Blood Hymns - 1

ही माणसं एकत्र का रहातात?
कपल्स म्हणुन?
कुटुंब बनवुन?
शहरं वसवुन?
देश, धर्म??

पावलं घेऊन जेव्हा बाहेर पडलो,
तेव्हा जाणवलं,
जिथे जिथे पोकळी आहे,
तिथे कुंटणखाने निपजलेले
आदिम संस्कृतीला पर्याय म्हणुन?
कुणास ठाऊक पण,
पोकळीला पर्याय नव्हते
संदर्भ नव्हते
तिथे आतमध्ये खुप सोप्पंय
किंचाळू नका श्वास घ्या
धपापु नका हपापुन घ्या
पाऊस पाडा पिकं घ्या
एकबारी, दुबारी..कितीही..
एक स्तन वासनेचा
दुसरा स्तन मायेचा

बाहेर व्यवहार - अर्थहिन
आतले व्यवहार - अर्थपुर्ण?
तशात मोकळी दारं घेऊन
एक नाशवंत बाई
माझ्या पायथ्याशी येते
येळकोट येळकोट
स्तनाग्र दिठी,
स्नायुंची मिठी
मासावरच्या त्वचेसकट
थरारते मांडी

शल्याचे अर्थ खोडत,
मी इंद्रियं उतरवतो.
माझ्या आवंढ्यावर
सोलीव थंड जीभ घेत,
तुझी समग्र सृष्टी
दुभंगुन पडते,
माझ्या शरिरामध्ये....

स्पर्श चैतन्य वाहुन जातात.
मी तुझी इंद्रिय साठवुन ठेवतो.
पुढच्या दुष्काळासाठी.
एकेक कागदी होडी
निर्वासित मांडीसाठी...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दोनदा वाचली, थोडी समजली. अजून समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. विशेषतः उत्तरार्ध.

एक सूचनावज प्रश्न आहे: म्हणून, साठवून, हपापून हे पंचमीचे ऊन-हून प्रत्यय मुद्दामच र्‍हस्व लिहीले आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणून, साठवून, हपापून हे पंचमीचे ऊन-हून प्रत्यय मुद्दामच र्‍हस्व लिहीले आहेत का?

'म्हणून', 'साठवून', 'हपापून' वगैरेंमधले 'ऊन' हे पंचमीचे 'ऊन-हून' नव्हेत.

(ते नेमके काय आहेत हे सांगण्याइतके व्याकरण मला येत नाही. पण पंचमीचे 'ऊन-हून' निश्चित नव्हेत.)

पहा विचार करून.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
कृदंत आहे. "धातुसाधित क्रियाविशेषण" असे काहीसे तांत्रिक नाव असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा वाचून समजून घेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> एक स्तन वासनेचा

> दुसरा स्तन मायेचा

ठीक. पण कोणत्या बाजूचा कशाचा हे स्पष्ट होत नाही. माया अाणि वासना या वेगवेगळ्या भावना अाहेत. त्यांत उजवं-डावं नको का करायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

परत वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कळते आहे असे वाटेपर्यंत निसटली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0