पोहे

..

प्रुथ्विच्या अर्धगोलाकार आकाराची कढई...

खाली सहस्त्र सुर्य ओकतोय अशी आग

तापलेलेल्या रिफाईंड तेलाच्या डोहात

मोहरीचे, ब्रह्मांडात अणु रेणुचे चालते तसे तडतड नर्तन

साथिला हिरव्या मिरच्या व कढीपत्त्याचा

व्योमास भेदणारा चर्र्र्र असा नाद

कांदे व बटाट्याचे काप व रुद्राचा हळदिचा भंडारा

सुर्याच्या रक्तिमा सारखे लाल तिखट व हिंग

उलथण्याने सारे मिश्रण हलत रहाते

आत पडतो मग भिजवलेल्या पोह्यांचा डोंगर व कोथिंबीर

चविनुसार मिठ व साखर

ब्रह्मांडात चालणा~या उलथा पालथिसारखे

ते उलथले जाते कढईत.. पोह्याचा एक कण हि न सांडता

आणी झाकले जाते ते झाकणा खाली..

जेम्स वॅट च्या सहस्त्र इंजिनानी उश्वास टाकल्यावर जशी वाफ बाहेर येते

तशी वाफ झाकण काढल्यावर येते..

अन पुर्णब्रह्माचा तो खमंग स्वाद सा~या ब्रह्मान्डात दरवळु लागतो

डोळे मिटुन तो अनुभवत असतो व मिसळतो आत्म्यात

व घुमु लागतो तो सोहम अनाघत नाद

अन...अन्नपुर्णेची मंजुळ आवाजात हाक येते..

"अहो..नाष्ट्याला येता ना ..पोहे तयार आहेत."

आज नाष्ट्याला गरमागरम पोहे व फक्क्ड चहा चा बेत आहे..

आपणहि या ..आपले स्वागत आहे.

अकुकाका

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ग्रेट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिकाम बु बुम

छान. वाचूनच भूक लागली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से

येणा~ त~!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0