तुझ्या नकळत

तुझ्या नकळत तुला, रतीने बघावे
अन पाहून तव रूप ,लज्जित व्हावे
.
असा ,सखे लयबद्ध पदन्यास तुझा
पैंजणास वाटे, तुज बिलगुनि राहावे
.
अशी लाजरी अबोध रमणी, असे तू
आला वसंत देही,तुज ठाऊक नसावे.
.
नाभीत जशी त्याच्या ,कस्तुरी दरवळे
तसे मम हृदयी तू ,दरवळत राहावे
.
हे काय झाले,तुला हि कळेना
ते पाहून ,मदनाने गाली हसावे
.
तारकांच्या साक्षीने विवाहबद्ध व्हावे
मी तुला अन तू सौभाग्यास मिरवावे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली कविता. छान आहे. विवाहा पर्यंत आलेली अन् positive attitude वाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

क‌विता आव‌ड‌ली. प‌ण‌.... ही ओळ‌ ख‌ट‌क‌ली.

मी तुला अन तू सौभाग्यास मिरवावे

ल‌ग्न होणं हे सौभाग्य‌ असेल‌ त‌र ते स्त्रीचेच‌ का ? पुरुषाचेही तेव‌ढेच‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0