नकळत

तो चालून आला अशा फिरस्त्या वाटा
ज्या त्याच्या नकळत
मुक्कामी पोचवून निरोप घेण्याआधी
नव्या प्रवासाच्या हाकांनी
हरखून गेल्या

तो स्पर्शून आला अशा उसळत्या लाटा
ज्या त्याच्या नकळत
किनाऱ्यावरी फेनिल होऊन फुटण्याआधी
सागर तळीची अपार शांती
पिऊन आल्या

तो शोधून आला थोड्या अस्फुट ओळी
ज्या त्याच्या नकळत
विस्मरणाच्या धुक्यात विरण्याआधी
शब्दभूल पाडीत कुणाच्या
ओठी रुळल्या

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तो स्पर्शून आला अशा उसळत्या लाटा
ज्या त्याच्या नकळत
किनाऱ्यावरी फेनिल होऊन फुटण्याआधी
सागर तळीची अपार शांती
पिऊन आल्या

तो शोधून आला थोड्या अस्फुट ओळी
ज्या त्याच्या नकळत
विस्मरणाच्या धुक्यात विरण्याआधी
शब्दभूल पाडीत कुणाच्या
ओठी रुळल्या

फार सुंदर! तुम्ही कवितासंग्रह काढा अया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा उसळत्या लाटा
ज्या त्याच्या नकळत
किनाऱ्यावरी फेनिल होऊन फुटण्याआधी

ही रासायनिक अभिक्रिया समजली नाही.

बोले तो, लाटांचे (मिठाचे) पाणी (NaCl + H2O) किनाऱ्यावरल्या वाळूवर (SiO2) आदळल्याने त्यातून फेनिल/फिनाइल (नक्की रासायनिक सूत्र सापडले नाही, परंतु (१) काहीतरी सेंद्रिय - यानी कि सकर्बक - असणार, आणि त्यातही (२) C6H5-गट असणारे असणार, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)) कसे बनेल, ते कळले नाही. मुळात पाणी, मीठ आणि वाळू हे सगळे अकर्बक असताना - यांपैकी कशाच्याही रेणूंत कार्बन नसताना - निष्पन्न होणाऱ्या संयुगात कार्बन नेमका कोठून कडमडेल? त्याने Law of conservation of massमराठी?चे उल्लंघन होणार नाही काय? (की ही कोणती नवीनच अणुकेंद्रीय अभिक्रिया आहे? की 'भावनाओं को समझो'वाला भावेप्रयोग आहे?)

त्यामुळे, खारे पाणी आणि वाळू यांच्या मिश्रणाने फरशी (मुंबईकडे: लादी) पुसण्याची कविकल्पना (कितीही अव्यवहार्य असली, तरी) मोहक (तथा रोचक) आहे, एवढाच अभिप्राय तूर्तास मांडून सोडून देतो. (या अभिनव अभिक्रियेचे तथा संकल्पनेचे पेटंट घ्याच, असेही सुचवितो.)

अल्-काझाम्!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कीबोर्ड बडवण्याची आपली चिकाटी बघून तोंडास फेन आला. लगे रहो. (या वेळी तळटीपा नसल्याची नोंद घेण्यात आली आहे.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0