लाल शाहबाज कलंदर आणि परवाचा बॉम्ब

कोण होता हा लाल शाहबाझ कलंदर? पाकिस्तानात त्याच्या दर्ग्यावर बॉम्ब टाकला माथेफिरू ISISनं... ८० लोक मेले. सगळीकडे होतंच आहे हे. कशाला वाईट वाटून घ्यायचं. परवाच तू सीरियाचं सांगितलंस. अलेप्पो बघायचं होतं ना. आता उत्खननात सापडल्यासारखं झालं. चालायचंच. शहरं संपतात. संस्कृती संपतात. कारण नसताना युद्धं होतात... सृष्टी-स्थिती-लय.

मग शाहबाझ कलंदरच्या दर्ग्यावर बॉम्ब टाकण्याचे कशाला मनाला लावून घायचं? कोण हा? काय संबंध त्याचा-माझा?

पण कसंय ना, जगातल्या मोजक्या जागा बघायच्या होत्या. सेहवान शरीफ त्यातली एक. कधी तरी सिंधला जाणार. सिंधू बघणार. झुलेलालचं नदीतलं घर बघणार. आपल्या मुर्शिदला भेटायला येणारे हिल्सा मासे बघणार. मग नदीतीरानं सेहवान गाठणार. शाहबाझ कलंदरची न संपणारी धम्माल बघणार. कोण जाणे त्या मानवापलीकडे गेलेल्या बायकांमध्ये, त्या वेड्या फकीरांमध्ये, दरवेश्यांमध्ये, भिकाऱ्यांमध्ये काही तरी ओळखीचं दिसेल. त्यांच्या बरोबर एखादी गिरकी मीपण घेईन.

हा कधीतरी इराण मधून सिंधू किनारी आला १२व्या शतकात. कवी, गायक, संगीतकार, संत. आणि मग इथलाच झाला. जसे सिंधूच्या तीरावर अनेक पाणवठे आहेत, हिरवे ओअॅसिस आहेत, तशाच याच्या गोष्टी. धुरकट भकास वाळवंटात जिथे-जिथे हिरवा रंग आहे तिथे-तिथे कलंदरचा स्पर्श आणि त्याच्या गोष्टी आहेत. धर्माच्या पलीकडचा हा.

शिया जागा म्हणून सेहवानवर बॉम्ब टाकला म्हणे. अरे, तो तर हिंदू-मुसलमानांच्या पलीकडचा. दर्यापंथी हिंदू त्याला राजा भ्रतहरी मानतात; काही नवनाथांचा अवतार म्हणतात; काही झुलेलाल म्हणतात; काही जिन्दापीर म्हणतात; काही सुफी संत आणि कलंदर पंथाचा प्रमुख म्हणतात..

नाडलेल्या, झिडकारलेल्या, विचित्र weirdosचा देव; असे देव मुळात कमी. जोवर लोक आहेत तोवर लाल शाहबाझ कलंदर आहे. अबिदाच्या गाण्यात आहे; बुल्ले शाहच्या, सचल सरमस्तच्या शब्दांत आहे; सिंधूच्या वेड्यावाकड्या, कोरड्या-खाऱ्या पाण्यात आहे; धरणामागे अडकलेल्या हिल्सा माशात आहे. बॉम्बनं काय होणार!

सिंधू नदीला आपल्या तालावर नाचवणारा संत. त्याच्या धम्मालमध्ये कोण नाचतं माहितीये. नुसते देश परदेशातले वेडे फकीर नाहीत, तर बायका, तृतीयपंथी, स्वतःची ओळख विसरलेले, ओळख नसणारे, जग नको असणारे...

