेशनचा पहिला साइनबोर्ड मागे गेला. मी पिशवी खांद्यावर चढवली, सूटकेस डाव्या हातात घेतली आणि उजव्या हाताने दांडा धरुन शेवटच्या पायरी वर आलो. आता गाडीचा वेग वाढू लागला होता, आणि मी उडी घेतली...!

ललित लेखनाचा प्रकार: 

मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?


उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्
वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संतिःत

समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.

हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

शून्याचे गणित आणि बळीराजा

शून्य म्हणजे एक भला मोठा भोपळा अशी अधिकांश लोकांची समजूत आहे. शून्यात किती हि जोडा किंवा वजा करा उत्तर नेहमी शून्यच येणारच. पण या शून्यात एका रुपयाला हि अब्जावधी रुपये बनविण्याची शक्ती आहे. फक्त रुपयाला कळले पाहिजे त्याला शून्याच्या कुठल्या बाजूला उभे राहायचे आहे ते.

ललित लेखनाचा प्रकार: 

रामसे युग

एखादा ब्रँड तयार होतो, म्हणजे नेमकं काय होतं? थोडक्यात आणि ढोबळपणे सांगायचं तर एखाद्या उत्पादनाचं नावच उत्पादनाची ओळख बनून जात. उदाहरणार्थ लोखंडी कपाटाला आपल्याकडे ‘गोदरेज’च कपाट म्हणण्याचा प्रघात पडून गेला आहे. ‘छायांकित प्रत करा’ असं कुणी म्हणत नाही तर ‘अहो, जरा याची ‘झेरॉक्स’ द्या’ असं आपण म्हणतो. तसंच भारतामधल्या हॉरर चित्रपटांशी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव आहे रामसे परिवाराचं. कित्येक रामगोपाल वर्मा आले नि गेले, कित्येक विक्रम भट अजूनही झगडत आहेत, पण भारतीय भयपट आणि रामसे बंधू हे जे अद्वैत ‘बेंच मार्किंग’ आहे ते अजूनही बदलत नाहीये.

ललित लेखनाचा प्रकार: 

आउटलायर: पुस्तक परिचय

आपण आपल्या आजूबाजूला लोकांना आयुष्यात यशस्वी झालेले पाहतो आणि त्यातल्या कित्येकांचे वर्णन ‘स्वकर्तृत्वावर पुढे आलेला’ असे ऐकतो. परंतु यशस्वी होण्याकरता हुशारी आणि कर्तुत्व सोडून इतरही अनेक घटक कारणीभूत असतात असे माल्कम ग्लाड्वेल या लेखकाला वाटते. या इतर ‘अदृश्य’ घटकांचा शोध त्याने त्याच्या ‘आउटलायर’ या पुस्तकामधून घेतला आहे. लेखकाच्या मते यशस्वी होण्याकरता ‘हुशारी’ हा जरी मुलभूत घटक आवश्यक असला तरी एका ठराविक टप्प्यानंतर, बुद्धी आणि यश यांचा संबंध नसतो. नाहीतर प्रत्येक हुशार माणूस यशस्वी झाला असता.

ललित लेखनाचा प्रकार: 

यमुनाकाठी दैवीय शांती संमेलन आणि आसुरी अहिष्णुता

द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर दैवीय प्रेरणेने सर्व पंथीय धार्मिक नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते. या सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्य अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति.

ललित लेखनाचा प्रकार: 

जिगरवाला मन्सूर

झाडून सगळ्यांनीच महत्त्वाकांक्षी असलं पाहिजे, असा एक संकेत रूढ होत चालला आहे. म्हणजे, सगळ्यांनीच सहा आकडी पगार कमावला पाहिजे. सगळ्यांनीच उत्साहीपणे सण वगैरे साजरे केले पाहिजेत. सगळ्यांनीच विकेंडला मॉल आणि मल्टिप्लेक्सला गर्दी केली पाहिजे. सगळ्यांनीच मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणात राहून स्वतःची जबरी प्रगती करून घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे, मी महत्त्वाकांक्षी आहे, हे सिद्ध करण्यासाठी एका न संपणाऱ्या रेसमध्ये ऊर फुटोस्तर पळलं पाहिजे. जो माणूस यातलं काहीही करायचं नाकारून आपल्या अटींवर आयुष्य जगतो, त्याला हे सगळे महत्त्वाकांक्षी लोक एक लेबल लावतात, ‘पलायनवादी’!

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य