दूर देशी दूर गावी

ठेच त्याला लागली की रक्त माझे सांडते
दुःख त्याला स्पर्शिले की नेत्र माझे वाहिले

राहतो तो दूर गावी भासतो माझ्या मना
हासतो तो दूर देशी मोद का माझ्या तना?

अंधकारी सूर्य त्याचा मध्यरात्री जागतो
पूनवेला चंद्र त्याचा अर्धरात्री झोपतो

दूर देशी दूर गावी मित्र माझा राहतो
पाश वेडे त्यागुनी तो ध्येय त्याचे शोधतो

चार मासी बर्फ त्याच्या आसमंती शोभते
आठ मासी ना हिवाळा स्वर्ग तेथे अवतरे

बर्फ त्याच्या दूर देशी गारठे माझी तनु
रात्र त्याच्या दूर गावी चांदणी माझी वपु

बांधवांना सोडुनी तो दूर देशी राहतो
पत्र नाही वृत्त नाही काळ माझा गोठतो

दूर देशी दूर गावी मित्र माझा राहतो
पाश वेडे त्यागुनी तो ध्येय त्याचे शोधतो

दीस येती दीस जाती वाट त्याची पाहते
आठवांची वादळे ती, का कशाला? ना कळे

रेशमाचे पाश वेडे आर्तता आक्रंदते
भेट नाही वर्ष झाली चित्त का आक्रोशते?

गाठ नाही त्या सख्याची आज वाटे एकटे
भास त्याचा ना पुरे, तो सारखा का आठवे?

दूर देशी दूर गावी मित्र माझा राहतो
पाश वेडे त्यागुनी तो ध्येय त्याचे शोधतो

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडली. पण या दोन ओळी

राहतो तो दूर गावी भासतो माझ्या मना
हासतो तो दूर देशी मोद का माझ्या तना?

नाही कळल्या. ??


या पुढचं विवेचन नाही वाचलंत तरी चालेल!!!

चरणांचा क्रम जरा चुकलाय वाटतं. एकदम "ठेच त्याला लागली..." ने सुरूवात, मग तो दूर आहे, दुसऱ्या कडव्यात परत "चार मासी.." वगैरे.

त्याऐवजी, पहिल्या कडव्यात तो दूर आहे, मग ध्रूवपद - "दूर देशी... त्याचे शोधतो" - मग दुसऱ्या कडव्यात तुमची ईन्व्हॉल्व्हमेंट - "ठेच त्याला लागली..." - वगैरे आणि शेवटच्या कडव्यात तगमग - "दीस येती दीस जाती" - असं असलं तर कविता जास्त चांगली उमजेल. म्हणजे असं आपलं मला वाटतं.

आणि कविता चालू आहे पण "भेट नाही वर्ष झाली .." या ओळीने मधेच एकदम "किती वर्षात नाही भेटलास" असं गप्पा मारल्यागत सांगितलंय!! जरा तेव्हढं कवितेच्या रूपात सांगितलं तर बरं होईल. शेवटी "...चित्त का आक्रोशते?" हा प्रश्न का? आधीच्याच ओळीत आक्रंदन आहे स्पष्ट लिहिलंय. त्यामुळे या ओळीत प्रश्नापेक्षा "... चित्त हे आक्रोशते" हे जास्त संयुक्तिक नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

थोडा आक्रोश जमलाय, कविता नवीन विषयावर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'दिल लगाकर हम ये समझे ज़िंदगी क्या चीज़ है
इश्क कहते हैं किसे, और आशिक़ी क्या चीज़ है'

ही चाल फिट्ट बसतेय.

बाकी अर्थाबिर्थाकडे नाही पाहिले. (च्याxx, विविधभारतीवर गाणी ऐकून ऐकून तशीच पाठ व्हायची. नि मग तीच तीच पुन्हा पुन्हा गुणगुणायला मजा यायची. त्या वेळी काय अर्थाकडे बघत होतो काय? की कोणाला अर्थ समजत होता तेव्हा? पण अंगवळणी पडलीच ना? हं, आज कित्येक वर्षांनी त्यातली एखादीच लाइन मध्येच अचानक नि उगाच आठवून जाते, नि तिचा अर्थ डोळ्यांसमोर चमकून जातो. टू लिटल, टू लेट. पण की फर्क पैंदा? असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कुणी कोडे माझे उकलील का' ची आठवण झाली.
कविता ठीकठाक वाटली. मुख्य म्हणजे आताशा सगळ्याचाच कंटाळा येउ लागलाय, मग 'प्रेम-विरह-अध्यात्म-ज्योतिष ...' या सर्वाचाच. तेव्हा विरह कल्पनेवर आधारीत ही कविताही कांटाळवाणीच वाटली. व्हॉट अ वेस्ट ऑफ सायकिक एनर्जी ऑन सम ऑर्डिनरी ह्युमन बीइन्ग्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0