होर्हे लुईस बोर्हेसचा बोका - बेप्पो (क्रमांक २)

(स्फूर्ती : मिलिंद यांच्या लेखनाचा दुवा)

Beppo Beppo बेप्पो
--- --- ---
El gato blanco y célibe se mira The celibate white cat surveys himself शुभ्र विरक्त बोका बघतो स्वतःला
en la lúcida luna del espejo in the mirror's clear-eyed glass, तेजःपुंज चंद्रबिंबात आरश्याच्या
y no puede saber que esa blancura not suspecting that the whiteness facing him नि कळेना त्याला - ही सफेदी
y esos ojos de oro que no ha visto and those gold eyes that he's not seen before नि सोनेरी डोळे - न पाहिलेले कधी
nunca en la casa son su propia imagen. in ramblings through the house are his own likeness. घरात - प्रतिबिंबच आहे आपले.
¿Quién le dirá que el otro que lo observa Who is to tell him that the cat observing him कोण त्याला सांगणार, की निरखणारा तुला
es apenas un sueño del espejo? is only the mirror's way of dreaming? तो दुसरा आहे मात्र आरश्याचा स्वप्नातला?
Me digo que esos gatos armoniosos I remind myself that these concordant cats — म्हणतो मलाच, हे बोके वादी-संवादी
el de cristal y el de caliente sangre, the one of glass, the one with warm blood coursing — एक गरम रक्ताचे, नि एक बिलोरी,
son simulacros que concede el tiempo are both mere simulacra granted time टिचक्या प्रतिकृती दिल्या आहेत काळाने
un arquetipo eterno. Así lo afirma, by a timeless archtype. In the Enneads एका कालातीत साच्याच्या - म्हटल्याप्रमाणे
sombra también, Plotino en las Ennéadas. Plotinus, himself a shade, has said as much. एन्नियाडात (पुसट बिचार्‍या) प्लोटिनसने.
¿De qué Adán anterior al paraíso, Of what Adam predating paradise, जन्नतेच्याही पूर्वीच्या कुठल्या आदमाचा,
de qué divinidad indescifrable of what inscrutable divinity कुठल्या अनाकलनीय दैवताचा
somos los hombres un espejo roto? are all of us a broken mirror-image? फुटका आरसा आहोत आपण माणसे?
--- --- ---
Jorge Luís Borges Translated by Alan S Trueblood भाषांतर : धनंजय
--- --- ---
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भाषांतर उत्तम झाले आहे. आता मला वेगळाच मुद्दा मांडायचा आहे; अशा भाषांतरात मराठी सेन्सिबिलिटी कशी उतरवता येईल ? भाषांतर अजूनही "भाषांतर"च वाटते आहे. कवितेतले संदर्भच पाश्चिमात्य आहेत हे खरे असले तरी ते मूळ मुद्दा (कोणता?) मांडण्यासाठी त्यांची गरज आहे असे मला वाटत नाही . " काव्य म्हणजे जे भाषांतरात उतरू शकत नाही ते" या उक्तीला थोडाफार तरी शह दिला पाहिजे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

उदाहरणार्थ :
---
आरशात डोकावतंय मांजर,
कळतंय का त्याला - समोरचं
सोनेरी डोळ्यांचं शुभ्र पाहुणं
बिलोरी स्वप्न आहे नुसतं?
काचेचं काय, केसांचं काय
मिथ्या नि मांसवसादिविकारच
असं म्हणतात शंकराचार्य.
आहोत आपण माणसं
मनूहून प्राचीन अशा
कोणत्या परब्रह्माची
मायावी आरशातली
वठलेली सोगं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणताही पाश्चिमात्य प्रभाव नाही! मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

धनंजय यांचं मूळ भाषांतर आवडलं, पण मी त्यातल्या अोळी ‘सरळ’ केल्या असत्या (आरशाच्या स्वच्छ टकटकीत काचेत // विरक्त पांढरा बोका स्वत:ला न्याहाळतो).

> आता मला वेगळाच मुद्दा मांडायचा आहे; अशा भाषांतरात मराठी सेन्सिबिलिटी कशी उतरवता येईल ?

पण ‘मराठी सेन्सिबिलिटी’ ही कल्पना रुचली नाही. ‘पाश्चिमात्य’ संदर्भ मराठीला दूरचे आणि भारतीय तत्त्वज्ञानातले जवळचे हा ग्रह आपण जितक्या लवकर सोडून देऊ तितकं बरं होईल. बहुश्रुत माणसाला अादम कोण हे माहित असतं, त्याहीपेक्षा बहुश्रुत माणसाला इनियडस काय आहेत हे माहित असतं. त्याचा मराठी येण्या न येण्याशी संबंध नाही. खुद्द बोर्हेस हाताला लागेल ते वाचत असे. ते पाश्चिमात्य आहे की पौर्वात्य आहे की दक्षिण अमेरिकेत्य हा आपपरभाव त्याच्यात नव्हता.

