College Campus मध्ये घालवलेला एक तास...

बऱ्याच दिवसांनी काल असंच माझ्या कॉलेजला गेलो...
गडाच्या पायथ्याशी (Parking मध्ये) Bike park करून मग निघालो "सिंहगड" सर करायला...
रस्त्यात एक-एक करून सर्व departments लागली... Civil , EnTC, Computer...
आणि समोर आली एक षटकोनी वास्तु... "Sinhgad College Of Engineering - IT Department"...
ही फक्त एक वास्तु नसून, आमचं एक सुंदर घरटं आहे...
ह्याच घरट्यात आम्ही आयुष्याची महत्वाची चार वर्ष व्यतीत केलीयेत...

आठवलेत मग ते सर्व दिवस...
Lecture bunk करून मग Steps (CC) वर एक पाय लांब करून आणि हातात NesCafe चा cup घेऊन बसणं...
मग तिथेच, सुरु असणाऱ्या Lectures ला फालतू म्हणणं आणि जमलेल्या कारट्यांपैकी एखाद्याची टांग खेचणे...
B'day नसतांना सुद्धा "अरे... आज याचा B'day आहे रे..." असे म्हणून एखाद्याला उगीचच B'day bumps देणं...
मग Anna's Canteen मध्ये जाऊन जबरदस्तीने "वडा-पावची" party घेणं...
Submission मध्ये उडालेली सर्वांची धांदल... files वर teachers ची sign घेण्यासाठी त्यांच्या मागे-पुढे फिरणं, मस्का मारणं...
मग त्यांच्या भेदक नजरेचा सामना करणं... "पडली ना शेवटी आमची गरज..." असे त्यांचे expressions नाईलाजाने सहन करणं...
अशक्यप्राय वाटणाऱ्या Practicals, Orals ला मोठ्या हिमतीने present राहणं...
PLs आल्या की आभ्यासाच्या नावाखाली timepass करणं... आणि Exam सुरु झाली की 11th hour ला आभ्यास करणं...
मागची KT काढण्यासाठी, current semister चा एखादा फालतू subject "Option" ला ठेवणं...
रात्री झोप लागू नये म्हणून "Thumbs Up" च्या बाटल्याच्या बाटल्या रिकाम्या करणं... (यात म्हणे "Caffeine" असतं, ज्याने झोप येत नाही...)
एवढी "प्रयत्नांची पराकाष्ठा" करून देखील Exam मध्ये मात्र Option ला ठेवलेल्या topics वरच सर्व questions येणं...
आणि Result च्या दिवशी चेहेरा उतरवून "आता किती KTs येतील?" याचा अंदाज लावत बसणं...
एकही KT नाहीये बघून माकडासारखं उड्या मारत Steps वर आरडा-ओरड करणं...
.
.
.
हे सर्व Flashback सारखं डोळ्यासमोर फिरत होतं... आणि अचानक कधी डोळे थोडेसे ओले झाले, काही कळलेच नाही...
आज सर्व काही अगदी तसंच होतं... तेच College, तेच Department, तेच Anna's Canteen...
आणि त्याच Steps वर बसल्यावर हातात होता तोच NesCafe चा cup...
पण का कुणास ठाऊक...? एक विचार अचानक हृदयाला स्पर्श करून गेला...
सर्व जुन्या मित्रांची "उणीव" जाणवून गेला...
हे College माझंच असून देखील, कुठे तरी "मी आता परका झालोय..." असं सांगून गेला...
.
.
.
आज सर्वच आपापल्या कामात Busy झालेयेत...
कधी झालीच चुकून भेट त्यांच्याशी तर ती फक्त facebook आणि gtalk वर...
त्या भेटीत सुद्धा आता खूप Formality आलीये...
एक simple "Hi... hw r u...?" ह्या वाक्याने सुरुवात तर "will catch u later... Smile " असा शेवट...
पण त्या निमित्ताने का होईना, आज एकमेकांशी थोडासाच, पण Contact तर आहे...
रोजाचाच Call जरी नसेल, पण महिन्यातून एखादा Forward SMS तर आहे...
.
.
.
काल College Campus मध्ये घालवलेला एक तास Engineering ची चार वर्ष पुन्हा जगवून गेला...

- सुमित

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भा.पो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉलेज मधे थोडेफार तरी शिक्षण घेतलेत का? का फक्त टाइमपास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखक आय. टी. ला होते. पहिल्याच कंपनीत कळालं असेल की आपण क्ष्क्ष्क्ष्क्ष शिकलो ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हो मग, शिक्षण घेतले म्हणूनच तर आज चांगल्या आणि समाधानकारक (professional & personal) स्थितीत आहे... याचे श्रेय नक्कीच माझ्या कॉलेजला ...
आणि फक्त timepass केला नाही... ४ वर्षातल्या सगळ्याच आठवणी ४ ओळीत अथवा ४ परिच्छेदात मांडता येणं एवढंही सोपं नसतं...
ज्या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या, आठवल्या त्याच कागदावर उतरवल्या...
आशा करतो तुम्हाला समजेल ... धन्यवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

आपल्या कॉलेजमध्ये काही वर्षांनी परत गेल्यावर असेच अनुभव बहुतेकांना येतात. जागोजागी आठवणी चिकटलेल्या असतात. पण त्या आठवणींमधली माणसं तिथे नसतात. आपण तिथे नसतो. त्यामुळे ती रिकामेपणाची भावना आपल्या मनात भरून राहाते. आणि ते आनंदाचे क्षण हातातून निसटून गेल्याचंही जाणवतं. ते सोडलं, सुटलं, आणि आता हातात आहे ते त्यापेक्षा चांगलं आहे का?

अजून काही वर्षांनी पुढच्यावेळी जेव्हा कॉलेजात जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता त्या आठवणीही तितक्या लख्ख स्पष्ट राहिलेल्या नाहीत. आणि गेल्यावेळी आपण गेलो होतो तेव्हा जसं ते सगळं ताजं, आपलंसं वाटत होतं तितकं ते वाटत नाही. लोकं बदललेले असतील, बिल्डिंगी बदलतील, नेहेमीच्या टपऱ्या जाऊन तिथे वेगळ्या येतील. आणि आपण इथे त्रयस्थ आहोत, परके आहोत अशी भावना वाढत जाईल. हे माझं आहे हा विचार जाऊन हो, हे सगळं माझं होतं खरं असे विचार येतील.

आत्ताच तो ताजेपणा एंजॉय करून घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी... असंच होतं आणि झालंय पुढच्या दरेक भेटीत ... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

हा जुनाच विचार नव्याने उदास करुन गेला . लेख कोवळा आहे ते जे सराइत नाही ते नेहमी आवडतच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0