ते सर्व - २

सर्वांगी,
मौनाचे अधर.
मातीचा पदर.
व्याकूळ नदी
मेघाळलेली.
रेष प्रवाही
चुरगाळलेली.

आज तो येईल.
बाळस्पर्श देईल.
शरिरापलिकडले
स्पर्श ही घेईल.
वादळ ठेऊन,
निघून जाईल.

तो नसतो तेव्हा,
धुगधुगी असते.
पंखही असतात.
पण ओलेत्या
पावलांमधला
आक्रोश अडतो,
मावळतीच्या
घरामागे.

त्यांत,
गर्भपातासाठी विरामलेल्या,
प्राक्तनाच्या अनुयायांनी काढलेल्या,
हजारो
कावळ्या,
डुक्करं,
माश्यांच्या,
मिरवणुकीखाली
शिणतोय,
एक गल्लाभरु देह

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुकड्या-तुकड्यांनी कळते आहे असे वाटले. विशेषतः शेवटच्या कडव्याची संगती लागली नाही. विवेचनाच्या प्रतिक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिस्थितीवश देहविक्रयासाठी रस्त्यावर आलेल्या स्त्री विषयी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

तुमची थेट कळलेली ही पहिली कविता ...
हे वास्तव भयंकर आहे.. कविता आवडली असे कसे म्हणू ... परंतु जाळवत मात्र गेली...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुरगाळलेली वगैरे शब्दांनी कविता अधिक पोचते.. आवडली
फक्त 'बाळस्पर्श' काहि झेपला नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
पूर्णपणे सहमत

बाळस्पर्श शब्द पटला नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.