विवेकनिष्ठतेच्या वाटेवर

श्रद्धा विसर्जन

पृथ्वीवरील चराचर सृष्टी व सर्व नैसर्गिक घटना निसर्ग नियमानुसार घडत असताना व हे नियम कुणीही बदलू शकत नाही, त्यावर आक्रमण करू शकत नाही, त्याचे उल्लंघन करू शकत नाही, ही परिस्थिती माहित असूनसुद्धा सुशिक्षित माणसांसकट सर्व फल-ज्योतिषाच्या नादी का लागतात? आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष अशा भ्रामक कल्पनावर विश्वास का ठेवतात? अंत्यसंस्कारात दहावे-बारावे-तेरावे, मासिक श्राद्ध करून सहस्रावधी रुपये व्यर्थ का घालवतात? दहा रुपये किंमतीचा निरुपयोगी पत्र्याला पाचशे रुपयांना विकत घेऊन श्रीयंत्र म्हणून त्याची पूजा का करतात? लक्ष्मी प्रसन्न होईल असे त्यांना का वाटते? माणसाची बुद्धी इतकी रसातळाला कशी जाते? असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. व या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेताना श्रद्धा हो एकमेव कारण असू शकेल या निष्कर्षापर्यंत ते पोचतात. आणि यासंबंधात सुचलेल्या लेखांचा हा एक अप्रतिम संग्रह आहे.

या पुस्तकातील काही लेख लेखकाच्या वैयक्तिक अनुभवावर बेतलेले आहेत. त्यांना भेटलेल्या व्यक्ती, त्यांच्याशी झालेला संवाद, त्यांनी श्रद्धेच्या पुष्ट्यर्थ केलेला वाद-प्रतिवाद, वादातील तार्किक दोष इत्यादीवर नेमके बोट ठेवलेले चर्चा स्वरूपातील हे लेख अत्यंत वाचनीय आहेत. हे लेख वाचत असताना ही मंडळी इतके अतार्किक वाद कसे काय करू शकतात याचे आश्चर्य वाटू लागते. काही लेख विवेकवादाशी संबंधित संकल्पनेवर संवादाच्या स्वरूपात लिहिलेले आहेत. संवादाच्या स्वरूपातील लेख वाचत असताना लेखक आपल्या मनातील प्रश्नांचेच उत्तरं देत आहेत की काय असे वाटते. हे संवाद वाचत असताना त्या त्या विषयावरील तर्कसंगती ( व विसंगती) पटकन लक्षात येतात. लेखकाने लिहिलेल्या ओवीच्या स्वरूपातील काही कविताही या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रा. वालावलकर यांऩी मराठी वृत्तपत्रांसाठी वेळोवेळी लिहिलेले पत्रसुद्धा यात आहेत. या प्रकारे विवेकावादासारख्या गंभीर विषयावर विविध शैलीतील कथा, संवाद, लेख, कविता, स्फुट लेख वाचताना वाचक नक्कीच हरवून जातो.

काही स्वतंत्र लेखात प्रा. य. ना. वालावलकर अंधश्रद्धांच्या संदर्भातील अनेक संकल्पनांचा ऊहापोह घेत सामान्यांच्या मनात असलेल्या समजुती-गैरसमजुती, वर्षानुवर्षे पाळत आलेल्या रूढी-परंपरा यातील गुणदोष वाचकांपुढे मांडतात. सर्वधर्म समभाव, विश्वास-श्रद्धा-निष्ठा, आत्मा आणि मानवी मेंदू, सत्य आणि श्रद्धा, निरीश्वरवाद्यांना शिक्षा, ज्ञान व श्रद्धा, श्रद्धावंताचे तत्वज्ञान इत्यादी लेखातून परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यातील अंतर्गत विसंगती प्रकाशात आणतात. मुळात देव, धर्म, श्रद्धा, आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष, परलोक इ.इ. ज्ञानाचे विषय नाहीतच. त्यामुळे त्यावरील चर्चा, वाद-प्रतिवाद, तर्कसंगती लावण्याचा वृथा प्रयत्न व या संकल्पनामागील भूमिका इत्यादी गोष्टी फोल ठरतात, यावर लेखकानी भर दिला आहे. अनेक वेळा काही ‘बुद्धिवंत’ उपनिषद, वेद, दर्शन, वा भगवद्गीता यासारख्या ग्रंथांच्या आधारे आत्मा, परमात्मा यासारख्या पारलौकिक संकल्पनांच्या अस्तित्वाविषयी, त्यांच्या सुसंबद्धतेविषयी तावातावाने वाद घालत समोरच्याला नामोहरम करण्याच्या प्रयत्नात असतात. लेखकानी यातील काही लेखातून त्याच ग्रंथातील इतर काही परिच्छेद व श्लोक यांच्या आधारे या वादाच्या मुद्द्यातील विसंगती व प्रत्यक्ष चर्चेतील मुद्द्यांना बगल देवून केलेले स्पष्टीकरण किती तकलादू आहे हे दाखवून देतात. मुळात वाद घालणारे आपल्याला मुद्द्यांना पुष्टी देणारेच उतारे निवडलेले असतात हे लक्षात येऊ लागते. त्यामुळे वाद फिका पडतो. गीतेतील श्रद्धावान् लभते ज्ञानम् हे गीतावचन न पटणारे आहे याबद्दल लेखकाच्या मनात शंका नाही. श्रद्धा हे ज्ञानप्राप्तीचे साधन नाही. शिवाय श्रद्धा हा मानवजातीला जडलेला सर्वात भीषण आणि गंभीर रोग आहे असे लेखकाचे स्पष्ट मत आहे.

श्रद्धेचे विश्लेषण करत असताना लेखकाला पारंपरिक श्रद्धा (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी), गतानुगतिक श्रद्धा ( उदा. लालबागचा राजा नवसाला पावतो), आशावती स्पर्धा (उदा. श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते) व भयोद्भव श्रद्धा (उदा. मृतांचे अंत्यसंस्कार केले नाही तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो) असे चार प्रकार करावेसे वाटतात. . लेखक या सर्व श्रद्धाप्रकारांच्या बाबतीत विचारपूर्वक व तर्कसुसंगत भूमिका घेत आहेत. अंधश्रद्धांचा उपहास या लेखात अंधश्रद्धावर घाला घालत असताना लेचापेची भूमिका न घेता चेष्टा, टवाळी, खिल्ली, अवहेलना अशा गोष्टींचा सर्रास उपयोग करावा असे लेखकाचे मत आहे. फक्त हा उपहास अंधश्रध्दांचा असावा व कोणत्याही व्यक्तीचा नसावा हा इषारा ते देवू इच्छितात.

अजून एका लेखात लेखक स्वतःची भूमिका मांडत असताना सश्रद्धांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यास सांगणे यात गैर काही नाही, कारण तो घटनादत्त अधिकार आहे अशी मांडणी करतात. जरी उपासनेचे वा आपल्या मताप्रमाणे श्रद्धा बाळगण्याचे स्वातंत्र्य घटनादत्त असले तरी योग्य काय व अयोग्य काय हे सांगण्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्यही घटनेने आपल्याला दिलेले आहे याचे स्मरण लेखक करून देतात. यावरून प्रा. य. ना. वालावलकर श्रद्धा-अंधश्रद्धांच्या विरोधात इतक्या तळमळीने, इतक्या पोटतिडिकीने इतकी वर्षे का लिहित आहेत याची कल्पना येऊ शकते.

या पुस्तकातील काही लेख संवादाच्या प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात असून त्यावरून श्रद्धा, निष्ठा, निरीश्वरवाद, राशीभविष्य, भाविकांची मानसिकता, नैतिकता, धर्माचे आकर्षण, आस्तिकांची मानसिकता इत्यादी विषयावरील वाद- संवाद वाचत असताना या संकल्पनामागील बारकावे कळू लागतात. व लेखकांची ही मनोरंजक पद्धतीने केलेले सादरीकरण वाचनीय ठरू लागते. खोचक प्रश्न व त्यांना दिलेली अचूक उत्तरं यातून विषय समजून घेण्यास मदत होते. म्हातारीची गोष्ट व इंदीची गोष्ट या कथेतूनही लेखक अंधश्रद्धा विरोधी संदेश देत आहेत.

या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकानी लिहिलेल्या ओवीच्या स्वरूपातील श्रद्धेविषयीच्या कविता असेल. मुळात अशा विवेकी विचार केंद्रित विषयावर अभंगाच्या शैलीत निरूपण करता येऊ शकते हेच मुळात आश्चर्यजनक कल्पना आहे. लेखकांचे मरणभय, आत्मा पुनर्जन्म, अध्यात्म-विज्ञान समन्वय, श्रद्धा आख्यान, आनंददायी इहलोक इत्यादी कविता वाचताना कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय लेखकानी पोचवले आहे हे लक्षात येऊ लागते.

प्रा. वालावलकर यांनी अंधश्रद्धेच्या विरोधातील लढ्यात प्रत्यक्षपणे मैदानात उतरलेले नसले तरी या लढ्याला जे सैद्धांतिक पाठबळ लागते ते पुरवण्यात नेहमीच पुढाकार घेत आलेले आहेत. यासाठी ते सातत्याने वेगवेगळ्या मराठी दैनिकात पत्र लिहून श्रद्धाविरोधी भूमिका सामान्य वाचकापर्यंत पोचवत आले आहेत. व या पत्राद्वारे जनमत तयार करण्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. या पुस्तकात त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रं समाविष्ट केले असून ते श्रद्धाविरोधातील एका प्रकारे स्फुट लेख आहेत असे म्हणता येईल. पत्रांच्या आशयाला मुख्यत्वे करून त्या त्या वेळच्या वृत्तपत्रातील बातम्या वा लेखांचा संदर्भ आहे. त्यात काही गोष्टींचे स्पष्टीकरण दिलेले असल्यामुळे वाचकांना बातम्यातील वा एखाद्या आस्तिक लेखकाच्या लेखातील भूलथापा पटकन लक्षात येतात. ज्ञान म्हणजे नेमके काय, पुनर्जन्माची संकल्पना, धार्मिक विधींचा स्तोम, साडेसाती निवारणासाठी सुरक्षाकवच, आत्महत्येचे कोडे, वास्तवाचा स्वीकार, ज्योतिषशास्त्राचा फोलपणा, वैचारिक प्रगती, प्रसारमाध्यमांची जबाबदारी, ईश्वराचा निर्दयपणा, अज्ञानाचा उदोउदो, निरुपयोगी यज्ञ, सत्यनारायण पूजा, वैदिक धर्म इत्यादीबद्दलची पत्रातील मांडणी जणू स्फुटलेखच वाटतात. व हे लेखन वाचताना समाजमानस कसा आहे, समाजाची दिशा कशी हवी, या गोष्टी स्पष्ट होत जातात. यातील काही पत्रं प्रकाशित झालेले नसतीलही. परंतु या सर्व पत्रांना एक श्रद्धाविषयक दस्तावेज म्हणून बघता येणे शक्य झाले आहे. याच पुस्तकातील लेखकाचे मित्र, भालचंद्र काळीकर यांनी लिहिलेले तीन लेखसुद्धा वाचनीय आहेत.

अनेकांना श्रद्धेविना जीवन अशक्य आहे असे वाटत असते. अशावेळी लेखक श्रद्धाविसर्जन करण्यास सुचवतात, हे त्यांना कदापि रुचणार नाही. कदाचित पुस्तकाचे शीर्षक अंधश्रद्धा विसर्जन असे चालले असते, परंतु श्रद्धा विसर्जन योग्य नाही असे सश्रद्ध सुचवतील. परंतु लेखकाच्या मते अंधश्रद्धा निर्मूलन करायचे तर कोणीतरी दाभोलकरांसारखा प्रबोधनकार लागतो. पण आपले श्रद्धा विसर्जन मात्र प्रत्येकाला स्वतःहून पुढाकार घेऊन करायचे असते. त्यासाठी भावनेवर मात करत बुद्धिनिष्ठपणे विचार करत राहिल्यास हे काम सोपे होईल. या विवेकनिष्ठतेचा खडतर मार्गावर चालण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करू शकेल.

विवेकाची चाड असलेल्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवे असे हे पुस्तक आहे.

श्रद्धाविसर्जन
लेः प्रा. य. ना. वालावलकर
वरदा प्रकाशन प्रा. लि. पुणे
पृ. सं 256, किंमत 300 रु.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

शुचि ला जोरदार समर्थन. सिरियसली.
.
रत्नांग्रीचा गावगांधी आठवला.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad
खरच रे!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्ह्नुन मी म्हनत असतो की ईश्वर हा जगातला स्वस्तातला सायकियाट्रिस्ट आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

Biggrin
तुम्ही सेन्सिबल आहात प्रघा. किंनबहुना सेन्सिबल मोस्ट, माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुची यांचा हा सुदीर्घ प्रतिसाद ( व त्यात कुठल्याही प्रकारचा खोचकपणा नाही असे गृहित धरून!) वाचताना मला जे जमले नाही ते तुम्ही नेमक्या शब्दात मांडल्याबद्दल (त्रिवार (?)) धन्यवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगा त्रागा करणारी पोस्ट डिलीट केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिलीट करायला नको होती. मला नाही वाटले त्यात 'उगा त्रागा' केलेला होता असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

धन्यवाद.
Writer's Remorse - हेच कारण होते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंत्यसंस्कारात दहावे-बारावे-तेरावे, मासिक श्राद्ध करून सहस्रावधी रुपये व्यर्थ का घालवतात?

मनुष्य जन्माला येतो तेव्हा जसा उत्सव असतो तद्वतच कदाचित त्याच्या मृत्युपरांत त्याला दिलेला हा एक शांत, समजूतदार आणि कायमचा दिलेला निरोप असतो. व्यक्ती गेल्यापरांत या मन:शांतीची तीव्र आवश्यकता असते. हे आपण आपल्याला समजावणं फार आवश्यक असतं की आपल्याकडुन होइल तेवढं आपण केलं, गेलेल्या प्रियजनाच्या इच्छा पूर्ण करण्यात कुठेही कमी पडू दिले नाही.

आयुष्याला अशा झालर झिरमिळ्या लावुन आपण अर्थ नाही दिला तर ते उलत गेलेल्या कांद्याच्या फोलपटासारखे खोखले (हिं) , पोकळ होउन बसेल.
__________________________
हे नास्तिकांना कळत नाही असे नाही कदाचित यनावालांना अंधश्रद्धेवरच कोरडे ओढायचे असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित यनावालांना अंधश्रद्धेवरच कोरडे ओढायचे असतील.

अरेरे, एवढ्या वर्षांपासून ते कानीकपाळी ओरडून सांगतायेत पण तुम्ही मात्र तुम्हाला सोयीस्कर तोच अर्थ घेऊन बसला आहात. कधी होणार तुमचा अभ्यास पुर्ण ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुटके सर मला असे म्हणायचे होते की श्रद्धेवर नव्हे तर अंधश्रद्धेवर कदाचित कोरडे ओढायचे असतील.
पण् अर्थातच नानावटींनी हे सुस्पष्ट केलेले आहेच - की अंधश्रद्धा समाजात असतात. पण ज्याच्या त्याच्या श्रद्धेचे विसर्जन प्रत्येकाने स्वत: करायचे आहे.
तेव्हा अंधच नव्हे तर श्रद्धा इन जनरल आर इन फोकस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनुष्य जीवंत असताना त्याच्यासाठी काय करायचं ते केलं आहे, मेल्यानंतर त्यास स्वर्गात पाठवण्याची खटपट करण्याची काहीएक गरज नाही यावर ठाम असल्यास दहावं बारावं करावं लागत नाही.
नाही केलं तर काय हुईल अशा घाबरट लोकांना सल्ला देण्यात अर्थ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या संदर्भात हा रिपोर्ट आणि ही चर्चा रोचक आहे. विद्याधर ओक यांनी नरेंद्र मोदी मोहंजोदारो मधील पुतळ्याचा पुनर्जन्म आहेत आणि अंबानी हे अकबर तर रतन टाटा हे औरंगजेब आहेत इथेपासून स्वानंद किरकिरे हे गदिमा आणि निलेश साबळे राजा गोसावी आहेत (गोसावी गेले तेंव्हा साबळे शाळेत होता तरीही) इथेपर्यंत भली मोठी लिस्ट दिली आहे.

- ओंकार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते स्वत: कुणाचा पुनर्जन्म आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही माहीत नाही. मी तेवढे धाडस केले नाही. व्यास असतील कदाचित.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतके ज्ञान म्हणजे व्यासच किंवा साक्षात गणेशाचा अवतार !

दर्शन घ्यायलाच हवे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विद्याधर ओक अमचे शेजारी होते आठ वर्षं. एवढे सांगून खाली बसतो.
( पण म्हणतात ना संतांचा मोठेपणा शेजाऱ्यास कळत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर नवीन भाषा शिकणे, नवीन कौशल्य (स्किल) शिकुन स्वत:ला सतत चॅलेन्ज करत रहाणे हे निरोगी रहाण्याकरता, अनिवार्य आहे. तसेच एखादी नवीन संकल्पना मांडणारे पुस्तक वाचून विचार केलाच पाहीजे.
'End of Faith' पुस्तक आज ग्रंथालयात शोधते. इतके दिवस 'न्यु एज/ स्पिरिच्युॲलिटी' विभागांत चक्कर मारायचे, आज नवीन काहीतरी शोधते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'End of Faith'

.
सुचवणी : End of History and the Last Man हे पण चाळावे. फुकुयामांचं.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

End of Faith आणि The portable atheist : essential readings for the nonbeliever - ही २ पुस्तके दिसताहेत. गब्बर तू सुचनविलेलं पुस्तक शोधते. सुचवल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=J4RoxjunYys&t=10s
येता जाता गाडीत ऐकून होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद स्वधर्म.
_____________
आज ग्रंथालयातून पुस्तक घेतलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने