दर्पण

दर्पण
..........
गावात स्वामी आल्याची बातमी हळुहळु पसरु लागली.
नगरी च्या बाहेर असलेले भग्न शिवमंदीर..तेथे फारशी वर्दळ नसायची..
त्याच परिसरात स्वामी नी एक पर्ण कुटी बांधली होति..बाजुलाच एक झरा वहात होता.
त्याने तो परिसर स्वछ्य केला...व तिथेच त्याचा मुक्काम होता..
बाजुलाच एक विशाल वट्वृक्ष होता.. बाजुला बांधलेला पार खचायला आला होता...
त्या वर बसुन त्या वृक्षाखाली त्याची साधना चालु असे.
स्वामीचे व्यक्तिमत्व पण गुढ पण आवडावे असेच होते....
गोरापान देह..चेहे~यावर मार्दव व डोळ्यात अपार करुणा ..
मात्र हसणे निश्किल असे होते...
गावातले त्या परिसरातले अदिवासी वनवासी त्या कडे श्रद्धेने येत असत..
व तो पण त्यांच्या अडचणीचे निराकारण त्याना समजेल अश्या भाषेत करत असे..
काहि विद्वान त्याना पडणारे अध्यात्मिक प्रष्ण त्याला विचारत असे व तो पण सोप्या भाषेत उदाहरणे देऊन त्याना समजावुन सांगत असे.
सर्वात महत्वाचे म्हणजे तो कुठल्याहि भेटी स्विकारत नसे वा तशी अपेक्षा पण बाळगत नसे
भक्तानी आणलेली फळे अन्न धान्य आदी त्याला लागेल तितकेच जवळ ठेवुन बाकि भक्तात वाटुन टाकत असे...
ज्या प्रमाण सुमनांचा सुगंध हळुवार पणे आसमंतात पसरतो त्शी त्याची किर्ति पंचक्रोशित पसरु लागली.
व भक्त गण वाढु लागला...
सायंकाळी ५ च्या सुमारास तो प्रवचना द्वारे जिवन.. अध्यात्म.. इश्वर विषयक गोष्टीवर भाष्य करत असे...
साधी रसाळ वाणी..त्या मूळे भक्त गण तल्लिन होत असे.
*
नृपा च्या कानावर हि बातमी पसरली
स्वामी चा लौकिक ऐकून आपण हि त्याच्या समवेत सत्संग चा लाभ घ्यावा असे त्याला वाटू लागले
त्याने प्रधानास बोलावले
मी पण त्या साधू बद्दल ऐकून आहे पण बघण्याचा योग्य नाही आला -प्रधान
तुम्ही त्याला राज भवनात बोलवून घ्या -व ही आमची आज्ञा आहे असे सांगा
जाताना त्याच्या साठी उपहार म्हणून फुले फळे धान्य रोख मुद्रा आदी घेऊन जा
जशी आपली आज्ञा म्हणत प्रधान तिकडे निघाला
*
चार चा सुमार झाला होता भक्त गंण स्वामींचे प्रवचन ऐकण्या साठी जमले होते
प्रधानाचा रथ थाबला
प्रधान आपला लवाजमा घेऊन स्वामींच्या कुटीत आला
त्यांना प्रणाम केला
शुभम भवतू -
स्वामी महाराज राजे साहेबानी आपणास राज भवनात बोलावले आहे -आपणास या वस्तू हि पाठवल्या आहेत
आपण त्याचा स्वीकार करावा -प्रधान
हे नृप सेवका - भेटवस्त आपण आणल्या या बद्दल मी आपला आभारी आहे
पण कुठलीच भेट व कुंचीही भेट मी स्वीकारत नाही
त्या सेवा च्या कृपेंने मजकडे सर्व आहे
स्वामी या तबकात काही सुवर्ण नाणी आहेत संपल्यास उपयोगी येतील
स्वामी हसले अरे आम्हास सुवर्ण व मृत्तिका एक समान आम्हास त्याचे काय काम हो मात्र फळे आहेत ते ठेवा प्रवचना नंतर ती भक्तांना वाटली जातील
जसे आपण म्हणाल तसे
स्वामी राजे नी आपणास राज गृहात बोलावले आहे
आपण यावे
प्रधान मी कोणाकडे जात नाही -ज्यांना सत्सन्ग करायचा ते इथे येतात -आपण राजे ना इथे पाठवावे -स्वामी
स्वामी ते शक्य होणार नाही तशी रीत नाही -आपण राजाज्ञा मोडू नये
आमच्या वर फक्त एकाचीच आज्ञा चालते त्या वैष्णव चैतन्याची -त्या मुळे क्षमाकरावी व आपण यावे
माझी प्रवचनाची वेळ झाली आहे
-
राज प्रसादात आल्यावर त्याने सारी हकीगत राजास विदित केली
ऐकताच राजा क्रोधीत झाला
हि हिम्मत त्या गोसावड्याची -राजद्न्या मानत नाही -केवढा उपमर्द -प्रधान जी त्या गोसावड्याची गाढवा वरून धिंड काढा अन अन त्याचे शीर छेद करा
राजा क्रोधाने बेभान झाला होता
प्रधान शान्तपणे उभा होता
महाराज आपला क्रोध शांत झाला असेल तर मी काही बोलू शकतो का ??
