निर्बंध...

जायचे आहे सगळ्या बंधनातून निसटून कुठे तरी एकांतात
स्वच्छ सुंदर हवेत मन मोकळे करायला.
हलक्या वाऱ्याच्या झुळूकीवर बेधुंद होऊन उडायला.
पण हिम्मत होत नाही, बंधने सुटत नाहीत....
आणि नुसता राहतो तो एकांत कुठल्या तरी आठवणींचा.
मन सुध्दा किती हळवे असते ना.
जे समोर आहे ते सोडून भलतेच विचार करत राहते आणि मग सगळे सुख असताना चिंता संपत नाहीत.
राहतो तो आठवणींचा बाजार आणि न साकारलेली असंख्य स्वप्ने.
पण कुठेतरी हे थांबायला हवे. मनाला सुद्धा आता समजायलाच हवे.
पळून पळून थकलेल्या मनाला आता शांत व्हायलाच हवे.
काही तरी करावेच लागेल, मनाला वेसन घालावीच लागेल.
जे आत्ता पर्यंत स्वच्छंद होते त्याला बंधनात टाकावेच लागेल.
ठरले तर मग खूपच शांत व्हायचे अगदी निर्जीव असल्यासारखे.
प्रेताला बघून लोक कशी मागे सरकता तसे काहीतरी व्हयला हवे.
मन घट्ट करून एकदाच अखंड निद्रित व्हायला हवे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खरा शांत अनुभव घ्यायचा असेल तर , पिंडारी ग्लेशियरला जा. तिथे एक बाबा देऊळ बांधून रहातो. जमलं तर तिथेच रहा, सर्व बंधनांतून मुक्त! केवळ अप्रतिम निसर्गाच्या सान्निध्यात्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0