कोरडे दिसणारे केस केवळ ओले दिसण्याकरता काय उपाय करावा?

गेल्या सहा महिन्यांपासून मी माझे डोक्याचे केस थोडे मोठे राखलेले आहेत. एकदम पोनी घालण्याइतके ते मोठे नाहीत पण शर्टच्या कॉलरच्या खाली गेलेले आहेत. ते तसेच अजून कंटाळा येईपर्यंत ठेवण्याची इच्छा आहे.

मी माझ्या डोक्याच्या केसांना अगदी दररोज तेल लावत नाही. आठवड्यातून दोनदा लावतो. एखादे दिवशी किंवा ते केस धुतल्यानंतर कोरडे दिसतात.

आता माझा प्रश्न:

असे कोरडे दिसणारे केस केवळ ओले दिसण्याकरता काय उपाय करावा?
जेल वैगेरे वापरून केस ओले दिसतात पण ते कडक होतात. केस मऊ, उडते ठेवून ओले दिसण्यासाठी काही क्रिम आहे काय? असल्यास ते क्रिम कोणत्या ब्रांडचे आहे?

केस कर्तन करणार्‍या माझ्या कारागीराने मला 'Livon' नावाचे क्रिम घेण्यास सांगितले. ते क्रिम नसून एक लिक्वीड होते. त्याचा उपयोग केस धुतल्यानंतर गुंता न होता विंचरण्यासाठी होतो. थोडावेळ केस ओले दिसतात पण नंतर कोरडे होतातच.

जाणकार माता भगीनींनी केस ओले दिसण्याचा उपाय सांगितल्यास माझ्या व्यक्तिमत्वात चांगला बदल दिसण्याची शक्यता आहे.

उपाययोजकांना आधीच धन्यवाद.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

डोक्याला जास्त ताप होऊ देऊ नका. डोके तापले की त्या उष्णतेने केसातल्या पाण्याची वाफ होते. पाणी उडून गेल्यावर केस कोरडे पडणारच. मनःशांतीसाठी पूजाअर्चेत जीव रमवा.
संदर्भ:
ह्या लेखाआधी थोड्याच वेळापूर्वी इथेच टाकलेली आपली ही कविता.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शहराजाद अहो ती कविता अन हा प्रश्न हा निव्वळ योगायोग होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

H2O नावाचे रसायन केस ओले ठेवण्यास उपयुक्त ठरावे.
खिशात कंगवा ठेवा.. व केस कोरडे वाटू लागताचे केस विंचरताना तो H2Oने ओला करून केस विंचरा.. केस सतत ओले दिसतील Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डोक्याला ताप आल्यास H2O उडून जावू शकते म्हणून काही इतर भारतीय (स्वदेशी नव्हे!) उत्पादने सुचवावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हे पहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही हो, असला चप्प बसणारा उपाय नको. ओले भासणारे अन हळूवार हलणारे, डुलणारे, वार्‍यावर सळसळणारे केस हवेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

तुम्ही माताभगिनींनाच उपाय विचारल्यामुळे आम्ही तुम्हाला उपाय सांगू शकत नाही!!
खरंच उपाय जाणून घ्यायचा असेल तर व्यनि करा....
किंवा "देअर इज समथिंग अबाऊट मेरी" हा चित्रपट पहा....
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा "देअर इज समथिंग अबाऊट मेरी" हा चित्रपट पहा....

और ये लगा सिक्सर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता पाभेंनी फूलटॉसच दिल्यामुळे मोह आवरला नाही!!
तरी स्वारी हां कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बघायला पाहिजे, पण उप-शीर्षके हिंदी मराठीत आहेत काय? आमचे फास्ट बोलणारे इंग्रजी कच्चे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

डायलॉग समजायची गरजच नाही. नुसती चित्रं पहा...
व्हेरी सेल्फ-एक्सप्लनेटरी!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण चर्चाप्रस्तावकाने सांगितले आहे :

जेल वैगेरे वापरून केस ओले दिसतात पण ते कडक होतात.

त्यांना तसे नको आहे. त्यामुळे चित्रपटातील उपाय चालायचा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केस धुवू नका.
धुतल्यास वाळवू नका.
वाळल्यास तेल लावायला विसरू नका.

