ये रे ये रे पावसा

ये रे बाबा लौकर!
मोरांपासून बेडकांपर्यंत सारे आकाशाकडे डोळे लावून बसलेयत
तुझ्या वर्षावात चिंब व्हायला

अभिजात कवींपासून र ट फ शब्दजुळार्‍यांपर्यंत सगळे टपलेयत तुझी रिमझिम अन् आपापल्या उबळी
शब्दात कोंबायला

इथली झाकणगायब माणूसगिळी मॅनहोलं केव्हाची वाट पाहून र्‍हायलीयेत
तुझ्या ढगफुटीत ओतप्रोत तुंबायला

बघ, भेगाळलेला शेतकरी पण तयार झालाय पुढच्या दुष्काळापर्यंत
आत्महत्या लांबवायला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झाकणगायब माणूसगिळी मॅनहोलं

मॅनहोलवर झाकणं बसवलेली असतात. पण पाणी तुंबते तेंव्हा आंतल्या पाण्याचा दाबाने ती वर उचलली जातात. आणि वर पाणी भरलेले असल्यामुळे , मॅनहोल उघडे आहे, हे लक्षांत येत नाही.
बाकी, पावसाला सगळेच सारखे. मोर, बेडूक, सिद्धहस्त कवी, नवशे कवी, हिरो, हिरॉईन आणि व्हिलनसुद्धा! पावसाला त्यांचे काय ? अगदी शेतकऱ्यांचेही!
पाऊस कुणासाठी पडत नाही, प्रत्येकाला आपलं वाटत असतं, आपल्यासाठीच म्हणून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इसपे झब्बू देना पडेगा अभी! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी