तेव्हा

वास्तवाच्या लाक्षागृही
पुन्हा भस्मसात झालो
एका नव्या शेवटाची
तेव्हा सुरुवात झाली

ओतप्रोत तळ्याकाठी
पुन्हा सांडवा खोदला
दूर पाणलोटामध्ये
तेव्हा ढगफुटी झाली

आभाळाच्या तुकड्यात
पुन्हा पेरल्या चांदण्या
तेव्हा आकाशगंगेची
किनखाप झळाळली

शब्द शब्द मग केला
पुन्हा पुन्हा वज्रलेप
कवितेची वही तेव्हा
अश्रूंवर तरंगली

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0