एकटेपणा

शशांक जाउन ८ महीने उलटले होते. सविता अजुनही त्याच्या जाण्याला सरावलेली नव्हती. अजुनही सकाळी डोळे उघडले की पहीली आठवण होइ ते त्याच्या नसण्याची आणि एक अतिशय जड, उदास भावनेचा ढग तिचे मन झाकोळून टाके. मग उठण्याचे ना त्राण राही, ना झोपून राहून बरे वाटे. हे खरे तर रोजचेच झालेल होते. सकाळी कसे बसे अंथरुणातून स्वत:ला फरफटवत काढुन, ती ऑफिसमध्ये जायच्या तयारीस लागे. घरातील प्रत्येक वस्तू, शशांकची आठवण करुन देण्यास समर्थ होती. इलेक्ट्रिक ब्रश - तिचा व त्याचा ब्रश आलटुन पालटुन चार्जिंगला ठेवणे, हे शशांकने आपण होउन स्वीकारलेले लहानसे काम होते. आता तिने जर चार्ज केला नाही तर तो ब्रश तसाच अनचार्जड राही. खरं तर अनचार्जड ब्रशच्या मफल्ड आवाजासारखे तिचेही आयुष्य चार्जहीन झालेले होते. कसलाही पर्पझ नसलेले. आताशा तर तिने वीकेंडची वाटही पहाणे सोडुन दिलेले होते. कारण वीकेंड खायला उठे तिला. हेडस & शोल्डर शांपू - शशांकच्या आवडीचा शांपू. तिचे शांपू ठरलेले नसत कधी हर्बल तर कधी नॉनहर्बल, पण सर्व अतिशय सुगंधी. आणि त्याच गंधहीन शांपू कधीच बदलत नसे. क्वचित ती त्याला नज करुन म्हणे "दर वेळेस त्याच त्याच शांपूच आणि तोही गंधहीन, तुला कंटाळा येत नाही का रे. ओल्ड स्पाईस, वापर ना कधीतरी. मस्त वास आहे त्याला.खरं तर सविताने सांगीतले आणि शशांकने ऐकले नाही असे फार क्वचित होत असे. पण परसनल हायजिन, स्वत:च्या आवडीनिवडी याबाबत तो फार ठाम असे. त्यामुळे परत वॉलमार्ट, सी व्ही एस् मधून दोघेजण तोच हेडस & शोल्डर्स घेउन परत येत असत. पण आता, शशच्या आठवणीत सविही हेडस & शोल्डर्स वापरु लागली होती. काय करायचे होते सुगंधी शांपू वापरुन, थोडीच शश, तिला टॉवेलमध्येच मिठीत घेउन, तिच्या केसांचा सुगंध घेणार होता?
.
'अरे अरे! असं काय करतोयस, मला कपडे तर चढवु देत. आणि अंग बघ किती दमट आहे माझं.' - सविता
'कपडे घालायचेच कशाला, इन मिन दोघे जण. त्यात ११ व्या फ्लोअर वरती. ना कोणी पहायला आसपास. आणि बघू बघू ना कुठे कुठे दमट आहे ग?' - तो
'वा! छान कल्पना आहे. पण पूर्ण अव्यवहारी. मला उघड्या अंगावर हवा सहन होत नाही शश आणि परत घरात तू फिर नागडा. मला नाही फिरायचं' असं म्हणुन आपल्याच 'नागडा' या शब्दावर हसत ती कामाला लागे.
रात्री एकमेकांच्या मिठित बोललेले कामुक, उत्तेजक, उत्तान् शब्द वेगळे आणि दिवसा ढवळ्या बोललेले शब्द वेगळे. का असे होते, ते तिला माहीत नसे पण असे होइ खरे. शश ला बेडमध्ये डर्टी , प्रोफेन टॉक अतिशय आवडतो हे तिला नीट माहीत होते. तिला तरी कुठे नावडे?
.
ब्रश चार्जिंगला ठेवला पाहीजे, ब्रशची कॅप बदलली पाहीजे. खरं तर आयुष्याचा रस्ताच बदलला पाहीजे.
रस्ताच बदलला पाहीजे या विचाराने ती दचकली. खरच! आपण ही ८ महीन्यात असा विचार करायला लागलो? उर्मिलाने , सांगणे वेगळे की 'डेटिंग साईटवरती जाउन नाव नोंदव, गेट अ लाइफ फॉर गॉड्स सेक्. आपल्या गरजा मारत जगण्यात काय शहाणपण आहे सवि?' आणि आता आपण तोच विचार ८ महीन्यात करु लागणं वेगळं. खरे पहाता, उर्मी होती म्हणून सविची सॅनिटी टिकून होती. उर्मी होती म्हणून, सविला काहीतरी सोशल लाइफ होतं.
.
पण काय हरकत होती खरच डेटिंग साईटवरती जाउन,नाव नोंदवायला? नाव नोंदवलं की लगेच डेटिंग सुरु करायचच असा तर नियम नाही. आज शनिवारी 'मीट सिंगल्स - लेकव्हिल' वरती जाउन तर बघू. पण पहीली कॉफी.
कॉफी चा घोट घेत, घेहुन सविने साईट उघडली. नाव, वय, लिंग, तुम्हाला जो जोडीदार हवा त्याचा वयोगट, त्याचे लिंग, .... आवडी-निवडी. अरे बाप रे बरच होतं की भरायला. खरं तर आपण शशच्या आधी गेलो असतो, तर शश या साइटवरती आला असता का? त्याला कोणी अन्य स्त्री चालली असती का? या जर तर ला काय अर्थ होता?. होता अर्थ होता, या 'जर-तर' मुळेच हे कळणार होतं की शश ला आपल्या जागी अन्य कोणी स्त्री चालली असती का? का त्याला नसता सतावला एकटेपणा? अर्थात, त्याला अन्य स्त्री चालो न चालो, आपल्याला अन्य कोणी पुरुष चालू शकणार आहे का, ज्याचा शरीरगंध वेगळा, तोंडवळा वेगळा, टर्न ऑन होण्याचे क्युज आणि किंकस वेगळे, .... बाप रे! तिला विचारही करवेना. धोका आहे. काय माहीत कोण परव्हर्ट असेल, त्याला काय इश्युज असतील. त्याची काय मानसिकता असेल. कोणी गुन्हेगारी वृत्तीचा निघाला तर? रिस्कीच आहे. आयुष्य जगणे हीच खरं तर रिस्क आहे. पण नाव नोंदवायला काय हरकत आहे. इमेल फेकच देउ यात,नेहमीचा इमेल आय डी नको..... अर्थातच नको!! हे काय विचारणं झालं! Are you naive or are you stupid? पण मग इमेल आल्यावरती? मग काय इग्नोर करायचा हक्क आहेच की आपल्या हातात. नाही द्यायचं उत्तर. फोटो तर पहायला मिळतील, या वयातील पुरुषांच्या अपेक्षा तर कळतील. अरे बाप रे फोटो! म्हणजे आपलाही तर शेअर करावा लागणार. इथे सविला गठाळल्यासारखेच झाले. ऑफिसात गवगवा झाला तर. नको आधी उर्मिचा सल्ला घेउ यात. तिला भरपूर अनुभव आहे. ३५ शीत ती आता डेटिंग साईटवरती पहील्यांदा ॲक्टिव्ह आहे.
.
उर्मिचा व्यवहारी स्वभाव, सविला अतिशय आवडे. जिथे सविच्या विचारांची झेप कमी पडे तिथे ती उर्मिच्या सल्ल्याने काम करे. बघू उद्या तिला भेटतोय तेव्हाच ठरवु कोणता फोटो टाकायचा. म्हणा आपले फोटोही सगळे एकाच प्रकारचे येतात. एकच निर्विकार भाव तोंडावर किंवा मग हसलं तर अवघडलेलं हसणं. मे बी, मे बी नॉट अ बॅड आय्डिया, उर्मिकडुनच फोटो सेशन करुन घेउ.

________________________ भाग २ - फेटिश _________________________________

"निळा नको हिरवा टॉप घाल" - उर्मी
"अगं पण मला निळाच रंग तो ही जरा बरा दिसतो."
"तुला काय माहीत तुझ्यावर काय चांगले दिसते ते. तू नोटीस केलं आहेस कि नाही ते माहीत नाही पण हिरव्या रंगात आपण अधिक तरुण दिसतो. खुलून येतो." - उर्मी
"अगं पण जो पुरुष फक्त तारुण्याच्या आसक्तीने माझ्याजवळ येईल, तो काय कामाचा?" - सवि
'सिरिअसली? तू चांगले प्रॉस्पेक्टस फक्त बाह्यरूपाच्या तुझ्या वेडगळ कल्पनांनी सोडणारेस? आई ने तिचे काम केले सवि. नकळत्या वयात, तुला चेक मध्ये ठेवण्याचे. आता तरी मोठी हो. सुंदर किंवा वयापेक्षा तरुण दिसणं गैर नाही गं!"
.
आणि शेवटी सुंदर आयरिश हिरव्या रंगाच्या टॉप मध्ये सवि चे फोटो सेशन झाले काय आणि फोटो आकर्षक आला काय. फोटोत वय ५ वर्षांनी कमी वाटतं होते खरे. फोटो साईटवरती टाकला ही गेला. पुढील काही दिवसात सवि चे मन हुरहुरत राहिले. विशेषतः: त्याच दिवशी प्रतिसाद न आल्याने, तिला जरा डाऊन वाटले. पण उर्मीने हुरूप दिला की क्वचित वेळ लागतो.
मात्र काही दिवसात, कामात सवि विसरून गेली विशेषतः: एका शिस्त म्हणून ती त्या साईटवरती फक्त रात्री शेवटची नजर टाकू लागली. जास्त भरणा अमेरिकन व तो हि कॉकेशिअन पुरुषांचाच होता. सवि ला भारतीय मित्रच आवडला असता. पण तिने ओपन दृष्टिकोनातून सॉर्ट ऑफ 'yeah , वेल ...... चालेल परदेशी ही पाहू. लेट'स नॉट बी चुझी' असा दृष्टिकोन ठेवला होता.
.
काही दिवसांत कोणी तिला रिक्वेस्ट पाठवू लागले तर क्वचित तिने काही जणांना approch केले. हळूहळू तिला या जगाचे नियम कळू लागले. तशी तर उर्मीदेखीला तिचे कान टोचत होतीच. काही जण विधुर होते, काही जण 'serial monogamy ' नात्यातून बाहेर पडत होते, परत परत मैत्रीण शोधत होते, काही ना काही कारणाने डंप करून या साईटवर आले होते. आणि who knows काही cheaters असू शकत होते.
.
अशीच एका रात्री उर्मी 'मीट सिंगल्स-लेकव्हील' वरती ब्राउझ करत असताना. तिला एक अवघड नावाची , डिसेन्ट लुकिंग रशियन एंट्री दिसली. इतकं अवघड नाव असलेला तो कसा आहे, काय करतो, त्याला कोण पाहिजे या कुतूहलाने तिने त्याचे प्रोफाइल उघडले. व्हिक्टर - आय टी मध्ये स्क्रम मॅनेजमेंट मध्ये. आवड - फुटबॉल, सॉकर, ट्रेकिंग ची हौस, मुख्य जगभर फिरण्याची इच्छा, जगभरचे विविध प्रकारचे पदार्थ चाखण्याचा शौक, बागकाम, आणि अन्य बरेच छंद त्याने जोपासलेले दिसत होते. खरं तर काय हरकत होती का नाही त्याला विचारून पाहू? तंतोतंत छंद जुळणाऱ्या व्यक्तीचा आपल्या growth मध्ये असा काय मोठा हातभार लागणार आहे. का नाही एकदम भिन्न मित्र निवडू, विचाराने तिने त्याला रिक्वेस्ट पाठवली. तीन दिवसांनी उत्तर आले - hey , where do you want to meet ?
