द विच : एक परी (उत्तरार्ध)

द विच : एक परी (पूर्वार्ध)

'हॅकर्स अंडरग्राउंड' एक अद्भुत, अनोखे आणि थरारक जग. जगभरच्या संगणक वापरकर्त्यांसाठी असलेले सर्वात मोठे नंदनवन, जिथे जागोजागी कल्पवृक्ष आणि कामधेनू उभ्या होत्या. तर मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅडॉब, जावा सारख्या कंपन्यांसाठी सर्वात मोठे शत्रूचे ठाणे, जिथे जागोजागी आंतरजालीय नक्षलवाद्यांच्या आणि समाजवाद्यांच्या टोळ्या मोर्चे बांधून लचके तोडायला बसल्या होत्या. 'हॅकर्स अंडरग्राउंड' म्हणजे काही मातब्बर हॅकर्सनी उभारलेले एक जग होते, जिथे जगातले महागात महाग सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टिम, पॅचेस, विविध अपडेट्स जे जे म्हणून तुम्हाला विनाकारण प्रचंड रक्कम मोजून विकत घ्यावे लागते ते सगळे फुकटात अगदी क्रॅक मारून, अधिकृत करून फुकटात दिले जात असे. विंडोजची नवी ऑपरेटिंग सिस्टिम आली ? दोन दिवसात क्रॅक सकट, की-जेन सकट फुकट उतरवून घ्यायला हॅकर्स अंडरग्राउंड मध्ये उपलब्ध आहे. नवीन अ‍ॅंटिव्हायरस हवा आहे ? नॉर्टन पासून पांडा पर्यंत वर्षभर सबस्क्राईब केलेले अनेक पर्याय हॅकर्स वरती उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण आहे ? कीबोर्ड साफ कसा करावा इथपासून ते मदरबोर्ड रिपेअरींग पर्यंत सगळी माहिती अगदी स्क्रीन शॉट सकट हॅकर्सवरती मिळणार म्हणजे मिळणार. 'हॅकर्स अंडरग्राउंड' दिवसें दिवस प्रचंड लोकप्रिय होते होते आणि धोकादायक देखील. आणी ह्या अशा जगात कधी कधी लहान-सहान मदत शोधत जाणारा मी, आता ऍडमिन म्हणून आमंत्रित केला गेला होतो.

====================
'हॅकर्स अंडरग्राउंड' म्हणजे एक अनोखेच विश्व होते. त्या विश्वात प्रवेश करावा की नको हे मला काहीच ठरवता येत नव्हते. शेवटी मी गुमराहचा सल्ला घेतला. गुमराहने माझे चांगलेच ब्रेन वॉशिंग केले आणि 'हॅकर्स अंडरग्राउंडचा' नवा शिलेदार म्हणून मी बिनघोरपणे माझे पाऊल पुढे टाकले. 'गिव्ह अँड टेक'च्या जमान्यात काही मोजकेच शिलेदार आपली बुद्धिमत्ता आणि वेळ खर्च करून नवशिक्यांसाठी आणि गरजूंसाठी हे विश्व चालवत होते. अर्थात ज्या ऍडमिनच्या शिफारशीने तुम्ही इथे ऍडमिन बनता, तो ऍडमिन सोडला तर इतर कोणाची नावे देखील तुम्हाला कळत नाहीत आणि तुमची देखील कोणी चौकशी करत नाही. ऍडमिन देखील सदस्य म्हणूनच वावरतात आणी मदत करत राहतात. काही अडचण मग ती सदस्यांना असो वा ऍडमिनला सोडवण्यासाठी एकच व्यक्ती उपलब्ध होती आणि ती म्हणजे 'मार्कस'. हा मार्कस म्हणजे देखील एक अनोखा मनुष्य होता. त्याच्या विषयी कधीतरी सवडीने नक्की लिहीन. ह्या संपूर्ण विश्वाचा डोलारा, कॉपीराइट्सचे नियम - कायदे सगळे हा मनुष्य एकहाती सांभाळत असे.

