शिशिर

हवेत आता लख्ख गारवा

स्वच्छ निळाई, केशरी थवा

पानांचा हा लालस मोहर

जाईल गळून, जरी मज हवा

देठात उबेचे आठव अजुनी

धग पानांची डोळ्यांमध्ये

जाणवते पण, पोचत नाही

आक्रसलेल्या गाभ्यामध्ये

झाडांनी कोठून आणला

विखार इतक्या सौंदर्याचा

अट्टहास होता का केवळ

बहरानंतरही बहराचा?

बोच पांढरी वाऱ्यामधून

हाक नव्हे ती - घंटा कानी

आभास तो पेटलेपणाचा

गाळण्यापूर्वीच्या निकरानी

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मला शिशिरातला बहर पाहिला की 'विझायच्या आधी काही क्षणांसाठी ज्योत तेजस्वी होते' हे आठवतं.

मात्र कवितेच्या वृत्तावर अजून काम करण्याची गरज आहे. गुणगुणताना अडखळल्यामुळे रसभंग होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0