.
व्हिक्टर तिला आवडू लागला होता. ३ भेटीत, तिला तो डिसेंट वाटला होता. त्याचा डिवोर्स झालेला होता आणि मुलगी मार्गी लागली होती. व्हिक्टर दिसायला आकर्षक होताच होता पण बोलण्यात एक सौजन्य, मृदुता होती. नजरेत व्यक्तीच्या आरपार पाहण्याचे , समोरच्या व्यक्तीला guage करण्याची लकब होती. त्यांच्या भेटी नंतरही तिच्या मनात भेटीचा हँग ओव्हर रहात होता. आणि उर्मिलाला, या गोष्टी सकारात्मकच वाटतं होत्या ....पण मुख्य म्हणजे सविलाही. शिवाय ३ भेटी म्हणजे नक्कीच व्हिक्टरलाही ती आवडली होती नाही तर वेळेला पैसा मानणाऱ्या अमेरिकेसारख्या देशात कोणी उगीच कशाला भेटत राहील आणि वेळेचा अपव्यय करीत राहील? तिचा एकटेपण सुसह्य झाला होता.
.
३ भेटीत डेटिंगमध्ये निदान किसपर्यंत मामला गेला नाही तर फाऊल धरतात. किंवा रस्ते वेगळे शोधले जातात, त्यामुळे आजच्या चवथ्या भेटीमध्ये ती किंचित anticipation मध्येच गेलेली होती. आतापर्यंत दोघात खूप मोकळेपणा आलेला होता. त्याला किंचित वाईड हिप्स आवडतात हे ऐकून ती खूप हसली होती. त्याला भारतीय खाणे आवडता असल्याने तिला हायसे वाटलेले होते. ती हसली की त्याची नजर क्षणभराकरता तिच्यावर रेंगाळत होती आणि हे तिच्यातील स्त्रीने ओळखले होते. त्यालाही तिने हिरव्या रंगाचा स्कर्ट किंवा पोपटी खड्यांचे कानातले घातलेले आवडत होते हे तिला माहीत होते. खरं तर ३ भेटीत बरेच काही कळते यावर तिचा पूर्वी विश्वास बसलाही नसता, पण आता ... अंहं!! आता अनुभव गाठीशी होता. खरं तर आज दोघेही जण सिनेमा पहाणार होते.
.
थिएटरचा मखमली अंधार आणि अमेरिकेत थेटर्समध्ये गर्दी नसणे या गोष्टी नक्कीच स्वागतार्ह होत्या. शशांकबरोबर सिनेमा पहाताना, हे थ्रिल तिने कधी अनुभवले नव्हते कारण दोघे पती-पत्नी होते, घरी रान मोकळे असल्यावरती, कोण सार्वजनिक ठिकाणी शोभा करेल? पण व्हिक्टर आणि ती पती-पत्नी तर नव्हतेच, शिवाय हा अनुभवच थ्रिलिंग होता. सिनेमा छान होता, तिच्या दंडाला , हाताला त्याचा स्पर्श जाणवत होता. आणि येस्स्स! तो स्पर्श तिला तरी heady वाटत होता. सिनेमात 3-4 बेड सीन्स होते, आणि ते श्वास रोखून पहाताना, कितीदा तरी तिला शंका येत होती की व्हिक्टरला आत्ता या क्षणी तिच्या शरीरातील कोलाहल, पूर्ण कळत असेल का? तिच्या श्वासाचा आवाज तर होता नाही ना? त्याचा दंड आता जास्त बिलगला आहे का? पायाच्या पोटऱ्याना चुकून जरा जास्तच स्पर्श होतोय. पॉपकॉर्नस चा सुगंध, थिएटरचा कोरा वास, हातावर बोटे मोजण्याइतक्या लोकांचे परफ्यूम्स .... हे सेक्श्युअल टेन्शन आउट ऑफ कंट्रोल जातंय. जर त्याने आज पुढाकार घेतला, तर? हो की नाही? हो की नाही? का नाही? - विचार करून ती वेडी झाली होती. सिनेमा अतिशय मनोरंजक व light होता. सिनेमात काही घडलेच नाही. म्हणजे दोघांच्यात. मध्ये मध्ये तो हसत तिच्याशी बोलत होता, ती रुकार देत , रिस्पॉन्स देत होती. पण तिचे सगळे ऑटोपायलट वरती चाललेले होते.
.
निरोप देताना, व्हिक्टरने नजरेत नजर घालत तिला मधाळ हसत सांगितले, तू आज वेगळी वाटलीस. पुढची भेट पब्लिक प्लेसमध्ये नाही. तुझ्या घरी किंवा माझ्या. Does that साऊंड like a प्लॅन? अतिशय फर्मली विचारलेल्या त्या प्रश्नात काहीतरी छुपा अर्थ दडल्यासारखे तो हसला की तिला तसे वाटले?. तिने ना होकार दिला ना नकार. ती एवढेच म्हणाली " बहुतेक हो ....आय विल कन्फर्म सुन. लिहिते मी किंवा फोनवते.
.
"अगं पण इतक्या feverishly रशियन भाषा शिकलीच पाहिजे का?" - उर्मी
"येस्स्स ..... मला त्याच्याशी बोलायचे आहे, मला त्याला मराठी शिकवायचे आहे."
"पण का? हा अट्टाहास का. इंग्रजीत संवाद नाही करता येत का?"
येतो ना .... पण .......... ती कशी पटवून देणार होती, उर्मिलाला , की पाचव्या भेटीत नाही कदाचित पण त्यानंतरच्या भेटींत तिला रशियन येणं व त्याला मराठी येणं भाग होता. तोडक्या मोडक्या , accent वाल्या भाषेत तर अजून मज्जा होती."
उर्मिला कळत नव्हतं की रशिअन शिकून आणि त्याला मराठी शिकवुन असा काय मोठा तीर मारला गेला असता, परत ही शिकण्या-शिकवण्याची इतकी घाई काय?

समाप्त

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुढचा भाग असेल असं वाटत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

होय माईंड, क्रमश: टाकलेलं होतं पण अँग्युलर ब्रेसेस मुळे ते दिसत नव्हतं. जमल्यास पुढील भाग टाकायची इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पास,माझा पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile ॲज यु विश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुभाप्र..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढिल भाग अपडेट केलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला भाग ओघवत्या शैलीत आला, कथानक फुलवता येईल. शेवटाची घाई झाली की चांगल्यावर बोळा फिरतो. आणि हे इतकंही लिहिणं सोप्पं नसतं याची मला जाणीव आहे, शेवट न सुचल्यानं घाई झाल्यानं माझ्या खूप कथा अर्धवट राहिल्या, माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करेक्ट!!! मी अतोनात आळशी आहे. पटकन (पाट्या टाकणे) आणि मग स्वत:शीच कुरकुरत बसणे. Sad की आपल्याला इतरांसारखं का नाही जमत ... का नाही जमत.
________
शिवाय जिथपरर्यंत मी आयडेंटिफाय करु शकते तिथपर्यंत सहसा बरी होते कथा. नंतर गठाळते. कल्पकतेचे वावडेच आहे जरा.
_________
यापुढे माझ्या मनासारखी कथा जमत नाही तोवर इथे टाकायची नाही असा पणच करते. आणि आपलं आपल्याला अगदी नीट कळतं (व्य-व-स्थि-त) की जमली आहे की नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0