किंवा 'लिव्हॉन'नेच आंघोळ करा. या 'लिव्हॉन'मुळे माझे केस बरेच गळायचे. त्यामुळे मी ते दोन-चारदा वापरून उरलेली बाटली कुणा मैत्रिणीला दान केली.

माझ्या माहितीतल्या सर्व जाणकार माता-भगिनी केस ओले न दिसण्याचा प्रयत्न करतात. ओले केस फारच चंपू वाटतात आणि ती आजकालची फॅशन नव्हे. आजकालची फॅशन केसांचा व्हॉल्यूम जास्त दाखवण्याची आहे. त्याबद्दल मला अधिक माहिती विचारू नये. मी जाणकार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धुतल्यास वाळवू नका.
पण मग ते कधीतरी सुकतीलच अन मग कोरडे दिसतात.

वाळल्यास तेल लावायला विसरू नका.
तेल लावल्यावर चीप्प दिसायला लागतात किंवा भुरभुरते दिसत नाहीत.

किंवा 'लिव्हॉन'नेच आंघोळ करा.
लिव्हॉन चे अनेक उत्पादने आहेत. त्यातले केसांचे कंडीशन होणारी बाटली मी वापरतो. ते केसांचा गुंता न होण्यासाठी आहे. मला ते उपयोगी नाही. त्यानेही केस सुकले की ओले भासत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

पण मग ते कधीतरी सुकतीलच अन मग कोरडे दिसतात.

अहो अभिषेक काय शंकर आणि रायबाईंसाठीच आहे का?

तेल लावल्यावर चीप्प दिसायला लागतात किंवा भुरभुरते दिसत नाहीत.

हे मान्य आहे. मग तेलकट नसणारं तेल वापरून पहा.

लिव्हॉन चे अनेक उत्पादने आहेत. त्यातले केसांचे कंडीशन होणारी बाटली मी वापरतो. ते केसांचा गुंता न होण्यासाठी आहे. मला ते उपयोगी नाही. त्यानेही केस सुकले की ओले भासत नाहीत.

लिव्हॉन सिल्की पोषण नावाचं उत्पादन पारले का कोणशीशी कंपनी विकायची. ते पुरेशा प्रमाणापेक्षा बरंच जास्त प्रमाणात वापरलं तर केस चिकट, तेलकट अशा पद्धतीने ओले दिसतील.

तुम्हाला केस ओले दिसायला हवे आहेत का चमकदार? केसांची चमक ही मुळात असावी लागते. नसेल तर कशी आणायची मला माहित नाही. आहे ती टिकवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या शँपूने केस धुतल्यावर चांगल्या प्रतीचा कंडीशनर लावल्यास फायदा होतो. चांगल्या प्रतीचे शँपू आणि कंडीशनर कसे ओळखावेत हे मला माहित नाही. बाजारात उपलब्ध असणारी चार उत्पादनं वापरून, त्यांचा केसांवर होणारा परिणाम पाहून चांगलं-वाईट ठरवता येईल. माझ्या एका मैत्रिणीचे 'सत्यसाईबाबा-केस' डव्ह वापरून छान होतात असं तिचं म्हणणं; तिच्या घरी असताना मी तो वापरला तर माझे केस भसाभस गळले म्हणून मी तो वापरत नाही. तुम्हाला काय सूट होतंय ते पहा.
शिवाय केस लांब असतील तर ते बांधून ठेवा. पोनी घालण्याइतपत लांब नसतील तर पिना लावा, आकडे लावा, चाप लावा, हेअरबँड लावा (ते फार विचित्र दिसतं), केस वर करून पोनी घाला किंवा सरळ बँडाना बांधा. सतत धूळ आणि वारा लागूनही केसांची नैसर्गिक चमक कमी होते. केस लांब ठेवायचे असतील तर बंधनं घालून घेण्याशिवाय पर्याय नाही.

रमाबाई कुरसुंदीकरांच्या काळात काय प्रथा होती कोण जाणे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>ओले केस फारच चंपू वाटतात आणि ती आजकालची फॅशन नव्हे. आजकालची फॅशन केसांचा व्हॉल्यूम जास्त दाखवण्याची आहे.<<

'मला फॅशनेबल दिसायचंय' असं आदरणीय धागाप्रवर्तक यांनी म्हटलेलं नाही. तद्वत हे सर्व अवांतर आहे. अवांतर गप्पाटप्पांसाठी व्यवस्थापनाने खरडवहीची आणि व्यनिची सोय दिली आहे. ती वापरावी ही नम्र विनंती. शिवाय 'ओले केस चंपू वाटतात' अशा टिप्पणीमुळे आदरणीय धागाप्रवर्तकांवर व्यक्तिगत आरोप केले जात आहेत अशी तक्रार त्यांनी केली तर हे असले वाद निस्तरण्यात प्रशासनाला डोकेदुखी होईल ती वेगळीच. इथे सर्वजण आपापले उद्योगधंदे सांभाळून नि:स्वार्थी वृत्तीने संपादन वगैरे (टाईमपास म्हणून) विनामोबदला करत असतात. कृपया आपल्या वर्तनामुळे त्यांना मनस्ताप देऊ नये. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुमच्यासारख्या सन्माननीय सामान्य जनांस सगळं उलगडून सांगावं लागतं याचा खेद वाटतो. पण तो सध्या बाजूला ठेवू.

ओले केस फारच चंपू वाटतात आणि ती आजकालची फॅशन नव्हे. आजकालची फॅशन केसांचा व्हॉल्यूम जास्त दाखवण्याची आहे.

आजकालच्या माता-भगिनी जाणकार असल्यास त्यांना आजकालच्याच फॅशनचीच माहिती असणार. माता-भगिनींचे ओलेगप्प केस असल्यास ते चंपू दिसतात. त्यामुळे जाणकार माता-भगिनी या फंदात पडत नाहीत. उरलेल्या माझ्यासारख्या माहितीबद्दल किंवा तिच्या वापराबद्दल जागरूक नसणार्‍या साळकाया-माळकाया केस या vestigial प्रकाराबद्दल फार चिकीत्सा बाळगत नाहीत.
शिवाय काही जणींना पुरूषांचे टक्कलच फार सेक्सी किंवा हँडसम वाटते. (चिवडा-लाडू केस पहाण्यापेक्षा पूर्ण लाडू, आपलं टक्कलच बरं, हाय मेंटेनन्स असलं म्हणून काय झालं!) शिवाय सत्यसाई कटपेक्षाही गांधीकट अधिक सेक्सी वाटतो. (का वगैरे प्रश्न विचारू नयेत, उत्तरं मिळणार नाहीत.)

त्यातून अधिक सल्ला हवा असल्यास लांब केसांचं रास्ताफेरियन कट करावा किंवा ब्रेडींग करावा असा सल्ला देईन. तो सल्ला नको असल्यास मी आधीच केस न धुण्याचा आणि लिव्हॉनमधेच नहाण्याचा सल्ला दिला आहे तो ही आधी नजरेखालून घालावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाद नकोय हो. मी आपला सल्लामसलतीच्या हिशेबाने विचारलेय. आंतरजालावर येतांना रागरोस खुंटीला टांगून येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

या धाग्याच वर्गीकरण विनोदी वाटतय - आता पाषाणभेद साहेबांनी केस ओले कसे ठेवावेत हे 'चर्चाविषय' म्हणून टाकल्यावर मतमतांतरं व्यक्त होणारच! - काहीजण/काहीजणी कोरडया केसांच्या बाजूने (तावातावाने) सामील होणार हे स्वाभाविक आहे! सगळ्यांच एकमत झाल तर कसली आलीय चर्चा? Smile

त्यामुळे प्रशासनाने धाग्याला योग्य ठिकाणी टाकून विषयाला न्याय देणे गरजेचे आहे.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाभे खिशात एक पाण्याची 'चपटी' बाळगत चला. केस वाळले आहेत असे वाटले की लगेच चार थेंब उडवायचे डोक्यावर. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

एव्हढ्या बायका असून एकीनेही टीप दिली नाही? (सगळ्या बॉयकट का बॉबकट वाल्या दिसताहेत म्हणजे!) Wink

पाभे, डोक्याला लावायचं नॉन हार्डनिंग* जेल बाजारात मिळतं. जेल लावताना हात थोडा ओला करून त्यावर हाताला चांगलं चोळून मग केसांना लावावं. जेलमध्ये थोडंपाणी घालून लावल्यासही चालतं.

