माझी आजी

"लिव्ह योर बेस्ट लाइफ" या "ओ - द ऑपराह मॅगझिन" च्या अंकामधील एका लेखाचे भाषांतर. हा लेख त्यातील लहान लहान वाक्यशैली व मसुद्यामुळे मला खूप आवडला.
_______________________________________
मला आठवते एक वेळ होती जेव्हा कित्येक वर्षांपासून, माझा समज असा होता की प्रेम म्हणजे दुसरेतीसरे काही नसून केवळ उष्ण श्वास, दीर्घ चुंबन आणि आसक्तीपूर्ण मीठी आणि स्पर्शाची देवाणघेवाण यातच फक्त ते सामावलेले असते. पण मात्र जसजसा काळ सरत गेला, मी प्रगल्भ होत गेले. आज, आत्ता या टप्प्यावर मला प्रेमाचे काही आगळेच रुप गवसले आहे. कळले आहे की प्रेमाचे अन्य रुप हे वाट सरता सरत नसताना एकाने दुसर्‍याला दिलेली दूरवरची साथ, आधार, विश्वास हेसुद्धा आहे.

_____________________________________________________________

बालपणी, उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली रे झाली की मी व माझी बहीण आजोळी चक्कर मारत असू. कॅलिफोर्नियामधील "पॅरडाइज" नावाच्या गावात माझी आजी रहात असे.गाव नावाप्रमाणेच देखणे, वनश्रीने नटलेले खेडे होते.आमच्या सुटीमधील वास्तव्यात आमच्या आजीने आम्हाला काय शिकविले नाही?शिवणकाम म्हणा, विणकाम म्हणा की घरगुती डोनट बनविणे म्हणा सर्व काही शिकविले. हे सर्व तर शिकविलेच परंतु आमच्या आजोळी बेसिनच्या सिंकखाली टर्पेंटाइनचा बॉक्स, बरेचसे ब्रश व ३ डझन एनॅमल पेंटच्या बाटल्या होत्या.माझी बहीण व मी शास्ता तलावाकाठून शोधून शोधून आणलेल्या चपटोळक्या दगडांवर बेडूक व बदके रंगविण्यात दुपार व्यतित करत असू. आजीने ही कला सुद्धा आम्हास शिकवली होती. मला नाही वाटत तिच्याइतकी प्रेमळ व दक्ष आजी अन्य कोणास लाभली असेल.माझ्या आजीसारखी प्रेमळ व दक्ष आजी मिळायला खरच पुण्यच लागत असणार.ती नेहमी आजी सतत कोणत्या ना कोणत्या कामात म्हणा, छंदात म्हणा, पाहुण्यारावळ्यात, घाराची देखभाल करण्यात व्यग्र असे. आम्ही तिला टी व्ही पाहताना असेकधी पाहीलेच नाही.तिच्याकडे आमच्या आजोळीएक पाळीव कुत्रासुद्धा असल्याचे मला स्मरते होता त्याच्याशी खेळण्यातही वेळ कसा निघून जाई ते कळतच नसे..माझ्या स्टॅम्प गोळा करण्याच्या व देवाण घेवाण करण्याच्या छंदास ती मदत करत असे.मला, माझ्या वयाला साजेसा, पोस्टचे स्टॅप गोळा करण्याचा छंद जडला होता.माझी आजी या छंदामध्ये माझी मदत करत असे. अजुन एक प्रिय आठवण म्हणजे रात्री मी सिंकसमोर स्टूल घेऊन उभी रहात असे व आजी माझे लांबे केस हलकेसे लिंबू पिळलेल्या ऊन ऊन पाण्याने स्वच्छ धुवून देत असे.अशा अनेक मोहक, निरागस आठवणींचे कोलाज माझे आजोळचे वास्तव्य होते. आजोळच्या मातीत माझी मूळे घट्ट अगदी पक्की रोवली गेली ती याच काळात.

जसजसा काळ गेला तसतशा मात्र काळ जात गेला आणिआमच्या दोघींच्या भूमिकांची अदलाबदल होत गेली.पूर्वी आजी मला रपेटीला नेत असे , आता मी तिला चक्कर मारवून आणते.पूर्वी आम्ही दोघी वाचलेल्या पुस्तकांवर भरभरुन चर्चा करत असू, अजूनही करतो फरक एवढाच की पूर्वी ती मला पुस्तके वाचून दाखवित असे आता तिची नजर अधू झाल्याने, मी तिला मी लिहीलेली पुस्तके वाचून दाखविते.पूर्वी आम्ही एकत्र, नाटकांना जात असू ते मात्र अजुनही जातो. . पण तेव्हाही नाटक सिनेमात तिला रस म्हणावा असा कमीच होता. कोणते पात्र कोणती भूमिका करत आहे याची गल्लत अन गोंधळ उडून ती तेव्हाही चिडचिडेपणा करत असे.

