धवल

खोडलेले चित्र तुझे
रेघा खोडलेल्या
निळ्या-हिरव्या रानगच्च
वाटा मोडलेल्या
खोडलेले चित्र तुझे
खोडलेल्या रेघा
शुष्क-रुक्ष भूमी
खोल खोल भेगा
अतृप्त हा कुंचला
रंग ही अतृप्त
सगुणात निर्गुण
विलुप्त , सुप्त ... दीप्त ?
हरेक रंगाला , हरेक छटेला
वेगवेगळा गंध
कोठेतरी पण
गुप्तसा धवल
दरवळे मंद

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली कविता..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

छान आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0