*साधारण जेल वरती होल्ड, स्ट्राँग होल्ड, वेरी स्ट्रॉंग होल्ड असं लिहलेलं असतं. जितकं कमी होल्ड तितकं वार्‍यावर जास्त उडेल.

मागे मी एक जेल वापरत होतो, त्याचं नाव विसरलो. थोडा शोध करून सांगतो.

-एकेकाळी पोनी बांधणारा लंबकेशा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तू जाणकार असशील रे, पण माता किंवा भगिनी आहेस का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजच्या तुम्हा माडर्न बायकांना संस्कृतीवगैरेची चाड उरलीए कुठे? त्यामुळे माझ्यासारख्या सज्जन पुरुषांना अशा गोष्टी शिकून संस्कृती जपावी लागते!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

श्री. पाषाणभेद यांनी थोडीच संस्कृती जपण्याचा टिपा मागितल्या आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचे केस रुक्ष, चरचरीत झाले आहेत की नॉर्मल केसच तुम्हाला ओलसर चकचकीत दिसतीलसे करायचे आहेत? दोन्हीसाठी वेगळे उपाय आहेत.

रुक्ष केसांसाठी:
१) कोरड्या केसांसाठी असलेला कंडीशनर वापरा. बहुतेक लोक कंडीशनर लावून १-२ मिनिटांनी धुवून टाकतात. कोरड्या केसांसाठी तो ५-७ मिनिट ठेवायला हरकत नाही.
२) पाव लीटर पाण्यात एक टेबल्स्पून ग्लिसरीन मिसळा. आवश्यकतेप्रमाणे थोडे मिष्रण हातवर घेऊन अलगद केसांना लावा आणी विंचरून पसरवा. लहानशी स्प्रे बाटली सोयीची पडेल.
३) हवे असल्यास वरील मिश्रणात अर्धा ते एक टी- स्पून कुठलेही हलके, कमी चिकट तेल घाला. ( तीळ, बदाम इ). तेल घातले तर बाटली दर वेळी खूप जोरात हलवून घ्यावी लागेल.
४) केस नेहमी सौम्य शॅम्पूने धुवा.
५) कठीण पाण्याने केस धुण्यामुळे देखील ते विचित्र चिकट- कोरडे होऊ शकतात.

केस ओलसर दिसावेत यासाठी:
१) मी गर्निएचे वेट लुक गेल वापरले आहे. बाजारात तसे काही मिळाले तर बघा. किंवा हलक्या होल्डवाल्या जेल मध्ये भरपूर ग्लिसरिन मिसळून केसाला लावा.
२) हेअर पॉलिश / ग्लॉस / शाइन सिरम इ नावांखाली काही उत्पादने मोठ्या प्रसाधन कंपन्या बनवतात. ते म्हण्जे बहुतेक वेळेला निव्व्वळ सिलिकोन सिरम असते. सिलिकोनने केस चकचकीत आणि स्पर्शाला रेशमी सुळसुळीत होतात. शॅम्पू व इतर केस आणि त्वचेच्या प्रसाधनांत ते खूप वापरले जाते. भारतात कुठल्या कंपन्या ते कुठल्या नावाने विकतात हे माहित नाही पण मोट्या शहरात, मोट्या मॉलमधे वगैरे चौकशी करून पहा. ह
मात्र ते अगदी थोडे पुरते. जास्त लावले तर केस तेलकट दिसू लागतात.

ओले ओले आणि त्याच वेळी भुरुभुरु उड/णारे केस फक्त चित्रपटात दिसतात. अतिशय कुशल केशभूषाकारांची वेळखाऊ मेहनत, ढीगभर प्रसाधने आणि कुठल्याही जागी हव्या त्या दिशेला लावलेले पंखे ह्या सर्वांचा तो एकत्र परिणाम असतो.वरील उपाय करून बघताना अपेक्षा रास्त असूद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0