नदी

युलियान तुविम हा पोलिश कवितेतला एक हिराच. तुविमची लेखकीय कारकीर्द विविधतेने भरलेली आहे. उछ या शहरात १८९४ साली त्याचा जन्म झाला तर १९५३ साली मृत्यू झाला. ज्यू कुटुंबात वाढलेल्या तुविमचं संपूर्ण जीवनच संघर्षमय आहे, त्यात स्वतःच्या देशाचा शोध आहे. त्यामुळे त्याची राजकीय कविता फार ताकदीची आहे तरीही त्याची कवी-प्रतिभा तिथेच थांबत नाही. बि-बा-बो कॅब्रेचा एक महत्वाचा लेखक हा आज पोलिश साहित्य क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट बालकविता लिहिणारा कवी म्हणून ओळखला जातो. त्याच्या लहान मुलांच्या कविता या - double audience - ची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. त्याच्या लहान मुलांच्या कवितेमध्ये अत्यंत नादमयता , संगीतिकता , साधी भाषा असली तरीही ती एकाच वेळी लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना देखील आकर्षित करते आणि ती दोघांसाठीही असते. त्याच्या - Rzeczka ( जेचका ) - अर्थात -नदी - या कवितेचं भाषांतर करण्याचा प्रयत्न !

-नदी -

वाहे वाहे नदीचा
चमचम चमचम धागा
कधी दृश्य , कधी अदृश्य
चंदेरी चंदेरी झगा

पाणी तिचं नितळ नितळ
थंड , शुद्ध खोल तळ
वाहता वाहता गुणगुणे
वाहता वाहता सळसळे
त्याचे मनोगत पण कोणा कळे ?

फक्त गोटे आणि मासे
यांनाच अशा भाषा अवगत असतात ,
पण सर्वांनाच माहितेय ना ?
गोटे आणि मासे
नुसते मौनीबाबा असतात ,
मौनीबाबा असतात !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान आहे. मूळ मराठीच असावी असंच वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0