इलेक्ट्रिसिटी

चोहीकडे दुःखाची मेजाॕरिटी आहे
सारीकडे वेदनेची कंटिन्यूटी आहे.

तुझ्या पाऊलवाटा कुठे आहेत देवा
तुझ्या अस्तित्वाची ॲम्बिग्विटी आहे.

आमच्याही दारी सुर्य येईल उद्या
अंधारातच ही प्रोबॕबिलिटी आहे.

कोणतीच भाषा तुला लागत नाही
बोलक्या नजरेत ही कपॕसिटी आहे.

हार तुरे नकोत फक्त हास एकदा
निरोपाची हीच सिंप्लिसिटी आहे.

कित्येक युगांची गाठ आहे ही
ओळख आपली ॲंटिक्विटी आहे.

सगळे जुळते पण काही उरते
नियतीची ही इसेंट्रिसिटी आहे.

तुझ्या मिठीने प्रभारित झालो
तुझ्या अंगात इलेक्ट्रिसिटी आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ती 'व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी' कविता तुमचीच काय हो?

असो. प्रस्तुत कविता म्हणजे इनॅनिटी आहे. चालायचेच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळे जुळते पण काही उरते
नियतीची ही इसेंट्रिसिटी आहे.

सगळे वाचले पण काही ना कळले
इतकेच म्हणतो कविता तुमची
सनसनाटी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Do not judge, or you too will be judged" Bible
Matthew 7:1-6 New International Version

सगळे जुळते पण काही उरते
नियतीची ही इसेंट्रिसिटी आहे.

सगळे वाचले पण काही ना कळले
इतकेच म्हणतो कविता तुमची
सनसनाटी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Do not judge, or you too will be judged" Bible
Matthew 7:1-6 New International Version