१६ वर्षे आजी माझ्या आईबरोबर होती.त्या काळात आजीने दुर्दैवाचे दशावतार पाहीले. तिने काय पाहीले नाही! तिच्या आजीच्या डोळ्यांसमोर तिने तिच्या मैत्रिणी, ८ भावंडे व तिच्या पतीचा मृत्यू पाहीला.ती माझी आजी कशी तगली तिचे तिलाच ठाऊक. तिच्यासाठी आयुष्याचे रहाटगाडगे खूप चेंगटपणे व वेदनामय रीतीने त्या काळात सरकत होते आणि त्याचा निषेध म्हणून म्हणुन की काय ती खाण्यावर राग काढत असे.अगदी कृश, १०३ पौंडांची अशी ती झाली तेव्हा मात्र आम्ही नाइलाजाने तिला वृद्धाश्रमात दाखल केली.

कधी माझी आई तिच्याकडे चक्कर मारत असे तर कधी मी. आम्ही काळाची अशी वाटणीच जणू केली.आम्ही परस्परात जबाबदारी वाटून घेतली. मी गेले की बरेचदा आजीला माझ्या घरीच घेऊनच येत असे व पहाटे आंघोळीच्या वेळी, सिंकजवळ वाकायला आवून तिचे आता विरळ झालेले शुभ्र केस धुवून देत असे.आमची एक चाकोरीच (रुटीन) ठरुन गेली होती म्हणा ना.मी तेव्हासुद्धा कधी दगड पेंट दगडांवरती नक्षीकाम, रंगकाम करत असे व आजीला सोबत देत असे तर कधी काकवीची गरमा गरम ताजी बिस्कीटे बनवून तिला भरवत असे. तिला जरा विरंगुळा म्हणुन तिला बाहेर घेऊन जायचे मी कधी खरेदीला तिला घेऊन जात असे तर कधी वाणीसामान आणवयास आम्ही एकत्रच जात असू. तिच्या वेणीफणीबद्दल, आवरण्या बद्दल बोलायचे झाले तर माझे रुपांतर जणू त्या इवल्या इवल्या दक्ष इजिप्शिअन पक्षांतच झाले होते, जे मगरीच्या पाठीवर ऊभे राहून मगरीचे खवले चोचीने साफ करुन देत. मी तिला शांपू करत असे , नंतर कंडीशनर ने मसाज करुन ऊबदार टॉवेल तिच्या केसांना, डोक्याला बांधून शेक देत असे, नंतर ड्रायरने केस कोरडे करुन सुंदरशी वेणी निगुतीने घालून देत असे. मग हनुवटीवरची लव काढण्याची पाळी. आजीला स्वयंपाकघराच्या खिडकीसमोर सोनेरी कवडशात बसवून मी ट्वीझरने तिच्या हनुवटीवरची लव काढून देत असे. आजीही हे सर्व हक्काने करवून घेइ, मध्येच हनुवटीवरुन हात फिरवत हक्काने ती एखादा चुकार केस माझ्या लक्षात आणून देई "हा बघ हा राहीला." नंतर तिची नखे कापून , तासून (फाईल करुन) व तिचा मूड बघून मी रंगवूनही देत असे. नंतरची पावलांची मालीश हा माझ्या आजीचा आवडीचा कार्यक्रम असे. माझ्यकडे निळा मोठ्ठा असा चीनी मातीचा सूपचा बोल होता. त्यात कोमट पाणी घेऊन, किंचित सुगंधी सफरचंदाचे सायडर व्हिनेगर घालून मी आजीची पावले त्यात १५ मिनीटे वा तत्सम वेळ बुडवून ठेवत असे. तिच्या पावलांची नखे नरम पडली की पाय बाहेर काढून कोमट टॉवेलने पुसून मग मी लव्हेंडर तेलाने त्याची मालीश करुन देई.

या संदर्भात बायबलमधील एक वाक्य मला पक्के स्मरते - दुसर्‍याची पावले मालीश आदि करुन सेवा करणे हे सर्वात मोठ्या विनम्रतेचे व साधेपणाचे लक्षण वा खूणगाठ आहे असे काहीसे ते वाक्य आहे. अजूनही मला जेव्हा लोकं म्हणतात की किती ग्लॅमरस आयुष्य तू जगतेस तेव्हा मनातल्या मनात आजीच्या पवलांची केलेली ही सेवा आठवून मी हसते. मला आठवते क्वचित मी नखे कापू लागण्याआधीच, दुखेल या भीतीने आधीच आजी लहान मुलीसारखी आरडाओरडा करते. मध्यंतरी मला कोणीतरी सांगीतले की वृद्धाश्रमातच "फॅन्सी पेडीक्युअर" ची सुविधा उपलब्ध आहे. मी खूप आनंदाने आजीला घेऊन तेथे गेले. सगळे सोपस्कार होईपर्यंत मी आजीजवळच होते. सगळे पार पडल्यावर निघताना आजी कुरकुरली "मला अनोळखी लोकांच्या हाती माझी पाय सोपवायला कसेसेच वाटते. तुला होत नसेल तर मला सांग, मी पाहते काय करायचे ते." आता आजीला स्वहस्ते पायाची काळजी घेणे हे तिच्या वयोमानानुसार तिला शक्य नाही हे ती देखील जाणून होती. त्यामुळे परत ये रे माझ्या मागल्या झाले.