सोपं कोडं: युरोपला कुठलं शहर जास्त जवळ आहे? ब्युएनोस आयरीस की पुणे?
हिंट: युरोपातला कुठलाही बिंदू घेतला तरी उत्तरात फरक पडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

पाश्चिमात्य’ संदर्भ मराठीला दूरचे आणि भारतीय तत्त्वज्ञानातले जवळचे हा ग्रह आपण जितक्या लवकर सोडून देऊ तितकं बरं होईल.
Isn't the Latin American, Argentine civilization (at least predominantly) Judeo-Christian ? Isn't Pune very, very far from Judeo-Christian , compared to B.A.? I mean, what do we share? I understand that from a globalist, non-sectarian perspective, it is bad/wrong/counterproductive to make such a distinction. But isn't poetry about culture, and thus about history?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

या द्विभाजनाबाबत काळजी घ्यायला हवी. ग्रीक तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान यांच्यात प्राचीन काळात काही थोडी प्रवासी देवाणघेवाण झालेली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला काळाच्या नदीतील प्रतिबिंब अधिक सुसंगत वाटले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ स्पॅनिशात अधूनमधून बोर्हेस वाक्यातील पदांचा नेहमीचा क्रम मागेपुढे करतो. त्यामुळे ही चमत्कृती बोर्हेसला नॉन-व्हर्बल अर्थवाहनाकरिता अपेक्षित होती, आणि त्याचे हे तंत्र भाषांतरातही आणावे, असा निर्णय मी घेतला. ("पूर्ण भारतीय" रचनेत फक्त मांजर-आरसा दृष्टांत घेतला. तत्त्वज्ञानचा मुद्दाच वेगळा असल्यामुळे या स्वतंत्र रचनेत मी सामान्य मराठी क्रम वापरणे निवडले.)

ट्रूब्लड इंग्रजी भाषांतरात "क्लिअर आइड मिरर" म्हणतो, आणि त्याचे त्याच्याकरिता ठीकही आहे.

परंतु स्पॅनिश मूलरचनेतला आरशाचा चंद्र मराठीत आणायचा की नाही, हा निर्णय मी स्वतंत्रपणे घ्यावा लागणार. इंग्रजी भाषांतरातील इंग्रजीपुरते-मान्य-करण्यालायक-तरी-मुळात-नसलेले बदल मराठीकरिता कदाचित अयोग्य ठरले असते. म्हणून भाषांतर करताना मी मुद्दामून "इंग्रजी अजिबात बघायचे नाही" हे तंत्र अंगीकारले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुवाद आवडला.

अवांतरः
१. बोर्हेसला समकालीन असणार्‍या श्रॉडिंगरचा एकसमयावच्छेदी-मार्जार-विचार-प्रयोग म्हणजे एका अर्थी या कवितेची मिरर इमेज म्हणता येईल Smile

२. इंग्लिश 'mirror' आणि स्पॅनिश क्रियापद mirar (पाहणे) यांचे लॅटिन मूळ एकच. मूळ स्पॅनिश कवितेतल्या पहिल्या ओळीतही तो शब्द आला आहेच ((स) se mira). Ad-mire, mirage अशा इतर शब्दांतही हे दिसतं. त्याच वेळी, स्पॅनिशमधला आरशाचा प्रतिशब्द espejo हा लॅटिन speculumशी संबंधित. इंग्लिशमधले यासंबंधित शब्द म्हणजे speculate, spectator इत्यादी. भास/आभास, पाहणे/निरखणे, बिंब-प्रतिबिंब या सार्‍या छटा दोन्ही प्रतिशब्दांत (आणि त्यांच्याशी संबंधित शब्दांत) सामावल्या आहेत. काहीसं अवांतर असलं, तरी प्रस्तुत कवितेच्या संदर्भात याचा उल्लेख करावासा वाटला.

३. *पार्डन द पन; मात्र युसुफ/जोसेफ-Giuseppe-Beppo हा प्रवास मजेदार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि अर्थाचे कंगोरे दाखवणारे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"is only the mirror's way of dreaming?" ह्याचे पहिल्या धाग्यातलेच भाषांतर अधिक सहज होते, आणि अर्थवाहीपण, असं वाटतं (अगदी विनम्र प्रतिक्रीया)._/\_

त्याउलट 'वादी-संवादी' हे खूपच आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय संगीतशास्त्रातले वादी-संवादी हे पाश्चात्त्य संगीतशास्त्रातल्या "harmony (armoniosos)"शी काहीसे संबंधित आहेत, शिवाय बोका आणि प्रतिबिंब एकमेकांकडे बघणारे वादी संवादी आहेत - दुहेरी अर्थ साधणारे चपखल भाषांतर सापडले की मस्त वाटते. तुम्हालाही आवडले, धन्यवाद. खरे म्हणजे पाश्चिमात्य संस्कृती जवळ असल्यामुळे इंग्रजी भाषांतरकाराने नेट लावून संगीतशास्त्रीय शब्द वापरायला हवा होता, असे मला वाटते, परंतु त्याने "concordant" असा शब्द वापरला.

आता "way of dreaming" बाबत.
पहिले इंग्रजीचे भाषांतर आहे, दुसरे स्पॅनिशाचे.
"is only the mirror's way of dreaming?" हे इंग्रजी भाषांतरकाराने बदललेले वाक्य आहे. मूळ स्पॅनिशात तसे नाही आहे. ("es apenas un sueño del espejo?" आता केलेले साधे इंग्रजी भाषांतर "is barely a dream of the mirror"). इंग्रजी भाषांतरकाराने आरशाला स्वप्ने बघायची पद्धत (way of dreaming) दिली, परंतु हे नाविन्य त्याच्या स्वतःच्या हिमतीने त्याने भाषांतरात आणलेले आहे.

गंमत म्हणजे मी आणि मिलिंद दोघांनी "आर्शाचे स्वप्न""आरशाला पडलेले स्वप्न" असेच वापरले - मुळातल्यासारखे.

मी मुळातल्यासारखे भासमान वृत्त-यमकाचे बंधन स्वीकारले, म्हणून वाक्यरचनेत काही फरक येतात, खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषांतरामागचे स्पष्टीकरण वाचून अजून मज्जा आली. मला स्पॅनिश येत नसल्यामुळे, अर्थ कळण्यासाठी माझे २ टप्पे पडले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0