नवीन नवीन असताना माझ्याकडे वेगवेगळे रिमोटस तयार करणे, याहू, एम्-एस-एन साठी टॉकिंग बॉटस बनवून देणे,लिट ट्रान्सलेटर, हॅश कोडर बनवणे अशी लहान लहान कामे होती. पुढे काही काळातच मी फेक वेबकॅम, अँटिव्हायरस क्रॅकिंग, की-जेन इत्यादींवरती देखील काम करायला लागतो. ह्या काळात मी, गुमराह आणी द विच चे त्रिकूट खूपच जवळ आले. आमचे रोजचे फोन,दिवस दिवस चाट तर चालू असेच. अर्थात फोन करण्याची ऐपत नसल्याने मी याहू कॉल्सवरतीच भागवत असे. द विच तर कधी कधी माझ्या घरच्यांशी देखील गप्पा मारत असे. ह्या फोन्सचा एक फायदा झाला, तो म्हणजे द विच चे मराठी 'तू कशी हाय?' इथपर्यंत सुधारले आणि आमच्या मातोश्रींचे इंग्रजी 'आय एम फाईन, हाऊ आर यू' पर्यंत सुधारले. अशातच एके दिवशी मला 'द विच' चा फोन आला. 'मी मुंबईत येते आहे आणि मुंबई पासून तुझे शहर किती दूर आहे' ह्या दोन प्रश्नांची उत्तरे मिळवून तिने सरळ फोन ठेवून दिला. कधी येणार आहे, कशी येणार आहे, का येणार आहे.. काही काही सांगितले नाही. ह्यानंतर आठवडाभर ती नेटवरून गायबच झाली. सात-आठ दिवसांनी पुन्हा फोन आला आणि माझा पत्ता माहिती करून घेऊन पुन्हा कट झाला. ह्यावेळी निदान 'मी बुधवारी येते आहे' येवढे सांगण्याची कृपा आमच्यावरती झाली होती.

बुधवारी मी सकाळपासूनच आतुरतेने द विच ची वाट पाहत होतो. ह्याआधी तिला फोटोत देखील कधी बघितले नसल्याने आठवतील तेवढ्या परदेशी ललनांच्या चेहर्‍यांची उजळणी करून झाली होती. साधारण दुपारी २ च्या सुमाराला कॅफेबाहेर एक रिक्षा थांबली आणि त्यातून गोरीपान, निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची 'द विच' आमच्या कॅफेकडे बघायला लागली. मी लगबगीने उठून तिचे स्वागत केले आणि आधारासाठी हात पुढे केला. 'डिअर साठ वर्षाची असले तरी अजून आधाराची गरज लागत नाही मला, उलट लोकांना मीच आधार देत असते.' असे म्हणत आणि डोळे मिचकावत द विच आमच्या कॅफेत प्रवेशकर्ती झाली. "तुला कोणी यंग ब्युटिफुल येणार वाटले होते का?" ह्या तिच्या प्रश्नाने आमच्या चेहर्‍यावरचे भाव तिने सहज वाचल्याचे समजले आणि कबुली देण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. पण एखाद्या तरुणीला देखील लाजवेल असा उत्साह, उमदेपणा आणि निरागसता 'द विच' मध्ये भरभरून वाहत होती. तिच्या बरोबर वेळ कसा गेला ते देखील कळले नाही. तिच्या बरोबर मग मी मस्त महाराष्ट्रीय थाळी खायला गेलो, तिच्या आग्रहाखातर ऊसाचा रस पिला, तिला गणपतीचे मंदिर दाखवले आणि बरेच काय काय केले. तिला भेटल्यावरती आपण तिला पहिल्यांदाच भेटतो आहोत हा विचार काही क्षणातच नाहीसा झाला आणि आम्ही अगदी मिसळून गेलो. माझ्या भयाण इंग्रजीचा मारा सोडला तर तिचा देखील दिवस छान गेला असावा. संध्याकाळी तिला न्यायला तिचा कोणीतरी मित्र येणार होता. फोनवर पत्ता समजावून घेत घेत एकदाचा तो देखील कॅफेत पोचला आणि आमच्या भेटीचा (द विच च्या शब्दात डेटिंगचा) दिवस संपला. तिच्या ह्या मित्राबरोबर एक छानशी गोडशी मुलगी देखील आली होती. १७/१८ वर्षाची ती मुलगी एखाद्या बाहुली सारखी दिसत होती. द विच ने पुन्हा एकदा बाय बाय केले आणि "अरे ओळख करून द्यायला विसरलेच, 'ही माझी मुलगी कॅथरीन आणि कॅथरीन तू पॅपिलॉनला ओळखतेसच." असे सांगून पुन्हा एकदा डोळे मिचकावले. त्या बाहुलीने देखील खट्याळपणे हसून दाखवले आणि शेवटी स्वतःची खरी ओळख करून दिली आणि "मी बबलगर्ल" सांगून माझी विकेट काढली.