बोला --
महाराज त्याला मारून व अपमानित करून काहीच साध्य होणार नाही
उलट तो मेला तर लोक त्याचे पुतळे उभारतील -मठ मंदिरात त्याच्या मूर्तीवर अभिषेक होईल -त्याला मानणारे भक्त घर घरात आहेत
मग आपला काय प्रस्ताव आहे ?नृपाने विचारले
महाराज या साधुंचे चारित्र्य शुद्ध असते आपण तेच भ्रष्ट करायचे -भक्त सारे सहन करतात पण स्वामी बाईच्या नांदणी भ्रष्ट झालेला त्यांना खपत नाही
असे भक्त त्या स्वामींची धिंड काढतील-परस्पर काटा निघेल
ठीक आहे तुम्हाला उचित वाटते ते करावे
आज्ञा -असे म्हणत त्याने निरोप घेतला
-
प्रधान आपल्या कक्षात आला
तिलोत्तमेला तात्काळ सांगावा धाडा -त्याने दूताला सांगितले
तिलोत्तमा राज गणिका होती
राजकारण विष प्रयोग आदित ती तरबेज होती
लावण्य खणी तिलोत्तमा प्रधाना समोर हजर झाली
स्वामी आज्ञा -
गावात स्वामी आला आहे गाव बाहेरच्या शिव मंदिरात त्याचे वास्तव्य आहे -त्याला एक रात्री साठी तुझ्या प्रसादात बोलवायचे तो आला कि मला सांगावा धाड पुढं चे काम माझे
छळ -कपट द्रव्य कशाचाही मार्ग अवलंब पण काम झाले पाहिजे -सुवण मुद्राची थैली त्याने तिला दिली
यशस्वी हो -
आज्ञा महाराज म्हणत ती निघाली
*
तिलोत्तमे नी खास वस्त्र प्रावरने परिधान केली होती अलंकाराने ती सुंदरी लावण्य वती दिसत होती
दासीला समवेत घेऊन ती रथात बसली व स्थळी आली
गजगतीने पदन्यास करत ती स्वामी जवळ पोहचली
भक्तांची फारसी वर्दळ नव्हती
बाजूला एक वनवासी व तिची मैत्रीण बसली होती
वनवासी स्त्रीच्या मांडीवर एक छोटे बालक होते ते रडत होते
बहुतेक स्वामींच्या चरणावर त्याला घालण्यास तिने आणले असावे
ती आर्जवाने म्हणाली स्वामी जी प्रणाम -मला आपल्या समवेत सत्सन्ग करण्याची मनीषा आहे ठेव्या या गारीब दासीच्या कुटीस आपल्या चरण कमळाची धूळ झाडावी
सुंदरी आपली मनीषा उमगली पण मी कुणाकडे जात नाही
स्वामी असे करू नका -मी गणिका आहे म्हणून आपण मला धिक्कारू नका
असो गणिका वा संसारी स्त्री दोघी आम्हास समान आहेत -दोघीकडे आम्ही जात नाही
तिलोत्तने स्वमचे पाय पकडला आपले वक्षस्थळ त्याला लागत आहे याची काळजी घेतली
कामुक दृष्टीने त्यांच्या कडे बघत ती आर्जवे करू लागली
तिचा हेतू ओळखत स्वामी म्हणाले सुंदरी आमच्या वर आपल्या सौंदर्याचा काही परिणाम होणार नाही
मला सारे जग सुंदर दिसते -बाजूला बसलेली ति वनवासी महिला मला तुझ्या इतकीच सुंदर वाटते
आपल्या सौंदर्याची तुलना त्यावनकासी सत्रे वर केल्यामुळे ती क्रोधीत झाली
तिला शांत करत स्वामी म्हणाले -तुला तुझ्या आत्म स्वरुपाची ओळख झाली नाही -नाह्य मायेच्यामायाजालात तू फसली आहेस
हि सारी माया आहे
स्वामी आपली पोपट पंची बंद करा अन मला सांगा आपण येणार कि नाही ?