याचं सेहवान 'सेहवान शरीफ' होण्याआधी शिविस्थान होते. मोरोक्कोच्या इब्न बतूूतानं याचा उल्लेख केला आपल्या बखरीत केला. पर्शिया आणि भारताच्या मधले सिंधू नदीतीरावरचे महत्त्वाचे ट्रेड रूट. अशा ठिकाणी कट्टर धर्म टिकत नाही. अनेकानेक लोकांच्या घामात,चलाखीत, हसण्यात, रडण्यात, व्यवहारात, कलेत कट्टरतेचा रंग उडत जातो. मुंबईत होतं तसं.

संध्याकाळ कलली की सेहवान शरीफ दर्ग्यात लोक घुमू लागतात, गाऊ लागतात, नाचू लागतात, धम्माल चढत जाते, भिनत जाते रक्तात. सईद, पीर, फकीर, मजहूब, सगळे एक होतात. हजीरी येतात; फकिरी येतात; संसारात बुडलेली बाई आपला बुरखा फेकून फकीर होऊन जीवघेण्या गिरक्या घेते निळ्या फरशीवर. 'लाल की मस्तानी' केस मोकळे सोडून गोलगोलगोलगोलगोल फिरते. म्हणते माझे सांसारिक आयुष्य माझ्या मुर्शिदने मला दिलेली 'आझ्माइश' आहे. सकाळी ती परत कपडे बदलून घरी जाते. उरुसात मेंदीनं भरलेली ताटं जातात हिंदूकडून मुसलमानाकडे, शियाकडून सुन्नीकडे, बाईकडून तृतीयपंथीयाकडे... न संपणारं आहे हे.

याच्या लाल रंगात सिंधू नदी आहे संचारलेली. याला कोण बॉम्बनं शांत करणार!

लाली मेरे लाल कि, जित देखू उत लाल।
लाल देखन मै गई, मै भी हो गई लाल॥

चार चिराग तेरे बलन हमेशा
पंजवा बालन आइया बला झूलेलालन
सिंधड़ी दा, सेवन दा सखी शाहबाझ कलंदर
दमा दम मस्त कलंदर॥

(पूर्वप्रकाशित)

संदर्भ - Jhulelal or Zinda Pir: Of river saints, fish and flows of the Indus

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कालच चेपुवर वाचला होता. आवडला.

अपडेटः स्क्रोल डॉट इन वरचा तो लेख जास्त छान आहे. तुमच्या कामाविषयी आणखी लिहिलंत तर आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शिया द्वेष हा एक भाग झाला, पण पाकिस्तानातले इतरही कित्येक दर्गे यापूर्वीही बॉम्बने उडविले गेले आहेत. कट्टर सुन्नी / वहाबी मतानुसार कबरीची पूजा करणे निषिद्ध आहे असे असे कुराण सांगते , त्यावरून हे होत असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

धर्माचे काटेकोर पालन केल्यावर असेच होणार. ऐकलं काय जुना जमानावाले मंगळकर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धर्म असो वा घटना, काटेकोर शब्द मी कधी वापरला नाही. मी काय लिहितो ते तुला कळत वा आठवत नसेल तर प्रोग्राम मधे अजो प्रोसिजर कॉल करत जाऊ नकोस अशी नम्र विनंती.
=================
लेखिकेनं खरोखरच तिथला माहौल फार मस्त पुढे मांडलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या धाग्यावर धुळवड खेळायची इच्छा नाही, मात्र धर्म हा कसा भारी वगैरे जे लोक म्हणतात त्यांना उद्देशून एक पॉइंट मांडला, इतकेच. तेव्हा अजो प्रोसीजर वापरणे इथे नक्कीच समर्थनीय आहे. भावनाबिवना दुखावत असतील तर मात्र राहूदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे, तो तर हिंदू-मुसलमानांच्या पलीकडचा. दर्यापंथी हिंदू त्याला राजा भ्रतहरी मानतात; काही नवनाथांचा अवतार म्हणतात; काही झुलेलाल म्हणतात; काही जिन्दापीर म्हणतात; काही सुफी संत आणि कलंदर पंथाचा प्रमुख म्हणतात..

