स्मॉश: बाष्कळ, आचरट आणि तूफान मजेशीर!

नवीन नवीन फास्ट इंटरनेट जेव्हा घरी आलं तेव्हा युट्यूब ह्या प्रकाराशी ओळख झाली. नेहमीप्रमाणे युट्यूबने रेकमेंडेड मधून कचरा ओतण्यास सुरूवात केली तेव्हाच कळलं की इथे फोकसचा म्याटर आहे. जे पहाल तसंच दिसत राहील. एआयबी, टीव्हीएफशी ओळख झाली होतीच. त्यात आणखी रसेल पीटर्स. कॉमेडी हे चांगलंच जंक दृश्यखाद्य आहे हे कळलं आणि त्याचा शोध सुरू झाला. ह्यात मिळालं स्मॉश. त्यांचा पहिला व्हिडीओ आहे 'मोलेस्टर मून.'

शीर्षकच असं म्हटल्यावर तो व्हिडीओ मी पाहिला नसता तरच नवल. व्हिडीओ सुरु होतो. स्मॉशचे जनक, लेखक, नायक डॅनिअल अँथनी पडीआ आणि इअन हीकॉक्स दिसतात. जेसन मायकल फाँग हा इसम त्यांच्यात असतो. ते ईमोजींबद्दल काहीतरी गप्पा मारत असतात. इअनच्या पहिल्याच संवादावरून एक मजेशीर लहर मनातून जाते. त्यानंतर इअनचे संवाद काहीच्च्या काही मेलोड्रामॅटीक होत जातात. तशीच ही गोष्टसुद्धा. इअन म्हणतो, की ॲपलच्या ईमोजीज् मधला हा, काळ्याचंद्रावर चेहरा असलेला इमोजी जर तुम्ही कोणाला तीनदा पाठवलात तर हा विनयभंगचंद्रमा येऊन तुमचा विनयभंग करतो. अँथनी आणि मायकल अर्थातच हे हसण्यावारी नेतात. नंतर तिघेही जमिनीवर झोपतात. अँथनी झोपण्याआधी "pee-pee before sleep-y" म्हणून लघुशंकेस जातो. इअनही लगेच दीर्घशंकेस जातो. नंतर काय होतं ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहणं अति आवश्यक आहे. खदाखदा हसून लोळण्याचा अनुभव मी पहिल्यांदा ह्या व्हिडीओतून घेतला. व्हिडीओ शुद्ध आचरट आणि पोरकट आहे. पण त्यात एक अतिशय निखळ, कुठल्याही वयाच्या प्रेक्षकाला खदाखद हसवण्याचं सामर्थ्य आहे. शिवाय अँथनीचा सबटायटलवाला डायलॉग (आणि त्यातून उद्भवणारं सगळंच) जाता जाता अमेरिकन विचारसरणीवर शेरा मारून जातो.

हीच गोष्ट स्मॉशच्या प्रत्येक व्हिडीओचा सरासरी दर्जा बराच वर नेऊन ठेवते.

इथे गैरसमज नको. स्मॉश हे काही अत्युच्च दर्जाचा विनोद असणारे व्हिडीओ बनवत नाहीत. प्रत्येक व्हिडीओ अतिशय उथळ, आचरट संवाद आणि अति मेलोड्रामॅटीक ॲक्टींगने भरलेला असतो. ह्याबाबतीत पहा: इफ बीबर रोट हिज साँग्ज. ह्यात आत्तापर्यंत जाणवली नसेल, तर इअन आणि अँथनीची जबरदस्त निरीक्षणशक्ती दिसून येते. टीनेजर्सच्या गळ्यातला ताईत जस्टिन बीबर ह्याची यथेच्छ खिल्ली उडवणारा हा व्हिडीओ आहे. ह्यात अँथनी आणि इअनच्या संवादात, त्यांच्या वेषभूषेतून बीबरने स्वत:चं रुपांतर जे केलं त्यावर अत्यंत तीक्ष्ण टिप्पणी केलेली आहे, जिला क्षणोक्षणी आचरटोत्तम विनोदांची फोडणी दिलेली आहे. शिवाय स्मॉशची गाणी ही मूळ गाण्यांच्या मीटरमध्येच ठेवून त्यांचे शब्दही तसेच, फार्सिकल लिहीलेले आहेत. (हे त्यांच्या सगळ्याच व्हिडीओज् मध्ये आहे.) प्रत्येक वाक्यात असे बोचरे, तिखट आणि विनोदी संवाद लिहायला अति अति कौशल्य लागतं. प्रत्येक व्हिडीओचं ते एक 'बीहाइन्ड द सीन्स' ही बनवतात. ह्या व्हिडीओचं 'बीबर व्हर्सेस बीबर' हे बीटीएस पाहूनच टाका. अति थोर लिहीलेलं आहे.

स्मॉशने आत्तापर्यंत असंख्य व्हिडीओ बनवलेले आहेत. त्यांचा एक स्पॅनिश चॅनेल आहे, एक स्मॉश गेम्स, स्मॉश पिट म्हणूनही चॅनेल्स आहेत. प्रत्येक व्हिडीओबद्दल लिहीणं कोणालाच शक्य नाही. तरीही, विशेष उल्लेखनीय असे स्टॉप माइली, टेलर स्विफ्ट डम्प्ड मी हेही असेच प्रथितयश(?) गायिकांचे खिल्ली उडवणारे व्हिडीओज पहा. प्रत्येक व्हिडीओ तूफान लिहीलेला आहे. प्रत्येक गाण्याचं विडंबन हे वर लिहील्यासारखंच, अतिशय टोकदार विनोदाने भरलेलं, आणि मूळ गाण्यांच्या चालीत बेतलेलं आहे. टीनेजर्सनी डोक्यावर घेतलेल्या, इंटरनेट सेन्सेशन ठरलेल्या गायक/गायिका, त्यांचं बेफाम आयुष्य आणि त्यांची प्रसिद्धीलोलुपता ह्यांच्यावर वाक्यावाक्यातून, गाण्याच्या ओळीओळींतून खवचट शेरे मारलेले आहेत.

हे लोक एव्हढंच करत नाहीत. एव्हरी ब्लँक एव्हर ह्या सिरीज मधून ते अमेरिकन आयुष्यातल्या 'रिलेटेबल' गोष्टी शोधून त्यांची खिल्लीही उडवत असतात. ह्या त्यांच्या लिस्टमध्ये इन्स्टाग्राम, गेम ऑफ थ्रोन्सचा एपिसोड पासून ते प्रत्येक वडील आणि प्रत्येक मॅकडोनल्ड्स इत्यादी गोष्टी अंतर्भूत आहेत. त्यांतली प्रत्येक भूमिका एकेका टिपीकल अमेरिकन नागरिकांचं प्रतिनिधित्व करते असं मला वाटतं. अतिशय बारीकसारीक गोष्टींतून त्यांनी प्रत्येक गोष्टीवर अत्यंत तिरकस शेरे मारलेले आहेत.

स्मॉशचा विनोद हा भाष्यकार (preachy?) नाही. त्यांनी स्वत:चं आचरट्य मान्य केलेलंच आहे. त्यांनी घेतलेली ड्वेन 'रॉक' जॉन्सनची मुलाखत पहा. अतिशय बाष्कळ आणि आचरट विनोदांनी भरलेली आहे. तशीच एमा वॉटसन आणि टॉम हिडल्स्टनचीही. स्मॉश हे, सलगपणे तितकाच आचरटपणा प्रत्येक व्हिडीओमध्ये तब्बल १६ वर्षे करत आलेले आहेत. ते एक उगीच नसत्या गोष्टींवर भाष्य करत नाहीत. फक्त ट्रेंडींग, एजी गोष्टींवर टीका/विनोद करत नाहीत आणि सवंग लोकप्रियतेच्या मागे लागत नाहीत. त्यांचं आचरट्य त्यांना मान्य आहे, आणि म्हणूनच ते त्यांच्या क्षेत्रात एका वेगळ्याच स्थानी आहेत.
आणि ह्या एका कारणासाठी सर्व भारतीय विनोदी चॅनेल्सनी त्यांच्याकडून धडा घ्यावा.

जाता जाता: त्यांचा स्मॉश लाईव्ह हा जो कार्यक्रम झाला होता त्यातलं त्यांचं प्रत्येक सादरीकरण तूफान, भन्नाट विनोदी होतं. त्यातलं मला सगळ्यात जास्त आवडलेलं: हँगमॅन. नक्की पहा.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

परदेशी संदर्भ माहित नसल्याने हे विनोद कळत नाही.
आमचा पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यादीत नोंद करुन ठेवतो.
याची AIB सोबतची तुलना कशी होईल? AIB = देसी स्मॉश?

- ओंकार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एआयबी एकेकाळी मजेशीर होतं, सध्या फारच edgy teens oriented झालेलं आहे. त्यामुळे मजेशीर हे विशेषण लागू होत नाही. शिवाय शेवटच्या परिच्छेदात मी बरंच लिहीलंय ह्याबाबत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

चौदावे, फनी ऑर डाय हा प्रकारही पाहून टाका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला