दमलेल्या बाबुष्काची कहाणी

रांगेमध्ये पकलेली एक आजीबाई
थंडीचा गारठा आणि पोटामध्ये खाई
रोजचेच आहे सारे काही आज नाही
दुकानात कॅव्हियार पण पाव नाही
सकाळपासून फ़क्त वोदकाचा घोट
अन्नाचे नावही नाही, खपाटीला पोट
कपोलकल्पित जरी, सांगतो फुला
दमलेल्या बाबुष्काची कहाणी तुला

सोविएत काळामध्ये स्थिती होती बरी
बाबुष्का तेव्हाही करी दुकानाची वारी
पण तेव्हा दुकानात पाव मात्र असे
शनिवारी रविवारी साॅसेजही दिसे
खिशामध्ये जरी फक्त कोपेकची नाणी
पोट भरलेले आणि ओठांवर गाणी
बॅले आणि ऑपेराची महिन्याची फेरी
गावातल्या दाचामध्ये वर्षातून वारी
सोनेरी आठवणींचा झुलवे झुला
दमलेल्या बाबुष्काची कहाणी तुला

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

एक घोट वोदका
बबुष्काचा रोजचा
जास्त कधी झाली
कॉस्मोनॉटच व्हायचा

बबुष्का पोचलेली आहे.

अवांतर - मटणाच्या रश्याला रश्यात काय म्हणतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी4
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबुष्काचा एक घोट म्हणजे बॉटम्स अप केलेला एकच प्याला, हा तपशीलाचा भाग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही बाबुष्का तुझ्या त्या दुसऱ्या मराठी आजी कोणत्या, आठवल्या - सिंधूआजी, त्यांचंच वेषांतर का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सिंधुआज्जींनी रणगाडाविरोधी ग्रेनेड फोडून कॅव्हियारचे दुकान फोडले असते आणि स्फोटात न जळलेली कॅव्हियार फस्त केली असती. नो मॅन, नो लाॅ, नो वाॅर कॅन स्टाॅप सिंधुआज्जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजा आली वाचायला Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरच छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

झकास! सेंट पीटर्सबर्गातली एक दमलेली बाबुश्का आठवली:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रेट कविता !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंदिरा हटाओ इंद्रिय बचाओ ! - १९७७