पूर्वी जेव्हा आजीच्या बटव्यात पैसे असत व आम्ही एकत्र खरेदीला जात असू तेव्हा मी तिला सुटी नाणी नीट मोजून देत असे. आजीला त्याचे मोठे कौतुक होतेआजीला त्या लहानशा कृतीचेही किती अप्रुप होते, किती कौतुक वाटे.. अगदी ठेल्यावरच्या (काऊंटर) अनोळखी मुलीला ती मोठ्या कौतुकाने सांगे, "गुणाची हो माझी नात.ती नसती मी काय केले असते बरे?" पण मग माझ्याकडे वळून काळजीने ती विचारत असे "माझं सगळं तू करतेस ग माझी बाय पण माझ्या वयाची तू होशील तेव्हा तुझं कोण करेल गं?" आणि ते खरंही होतं. मला ना मूल ना नवरा. पण मला ते नकोही वाटते.खरच मी म्हातारी झाले की माझी नखे कोण कापणार, कानातला मळ कोण काढणार अन हनुवटीवरची लव कोण काढून देणार हा प्रश्नच आहे. पण माझी काळजी कोणीतरी घ्यावी या हेतूपोटी मी मुलांना जन्म देणार नाही हे नक्की. आणि तसेही पाहता आता मी ३९ वर्षाची आहे पण मी ९४ वे वर्ष पाहीन याचा काय भरोसा? आयुष्याच्या धुमश्चक्रीत कारचे अपघात आहेत, कर्करोगासारखे रोग आहेत , अनेक संकटे आहेत. ९४ वर्षे पूर्ण व्हायच्या आत माझा घास घेतला जाऊ शकतोच.

पण तिच्या या प्रश्नावर मी तिचा हात हातात घेउन तिला विश्वास देत असे की "का गं काळजी करतेस? तुझी नात रग्गड पैसा बाळगून आहे बघ.मी किनई म्हातारपणी माझ्या दिमतीला एक नात भाड्याने घेणार आहे. ती जगातील सर्वात गुणी नात असेल. मी तुझी जितकी काळजी घेते तिच्या १० पट जास्त ती नात माझी काळजी घेईल. मी मरतेवेळी माझी संपत्ती तिच्यासाठी सोडून जाईन. आता कळला तुला माझा बॅक अप प्लॅन?" हे माझी बोलणे तिला पटून जात असे आणि हायसे होऊन, माझा हात दाबत ती उद्गारे "मोठी शहाणी आहेस ग तू. नकोच अडकूस मुलाबाळांच्या पसार्‍यात." पण तिच्या या शब्दांमागला अर्थ मला कळत असे. तिला म्हणायचे असे "मी तुझी एकमेव लेक...मला कुण्णी कुण्णी वाटेकरी नको."

पण एक गोष्ट मात्र चांगली झाली, वृद्धाश्रमाच्या वातावरणात आजीने खाण्यापीण्याशी परत दोस्ती केली. एक दीड वर्षात तिने चांगले बाळसे धरले. आम्ही जेव्हा रुटीन चेक अपला डॉक्टरांकडे गेलो तेव्हा ती १८० पौंड भरली. त्या आकड्यावर तिचा विश्वासच बसेना. "काय! अगं काय हे!मला स्वेटर काढून परत वजन करु देत बरं." यावर मी मिष्कीलपणे हसत म्हणाले "७५ पौंडाचा स्वेटर की काय तुझा?" त्यावर लटक्या रागाने ती म्हणाली "लोकरीचा आहे. असूही शकतो." असो. डॉक्टर मात्र तिने धरलेल्या बाळशावर खूष दिसले. तिचा मधून मधून जाणवणारा स्म्रुतीभ्रंश व अधू नजर सोडता तिची तब्येत टुणटुणीत आहे व ती नक्की शंभरी पार करेल याची मला खात्री आहे.