ह्या भेटीनंतर द विच बरोबरच बबलगर्लशी देखील माझे सूत चांगलेच जुळले आणि समवयस्क असल्याने आमच्या गप्पा देखील रंगू लागल्या. 'द विच' हे काय रसायन आहे हे मला बबलगर्ल कडून हळूहळू उलगडले आणि मी अक्षरशः थक्क झालो. 'द विच' चा जन्म झाला तोच मुळी तुरुंगात. आईची आणि बँकेची फसवणूक करून बाप परागंदा झाला होता आणि त्या केसमध्ये आई मात्र अडकली होती. मुलीला जन्म देताच त्या बिचारीने प्राण सोडले आणि 'द विच' ची रवानगी आधी आश्रमात आणि कळत्या वयात दत्तक म्हणून वॉटसन कुटुंबाकडे झाली. वॉटसन कुटुंबात तिला पहिल्यांदा हक्काचे प्रेम अनुभवायला मिळाले. शिक्षणाची गाडी रुळावरती यायला लागली. पण नियतीला ते बघवले नसावे. अचानक आलेल्या हार्ट अ‍ॅटॅक मध्ये मिस्टर वॉटसन दगावले आणि वॉटसन कुटुंब गरिबीच्या कड्याकडे वेगाने धावू लागले. अशावेळी छोटी 'जेन' अर्थात 'द विच' हिमतीने पुढे झाली आणि फ्लॉवर गर्ल पासून ते पिझ्झा शॉप, बेबी सिटिंग पर्यंत सर्व कामे हिमतीने करत तिने घर सावरले आणि स्वतःचे शिक्षण देखील चालू ठेवले. ह्या सगळ्या काळात तिला अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले. अपमानापासून ते बलात्कारापर्यंत सगळे भोग तिच्या वाटेला आले. घर सावरले जात असतानाच मिसेस वॉटसन देखील कालवश झाल्या आणि जेन पुन्हा एकदा एकाकी झाली. अशातच तिला बँकेची नोकरी चालून आली. बँकेच्या नोकरीतच तिचा संगणकाशी परिचय झाला. आधीच थोडीशी अबोल असलेल्या आणि आता पूर्णच एकाकी झालेल्या जेन च्या जिवाला एका आभासी जगाचा ओलावा मिळाला आणि ती हरखूनच गेली. फावल्या वेळात संगणकाचे शिक्षण घेणे तिने चालू केले आणि जोडीला चालू केले अनाथ मुलांसाठी समाजकार्य. तिच्या पगारातला एक मोठा हिस्सा संगणकावरती आणि ह्या मुलांवरती खर्च होऊ लागला. "आजच्या घडीला ती २४ अनाथ मुलांच्या पालन पोषणाचा आणि शिक्षणाचा खर्च उचलत आहे आणि त्यातला एकाला तर तिने दत्तक घेऊन आपल्या घरीच आणून ठेवले आहे, आणि ती मी आहे पॅपिलॉन."

'द विच' चे हे रूप माझ्यासाठी अगदीच शॉकींग होते. एक हॅकर म्हणून दरारा असलेली, माझ्या चुकांमध्ये देखील मला पाठीशी घालणारी, माझ्यासाठी बिनधास्त पंगे घेणारी ही 'द विच' अशी असेल असे कोणाला वाटले होते? पुढे पुढे तर मी तिला मदर टेरेसाच म्हणायला लागलो होतो. पण सुखाचे दिवस टिकत नाही म्हणतात हेच खरे. एके दिवशी एयरपोर्टवरून येत असताना कॅथरीनच्या गाडीला अपघात झाला आणि ती जागेवरच ठार झाली. येवढी धीरोदात्त असूनही 'द विच' हा आघात मात्र सोसू शकली नाही. अक्षरशः ती कोलमडून पडली. कुठेतरी स्वतःचे बालपण आणि तारुण्य कॅथरीन मध्ये ती बघत असावी, जपत असावी. अनेक वादळाला सामोरे गेलेली 'द विच' ह्या वयात ह्या प्रसंगाने मात्र पूर्ण खचली. हळूहळू नेटवरचा तिचा वावर देखील कमी होत गेला. आठवडा पंधरा दिवसांनी येणारे कॉल्स आता दोन्-तीन महिने देखील येईनासा झाले. तोवर माझी परिस्थिती जरा बरी झाली असल्याने मीच अधे मध्ये तिला कॉल लावायचो पण बर्‍याचदा तो उचलला जायचा नाही किंवा २/४ मिनिटात ती संभाषण आटोपते घ्यायची. तिला बहुदा आता ह्या जगापासून आणि आमच्यापासून देखील दूर जायचे होते. मी देखील मग तिला त्रास होऊ नये म्हणून फोनच्या ऐवजी ईमेल्स ची वाट पसंत केली. ईमेल्सला देखील फक्त त्रुटक उत्तरे मिळायची. अशातच गुमराह एकदम नाहीस झाला आणि मी पूर्णच खचलो. आधी 'द विच' आणि आता 'गुमराह' मला एकटे टाकून सगळ्यापासून दूर झाले आणि मला अगदी पोरके वाटायला लागले. माझे मन त्या दुनियेत रमेना. शेवटी मी देखील त्या जगाला शेवटचा गुडबाय केला आणि सर्व आठवणी मागे सोडून सगळ्याचा निरोप घेतला.

गुमराहचा तर पत्ताच नव्हता, पण ख्रिसमस, माझा वाढदिवस, दिवाळी अशा प्रसंगी 'द विच' ची शुभेच्छापत्रे मात्र आठवणीने ईमेलवरती धडकत होती. मी तर इतका विरक्त झाल्यासारखा झालो होतो की मी त्यांची पोच देखील देत नव्हतो. अशातच मागच्या आठवड्यात अचानक 'द विच' चा फोन आला आणि तो आवाज ऐकून पुन्हा एकदा मी रोमांचित झालो. सगळ्या चौकश्या झाल्यावरती 'द विच' अचानक म्हणाली "तुला माहितीये, परवा खूप दिवसांनी इंटरनेटला कनेक्ट केले. माझ्या लॅप्पीत बहुदा ट्रोजन शिरल्याचे जाणवले. रिमूव्हल शोधायला सर्च केला तर एक फोरम मिळाला."

"मग घेतलेस का नाही रिमूव्हल डाऊनलोड करून?"

"नाही रे. तुला सांगते, काय हे आजकालचे फोरम रे, रिमूव्हल स्टेप बाय स्टेप कसे करावे हे वाचायला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागते आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत १०$. आणि रिमूव्हलची .exe हवी असेल तरी १०$.

"ते तर आता सगळ्यांनीच चालू केले आहे. पैसा तेव्हा देखील महत्त्वाचा होता आणि आता तर अतिमहत्त्वाचा झाला आहे बाई. मग शेवटी भरलेस का मग पैसे ?"

"तेच भरायला आले होते, पण तो फोरमच हॅक झालाय. रजिस्ट्रेशन पण गरजेचे नाही आणि सॉफ्टवेअर पण फुकट डाऊनलोडाला उपलब्ध झाले आहे. स्ट्रेंज ना?"

"खरंच स्ट्रेंज आहे." मी येवढेच म्हणालो आणि फोन संपल्या संपल्या कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा 'हॅकर्स अंडरग्राउंड'च्या पेजवरती हजेरी लावली आणि फक्त 'she is back' येवढीच पोस्ट टाकली. एका तासात ५७९ लाईक्स आणि ३५९ आनंदाने आणि उत्साहाने भरलेल्या कॉमेंट्स लगोलग येऊन आदळल्या. 'she' म्हणजे कोण हे सांगायची मला गरज पडली नाही.
=========================

(समाप्त)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

इतक्या लवकर दुसरी पोस्ट पाहून ड्वाले पाणावले Wink
लेखन नेहमीप्रमाणे झक्कास. "द विच" मस्त रंगवली आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही भाग रंजक.
मार्कस बद्दलही वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फारच घाईघाईने सांगणे संपवले गेले आहे असे मला वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निषेध. तब्येतीत लिही की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संपवलं घाई करून? कोणी मागं लागलं होतं का? छ्या... सगळा सूरच घालवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगाच काय रंगवून रंगवून लिहित बसायचे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

रंगवलेलं उगाच आहे किंवा कसं हे वाचकांना ठरवू द्यायचं. तिथं लेखकानं नाही शिरायचं. आधुनिकोत्तर समीक्षकी विचारवंत कुठला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधुनिकोत्तर समीक्षकी विचारवंत कुठला.

खीक्क...

- (हसून हसून फुटलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या लवकर दुसरी पोस्ट पाहून ड्वाले पाणावले

+१ Smile

मस्तच रे पर्‍या, मझा आला!

- ('परा'पंखा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.
आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी नव्हे ती कथा चक्क संपवली आहे!! उत्तरार्ध आल्यावर वाचल्याचे सार्थक झाले.
आता बाकीच्या रखडलेल्या कथांचही जरा मनावर घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

हे आणि अस्सच म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झालं उरकुन टाकलस लगेच?
छ्या आम्हाला मिन्नतवार्‍याही करायची उसंत दिली नाहीस. Wink

इतक्याच तन्मयतेने ती 'गुलनार'ही संपवली असती तर पार्टी दिली असती. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

सगळे भाग वाचले. मी आय टी मध्ये असूनही हॅकर्सच्या या जाळ्यामध्ये अडकले गेले होते. कोणत्यातरी वेगळ्या काळात किंवा गूढ अंडरवर्ल्ड विश्वात गेल्यासारखे वाटले. पण काही लोकांनी म्हटल्याप्रमाणे मलाही शेवट खूपच घाईघाईत केल्यासारखा वाटला.
आणि याला कारण मला वाटतंय की हि बाकीची मंडळी आहेत ;). तुमच्या पाठी त्यांनी किती नकारात्मक सूर लावला होता की हि कथा पूर्ण होणार नाही म्हणून! माझ्या मते घाईसाठी तुम्ही खुशाल त्यांना जबाबदार धरावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेखन. सुहास शिरवळकरांच्या कादंबर्‍यांची आठवण झाली....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

बबलगर्लची भेट होईपर्यंतचा वेग मस्त आहे.. नंतर जरा आटोपल्यासारखं वाटलं!
असो. विच ची ओळख आवडलीच!
आता मार्क?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

महत्वाचे मुद्दे

की पंडीत एकेकाळी संपाद्क होता.(भाग १ समाप्ती) पुढे ते फोरम हॅक झाले.(भाग दोन)

तमाम प्रथितयश हॅकर हे प्रत्यक्षात खरेच नर्ड व्यक्तिमत्त्वाचे असतात व जास्त बाँड गिरी केली तर अल्लाला प्यारे होतात.

अरे त्या शाळेच्या बाईंची मालीका कधी पूर्ण करतोयस? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी रंगवली असती, तर आणखी मजा आली असती.

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

नंतर निवांत पाहतो. रूमाल टाकून ठेवलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

परी आवडली, बबलगर्लची भेट होईपर्यंतचा वेग मस्त आहे.. नंतर जरा आटोपल्यासारखं वाटलं!
हे ऋ चे म्हणणे पटले.
स्वाती
अवांतर- आता इतर अपूर्णांना पूर्ण करायचे बघा पराबाबू..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा
पूर्ण सुध्दा केलस! अभिनंदन

छान जमलाय भाग
आवडला.
खास परास्टाईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.