चिरन्तन

चिरन्तन सत्य
की निरन्तर भास
विझेल कधी
जिवाची आस ?

अडकून पडशील
वेड्या मना
वळतील तेथे
पाय पुन्हा

फुङ्कून टाकता
येईल काय
धूळ जमते
जमत जाय

थोडा खेळ
माण्डून बघ
विरून जाईल
सारी धग

खचत जातो
एकेक कण
सलती सारे
मनाचे व्रण

कळलेच नाही
कसे सरलो
अन्ती क्षणांसाठी
झुरलो

मनास विचार
करशील काय ?
कुठली वाट
चालत जाय ..

चिरन्तन सत्य
की निरन्तर भास ?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदर कविता.. आवडली...!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चन्द्रशेखर केशव गोखले