संध्याकाळ कलली की सेहवान शरीफ दर्ग्यात लोक घुमू लागतात, गाऊ लागतात, नाचू लागतात, धम्माल चढत जाते, भिनत जाते रक्तात. सईद, पीर, फकीर, मजहूब, सगळे एक होतात. हजीरी येतात; फकिरी येतात; संसारात बुडलेली बाई आपला बुरखा फेकून फकीर होऊन जीवघेण्या गिरक्या घेते निळ्या फरशीवर. 'लाल की मस्तानी' केस मोकळे सोडून गोलगोलगोलगोलगोल फिरते. म्हणते माझे सांसारिक आयुष्य माझ्या मुर्शिदने मला दिलेली 'आझ्माइश' आहे. सकाळी ती परत कपडे बदलून घरी जाते. उरुसात मेंदीनं भरलेली ताटं जातात हिंदूकडून मुसलमानाकडे, शियाकडून सुन्नीकडे, बाईकडून तृतीयपंथीयाकडे... न संपणारं आहे हे.

या शब्दांत धार्मिक लोकांचं देखिल बरंच वर्णन आहे. जगाने कितीतरी नावे ठेवलेल्या इस्लामचं पण आहे. त्यांचा लिबरलपणा, समावेशकपणा, लिंगनिरपेक्षता, तृतियलिंगी लोकांचा स्वीकार, उपधर्मांचा स्वीकार, इ इ बर्‍याच गोश्टींचं वर्णन आलं आहे. ही जुनी भारतीय परंपरा आहे. मला तिचं कौतुक आहे, आनंद आहे आणि अभिमान आहे. अशीच स्वीकार्यता ज्या कोणत्या विचारसरणीत आढळेल तिचा देखिल मला अभिमान असेल.
===============
धर्म काटेकोरपणे पाळावा असं किंवा असं सूचित करणारं मी कधी काय म्हणालो आहे? जगातल्या बर्‍याच लोकांना धर्म आवडतो त्यातला मी एक. जोवर तुमच्या "धर्म भारी नाही" किंवा काय त्या विचारसरणीत इतरांचा अनादर नाही, आम्हाला तिचापण आदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धर्म नामक गोष्टीचे इतके कौतुक असेल तर बाय एक्स्टेन्शन त्याच्या काटेकोर पालनाचेही असले पाहिजे. ते नसेल तर धर्माबद्दल मुळातच कौतुक नाही असेच दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कौतुक आहे म्हणा, नाही म्हणा, दुसरं काही आहे म्हणा, नाही म्हणा, काय धिंगाणा घालयचाय तो घाला. प्रत्येक माणसाला धर्म काटेकोर पाळतो का रे म्हणून विचारून "धर्माचे कौतुक असलेला" आणि "धर्माचे कौतुक नसलेला" अशी कपाळावर लेबले लावून या. पण मला क्षमा करा. माझ्यावर दया करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आस्तिक-नास्तिकता, होमो-हेटेरो, व्हेज-नॉनव्हेज, इ. बद्दलचा धिंगाणा हिरो कोण होता हे सर्वश्रुत आहे. Wink असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ती चूक झाली. आता पुन्हा करणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एका वेधक पण अपरिचित संस्कृतिसंगमाविषयी लिहिलेल्या लेखाबद्दल प्रथम अभिनंदन.
वाचून फार प्रसन्न वाटले.कोणताही धार्मिक भेदभाव न बाळगिता एका इष्ट देवते विषयी भक्ती असणे किती स्वाभाविक होते,यावर विश्वास बसत नाही.असे असणेच किती 'स्वाभाविक'हे आपण विसरूनच गेलो आहोत.
हे सर्व इतके लख्खपणे समोर मांडल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

एक बढीया धागा वाचायचा राहून गेला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विस्कळित, तरी वाचायला आवडला हा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हे गाणे ऐकायचे आहे. आज ऐकेन नक्की. अदिती ने अबिदा बाईंबद्दल चंगलं सांगीतलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0