ज्योतिष चर्चा २०१९

ज्योतिष ही मौजमजाच आहे हे जोपर्यंत कठीण प्रसंग आपल्यावरच शेकत नाहीत तोपर्यंत कुणीही मान्य करेल. एखादी व्यक्ती कशी वागेल हे त्याच्या राशीवरून ( born under star) थोडीफार कल्पना येते. तर अशा गमतीजमतींसाठी हा धागा वेगळा काढतोय.
ज्योतिष न कळणारे, त्यावर विश्वास नसणारेही अनुभव लिहितीलच. आता या धाग्यातून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा अजिबात हेतू नाही. झालेल्या घटना, व्यक्तींच्या कुंडल्या पाहून त्यातून स्टॅटिस्टिकल डेटा वापरून अमुकएक टक्के शक्यता असते/नसते अनुमान काढण्याचे बरेच प्रयत्न झाले आहेत. हे सर्व जमेस धरून थोडा टैमपासअन टवाळकीला भरपूर वाव आहेच.
खडफळ्यावर टिप्पणी खूप झाल्यावर इकडे उलटसुलट करायला बार त्रास होतो म्हणून अगोदरच धागा उघडला.
---
पिरिओडिक टेबल जसे प्रत्येक मूलद्रव्याचे गुणधर्म सांगते तसेच ग्रह काम करतात या गृहितकावर ज्योतिष उभे आहे.
डोकेबाजपणा - बुध,
चिकाटीने काम,मालक - शनि,
पोकळ बडेजाव,स्थैर्य - गुरु,
काम तडीस नेणे,पदाधिकारी -रवि,
मानसिक संतुलन,लोकमान्यता -चंद्र,
तडकाफडकी झटपट उरक - मंगळ,
परदेश, घुसखोरी - राहू,
सुखभोग,लोभसपणा - शुक्र,
कल्पकपणा - नेपच्युन.
यावर आणखी लिहिनच.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

च्रट्जी लोलच लोल झालय. आपण एकच धागा काढला आहे. ROFL
चिंतांना (संपादक) बिचाऱ्यांना काम पडेल की काय? Sad
अभी क्या करनेका?
राहू देत दोन्ही नाहीतर. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

A certain smile, a certain face
Can lead an unsuspecting heart on a merry chase
A fleeting glance can say so many lovely things
Suddenly you know why my heart sings

बायपास रोड आहे की कात्रजबाइपास, खोपोली,बंगळुरु बाइपास.
पंढरपुराला नाही का जात दोन दिंड्या दिवेघाट/ कात्रज घाटाने?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन दिंड्या हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

A certain smile, a certain face
Can lead an unsuspecting heart on a merry chase
A fleeting glance can say so many lovely things
Suddenly you know why my heart sings

"

ज्योतिष न कळणारे, त्यावर विश्वास नसणारेही अनुभव लिहितीलच. आता या धाग्यातून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा अजिबात हेतू नाही. झालेल्या घटना, व्यक्तींच्या कुंडल्या पाहून त्यातून स्टॅटिस्टिकल डेटा वापरून अमुकएक टक्के शक्यता असते/नसते अनुमान काढण्याचे बरेच प्रयत्न झाले आहेत."

ज्योतिष विषयावर धागा सुरु आहे हे पाहून नाडीग्रंथ भविष्याचा विचार सादर करायला सुरसुरी आली.
सायन-निरयन, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य कुंडलीत ग्रह मांडायची पद्धत वगैरे चर्चा होत राहतील. ताडपट्टीवर कोरलेले ज्योतिष, त्यात मांडून आलेली जन्माच्या वेळची ग्रह परिस्थिती आणि अन्य कथन ज्योतिष शास्त्राला वेगळ्या स्तरावर पोहोचवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>नाडीग्रंथ भविष्याचा विचार सादर करायला सुरसुरी आली.>> - शशिकांत ओक.

लेखातून मांडा. कोणत्याही विषयावर त्रयस्थ खुली चर्चा नक्कीच चांगली.
मी खूप पूर्वी ( लहानपणी ) एक नाडीग्रंथ ( हस्तलिखित नाही) कुणी आणलेला पाहिला होता. त्यामध्ये आवर्तन पद्धतीने कुंडल्या होत्या. साठ संवत्सरांचे एक आवर्तन.

हे थोडे पटण्यासारखे आहे. कारण गुरु आणि शनि हे दोन्ही हळु चालणारे ग्रह जातकाचे भविष्य फिरवतात. गुरुचे बारा राशिंतून एक आवर्तन साधारण बारा वर्षे, शनिचे साडेअठ्ठावीस. तर लसावि साठ धरायला हरकत नाही. म्हणजे साठ वर्षांत बरेच योग होऊन जात असतील.

नाडी ग्रंथांच्या मूळ हस्तलिखित प्रति तंजावुर ललिता महाल / संग्रहालयात असण्याची शक्यता आहे. तुम्ही तिकडे गेलात काय?/विचारलं काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाडी ग्रंथांच्या मूळ हस्तलिखित प्रति तंजावुर ललिता महाल / संग्रहालयात असण्याची शक्यता आहे. तुम्ही तिकडे गेलात काय?/विचारलं काय?

नाडी ग्रंथ ताडपट्टीवरील भविष्य कथनाच्या हस्तलिखित बंडले तंजावरच्या सरस्वती महाल लायब्ररीत नाहीत. मात्र सरफौजी राजांनी या नाडीग्रंथ ताडपट्टीवर पुनर्लेखन करायला प्रोत्साहन दिले. राजाश्रय दिला. असे नाडी केंद्रवाल्यांच्या तोंडावर फार असते. प्रत्यक्षात ऑफिशियली तंजावरच्या कागदपत्रे पाहता तसे उल्लेख नाहीत. मात्र वैदीश्वरन कोईल (मंदिरात) पाण्याचे कुंड ज्या भागात आहे तिकडे तंजावरच्या सरफौजी राजे आणि त्यांचे पंतप्रधान यांचे दगडी पुतळे उभे दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0