पिंपळ

त्या तीरावर आहे तो पिंपळ
पानांतुन ज्याच्या सळसळते ऋतुंची जाग
आणि नखांनी ओरबाडतात ज्याला
बिलंदर खारी ढोलीतल्या.

तळहातच जणू!
पिंपळपानं आहेत काही तांबुस कोवळी
रेषांतुन जीवन घेऊन ओलंकंच
लालसावलेलं, आभा ल्यालेलं प्रकाशाची.
जडमूढ मुळांनी धरली आहे माती घट्ट
पसरून आपली बोटं लांबचलांब
आपोष्णी करायला पृथ्वीच्या गाभ्यातुन!

फांद्यांचे बाहू फेकत अस्ताव्यस्त
निळावंतीच्या वाणीने सांगतो तो
घरट्यातल्या पिल्लांना आणि चोचीतल्या अळ्यांनाही,
जन्मजन्मांतरीच्या कर्मकहाण्या
वाऱ्यावर दहादिशा होणाऱ्या रुई-म्हाताऱ्यांच्या
नी शीळ वाजवणाऱ्या पक्षांच्या.

पांथस्थांच्या सावल्या टेकतात त्याच्या बुंध्याशी
सुखदु:खांच्या बोलांच्या नी यतींच्या गभीर पाठांच्या
सरी कोसळतात अन आदळतात त्याच्या निबर अंगावर
कधी वादळवाटांसारखी माणसं हलवतात त्याला गदगदा
पण हंसाच्या वृत्तीनं तो घेतो फक्त कहाण्यांचे अर्क
आणि त्यागतो नश्वर,
चिकट थेंब कर्मविपाकांचे.

नित्य उभा आहे कधीचाच
छिलल्या सालीचा पोत मातकट त्याच्या,
जीर्णफाटकं महावस्त्र पांघरून
जणू उभा असावा पुरातन जखमी
अश्वत्थामा!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुम्ही जीएंचे फॅन आहात काय ओ ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्कीच! पण माझ्या 'पिंपळा'त असं काय आहे जिएंची आठवण होण्याजोगं?

अश्वत्थाम्याचा उल्लेख की 'माणसे अरभाट आणि चिल्लर' च्या मुखपृष्ठावरचे पिंपळपान?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचे एक डॉक्टर मित्र जीएंचे जबरदस्त फॅन आहेत. त्यांनी जीएंच्या सांगितलेल्या कथांची शब्दावली ही अशीच होती.
....... (काजळ माया चेटूक छाया रात्र नयनी सुरमा लेखी -असं काहीसं होतं ते - मला काहीच समजलं नाही.)
जोडीला तुम्ही लिहिलेली कवीता व तिचे शीर्षक - छद्मपिपासा - सारखे portmanteau.
प्रकर्षानं जाणवलं. म्हणून खडा टाकून बघितला. आणि अहो आश्चर्यम - तुम्ही जीएंचे फॅन निघालात सुद्धा.
मी जीएंची जास्तीतजास्त ५ पानं वाचली असतील.
सोनपाऊलं मधलं ते साधूचं मनोगत - त्या बीजाला उल्लेखून "तू असाच वर जा .... " - ते आठवतंय. १९९५ च्या आसपास वाचलं होतं ते.
.
जीएंचे लिखाण वाचल्यावर तुम्हाला काय वाटते की - "त्यांना एकंदरित काय म्हणायचे होते, आहे, असते ?"
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

portmanteau आणि जिएंच्या पुस्तकांची नावं हे पटलं. जिएंची सगळी पुस्तकं (सोनपावलं, बखर बिम्मची, रान-शिवार-गाव पर्यंत) संग्राह्य आहेत पण सगळीच मला पुन:पुन्हा वाचवत नाहीत. याचं कारण म्हणजे जिएंची कथा वाचणे म्हणजे जीव खर्चणे किंवा तसंच काहीसं महाग प्रकरण आहे माझ्यासाठी. किती लेखकांसाठी आपण असं म्हणू शकतो? I consider him a giant of Hemingway, Steinbeck stature. स्वामी, राधी, कैरी, ऑर्फिअस अशा अनेक कथा एकदा वाचल्या की मनात रुतून बसतात आणि विसरवत नाहीत.

जिएंचे लिखाण दैववादी, नियतीवादी, परिस्थितीशरण आहे असा आरोप होत असतो. पण दैव/नियतीच्या फाशांशी नित्य झगडणारी माणसे जिएंच्या कथात दिसतात आणि ती आपल्या परीने प्रयत्नही करीत असतात पण परिस्थितीशी तह करण्यावाचुन दुसरे काही त्यांच्या हाती उरत नाही. ह्याविषयी हातकणंगलेकर, द भि कुलकर्णी प्रभृतींनी बरेच लिहीले आहे तेंव्हा ते असो. जिएंना सांगायचे असलेच तर ते त्यांच्या पुस्तकांच्या श्रेय-वचनांत असावे असे मला वाटते, तेच इथे उद्धृत करतो:

No. No. Why further should we roam?
Since every road man journeys by,
Ends on a hillside far from Home
Under an alien sky.
(रमलखुणा)

Shallow people demand variety—but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve!
(बहुधा 'प्रवासी आणि इस्किलार')

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

अवांतर : जीएंच्या लेखनावर विस्तृत काही तरी लिहा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0