दुधपोहे

आंतरजालावर "दुधपोहे" (किंवा "दुध पोहे" ) असे शोधले असल्यास काहीच मिळाले नसल्याने ही पाककृती देत आहे.

तसे "दही पोहे" बनवतात पण त्यासाठी लागणारे जिन्नस जसे- दही, मसाला, कोथंबीर आदी बॅचलर असलेल्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही.

झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे.
(लहाणपणी 'मला काहीतरी खायला दे' असली माझी भुणभुण ऐकून माझी आई मला 'दुधपोहे' झटकन बनवून देत असे हे लख्ख आठवतेय! असो.)

जेव्हा तुम्ही घरी एकटे असतात व नाश्टा बनविण्याचा कंटाळा येतो तेव्हा दुधपोहे करणे फारच सोपे असते.

पाककृती:
१) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या.

२) मुठभर पातळ पोहे त्यात टाका.

३) वरील दुधपोह्यांत चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात.

दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत.
(फोटो आंतरजालावरून साभार)
पुर्वप्रकाशीत

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

माझ्या मते दूध-पोह्यांसाठी किंवा बटाटा/वाङ्गी/मटार पोहे यांसाठी जाडे पोहे लागतात. पातळ पोहे हे भाजलेल्या चिवड्यासाठी वापरतात. तुम्ही चित्रात दाखवलेले हे जाडे पोहेच दिसत आहेत. नव्हे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाड पोहे दुधात पटकन ओले होत नाहीत. म्हणून आधी पाण्यात धुवून भिजवता येतात. या प्रकारात वेळ जातो. म्हणून पाषाणभेद यांनी म्हटल्याप्रमाणे पातळ पोहे घेतल्यास दुधात लगेच भिजतात.
दूध-पोहे, दूध-पोळी(कुस्करलेली), दूध-भाकरी (सर्व साखर घालून) हीच आमची वर्षानुवर्षे न्याहारी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, मीही जाड पोहेच वापरते दुध पोह्यांना .
एक सूचना : यामध्ये २ चमचे दही व चिमुटभर मीठ घालावे आणि १ चमचा तेल तापवून चिमूट चिमूट जिरे-मोहरी व १ लाल सुकी मिरची यांची फोडणी करून या दुध पोह्यांवर ओतल्यास एक वेगळीच खमंग व आंबटगोड अशी चव येते. कधी कधी दह्याऐवजी लहान काकडी किसून घातली तर बहारदार लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छायाचित्रे आंतरजालावरून उचललेली असल्याने त्यात निवड करणे अवघड होते.
झटपट नाष्टा उपलब्ध असणे ही काही वेळा शरीराची गरज असते. आपली जीभही त्यास परवानगी देते व आहे त्यात साजरे करणे महत्वाचे ठरते. त्यावेळी केवळ कमीतकमी जिन्नस घेवून पोटपुजा करणे योग्य असते. तसे पात्र सजवायचे झाल्यास काहीही पदार्थ टाकून, भर घालून सजवू शकतो यात वाद नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

>> छायाचित्रे आंतरजालावरून उचललेली असल्याने त्यात निवड करणे अवघड होते

काय हो? एवढी सोपी पाककृती झटपट करून तिचेच चित्र चढवायचे की! ही अशी उचलेगिरी कशाला... Wink
रसिक/वाचक आणि भुरटे यांच्यातल्या जालीय संघर्षात सध्या हा मुद्दा ऐरणीवर असल्याने विचारले. (सध्याच काय? हा मुद्दा बहुतेक नेहमीच ऐरणीवर असावा, पण 'सध्या' म्हटले की वाक्याला कशी एक वेगळीच धार येते.)

ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जालावर (बॅचलर्ससाठी) एका महत्त्वाची पाकृचे डॉक्युमेंटेशन झालेले आहे Smile आभार!

पातळपोह्यांनी लगदा होतो.. जाड पोहे वापरल्यास पदार्थाला जरा स्थायुपणा येतो. अर्थात आवड आपली आपली.
ज्यांना भुक काहि मिनिटे अधिक थोपवता येते त्यांनी थोड्याशा साजूक तुपावर पोहे परतून मग दुधात घालून बघावेत वेगळीच चव येते

पातळ पोह्यांचे दडपे पोहे करतो ते ही रुचकर असतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>> जालावर (बॅचलर्ससाठी) एका महत्त्वाची पाकृचे डॉक्युमेंटेशन झालेले आहे आभार!
होय पाककृती टाकण्यामागचा उद्देश तोच होता. एकदम झटपट बनणारा पोटभरू पदार्थ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

एकेकाळी आंजावर पाणी उकळायचीही रेसिपी होती. चांगले विनोद असे लिंबो का होतात कोण जाणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाकृ अधिक विस्ताराने हवी. दुध घ्या या 'स्टेप' मध्ये माझा फारच प्रॉब्लेम झाला. ही पायरी नीट समजावून सांगा.

१) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या.

आधी माझ्या कडच्या सगळ्यात मोठ्या वाटीत मी दुध घेतले, पण ते दीड कप आहे का नाही हे तपासण्याकरता मला सगळ्या कपात दुध घालून पहावे लागले. माझ्याकडे एकाच मापाचे दोन कप नसल्यानेही दीड कप मोजताना मला इतर अनेक वाट्यांचा वापर करावा लागला. ही पायरी सोपी करण्याची काही युक्ती नाही का?

नंतर मी आधी एक कप घेतला, त्यात कपभर दुध घेतले आणि ते वाटीत ओतले तर बरेच दुध वाहुन गेले. त्यामुळे माझ्या मोजमापाचा बट्ट्याबोळ झाला. मग मी दुसरा कप घेतला आणि त्यात दुध ओतले तर कप भरायच्या आधीच दुध संपले! Sad

त्यामुळे पुढील पाकृ करण्याची संधी मिळाली नाही. तरी पाकृ व्यवस्थित टप्प्या टप्प्याने विस्तार करून द्यावी ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हा प्रश्न विचारण्यापुर्वी आपण तुमच्याकडच्या असलेल्या कपांचे, वाट्यांचे आकारमान (Volume) देण्यात यावे म्हणजे मग पुढील प्रक्रिया व्यवस्थित सांगता येईल. पिरीयड.

आता दुसरा मुद्दा.

संदर्भ: २)मुठभर पातळ पोहे त्यात टाका.

आपल्याला अर्धी (५०%) पाककृती समजली आहे असे गृहीत धरले आहे कारण आपण वरील पाककृतीतील या दुसर्‍या पायरीबद्दलच्या मापाबद्दल काही शंका उपस्थित केलेली नाही. आपले हात थरकापत नसतील तर त्यातून पोहे सांडणार नाहीत व पाककृतीसाठी योग्य वजनाचे पोहे मिळून पाककृती चांगल्या चवीची होईल. परंतु म्हातारपणामुळे एखाद्याचे हात थरथर कापू शकतात. त्याचप्रमाणे एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीचे हात (पायसुद्धा)लटलटू शकतात. त्यामुळे त्या व्यक्तीने ही दुसरी पायरी करतांना काळजीपुर्वक करावी. (अर्थात हे सांगण्याची आपणाला गरज आहे असे मला वाटत नाही असे नाही तरीही एक सर्वसाधारण सुचना असावी म्हणून येथे सांगितले आहे असे मला वाटले म्हणून मी ते येथे सांगितले आहे असे आपण समजले जावे म्हणून मी ते येथे सांगितले आहे.)

आता "चव लागणे" ही शारिरीक प्रक्रिया व्यक्तीपरत्वे भिन्न असल्यामुळे व वर सांगितल्यामुळे थरथरीमुळे, लटलटीमुळे मुठभर पोह्यांच्या ऐवजी सांडून अर्धी मुठ पोहे दुधात पडले तर पोहे चांगले झाले किंवा न झाले तर ती जबाबदारी ही पाककृती बनवणार्‍या व्यक्तीची व तो व्यक्ती ज्या दुसर्‍याव्यक्तीसाठी ही पाककृती बनवत आहे त्याच्या जीभेच्या चवीवर जाते.

त्याचप्रमाणे एखाद्याच्या हाताच्या मुठीत सामान मावण्याचे प्रमाण दुसर्‍या व्यक्तीसाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे आपण ही पाककृती दुसर्‍या व्यक्तीसाठी जर बनवित असाल तर त्या व्यक्तीस आपण पहिल्यांदा तुमची मुठ दाखवून बघावी. त्यात पोहे किती मावतात ते सुद्धा दुसर्‍या वेळी (पहील्या वेळी पोकळ मुठ आवळावी)दाखवून द्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

एकदम सोपी पाकृ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

दुधपोहे = दूधपोहे
नाश्टा= नाश्ता, न्याहारी
भुक = भूक
दिड = दीड
पोटपुजा = पोटपूजा
स्थायुपणा = स्थायूपणा
मुठभर = मूठभर
सुचना = सूचना
मुठ = मूठ
जीभेच्या = जिभेच्या

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

साखरे ऐवजी गूळ घालून सुद्धा दूधपोहे छान लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0