क्षमा असावॆ सुंदरी मी नाही येऊ शकत
स्वामींचा नकार ऐकताच क्रोधीत सुन्दरी दाणदाण पाऊले आपटत रथाकडे निधाली
-
घरी आली अन आभूषणे उतरवताना तिला गालवर एक ओंगळ पांढरा डाग दिसला -नीट पाहता तो गालावरून काना पर्यत पसरला होता
ते पहाताच ती हरकली
कुठल्या तारे कृमी कीटकाने दंश केल्याने असे झाले असावे तिला वाटले
झाल्या प्रकाराने तिच्या डोक्यात संताप होता
अरे गोसावड्या तुला घरी आणून दारावरचा कुत्रा नाही बनवला तर तिलोत्तमा नाव लावणार नाही ती मनातल्या मनात म्हणाली
सकाळ स्नान करून तिने दर्पणात पाहिले
त्या ओंगळ डागाने तिचे कपाळ व डोळ्याचा काही भाग व्यापला होता
सुंदर दिसणारा चेहरा कुरूप दिसू लागला होता
तिने राजवैद्याला सांगावा धाडला
वैद्यराज आले त्यांनी नाडी परीक्षा केंली
डाग पाहिले
ते म्हणाले हे गणिका या रोगाला श्वेत डाग असे म्हणतात -या वर औषध नाही -या डागांमुळे पचन आदिवारपरिणाम होत नाही तू निरोगी आयुष्य जगू शकतील
पण याने तुझी सुंदरता नष्ट होईल
हे डाग आता वाढत वाढत सा-या शरीर भर पसरतील
वैद्यराज यावर काही उपाय ?
यावर उपाय नाही -निदान मला माहीत नाही
जर कुणी साधूंनी चमत्कार केला तर --पण ह्या कवी कल्पना आहेत तूर्तास असेच राहाणार असे तू समज
*
तिलोत्तमा निराष झाली
दर्पणात तिने चेहेरा पाहिला तो तिला बघवत नव्हता
सौंदर्य हे तिचे शस्त्र होते तेच बोथट झाले होते
तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या
तिला एकदम आठवले व तिने विचार केला स्वामी कडे जाऊन आपण त्यांच्या कृपेस पात्र व्हावे असे तिला वाटले
स्वामी पारावर पाय खाली सोडून बसले होते
बाजूला ती वनवासी स्त्री अन तिचे बालक होते
येताच तिने स्वामींचे चरण धरले व त्यावर अश्रू चा अभिषेक सुरु केला
स्वामी हसले -माया माया असे म्हणाले व तिच्या केसा वरून मायेने हात फिरवाला
स्वामी नी तिच्या वर शक्तिपात योगाचा प्रयोग केला होता
स्वामींचा हस्तस्पर्श होताच तिच्या अंगात चैतन्य संचारले
तिला ग्लानी आली अन ती तुर्यावस्थेत गेली
तिने डोळे उघडले
तिने स्वताला एका विस्तीर्ण पठारा वर उभे असल्याचे पाहिले
तिथे निरव शांतता होती सारे शरीर हलके झाल्यासारखे वाटत होते
अवकाशात कधी न बघितलेला गूढ असा प्रकाश पसरला होता विलक्षण रंगा चे पक्षी पिसारा फुलवत विहार करत होते
अवकाशातून श्वेत शुभ्र ऊर्जेच्या पर्जन्य धारा संथ गतीने कोसळत होत्या
सारे आसमंत क्षणा क्षणाला बदलत होते विरघळत
होते
ते विस्मय कारि दृश्य बघून ती चकित झाली
मंद सुखावह वारे वाहात होते
ति डोळे मिटून त्याची अनुभूती घेत होती
जरा वेळाने तिने नेत्र उघडले
समोर एक सुवर्ण पुतळी उभी होती
तिचे लावण्य बघून ती चकित झाली
ही कुठून आली असावी ? सुंदरी तू कोण आहेस इथे कशी आलीस ?
