शोधत होतो पुन्हा स्वत:ला

शोधत होतो पुन्हा स्वत:ला
उपसत होतो पुन्हा पुन्हा मी
पुरातनाची प्रचंड पडझड
परंपरांची अपार अडगळ

शोधत होतो अथक स्वत:ला
ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी
वर्तमान हतबल करणाऱ्या
भवितव्याचे भीषण पडघम

ऐकत होतो अधीरपणाने
माझीच अनोळखीशी चाहूल
कळून चुकला पुन्हा, स्वतःचा
शोध विफल ठरण्याचा संभव

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शोध विफल ठरण्याचा संभव

गूगलवर आत्ताच 'मी' असा (देवनागरीतून) सर्च मारून पाहिला. वाट्टेल तेवढे रिझल्ट्स मिळाले, परंतु एकही उपयोगाचा असेल तर शपथ! शाओमी मी ए२ काय, मीटर काय, रियल मी (चायनीज स्मार्टफोन?) काय, 'मी तुझी तू माझा' (सीरियल?) काय, नि काय काय! (नाही म्हणायला 'एक शून्य मी' सापडले, तेच काय ते त्यातल्या त्यात रेलेव्हंट होते.) असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0