शेवटचा दीस

स्थलकालाच्या वितानावरी
तरंग उठतिल मग अखेरचे
सीमेवर असण्या नसण्याच्या
क्षणभर उमटून मिटेल काही

जाणिव नेणीव कुठली,जेव्हा
कोसळतिल द्वैतांच्या भिंती
विश्वद्रव्य लवथवुनी पुन्हा
निराकार होईल लवलाही

चिरंतनाच्या अवघड वेणा
सोसून हसणारे क्षणभंगुर
उजळत जाईल हलके हलके
विस्कळखाईत विझतानाही

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अनंत यात्री
मी तुमच्या कवितांचा फॅन आहे. तुमच्या कवितेच्या थीम्स तुमची शब्दकळा
मला फार आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" If you kill a killer, the number of killers in the world remains the same " Batman