अग मी तूच आहे -तुझे शुद्ध रूप आत्मस्वरूप
तू कुठे राहातेस ? तुझ्या शरीरात माझा निवास असतो
मग मला कसा जाणवला नाही ?
तू कधी शोध घेतलाच नाही
बाह्य सौंदर्य वसने अलन्कार यातच तू रमली होती
मला सोडून तर जाणार नाही ना? नाहीं असें म्हण्त ती शरीरात प्रवेशली
वरूनत्या चैतन्याच्या पर्जन्य धारा कोसळत होत्या
त्यात तिचे डाग धुवून निघत होते
काया पूर्वी सारखी झाली होती
ती चकित झाली
तिने पाहिले दूर पिंपळ वृक्षाच्या पारावर कुणीतरी बसलेले तिला दिसले
ती धावत तिकडे निघाली
ते स्वामी होते
स्वामी आपण ? असे म्हणत तिने त्यांचे चरण पकडले
स्वामी नि त्याच्या मस्तकास स्पर्श केला
तिची तंद्री लागली
डोळे मिटले गेले
काही वेळाने तिला कोलाहल ऐकू आला
एक लहान बालक रडत आल्याचा आवाज आला
तिने डोळे उघडले
वनवासी स्त्री चे ते बालक रडत होते
ती जागृत अवस्थेत आलेली
स्वामींच्या चरणांना तिने मिठी मारले होती
तिला देह भान आले
ती उभी राहिली व स्वामीस नमस्कार केला
स्वामी मिस्कील पणे हसत होते
सारी माया माया मायाजाल असे ते म्हणाले
भक्तगण येत होते
ती निघाली
रथात बसली व घरी आली
आल्यावर तिने दर्पणात आपले रूप पाहिले ती सुंदर दिसत होती सुंदर पण तिला त्याचे अप्रूप वाटेना
तिच्या डोळ्या समोर ती सुवर्ण बाहुली येत होती
ताला रडू फुटले
स्वामी मला क्षमा करा मी स्वार्थी अन पापी वेश्या आहे
मी आपणास या नरकात ओढायला निघाले होते पण आपण महान आपण मला या रौरवातून हात देत बाहेर काढले स्वामी क्षमा करा
तिने अश्रू पुसले
बाजूला एक रेशमी शेला पडला होता त्या शेल्याने तिने दर्पण झाकून टाकला
*
आता तिला दर्पणाची गरज नव्हती

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुढ काय झाल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कथा चांगली आहे.

परंतु सध्या "एक नूर आदमी - दस नूर कपडा" चा जमाना आहे.
तुमची वेषभूषा, केशरचना, रंगभूषा टिपटॉप असेल तरच तुम्हाला समाजमान्यता मिळते. नाहीतर तुम्ही टाकाऊ ठरता.
बुद्धी, विचार, वर्तन चांगले आहे/नाही यापेक्षा तुमचा वेष आणि रंगरूप कसे यावर तुम्ही ग्रेसफुल आहात की नाही ते ठरते.

त्यामुळे कथासार लोकांना रूचेल की नाही याबद्दल साशंक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेतच्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम वदति पुस्तकम ||

सध्या बातम्यांत असलेल्या, जेफ्री एपेस्टिन या पेडोफाइलची पिंप - ghislaine maxwell हिचे फोटो बघा. अतिशय आकर्षक बाई आहे. पण कृत्य/कर्म - हिडीस, हीन, गर्हणिय!!! लहान मुली पुरवायची त्या बिलिओनेअरला.
.
तेव्हा थोबाडावर, शरीराच्या सुबकतेवर, सौंदर्यावर काहीही नसते.
_________
कथा चांगली आहे. स्तुत्य प्रयत्न.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

How about 'embrace our inner sloth' by slowin down being more mindful reducing wasteful convenience being economical with our energy recycling creatively and reconnecting with nature.