माझ्या लहानपणी आजी बाथटबमध्ये माझी पाठ स्क्रबरने घासून देत असे.आणि पाठ घासता घासता चिंता करत पुटपुटत असे "मी पुढची १० वर्षे तरी बघेनसे वाटत नाही." आता ९४ व्या वर्षी ती बाथटबमध्ये असते आणि मी तिची गोरी गुलाबी पाठ घासून देते. हो मला माहीत आहे की वृद्धाश्रमात आजीच्या ऊन ऊन स्नानाची सुव्यवस्था आहे पण पाण्याचा शेक देत तिच्या नातीने तिला मायेने स्नान घालणे यातील प्रेमाची सर त्या व्यवस्थेला थोडीच येईल? माझे तिच्यावर अतोनात प्रेम आहे, ती माझी आहे, माझाच एक हिस्सा आहे.

मला आठवते एक वेळ होती जेव्हा कित्येक वर्षांपासून, माझा समज असा होता की प्रेम म्हणजे दुसरेतीसरे काही नसून केवळ उष्ण श्वास, दीर्घ चुंबन आणि आसक्तीपूर्ण मीठी आणि स्पर्शाची देवाणघेवाण यातच फक्त ते सामावलेले असते. पण मात्र जसजसा काळ सरत गेला, मी प्रगल्भ होत गेले. आज, आत्ता या टप्प्यावर मला प्रेमाचे काही आगळेच रुप गवसले आहे. कळले आहे की प्रेम अन्य रुप हे वाट सरता सरत नसताना एकाने दुसर्‍याला दिलेली दूरवरची साथ, आधार, विश्वास हेसुद्धा आहे..

मी आजीला टबमधून बाहेर येण्यास मदत करते. माझे हात व झगा पाण्याने भीजला आहे पण आजीला थंडी लागू नये म्हणून मी कोरडा टॉवेल तिच्यासमोर धरते. मी हातावर गुलाबाच्या मंद सुगंधाचे लोशन घेऊन तिच्या पाया - पाठीवर चोळू लागते व आजी विचारते "काय आहे ग ते? कसला वास येतो आहे इतका छान?" मी तिला लोशनचे नाव सांगते. ती म्हणते "कधी ऐकलं नाही पण बरं वाटतय." आणि मी समाधानाने मनाशी म्हणते "लोशन आवडणं हेच तिच्यातील जीवनावरच्या प्रेमाचे लक्षण आहेनाही काय!

---------अन्यत्र पूर्वप्रकाशित---------------------------

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

एक नंबर लिहिलंय! भाषांतर आहे असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थअँक्स बॅट्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषा फार ताठर आणि औपचारिक झाल्ये. कुणा अधिकारी माणसाला विनंतीपत्र लिहिल्यासारखी. 'चपटोळके दगड' हा शब्दप्रयोग आजीबद्दलच्या लेखात योग्य वाटला तरी बाकी बरेच शब्द आणि क्रियापदांची रूपं अवघडल्यासारखी झाल्येत. तसे बदल करून पाहावं, असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूपच गोड लिहीलंय ब्वॉ! पण बारीकशी गोष्ट अशी, की बर्‍याच वाक्यांत इन्ग्रजी व्याकरणाचा प्रभाव दिसतो. तुम्ही फारच 'स्ट्रिक्टली' भाषांतर करायचा प्रयत्न करताय वाटतं.
उदा. 'मला आठवते...' ह्या ओळीमध्ये 'मला आठवते एक वेळ होती' ऐवजी 'एकेकाळी मला वाटायचं...' अशी सुरुवात झाली असती तर ते जास्त 'मराठी' वाटलं असतं.

बाकी लेख खूपच छान. स्वेटरवाला किस्सा खूपच गोड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

होय अदिती आणि तुम्हाला काय म्हणायचय ते कळतय मला. तुम्ही एक पाऊल जाऊन कसे हवे होते याचे उदाहरण दिल्याने फार आवडले. व अधिक यथार्थतेने समजले.बाकी खरा लेख वाचला आणि मी इतकी लट्टू झाले त्या लेखावर. ताबडतोब भाषांतर केले. नंतर फिनिशिंग टचेस दिले नाहीत. ते द्यायला हवे होते का का असे वाटते नव्हे पाहीजेच होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग करून टाक. लेख संपादनाची सोय यासाठीच तर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्ट्राइक ऑफ करुन करेन सो गुणवत्तेतील फरक कळेल आणि मला त्या व्हिझिबिलिटीमुळे, मोटीव्हेशन राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजीची गोष्ट आवडली. एखादा व्याकरणाचा पांढरा केस राहतो तो राहू दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजीची गोष्ट आवडली. एखादा व्याकरणाचा पांढरा केस राहतो तो राहू दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! काय मस्त उपमा आहे. धन्यवाद अचरटजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त उपमा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छानच ऊतरला आहे अनुवाद. मनापासून केलाय ते जाणवतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान...

आजीची गोष्ट आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

धन्यवाद श्री. तेलंग आणि हारुन शेख जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी पण कृत्रिम अनुवाद वाटतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!