(वाईट) साईट-सीईंग

कॅनियनच्या वरती पडूनी अडवे फोटो किती काढिले
सेल्फीस्टिक अति वापरून उलटे-सुलटे स्वत: पाहिले
इन्स्टाग्रामवरी करून पोष्टी, फेस्बुक लाईवही
केले फीड सुरू, बघून ललना ब्लॉन्ड-सुबक-ठेंगणी!

दगडांच्यातच काय हीस दिसते ढमके? मना वर्तले
अस्मादिक-मुख-चंद्र-बिंब दिसते उजवे कुणी बोलिले!
त्याला 'थॅन्क्यु ब्रदर' म्हणू तरी कसा, दांताळ उचकाटुनी
गोची काहीतरी असे, न समजे, त्याच्या रिमार्कातली!

उठलो, पॅन्ट झटकलीच पुरती धूळीत जी माखली
आणिक् उचलाया स्मरून वळलो बॅकपॅक् कॅमलची,
एकदम पाठीच्या कण्यात चमके, कळ जीवघेणी अगा
उठतो का बसतो! गमुनि दिवसा तारेच म्या देखिले!

गेली स्वॅग समस्त घाम सुटला, झालो धराशायी मी
गॉगल ओक्लेचा पडूनी फुटला हळहळ दाटे मनी
केंव्हा निज कर ठेऊनी कटिवरी कण्हता कसा ऊठलो
ते स्मरते अंधूक मात्र मजला आता बिछान्यावरी!

म्हणती 'सिल्वर-लायनींग' तसले घडलेच माझ्यासवें
'लाईव' पाहत राहिलेच अवघे, नी फेमस(!) मी लोकांमध्ये
जरी का सेलिब्रीटीसमान गमते जाता मी मार्केटला
व्हावे ना विचलीत ट्रेकवरती हा मी धडा घेतला!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

गमतीदार शार्दूलविक्रीडा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विनोदी व मार्मिक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी |
तळमळ निववी रे राम कारुण्यसिंधू, षड्रिपुकुळ माझे तोडि याचा समंधू ||