(आम्ही कोण ?)

आम्ही कोण म्हणोनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
श्रेष्ठींनी दिधले असे कुरण हे आम्हास पोसावया
पैशाने तुमच्याच आम्ही मिरवू चोहीकडे लीलया
दुष्काळातही अर्थप्राप्ती आमुची पार्टी कराया शके //

सारेही विधी, कायदे, नियम हे आम्हा तृणासारखे
हस्तक्षेपच आमुचा शकतसे राष्ट्राप्रती द्यावया
अस्थैर्यातिशया अशी वसतसे जादू करा॑माजि या
पोटार्थी प्रति-सूर्य पाळू पदरी - सत्तेपुढे जे फिके //

सत्तेमाजि वसाहती वसविल्या कोणी ठगांच्या बरे?
सत्तेला घरची मिरास करण्या सा॑गा झटे कोण ते?
ते आम्हीच, क्षुधा अदम्य अमुची - मरणोत्तरेही उरे
ते आम्हीच, दरिद्र-दैन्य तुमचे ज्या॑पासुनी जन्मते//

आम्हाला निवडा-पुनश्च फ़ुगवू आम्ही स्वतःचे खिसे,
आम्हाला निवडा- पुनश्च उडवू डेमॉक्रसीचे हसे //

-(एखाद्या जुन्या कवितेशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अभिवादन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0