:संपूर्ण दीप्ती:

:संपूर्ण दीप्ती:

म्हणजे खिडकीच्या बाहेर संपूर्ण दीप्ती दिसली मला ,
पण त्याची व्याख्या करता येईना , समजेना अगदीच काय म्हणावं याला
संपूर्ण च्या संपूर्ण दीप्ती दिसल्यावर कसं वाटतं ते ...

ना दुःख , ना आनंद ही , ना भय ,
ना गोंधळ , ना उपेक्षा, ना हर्ष ,
ना आशा , ना शांती आणि ना आसक्ती ,
काय हे ?
हे काय घरंगळून गेलं माझ्यावर ,
हे कुठले भाव नक्की वेढून राहिले -
की तो क्षण संपूर्ण जगून गेलो,
त्या क्षणी त्या ठिकाणी होतो

संपूर्ण दीप्तीचं दर्शन घ्यायला !!
(मूळ कविताCała jaskrawość)
मूळ पोलिश कवी - एडवर्ड स्ताहुरा (१९३७-१९७९) : कवी , लेखक , अनुवादक ! १७व्या वर्षी लिखाणाला सुरुवात ! हा एक प्रवाही कवी होता , प्रवाही अशा अर्थाने , की स्वतःच्या कविता स्वतः गात असे आणि त्यात कायम बदल करीत असे.

field_vote: 
0
No votes yet