मी फेसबुकवर फ्लर्ट का करतो?

Miklós Barabás - Flirting

फेसबुकवर फोटो-लिखाणातून लोकांचे विचार, व्यक्तिमत्वे, आवडी-निवडी कळतात. त्यापरत्वे त्यांच्याबद्दल सहज नैसर्गिक आकर्षण वाटणे हे फार काही अघटित नाही. ज्यांच्याविषयी आकर्षण वाटते त्या लोकांचे वय, लिंग, वैवाहिक स्थान, भौगोलिक अंतर इ. बाबी आपल्यापेक्षा वेगळ्या असतात; लौकिकार्थाने जोडी जुळण्यास अनुरूप नसतात. म्हणून आपण ते आकर्षण बऱ्याचदा जाहीरच करत नाही आणि अनुभवांस मुकतो. मी खूपदा व्यक्तिमत्व भावलेल्या स्ट्रेट, विवाहित स्त्री-पुरुषांच्यासोबत फ्लर्ट करतो, त्याची परिणती कसल्याही लैंगिक नातेसंबंधात होणे मला अपेक्षित नसते. त्याचे रूपांतर फक्त मैत्रीत होते खुपदा आणि तरीही फ्लर्टींग चालू राहते दोघांत. वाटणारे आकर्षण फारसे कधी कमी होत नाही,कारण त्याबद्दल कोणतीच शारीरिक-भावनिक कृती कधीच घडत नाही. ती अपूर्णता कायम गूढ वलय ठेवते त्या व्यक्तीच्या अस्तित्वाभोवती. पण आकर्षणामुळे घडणारे रंजक, वळणावळणाचे, गंमतीचे नाजूक संभाषण फार मजा आणते. इतर गे-समलैंगिक पुरुष फ्लर्ट केल्यास लगेच सेक्स किंवा प्रेम अश्या बटबटीत विषयांना ताबडतोब हात (तोंड, पाय, जो वाटेल तो अवयव) घालतात, आणि हळूहळू ते गूढ आकर्षण विरून जाते. त्याउलट स्ट्रेट पुरुष केवळ लाजतात आणि awkward होतात. स्त्रिया 'काय उपयोग गे व्यक्तीशी फ्लर्ट करण्याचा' असा विचार करतात. प्रेम-आकर्षण ही केवळ भावना म्हणून अनुभवता येते , त्याचे क्रियाशील 'उपयोगी' नात्यात रूपांतर होणे दरवेळेस गरजेचे नसते हे आपण लोक किती विसरलेले असतो. स्ट्रेट स्त्री-पुरुषांतसुद्धा नात्यांचा ठळक बटबटीतपणा न आणता केवळ संयत मर्यादित आकर्षणाचे, निरागस मनमोकळे तीव्र रूप अनुभवणे शक्य असते, उलट जास्त गंमतीचे असते. आणि मग तिथे वय, लिंग, वैवाहिक स्थान, भौगोलिक अंतर इ बाबी आडकाठी बनत नाहीत.समोरच्या व्यक्तीने कोणताही अपेक्षित प्रतिसाद न देता फक्त आपल्या त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाचा खेळकरपणे स्वीकार करणेसुद्धा रंजक असते. सतत फक्त मैत्री किंवा प्रेमाचे नाते अशी नात्यांची दोन टोके अट्टाहासाने अनुभवणे, हे अरसिकतेचे लक्षण !

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

...फ्लर्ट केल्यास लगेच सेक्स किंवा प्रेम अश्या बटबटीत विषयांना ताबडतोब हात (तोंड, पाय, जो वाटेल तो अवयव) घालतात, आणि हळूहळू ते गूढ आकर्षण विरून जाते.

हळूहळू? मुख्य कथानकाबरोबर सर्व उपकथानकांची गुपिते सुटल्याशिवाय आकर्षणातले गूढ विरत नाही असे असावे.

"कठिण कठिण कठिण किती पुरुष हृदय, घाई
फ्लर्ट करिता झटण्याप्रति त्वरित गोष्ट जाई

...
एकपेडिचा एककल्ली हा गोफ गुंफिती
हळुच हळुच परि शेवटी तुटत-तुटत जाई"
--------

(पण हा एक एककल्ली गोफ एकदम खट्टकन् तुटण्याऐवजी हळूहळू का तुटावा, बरे?)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

. प्रेम-आकर्षण ही केवळ भावना म्हणून अनुभवता येते , त्याचे क्रियाशील 'उपयोगी' नात्यात रूपांतर होणे दरवेळेस गरजेचे नसते हे आपण लोक किती विसरलेले असतो.

ज्यांचे अगोदर क्रियाशील 'उपयोगी' नात्यात रूपांतर होत होते त्यांच्यासाठी विसरणे ठीक. इतरांचे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवादातून जे काही मिळवायचे आहे, त्याची चौकट दुतर्फा मान्य असायला हवी.

फ्लर्टचा पहिला खडा टाकणे ठीकच -- कुठलाही प्रस्ताव कोणीतरी प्रथम करावाच लागतो. आणि त्या फ्लर्टेशनची चौकटही कोण्या एकाने सुचवणे ठीकच : ती चौकट येथे सुचवलेली असो "बटबटीतपणा न आणता केवळ संयत मर्यादित आकर्षणाचे, निरागस मनमोकळे तीव्र रूप अनुभवणे", किंवा "बटबटीतपणा अनुभवणे" वा "फक्त मैत्री" असो, त्या चौकटीचा दुतर्फा स्वीकार झाला तरच ठीक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हणतो.
पण "विवाहित स्त्री-पुरूषांशी" फ्लर्टिंगचा नतीजा नक्की कुठे जाईल हे कसं ठरवणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी फेसबुकवर सगळ्या प्रकारच्या लोकांशी फ्लर्ट करते, गे पुरुषांशीसुद्धा. अट एकच - मला पसंत पडेलशी विनोदबुद्धी हवी.

का करते? (शिंकेसारखं) येतं म्हणून करून मोकळी होते. उगाच बोळे कशाला तुंबवून ठेवायचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसीवर माज्याशी मयत्री कर्नार कं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही गे पुरुष आहात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. पण मी "सगळ्या प्रकारचा लोक" आहे. (संदर्भ: प्रथम वाक्य)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सगळ्या प्रकारच्या लोकां'त गे पुरुषांचा समावेश होत नाही काय?

मग तुम्ही 'सगळ्या प्रकारचे लोक' आहात, परंतु गे पुरुष नाही, हे कसे काय ब्वॉ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी फेसबुकवर सगळ्या प्रकारच्या लोकांशी फ्लर्ट करते, गे पुरुषांशी सुद्धा. अट एकच - मला पसंत पडेलशी विनोदबुद्धी हवी.

स्पष्टीकरण: "सगळ्या प्रकारचे लोक" आणि "गे पुरुष" हे दोन वेगळे गट* असल्याचं अदितीशेठच्या मूळ वाक्यातच आहे. आणि मॅडमने कह दिया तो कह दिया, हे तुम्हास ठाऊक नसावे?

*उदा. "फक्त सभ्य गृहस्थ आणि ऑफिसर्स यांना प्रवेश"

तुम्हाला सुद्धा पायजे तर तुम्ही डायरेक मागा ना मयत्री मॅडमकडे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सगळ्या प्रकारचे लोक" आणि "गे पुरुष" हे दोन वेगळे गट* असल्याचं अदितीशेठच्या मूळ वाक्यातच आहे.

मी त्या वाक्याचा अर्थ "मी सगळ्या प्रकारच्या लोकांशी फ्लर्ट करते, अगदी गे पुरुषांशीसुद्धा!" असा घेतला.

तुमच्या (पारंपरिक पद्धतीच्या) इंटरप्रिटेशनप्रमाणे गे पुरुषांना 'सगळ्या प्रकारच्या लोकां'तून वगळलेले आहे; माझ्या इंटरप्रिटेशनमध्ये (आधुनिक फ्याशनीस अनुसरून) थोडी इन्क्लूज़िविटी घुसडण्यात आली आहे खरी, परंतु त्यात गे पुरुषांना 'सगळ्या प्रकारच्या लोकां'च्या उतरंडीत निम्नतम स्थान देण्यात आलेले आहे. (कोणते अधिक वाईट, ते तुम्हीच ठरवा.) कोणते इंटरप्रिटेशन खरे, ते मॅडमच सांगू शकतील.

अर्थात, इंटरप्रिटेशन कोणतेही का असेना, वाक्य मॅडमचे आहे, तस्मात् तो त्यांचा (बंगाली) सत्कार आहे; माझा (किंवा तुमचा) नव्हे.

*उदा. "फक्त सभ्य गृहस्थ आणि ऑफिसर्स यांना प्रवेश"

सभ्य गृहस्थांचा आणि ऑफिसरांचा दाखला रोचक आहे. मात्र, तो येथे लागू नसावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

तुम्हाला सुद्धा पायजे तर तुम्ही डायरेक मागा ना मयत्री मॅडमकडे..

अर्थात. (मला मागायचीच असेल मयत्री, तर मग मी आणखीन मध्यस्थ तो कशाला घेऊ मध्ये?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही फ्रेंडशिप मागणार असाल तर साईबाबाशप्पत आपण मधून बाजूला होणार. आडीबाजी नाय करणार. राखी बांधून घेणार साला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याशी आणि हातचा म्हणून नबांशीही फ्लर्ट करायला काही अडचण नाही. का, ते नबा सांगतीलच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्याशी आणि हातचा म्हणून नबांशीही फ्लर्ट करायला काही अडचण नाही.

'हातचा म्हणून', हं? बरे!

का, ते नबा सांगतीलच!

मी मयत्री मागितली नाही. मी टरफले उचलणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आसपासच्या अनेक तरुण तरुणींना अजिबात फ्लर्ट करता येत नाही. ग्रेसफुली फ्लर्ट कसं करावं याचे क्लासेस सुरू व्हायला हवेत.
निदान या निमित्ताने अनिकेतराव, तुम्ही अजूनेक लेख लिहा या बद्दल. का झालं, कसं हेही सांगा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

(शीर्षकाची कल्पना पु.लं.कडून साभार. इदं न मम|)

म्हणजे, 'नवनीत' वाचून का फ्लर्ट करणार ही आजकालची तरुण मंडळी??? कठीण आहे!

(पण हा सगळा आजकालच्या शिक्षणपद्धतीचा दोष आहे. प्रत्येकाला फ्लर्टिंग विषय कंपल्सरी कशासाठी? मग '२१ अपेक्षित' नि 'विकास व्यवसायमाला' घोकून ढिगाने पोरे पास होणार. आतून मात्र पोकळ. हवेय कशाला? त्यापेक्षा ज्याला कोणाला बायसेप्स नाहीतर ॲब्ज़ मिरवून तमाम महिलावर्गाशी फ्लर्ट करण्यात रस आहे, त्याला देऊ द्यात की परीक्षा! इतरांवर तो बोजा कशासाठी?)

(नाही, NGAF, हे मान्यच आहे, परंतु तरीही. आणि हो, NGAF, बरे का! (NGF नव्हे.) बोले तो, Nobody gives a f***. नाही म्हणजे, इंग्रजी पाजळायचेच झाले, तर निदान व्याकरणशुद्ध तरी पाजळावे, असे आमचे बुवा जुन्या पद्धतीचे मत. असो चालायचेच. आजकालची शिक्षणपद्धती, अजून काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

तुमच्या सारख्या सपक, पाणचट आणि बोअरिंग कॉमेंट्स लिहिण्यात रस नाही. वाट्टेल तिथं बादलीभर पातळ व्याकरणशुद्ध डरंगळणाऱ्याने कुणी कुठं काय लिहावं हे सांगू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला