हे सव्यसाची,

खुणावतील तुला जटिल गणिते-
आदिस्फोटाच्या प्रसववेणांची

हाकारतील तुला कोडी-
विस्कळखाईत क्षणोकणी होणार्‍या
विश्वाच्या अटळ अंताची

या अपार भूतभविष्यादरम्यान
लीलया झुलणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका
कुठे खिळवलाय, हे सव्यसाची?

तो इथेय बघ,
निळ्या पाखरपंखावर
अथक थिरकणार्‍या
क्षणभंगूर वर्तमानात

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदरच!!! फारच आवडली. तुमच्या कविता संग्राह्य आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गहन! रसग्रहण अपेक्षित..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विस्कळखाईत क्षणोकणी होणार्‍या

जी.ए. च कविता लिहायला लागले की काय, असं वाटलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..शुचि, फुटकळ, तिरशिंगराव - आपल्या प्रतिसादांबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा कॅलिडोस्कोप भलताच जोरदार होत चालला आहे. हा प्रकार फार आवडतो. अजून कवितांच्या अपेक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१४टॅन हा anant_yaatree चा डुआयडी आहे असे वाटावे इतके तेल वाहत असतो AY च्या कवितांवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

एकोळी समीक्षा लिहिताना व डुआयडींचे रहस्योद्घाटन करताना तुमच्या बादरायण-संबंध-प्रस्थापन-कलेला भलताच बहर येतोसे दिसते. मग रहस्यकथाच लिहा की . बघा जमेल तुम्हाला. सुमार कवितांवर आपले टुकार समीक्षास्त्र चलविण्यापेक्षा किमान दर्जेदार रहस्यकथा तरी वाचायला मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुणावतील तुला जटिल गणिते-
आदिस्फोटाच्या प्रसववेणांची

इथे पण पुन्हा गणित. कविला गणित विषयानी खुप त्रास दिलेला दिसतोय. त्याचा सुड घेतायत आता ते त्यांच्या कवितेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गणित ह्या "विष"याला कवीने खूप त्रास दिलाय पूर्वी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप छळलय ह्या गणिताने मला पण, M1,M2,M3,M4...आरारारा
मी तर ह्याला एमपुरीच म्हणायचो. सुटले गोल्डनवर एकदाचे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं